Shridattdham Yatra Parivar

Shridattdham Yatra Parivar Arrange yatras to all Shri Datta guru places

गण गण गणात बोते 🙏🙏🙏जय गजानन 🙏
21/04/2024

गण गण गणात बोते 🙏🙏🙏
जय गजानन 🙏

17/04/2024

अयोध्यापती
सियावर रामचंद्र की जय
🚩🚩🚩

26/03/2024

श्रीदत्तगुरूंच्या कृपेने
गिरनार - सोमनाथ
यात्रा सफल संपन्न...
परतीचा प्रवास सुरू 🚉

श्री लिंगराज मंदिर...
18/03/2024

श्री लिंगराज मंदिर...

माणगाव दर्शन 🙏🙏🙏श्रीपाद श्री वल्लभ नरहरी दत्तात्रेया दिगंबरावासुदेवानंद सरस्वती सद्गुरूनाथा कृपा करा
23/02/2024

माणगाव दर्शन 🙏🙏🙏

श्रीपाद श्री वल्लभ नरहरी दत्तात्रेया दिगंबरा
वासुदेवानंद सरस्वती सद्गुरूनाथा कृपा करा

श्री पंत महाराज, बाळेकुंद्री, बेळगाव 🙏🙏🙏💐श्रीदत्तधाम यात्रा परिवार💐
22/02/2024

श्री पंत महाराज, बाळेकुंद्री, बेळगाव 🙏🙏🙏

💐श्रीदत्तधाम यात्रा परिवार💐

गाणगापूर अभिषेक आणि दर्शन 🙏🙏🙏
20/02/2024

गाणगापूर अभिषेक आणि दर्शन 🙏🙏🙏

शालिवाहन शिवमंदिर येथून दिसणारे महेश्वरचे विलोभनीय दृष्य...
29/01/2024

शालिवाहन शिवमंदिर येथून दिसणारे महेश्वरचे विलोभनीय दृष्य...

.                     💐श्रीदत्तधाम यात्रा परिवार💐                                      संयोजित                       🚩 च...
13/01/2024

. 💐श्रीदत्तधाम यात्रा परिवार💐
संयोजित

🚩 चारधाम दर्शन यात्रा 🚩

यात्रा कालावधी - 20 जून ते 3 जुलै 2024
सहभाग मूल्य - रू. 38,500/- + रेल्वे किंवा विमान तिकीट
यात्रा मुंबई येथून सुरू होईल ( मुंबई ते मुंबई )

सविस्तर माहिती साठी व यात्रेत सहभागी होण्यासाठी खालील लिंक वापरून व्हॉट्सॲप चां ग्रुप जॉईन करावा.

https://chat.whatsapp.com/EGNwzhqqfF97hborQ1s4Af

जय बद्रिविशाल 🙏🚩🙏

श्रीदत्तधाम यात्रा परिवार संयोजीत श्री सौर याग वेळी यज्ञवेदी मधे श्रीदत्तप्रभूंचे अग्नी स्वरूपात दर्शन...श्रीगुरुदेवदत्त...
10/01/2024

श्रीदत्तधाम यात्रा परिवार संयोजीत श्री सौर याग वेळी यज्ञवेदी मधे श्रीदत्तप्रभूंचे अग्नी स्वरूपात दर्शन...
श्रीगुरुदेवदत्त...

23/12/2023

जयघोष करा दत्तनामाचा
अनुभव येईल
कृतार्थतेचा
🙏🙏

17/11/2023

दिवाळीनंतरच्या प्रतिवार्षिक गाणगापूर,कडगंची, अक्कलकोट यात्रेकरिता प्रयाण...
श्रीगुरुदेवदत्त 🙏🙏

01/11/2023

श्रीदत्तधाम यात्रा परिवार संयोजित
होळी पौर्णिमा गिरनार -सोमनाथ यात्रा
1 ते 26 मार्च 2024

गिरनार कोजागिरी पौर्णिमा चंद्रोदय दर्शनजय गिरनारी 🙏🙏🙏
27/10/2023

गिरनार कोजागिरी पौर्णिमा चंद्रोदय दर्शन

जय गिरनारी 🙏🙏🙏

*द* दत्तगुरूंच्या*स* सहवासात*रा* राहणेम्हणजे *दसरा*....विजयादशमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 💐💐
24/10/2023

*द* दत्तगुरूंच्या
*स* सहवासात
*रा* राहणे
म्हणजे *दसरा*....

विजयादशमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 💐💐

.                        🙏🏼 श्रीगुरुदेवदत्त🙏🏼४ दत्तावतार दर्शन यात्रा वृत्तान्त 👉🏽                          🌷 चतुर्थ पुष...
17/10/2023

. 🙏🏼 श्रीगुरुदेवदत्त🙏🏼

४ दत्तावतार दर्शन यात्रा वृत्तान्त 👉🏽

🌷 चतुर्थ पुष्प 🌷

संस्थानस्य यशोऽवलक्षपटलं तन्वन्भ्रमन्तं क्षितौ
अद्वैतामृतवर्षणैस्स्वजनतातापापहं तं कविम्।
शिष्टैर्दिष्टविशिष्टमार्गसरणं श्रीज्ञानराजं गुरुं
माणिक्यप्रभुमाश्रयामि परमं शं नो भवेत्सर्वदा।।

श्री माणिक प्रभूंच्या नगरीमध्ये आमचे वास्तव्य होते.श्रीदत्तगुरूंच्या चार अवतारांपैकी श्री माणिक प्रभू हे एक अवतार.सकलमत संप्रदाय ची स्थापना श्रींनी केली.श्री स्वामी समर्थ महाराज,श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज,श्री साई बाबा यांची श्री माणिक प्रभू यांच्या बरोबर भेट झालेली आहे.श्री माणिक प्रभू हे राजयोगी होते.त्यांच्या काळात या क्षेत्रात प्रचंड अन्नदान होत होते.तीच प्रथा आजही सुरू आहे.श्रींनी अगणित लीला इथे केलेल्या आहेत.बऱ्याच जणांना श्री माणिक प्रभू यांच्या विषयी जास्त माहिती नाही.सोलापूर - हैद्राबाद रोडवर हुमणाबाद जवळ हे तीर्थक्षेत्र आहे.सोलापूर पासून फक्त अडीच तासाच्या अंतरावर माणिक नगर आहे.जे अद्याप या क्षेत्री गेलेले नसतील त्यांनी अवश्य जाण्याचे योजावे.मंदिरात अपार शांतीचा अनुभव निश्चित मिळतो.
काल रात्री लवकर झोपल्यामुळे पहाटे खूप लवकर जाग आली.फ्रेश होऊन तासभर छान साधन घडले.तासभर साधनानंदात मस्त होतो.6 वाजता रूमवर चहा आला.मस्तपैकी दोन कप उष्णोदक घेऊन त्या आनंदात तल्लीन झालो.फ्रेश वगैरे होऊन सगळेजण सातच्या सुमारास मंदिरात आलो.भक्त निवास पासून चालत फक्त पाच मिनिटाच्या अंतरावर मंदिर आहे.दर्शन घेऊन सभा मंडपात बसलो आणि स्तोत्र पठण,भजन,पदे असे त्या शांत वातावरणात म्हणत बसलो.सर्व ग्रुप त्या वातावरणाशी समरस झालेला होता.आठच्या सुमारास अन्नछत्र मधून गुरुजी आम्हाला बालभोग साठी बोलविण्यास आले.तासभर आमची छान सेवा घडली.आता पोटपूजा करण्यासाठी बालभोग घेणे गरजेचे होते.सुंदर चविष्ट उप्पिट व त्यावर कच्च्या टोमॅटोची चटणी.त्या सुंदर नाश्त्याला योग्य तो न्याय देऊन आम्ही भक्त निवास कडे निघालो.संस्थानच्या ऑफिस मध्ये अन्नदान साठी छोटीशी धनराशी अर्पण केली.इकडे बॅग तयार होत्या,त्या जीप वर चढविल्या आणि जय गुरु माणिक चा गजर करीत कडगंची कडे प्रयाण केले.
जीप मधे गप्पा मारीत,गाणी ऐकत प्रवास सुरू होता.11:30 वाजता कडगंची येथील श्रीदत्त मंदिरात पोहोचलो.श्री आप्पाजी यांचे नातू आनंदजी यांना अगोदरच सांगून आम्हा सर्वांची महाप्रसादची व्यवस्था येथेच केली होती.आनंदजी आमची वाटच पहात होते.हात पाय धुवून मंदिरात प्रवेश केला.अगोदर सर्वांना दर्शन घ्यायला सांगितले.सर्वांचे दर्शन होईपर्यंत आरतीची तयारी केली.आरती करायच्या अगोदर आनंदजी यांनी आत बोलावले आणि सोन्याचा मुकुट माझ्या हाती देऊन श्रीदत्त प्रभूंना तो घालायला सांगितले.हा अगदी अनपेक्षितपणे पुण्यलाभ सद्गुरूंच्या कृपेने घडला.मुकुट घातल्यावर कोणीतरी एकजण फोटो काढून घ्या म्हणून त्यांनी परवानगी दिली.सोन्याचा मुकुट धारण केलेले श्रीदत्तप्रभूचे रूप अतिसुंदर दिसत होते.दोघा तिघांनी पटकन फोटो काढून घेतले.नैवैद्य समर्पण करून आरती संपन्न केली.सर्वांना आरती,प्रसाद दिला.मंदिर परिसरातील इतर दर्शन होईपर्यंत आप्पाजी मंदिरात आले.थोडावेळ त्यांनी सत्संग केला.सत्संग झाल्यावर सर्वांना गर्भगृहात जाऊन श्रीदत्तप्रभूंचे चरणस्पर्श करून नमस्कार करण्याची परवानगी दिली.सर्वांनी शांततेत रांगेत उभे राहून चरण स्पर्श करीत परत एकदा दर्शन घेतले.सर्वजण बेहद खूष झाले होते.प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.नंतर दोन पंगतीत मिळून आम्ही सर्वांनी महाप्रसाद घेतला.सर्व स्वयंपाक चुलीवर केलेला असल्यामुळे अतिशय चविष्ट झालेला होता.पोळी,चटणी,लोणचे,आमटी,भाजी,खीर,भात असा साधाच पण रुचकर महाप्रसाद घेऊन आम्ही सर्व तृप्त होऊन गेलो.येथील अतिशय सुंदर अनुभव पदरी बांधून आम्ही नंतर गाणगापूर कडे प्रयाण केले.
कडगंची - गाणगापूर अंतर फक्त 40 किमी आहे.पाऊण तासात आम्ही गाणगापूर येथे संगम रोड वरील हेरिटेज हॉटेल मधे पोहोचलो.रूम मध्ये शिफ्ट होऊन फ्रेश झाले सगळे.चहापान करून घेतले आणि संगम वरील मंदिरात दर्शन साठी निघालो.भीमा अमरजा संगम,अश्वत्थ वृक्ष आणि मंदिर दर्शन करून घेतले.काही जणांनी नदीत नौकानयनचा आनंद घेतला.परत हॉटेलवर येईपर्यंत गुरुजी आमची वाट पहात थांबले होते.उद्याचे ज्यांचे अभिषेक करायचे होते त्यांना माहिती देऊन त्यांची नोंद करून ते गेल्यावर आम्ही निर्गुण मठात दर्शन आणि पालखी सोहळा साठी निघालो.हॉटेल पासून निर्गुण मठ मधल्या रस्त्याने फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर आहे.सर्वांना मंदिरात घेऊन गेल्यावर मी दर्शन घेऊन लगेच परत हॉटेलवर आलो.बाकी सगळे पालखी सेवा करून 9 वाजता परत आले.गाणगापूर मधे प्रवेश करताना एन्ट्री नाक्याच्या मागे एक चांगला ढाबा आहे.तिथे आजची जेवणाची व्यवस्था केलेली होती.जेवण करून हॉटेलवर परत आलो.उद्याच्या कार्यक्रमाचे वेळापत्रक सांगितले आणि रूमवर येऊन दाखल झालो. आवराआवर करून पटकन निद्रादेवीला शरण गेलो.

इति चतुर्थ पुष्प श्रीगुरुदत्तात्रेयार्पण अस्तू...
🙏🏼🙏🏼🙏🏼

13/10/2023

🌻🌹 १३ ऑक्टोबर - निष्ठा बलवत्तर असावी. 🌹🌻

पोथीची समाप्ती झाली, म्हणजे ऐकण्याचे संपून कृतीत उतरण्याची वेळ आली असे समजावे. पोथी ऐकण्याचा मोबदला पुराणिकाला पैका दिल्याने मिळत नाही; तो असा असावा की दोघांचेही कल्याण होईल. भगवद्‌भक्ति करणे हा खरा मोबदला आहे.
जगात अशा कितीतरी गोष्टी आहेत की त्यांचे ज्ञान आपल्याला होत नाही; पण म्हणून काही आपण त्या खोट्या नाही मानीत.

आपण आपल्या तुटपुंज्या ज्ञानाचाही अभिमान धरतो हे चुकते आपले. भगवंताने ज्ञान दिले, आणि आम्ही त्याचा अभिमान धरू लागलो, तर हातात तरवार दिल्यावर शत्रूचे शिर कापण्याऐवजी आपलीच मान तोडल्यासारखे झाले ! ज्या विद्येने स्वतःचे हित कळत नाही, ती विद्या नसून अविद्याच होय.

जे खरे नाही ते खरे आहे असे वाटणे, हे अज्ञान होय. अविद्या आणि अज्ञान दोन्ही सारखेच. परमात्म्याच्या स्वरूपाविषयी आपण संशय घेतो हे आपले अज्ञानच होय.
देव आपल्याला आणि आपल्या कृतीला पाहतो ही जाणीव असणे, म्हणजे ज्ञान होय.

प्रत्येकाला त्याची गरज भागेल एवढे भगवंत देतच असतो. म्हणून आहे त्यात समाधान ठेवावे. ज्याचे समाधान भगवंतावर अवलंबून आहे त्याचे समाधान कोणत्याही परिस्थितीत टिकेल.
आपली निष्ठा अशी बलवत्तर असावी की तिच्यामुळे आपले समाधान राहील. हरिश्चंद्र, प्रह्लाद, वगैरे मोठ मोठ्यांचा किती छळ झाला ! पण त्यांची निष्ठा अती बलवत्तर असल्याने ते त्या छळातून सुखरूप पार पडले.

परिस्थिती सारखी बदलत असते; म्हणून जे फळ आपण आज मागतो ते बदललेल्या परिस्थितीत सुखाचे होईलच याची खात्री नाही. म्हणून जे फळ मिळेल त्यात समाधान मानावे.

गीतेत असे सांगितले आहे की, सर्व धर्म सोडावेत पण भगवंताला शरण जावे; पण ते न करता आपण विषयालाच शरण जातो, त्याला काय करावे ? अर्जुनाने भगवंताला आपल्या बाजूला घेतले, आणि त्यामुळे पांडवांचे जे समाधान टिकले, ते काही कौरवांचे टिकले नाही.

पांडवांनी देहाने वनवास सोसला; पण मनाने त्यांनी भगवंताला भजल्यामुळे वनवासातही ते समाधानात राहिले.

भगवंताच्या इच्छेने सर्व होते आणि सर्व तोच करतो, अशी भावना ठेवणे यासारखे समाधान नाही.

आनंद कृतीत आहे, फळाच्या आशेत नाही. नामस्मरण ही कृती केली तर शाश्वत आनंद आणि समाधान आपल्याला मिळाल्यावाचून राहणार नाही.

जे घडते ते भगवंताच्या इच्छेने घडते अशा खर्या भावनेने एक वर्षभर जो राहील, त्याला समाधान हे काय आहे हे खात्रीने कळेल.

२८७. नाम घेताना देवाला सांगावे, " प्रपंचातले काही मला देऊ नकोस, मला तुझे प्रेम दे."

13/10/2023

. 🙏🏼 श्रीगुरुदेवदत्त 🙏🏼

४ दत्तावतार दर्शन यात्रा वृत्तान्त 👉🏽

🌷 तृतीय पुष्प 🌷

अनंत संसार समुद्रतारा
नौकायिताभ्यां गुरूभक्तीदाभ्यां
वैराग्य साम्राज्यद पूजनाभ्यां
नमो नमः श्रीगुरूपादुकाभ्यां
🙏🏼🙏🏼🙏🏼

काल 3 ऑक्टोबर रोजी ब्रह्मांडनायक भगवान श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या पादुकांचे व विग्रहाचे दर्शन घेऊन त्यांच्या तपस्या स्थळी कुरवपूर येथे जाण्यासाठी आम्ही पिठापुरम येथून प्रस्थान केले होते.रात्री ट्रेन मध्ये चढताच थोड्याच वेळात झोपी गेलो होतो.सकाळी झोप पूर्ण झाल्यावर उठून बसलो.फ्रेश होऊन चहापान झाले.एकेकाच्या पोटली मधून खाऊ बाहेर येण्यास सुरुवात झाली.गप्पा टप्पा करीत प्रवास सुरू होता.11 वाजताच्या सुमारास सिकंदराबाद आले.येथे आम्ही जेवणाची ऑर्डर देऊन ठेवली होती.सिकंदराबाद येथील रमाताई घरगुती जेवण ट्रेन मधे पोहोचवतात.पत्ता कोबीची भाजी,चटणी,3 पोळ्या व चित्रान्न असे एका कंटेनर मधे दिलेले होते.ग्रुप मधील सर्वांना जेवणाचे पार्सल पोहोच केले आणि ट्रेन सुटली की आम्हीही जेवायला बसलो.घडीच्या पोळ्या,भाजी,चित्रान्न खूप छान झाले आहे म्हणून सर्वांनी आवर्जून सांगितले.दुपारी 2 वाजता सेडम स्टेशनवर आम्ही उतरलो.आमचे सारथी मंडळ पार्किंग मधे आमची वाट पहात थांबले होते.आम्ही बाहेर येईपर्यंत चहाची ऑर्डर देऊन ठेवली होती.बॅग जीप जवळ ठेवल्या आणि चहापान करून घेतले.आमचे चहापान होईपर्यंत बॅग जीपवर ठेऊन बांधून घेतल्या.सर्वांचे चहापान झाल्यावर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त च्या गजरात पंचदेवपहाड येथील श्रीपाद छाया आश्रमाकडे प्रयाण केले.उन्हाचा तडाखा सुरू होता. मधे वाटेत एका ठिकाणी थांबून गरमागरम मिरची भजी आणि चहा चा प्रोग्राम केला.6 वाजायच्या वेळेस आश्रमात येऊन दाखल झालो.सगळे रूम मधे शिफ्ट होऊन फ्रेश होऊ लागले.आश्रमातील दत्त मंदिर खूपच सुंदर आहे.इथे 2018 पासून अखंड नाम हवनसहित सुरू आहे.फ्रेश होऊन दर्शन घेऊन बरेच जण यात सामिल झाले.आरती नंतर 8 वाजता जेवणाची वर्दी आली.आमच्या अगोदर एक ग्रुप इथे आलेला होता.त्यांच्यातील काही जणा बरोबर गप्पा मारीत जेवण केले.जेवणा नंतर ग्रुप मधील सर्वांना उद्याचे वेळा पत्रक सांगितले आणि रूम मधे आलो.उद्याची सर्व तयारी करून ठेवली.आमचे सारथी राजू यांना सोलापूर येथून येताना अभिषेक साठी विविध फळे आणायला सांगितली होती.ती स्वच्छ पुसून पिशवीत भरून ठेवली.अन्नावरम इथे मोती कलर चे सिल्कचे सोवळे खूप स्वस्तात मिळाले होते.ते इथे अर्पण करण्यासाठी घेतले होते.सर्व जामानिमा व्यवस्थित जमवून ठेवला आणि पलंगावर लोळण घेतली.
पहाटे 4 वाजता अलार्म वाजला पण अजून 5 मिनिटे झोपून मग उठू असे मनात म्हटले आणि परत झोपलो ते 5 वाजताच डोळे उघडले.खाडकन उठून बसलो.अर्ध्या तासात तयार होऊन बाहेर आलो.5:45 पर्यंत सगळे तयार होऊन बाहेर आले.जीप मधे बसून कृष्णा नदी किनारी आलो.आमच्या मागून नाव वाले पण येऊन पोहोचले.सध्या इथे धरणामुळे पाण्याचा साठा भरपूर असतो,त्यामुळे आता बुट्टी बंद होऊन नावा सुरू झालेल्या आहेत.नावेत बसले की 5 मिनिटात कुरवपूरच्या तीरावर पोहोचता येते.पण या पाण्याच्या साठ्यामुळे नदीत मगरीचे प्रमाण बरेच वाढले आहे म्हणतात.आम्हाला काही दिसल्या नाहीत मगरी.दिगंबरा चा जप करीत,फोटो काढीत या तीरावर येऊन पोहोचलो.राजू गुरुजींच्या पडवी मधे कपडे बदलले.इथे सोवळे,उपरणे किंवा धोती,लुंगी यावरच मंदिरात प्रवेश मिळतो तर महिलांना साडी किंवा पंजाबी ड्रेस असेल तरच प्रवेश मिळतो.राजू गुरुजी आमची वाटच बघत होते.सभा मंडपात सर्वांना शिस्तीत बसवले.दुसरे कोणीतरी एक जण राजू गुरुजींना शिवले होते म्हणून गुरुजी परत स्नानासाठी गेले.इथले सोवळे ओवळे खूपच कडक आहे.त्यात जरा सुद्धा हयगय करीत नाहीत.गुरुजी येईपर्यंत सर्वजण मिळून दत्तबावनी म्हणू लागलो.त्या शांत वेळी सर्वांच्या मुखातून दत्तबावनी ऐकताना प्रसन्न वाटत होते.गुरुजींनी आल्यावर अगोदर माहिती सांगितली आणि धर्मशास्त्राचे काही नियम सांगितले व त्याचे पालन करण्याविषयी आग्रह धरला.नंतर संकल्प सोडणे सुरू झाले.प्रत्येकाचे नाव व गोत्र विचारून आचमन करून घेतले.संकल्प सर्वांच्या मुखातून वदवून घेतला आणि सर्व साहित्य घेऊन गुरुजी गर्भगृहात गेले.बाहेरच्या बाजूला टीव्ही स्क्रीन सुरू केली.रुद्राभिषेक सुरू झाला.राजू गुरुजींच्या आवाजात रुद्र ऐकणे ही वेगळीच अनुभूती असते.ब्राह्मणाच्या वाणी मध्ये काय तेज असते ते बघायचे असेल तर कुरवपूर येथे आलेच पाहिजे.रुद्राचे आवर्तन ऐकताना भान विसरून जाते,त्या शिव तत्वाशी तादाम्य पावायला सुरुवात होते.बरोबर दिड तास हा अभिषेक सोहळा चालला.अर्पण करण्यासाठी दिलेल्या सर्व वस्तू गुरुजींनी सिद्ध स्थानावर अर्पण केल्या.नैवैद्य समर्पण करून आरती संपन्न केली.आत जाऊन दर्शन घेताना आणलेली फळे प्रत्येकाच्या झोळीत प्रसाद रुपात गुरुजी देत होते.बाहेर येऊन तीर्थ,प्रसाद घेतला.प्रदक्षिणा करून नंतर गुरुजींना दक्षिणा देऊन आम्ही बाहेर पडलो.श्री टेंबे स्वामी महाराजांच्या गुफे कडे जाण्याच्या मार्गावर एक छोटे दुकान आहे.अप्पी नावाचा तरुण ते चालवतो.त्याला अगोदरच पोहे आणि चहाची ऑर्डर देऊन ठेवली होती.चहा,पोहे खाऊन गुफेत दर्शन घेतले.नंतर प्राचीन वट वृक्षाचे व त्याखालील मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही परत निघालो.
श्रीपाद छाया आश्रमात येऊन सर्व सामान जीपवर चढवले आणि मंथनगड कडे प्रयाण केले. इथून साधारण 35 किमी अंतरावर मंथनगड हे ठिकाण आहे. वल्लभेश व्यापारीची कथा ह्या स्थानावर घडलेली आहे.थोड्याच वेळात इथे येऊन पोहोचलो. या ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या हाताचा ठसा एका शिळेवर आहे,अगोदर तो सर्वांना दाखवून दर्शन घेतले.नंतर मंदिरात आलो.मंदिराची डागडुजी चालू आहे सध्या.आरतीची वेळ झालेली होती त्यामुळे अगोदर आरती करून घेतली.नंतर गुरुजींनी स्थान माहात्म्य सांगितले व थोडा वेळ सत्संग केला.हे गुरुजी नेपाळ इथून आलेले आहेत.इथे राहून सेवा करायला कोणी गुरुजी मिळत नव्हते.या गुरुजींचे प्रारब्ध थोर होते त्यामुळे श्रीपाद श्रीवल्लभ यांची सेवा करण्याचे भाग्य लाभले.दोन्ही भाऊ मिळून खूप सुंदर सेवा करतात.आता रोज दुपारी अन्नछत्र ही सुरू केले आहे त्यांनी.दक्षिणा देऊन नमस्कार करून आम्ही पुढील प्रवासास सुरुवात केली.वाटेत यादगिर गावी एका हॉटेल मधे जेवण घेतले.संध्याकाळी 7 वाजता माणिक नगर येथे पोहोचलो.अगोदर मंदिरात जाऊन दर्शन घेतले.मंदिर परिसर अत्यंत रमणीय आहे.पण अंधार पडलेला असल्यामुळे आत्ता तो व्यवस्थित दिसत नव्हता.मंदिरात भजन सेवा सुरू होती,ती ऐकत थोडावेळ बसलो. आठ वाजता प्रसादालय मध्ये भोजन प्रसाद घेऊन भक्त निवास मधे आलो.भक्त निवासात काही नवीन रूम तयार केल्या आहेत,त्याच आम्हाला देण्यात आल्या.सर्वजण रूम मधे शिफ्ट झाले.दिवसभर जीप मधे बसून अंग आंबून गेले होते,त्यामुळे गादीवर पडलो की लगेच ब्रह्मानंदी पोहोचलो.

इति तृतीय पुष्प श्रीगुरु दत्तात्रेयार्पण अस्तू...

12/10/2023

. 🙏🏼 श्रीगुरुदेवदत्त 🙏🏼

४ दत्तावतार दर्शन यात्रा वृत्तान्त 👉🏽

🌷 द्वितीय पुष्प 🌷

गुरु की शरण गुरुमहिमा अपार सार,
जीवन का भेद पल भर में मिटावै है,
अज्ञान तिमिर के पट खोले जो,
जीवन मुक्ति का रहस्य बतावै है ।।

काल भगवान श्रीपाद श्रीवल्लभ यांचे चरणी लीन होऊन धन्य धन्य झालो होतो आम्ही.आज पहाटे सर्वजण उठून लवकर तयार झाले होते.कारण मूळ पादुकाचे दर्शन फक्त पहाटे 5 ते 6 या वेळेतच होते.संस्थानचा अभिषेक होऊन 6 नंतर त्यावर चांदीचे आवरण घातले जाते.त्यामुळे मूळ पादुकांचे दर्शन घ्यायचे असेल तर सहाच्या आत मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे लागते.सर्वजण दर्शन घेऊन आले.काही जण पालखी सेवेची,अभिषेकची पावती करण्याकरिता ऑफिस समोर रांगेत उभे राहिले.
मीही तयार होऊन अगोदर उष्णोदकचा प्रसाद घेतला आणि दर्शन घेऊन प्रदक्षिणा करू लागलो.सकाळी सकाळी मंदिरातील अत्यंत प्रसन्न वातावरणात मन अत्यंत प्रफुल्लित होऊन जाते.श्रीगुरु दत्तात्रेय,भगवान श्रीपाद श्रीवल्लभ,भगवान श्रीमननृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचे विलोभनीय रूप पहात वेळ कसा जातो ते कळत नाही.मंदिरातील हे विग्रह अत्यंत नयन मनोहर आहेत.असे वाटते की आत्ता हे बाहेर येतील आणि आपल्याला आशीर्वाद देतील.प्रदक्षिणा करून समोर मोकळ्या जागेत बसून अथर्वशीर्ष,पुरुषसूक्त,श्रीसुक्त, लक्ष्मी सूक्त,रुद्राष्टक,दत्त बावनी म्हणत बसलो.नित्य ही स्तोत्रे म्हणत असलो तरी कोणत्याही मंदिरात गेलो की शक्यतो स्तोत्र पठण करीत असतो.भगवंताच्या सानिध्यात ते म्हणत असल्यामुळे त्यात तेज येते,म्हणजेच चार्ज होते.8 वाजेपर्यंत हे विविध स्तोत्र पठण सुरू होते.हेमाताईने आमच्या दोघांच्या अभिषेकच्या पावती बनवून आणल्या होत्या.त्या गुरुजींजवळ दिल्या आणि लॉज वर आलो.8 वाजता आमचा नाष्टा येणार होता.10 मिनिटात नाष्टा येऊन पोहोचला.इडली,वडा,चटणी यांना पोटात व्यवस्थित मार्गी लावले आणि नंतर त्यावर चहाने समाप्ती केली.इकडे इडली,वडा,चटणी मात्र भन्नाट बनवतात.जिव्हेची रसना तृप्त होऊन जाते अगदी.9 वाजता मंदिरात येऊन परत दर्शन घेतले आणि बाहेरच्या बाजूला ऑफिस समोर असलेल्या कट्ट्यावर बसलो.कारण परत तेच आपल्यामुळे नवीन आलेल्या भक्ताला बसायला जागा मिळायची नाही.बरोबर 9 वाजता गुरुजींनी अभिषेकची नावे वाचण्यास सुरुवात केली.आलेले बरेच जण आपल्या बरोबर आपल्या स्नेही जनांचे सुद्धा अभिषेक पावती बनवतात,त्यामुळे बरीच संख्या असते.नाव व गोत्र उच्चारून झाल्यावर गुरुजींनी सर्वांकडून रुद्राभिषेकचा संकल्प सोडून घेतला.इथे महान्यास पूर्वक 11 विविध वस्तूंनी अभिषेक संपन्न केला जातो.अभिषेक सुरू असताना भस्म,गंध यांचाही केला जातो व ते सर्व एका भांड्यात ठेऊन लगेच सर्वांना कपाळावर लावायला देतात.अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने हा रुद्राभिषेक होते.ते स्वच्छ आणि स्पष्ट उच्चारात रुद्र सूक्त ऐकताना कर्णेंद्रिय तृप्त होऊन जातात.अनेक जन्मातील पापे रुद्र सूक्त श्रवणाने नष्ट होऊन जातात.10:30 पर्यंत हा सोहळा चालला.नंतर रांगेत उभे राहून तीर्थ आणि भस्म व गंध घेतले.सर्वजण अत्यंत प्रसन्नचित्त होऊन गेले होते.इथे कितीही वेळा येऊ देत,प्रत्येकवेळी भावविभोर अवस्था होते.बऱ्याच जणांचे डोळे भरून आलेले असतात.एक प्रकारची शांति प्रत्येकजण अनुभवत असतो.हे सर्व लिहिण्या व सांगण्या पलीकडले आहे.हा अनुभव घेण्यातच खरी मजा आहे.
आता आम्हाला पिठापुरम मधील इतर क्षेत्र दर्शनसाठी निघायचे होते. आपला सगळा ग्रुप लॉज मधे एकत्र जमवे पर्यंत गाड्या आल्या.प्रत्येक टवेरा गाडीत 7 जण बसून आम्ही निघालो.इकडे 12 च्या सुमारास मंदिरे बंद होतात.त्यामुळे आता 2 मंदिरात दर्शन घेणार होतो व बाकीचे नंतर करणार होतो.कुंतीमाधव मंदिरात थोड्याच वेळात येऊन पोहोचलो.पूर्वजन्मीचा ब्राह्मण असलेल्या राक्षसाचा वध इंद्राने केला. त्याचे प्रायश्चित्त घेण्यासाठी म्हणून ब्रह्मदेवाने पाच माधव मंदिर बांधण्यास सांगितले. संपूर्ण भारत देशात काशी येथे बिंदूमाधव,प्रयाग येथे वेणीमाधव,रामेश्वर येथे सेतूमाधव,त्रिवेंद्रम येथे सुंदरमाधव व पिठापूर येथे कुंतीमाधव मंदिर आहे. त्यास दक्षिण काशी असेही म्हणतात.दर्शन करून आम्ही कुक्कुटेश्र्वर मंदिर येथे आलो.पिठापुर हे पूर्व काळापासूनच सिध्द क्षेत्र आहे. म्हणून या क्षेत्रास पादगया असे म्हणतात. आर्श्चयाची गोष्ट म्हणजे श्री कुक्कुटेश्वराच्या शिवलिंगामधून विद्युतकांती प्रकाशत होती व त्यावेळी त्यातून अप्पलराजु शर्मा व सुमती महाराणी यांच्या विवाहाची आकाशवाणी झाली. या स्थानामध्ये एक तलाव असून तेथे रोज हजारो भाविक दर्शनास येतात या जागेलाच पादगया असे संबोधले जाते.याच परिसरात पुरूहुत्तिका शक्ती पीठ आहे.सतीदेवीच्या शरीराचे भाग अन्य-अन्य ठिकाणी पडले त्यातील पाठीचा एक भाग पिठापुरला पडल्यामुळे त्या ठिकाणास पुरूहुत्तिका शक्तीपीठ असे म्हणतात. तसेच गयासुराच्या शरीरावर देवतांनी यज्ञ केला. तेव्हा त्याचे मस्तक गयेला होते तर पाय पिठापूरला होते. म्हणून या क्षेत्रास पादगया असे म्हणतात. गयासुरास देवतांनी सांगितले होते की, सुर्योदय होईपर्यंत उठायचे नाही, मध्यरात्रीच भगवान शंकराने कुक्कुटाचे रूप घेऊन बांग दिली. गयासुर सकाळ झाली समजून उठला. भगवंतानी त्याचा उद्धार केला ते हेच कुक्कुटेश्वर देवस्थान पिठापूरात आहे.याच परिसरात स्वयंभू श्रीदत्तमंदिर आहे. काळ्या पाषाणातील दत्तमूर्ती अत्यंत तेजस्वी व जागृत भासते. हे दत्तमंदिर श्रीपाद श्रीवल्लभांच्या काळापासून असल्याचे सांगितले जाते. ह्या परिसरातील स्पंदने श्रीपाद श्रीवल्लभांच्या अस्तित्त्वाची ग्वाही देतात.तर दत्त वृंदावन नावाचे नवीन मंदिर कालाग्नीशमन दत्तमंदिरचा मागील बाजूस आद्य अवतार श्रीपाद श्रीवल्लभ,श्रीनृसिंह सरस्वती,श्रीस्वामी समर्थ,श्रीमाणिक प्रभू,श्रीसाई बाबा ह्या सूंदर रेखीव मुर्त्या असलेले मंदीर आहे.इथली सर्व दर्शने घेऊन आम्ही परत मुख्य मंदिराजवळील प्रसादालय मधे आलो.महाप्रसाद ग्रहण केला.सर्वांच्या वतीने महाप्रसाद साठी धनराशि अर्पण केली.नंतर आम्ही अन्नावरम येथील भारतातील एकमेव श्री सत्यनारायण मंदिरचे दर्शन घेण्यासाठी निघालो.पिठापुरम पासून 30 किमी वर अन्नावरम येथील ऊंच डोंगरावर हे श्री सत्यनारायण मंदिर आहे. तिरुपती मधे आल्याचा भास होतो येथे.विजाच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला.दर्शन घेऊन येईपर्यंत पाऊस गडप.इथला सर्व परिसर अत्यंत रमणीय आहे.परत पिठापुर येथे येऊन अनघादत्त मंदिर,श्री गोपालबाबा आश्रम व नवीन झालेले श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर यांचे दर्शन घेऊन लॉजवर परत आलो.
6 वाजत आले होते त्यामुळे पटापट आवरले आणि मंदिरात आलो.भजन सेवा सुरू झालेली होती.दर्शन घेऊन प्रदक्षिणा केल्या आणि बसण्यासाठी मागे जाऊ लागलो तर सेवेकरी काकांनी हाक मारून जवळ बसायला बोलावले.नंतर माईक माझ्याकडे देऊन भजन गायला सांगितले.एक सुंदर गिरनारी पद म्हणून माझी भजन सेवा समर्पित केली.सातच्या सुमारास पालखी सोहळा सुरू झाला.आज आपल्या ग्रुप मधील दोघांनी पालखी सेवा घेतली होती.पालखी सोहळा संपवून पाळणा सुरू होणार होता तेव्हा मी बाहेर येऊन कट्ट्यावर बसू लागलो तर ऑफिसच्या दरवाजातून एक ओळखीचा चेहरा बाहेर येत होता.हे तर श्री संजूभैय्या होते. दत्त संप्रदायातील अत्युच्च व्यक्तिमत्त्व प.पू.श्री नाना महाराज तरानेकर यांचे नातू म्हणजे संजूभैय्या.पटकन त्यांच्या जवळ गेलो.पाया पडून नमस्कार केला.श्री विष्णूगिरी स्वामींसोबत मी इंदोरला आपल्या आश्रमात आलो होतो म्हणून माझा परिचय दिला.त्यांचा आशीर्वादाचा हात पाठीवर पडला.धन्य धन्य वाटत होते एकदम.त्यांच्या बरोबर एक फोटो काढून घेतला आठवणीसाठी.पाळणा झाल्यानंतर प्रसाद वाटप झाले आणि आम्ही तो घेऊन लॉजवर परत आलो.जेवण करून 10 वाजता सर्वांना बॅग घेऊन खाली येण्यासाठी सांगितले.आज रात्री आम्ही कुरवपूर कडे निघणार होतो.10:30 वाजता बॅग गाडीवर ठेऊन आम्ही स्टेशनकडे निघालो.तासभर स्टेशनवर टाईमपास करीत गप्पाटप्पा करीत वेळ काढला.ट्रेन थोडी लेट झाली होती.ट्रेन आल्यावर त्यात चढलो.सर्वांचे बॅग वगैरे लागालागी झाली आणि बर्थवर अंग सोडून दिले.आज दिवसभरात एक क्षण ही आराम मिळालेळा नव्हता.त्यामुळे बर्थ वर पडलो की लगेच ढगात गेलो.

इति द्वितीय पुष्प श्रीगुरु दत्तात्रेयार्पण अस्तू...

माउंट एव्हरेस्ट - स्पेशल फ्लाईट - काठमांडू - नेपाळ
07/10/2023

माउंट एव्हरेस्ट - स्पेशल फ्लाईट - काठमांडू - नेपाळ

03/10/2023

आज माझ्या वाढदिवशी आपण सर्वांनी फोन, मेसेज करून माझा आजचा दिवस अविस्मणीय केला त्याबददल आपणा सर्वांचे मनापासून आभार व धन्यवाद 🙏
असेच आपले सर्वांचे प्रेम व आशिर्वाद असेच कायम पाठीशी रहावेत हीच श्री दत्तगुरु चरणी प्रार्थना 🙏🙏🙏

श्री गुरुदेव दत्त 🙏
जय गिरनारी 🙏🙏🙏

पाठक काकांसोबात उज्जैन यात्रा - 2021
29/09/2023

पाठक काकांसोबात उज्जैन यात्रा - 2021

Address

Dombivli

Telephone

+917588608840

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shridattdham Yatra Parivar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shridattdham Yatra Parivar:

Videos

Share

Category


Other Travel Companies in Dombivli

Show All