हदगांव_हिमायतनगर_नांदेड_Tehsil

  • Home
  • India
  • Hadgaon
  • हदगांव_हिमायतनगर_नांदेड_Tehsil

हदगांव_हिमायतनगर_नांदेड_Tehsil स्वच्छ भारत अभियान

🚩🚩🙏 िवराय🙏🚩🚩            ोषण                 दिवस 13.वा #ओबीसीतून  #मराठा_आरक्षण #दत्ता_पाटील_हडसणीकर
16/07/2023

🚩🚩🙏 िवराय🙏🚩🚩
ोषण
दिवस 13.वा

#ओबीसीतून
#मराठा_आरक्षण
#दत्ता_पाटील_हडसणीकर

हदगाव बसस्थानक परिसरातील कामाला मुख्यमंत्र्यांची मान्यता ;२ कोटी ९५ लक्ष निधी मंजूर, सिमेंट काँक्रीटीकरण अन् सुशोभीकरण ह...
12/07/2023

हदगाव बसस्थानक परिसरातील कामाला मुख्यमंत्र्यांची मान्यता ;२ कोटी ९५ लक्ष निधी मंजूर, सिमेंट काँक्रीटीकरण अन् सुशोभीकरण होणार,बी.ओ.टी. तत्वावर दुकान गाळे बांधकामास मंजुरी
हिंगोली लोकसभा मतदारसंघातील हदगाव येथील मध्यवर्ती बसस्थानक आणि परिसराच्या सिमेंट काँक्रीटीकरण आणि सुशोभीकरणाच्या कामाला मान्यता मिळाली आहे. यासाठी २ कोटी ९५ लक्ष रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी हा निधी मंजूर केला असून लवकरच या कामाच्या निविदा प्रक्रियेला सुरवात होणार आहे. यासोबतच येथे बी. ओ. टी. तत्वावर दुकान गाळे बांधकामास सुद्धा मुख्यमंत्री महोदयांनी मंजुरी दिली आहे. माझ्या मार्गदर्शनाखाली माजी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा विधानसभा नेते बाबुराव कदम कोहळीकर यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.

सोशल मिडीया वरील आक्षेपार्ह पोस्ट पासून सावधान.
12/07/2023

सोशल मिडीया वरील आक्षेपार्ह पोस्ट पासून सावधान.

विकास साहेबराव कदम राहणार वरुला तालुका हदगाव जिल्हा नांदेडयेथील रहिवासी असून नुकत्याच झालेल्या पोलीस उपनिरीक्षक पदी त्या...
04/07/2023

विकास साहेबराव कदम
राहणार वरुला तालुका हदगाव जिल्हा नांदेड
येथील रहिवासी असून नुकत्याच झालेल्या पोलीस उपनिरीक्षक पदी त्याची निवड झाली, हे ऐकताच गावामध्ये आणि त्याच्या परिवारामध्ये आनंदाच वातावरण आहे,
त्याच्या घरामध्ये त्याचे आई-वडील काका काकू भाऊ बहीण, आईकडे दोन शेळ्या आहेत आणि वडील हे त्यांची कोरडवाहू दोन एकर शेती सांभाळतात या परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी आज गावाच खूप मोठा नाव लोकही केलं त्यामुळे गावात एक प्रसन्न वातावरण निर्माण झालेल आहे,
लहानपणापासून उराशी बाळगलेलं त्याचं स्वतःचं PSI चे स्वप्न आज त्यांनी शेवटी पूर्ण केलं,
सर्व गावकरी वरुला व त्याचे मित्रमंडळी यांच्याकडून त्याला त्याच्या पुढील वाटचालीसाठी
खूप खूप शुभेच्छा🎊🎊

#विकास_साहेबराव_कदम

29/06/2023

दाढी फक्त रु 10/-
------------------------
एक #महावितरण मध्ये काम करणारा अधिकारी दाढी करण्यासाठी सलूनमधे गेला व दुकानदाराने लावलेला बोर्ड वाचला...!!

दाढी ---------- ₹.10/-
ब्लेड अधिभार- ₹. 2/-
वस्तरा भाडे --- ₹. 3/-
क्रीम ------------ ₹. 5/-
कात्री भाडे ----- ₹. 3/-
खुर्ची भाडे ------ ₹.10/-
लोशन ----------- ₹. 7/-
पावडर ---------- ₹. 5/-
नॅपकिन भाडे --- ₹. 5/-
-------------------------------
एकूण - ₹. 50/-

🤔 बोर्ड वाचून अधिकाऱ्याने विचारले :- तुम्ही तर कमालच केलीत. दाढी फक्त १० रु. लिहून इतर छुपे खर्च लावून ग्राहकांची #लूट करताय.!!!

#दुकानदार : --"हा बोर्ड मोठ्या अक्षरात आणि शुद्ध मराठीत असल्याने तुम्हाला वाचता तरी येतो साहेब.
तरीही, तुम्ही मला जाब विचारताय❓

"तुमच्या महावितरणकडून अनेक वर्षांपासून आमची महा-फसवणूक सुरू आहे त्याचं काय?

स्थिर आकार,
वीज आकार,
वीज वहन आकार,
इंधन समायोजन आकार,
वीज शुल्क
वीज विक्री कर,
व्याज,
इतर आकार,
चालू वीज देयक,
थकबाकी,
समायोजित रक्कम,
व्याजाची थकबाकी,
एकूण थकबाकी,
देयकाची निव्वळ रक्कम,... पूर्णांक देयक...

"हे विज बिल आजपर्यंत किती जणांना कळले ते सांगाल का?"

महावितरण अधिकारी #दाढी न करताच पळुन गेला...।😊😂

(जनतेचे डोळे उघडे होई पर्यंत शेअर करत रहा,जो पर्यंत जनता लुटवायला तयार आहे, तो पर्यंत महावितरण तर लुटायलाच बसलेलं आहे...)
🙏जागो ग्राहक जागो 🙏🏻
🙏🏻 🙏🏻

19/06/2023

पळवापळवी घडली असती तर....🙃

या एक  #बार्शीतील गावानं एक वेगळंच  #रेकॉर्ड केलंय..." #जलशोषक चर" म्हणून एक पाणी मुरवण्याचा उपचार असतो, त्याचं साधारण आ...
16/06/2023

या एक #बार्शीतील गावानं एक वेगळंच #रेकॉर्ड केलंय...

" #जलशोषक चर" म्हणून एक पाणी मुरवण्याचा उपचार असतो, त्याचं साधारण आकारमान असतं 5*3*2 . हा जलशोषक चर एकदा भरल्यास त्याची पाणी मुरवण क्षमता असते 30 हजार लिटर. एका पावसाळ्यात साधारण तो कमीत कमी 10 वेळा भरतो. (जास्तीत जास्त जितका दिवस पावसाळा टिकेल तितका.) म्हणजे एक जलशोषक चर एका पावसाळ्यात सरासरी 30,000 * 10 = 3 लाख लिटर पाणी जमिनीत मुरवू शकतो...

या गावाने त्यापासून फुटणाऱ्या सर्व रस्त्यांच्या कडेला, डोळ्यांना दिसेल तवर... , असे टोटल 10 नाही 100 नाही तर तब्बल 334 जलशोषक चर खणलेत.

म्हणजे
3,00,000 लिटर * 334 चर =
10 कोटी 2 लाख लिटर!!!

म्हणजे 10 कोटी लिटर पाणी या गावात फक्त या एका उपचारातून मुरणाराय...!!!

आताही गावात जाऊन पाह्यलं तर याच गावातल्या या फोटोसारखं, डोळ्यांना दिसेल तिथवर, अनेक रोडच्या कडेला या अशा चर खणलेल्या दिसतात..!!

गाव : उपळाई ठोंगे.
ता : बार्शी
जि : सोलापूर.

तुमच्या दुष्काळा विरुद्धच्या या लढाईला मनापासून सलाम गाववाल्याहो... मानलं!!

गावात लोकसहभागातून केला रोड पावसाळ्यात पाणी व चिखल होत असल्याने त्यावरून शेतकऱ्यांना शेतात जाणे कठीण होऊन जाते. ही अडचण ...
15/06/2023

गावात लोकसहभागातून केला रोड पावसाळ्यात पाणी व चिखल होत असल्याने त्यावरून शेतकऱ्यांना शेतात जाणे कठीण होऊन जाते. ही अडचण लक्षात घेत लोकसहभागातून वरूला येथे रस्त्याचे काम..वरुला ते निवघा रोड 🙏
(वरुला) गावात लोकवर्गणीतून रस्ता करण्याची वेळ आली आहे, त्यासाठी प्रत्येक कुटुंबाकडून निधी संकलीत करण्यात येत असून त्यामाध्यमातून रस्त्याच्या मुरुमिकरणाचे काम सुरू करण्यात आले. या रस्त्यावरून दररोज सर्वच गावकरी लोक ये-जा करत असतात. मात्र, ऐन पावसाळ्यात रस्त्यावरून चालणे देखील अवघड होते आणि रोड नाही झाला तर त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांसह शालेय विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागणार होता. मनुन ग्रामस्थांनीच स्वखर्चाने हा रस्ता बनवण्याचा निर्णय घेतला ...
गावकरी वरुला🙏

काल बालासोर, ओडिशा येथे कोरोमंडल एक्सप्रेस रेल्वे आणि मालगाडीचा दुर्दैवी अपघात झाला. ह्या अपघातात तीनशेहून अधिक नागरिकां...
03/06/2023

काल बालासोर, ओडिशा येथे कोरोमंडल एक्सप्रेस रेल्वे आणि मालगाडीचा दुर्दैवी अपघात झाला. ह्या अपघातात तीनशेहून अधिक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली..!🙏
ह्या धक्क्यातून सावरण्यासाठी ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना बळ देवो. तसेच जखमी नागरिक लवकरात लवकर बरे होवोत हीच ईश्वर चरणी प्रार्थना..! 🙏🙏

गोगलगाय एकात्मिक नियंत्रण :-नमस्कार शेतकरी बंधुनो, आज या लेखामध्ये आपण  #सोयाबीन पिकातील अतिशय महत्वाचा विषय जो सध्या सं...
31/05/2023

गोगलगाय एकात्मिक नियंत्रण :-
नमस्कार शेतकरी बंधुनो, आज या लेखामध्ये आपण #सोयाबीन पिकातील अतिशय महत्वाचा विषय जो सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सोयाबीन उत्पादक #शेतकरी बंधूना खूप त्रासदायक ठरत आहे तो म्हणजे गोगलगाय कीड नियंत्रण
होयगोगलगायीच्या नियंत्रणासाठी #मेटाल्डिहाईड (स्नेलकिल) दाणेदार या गोगलगाय नाशकाचा वापर करावा. सोयाबीन व कापूस यासारख्या पिकामध्ये दाणेदार #मेटाल्डिहाईड (स्नेलकिल) दोन किलो प्रति एकरी या प्रमाणात शेतात पसरून द्यावे. तर फळबागेमध्ये झाडाखाली दाणेदार मेटाल्डिहाईड (स्नेलकिल) प्रति झाड १०० ग्रॅम पसरून टाकावे.)
शेताचे #बांध स्वच्छ ठेवावेत व वेळोवेळी शेतात स्वच्छता मोहीम हाती घ्यावी.
शेताभोवती सुमारे दोन मीटरच्या पट्ट्यात #राख पसरवावी.शेतांच्या कडेने राख आणि #तंबाखू डस्ट एकत्र मिसळून बॉर्डर लाईन टाकून घ्यावी म्हणजे गोगलगाय आत येणार नाहीत.
दहा लिटर पाण्यामध्ये दोन किलो #गूळ अधिक २५ ग्रॅम #यीस्ट यांचे द्रावण तयार करावे. हे द्रावण ५० किलो गव्हाच्या अथवा भाताच्या कोंड्यात टाकून चांगले मिसळावे. १० ते १२ तास हे मिश्रण आंबवण्यासाठी ठेवावे.
त्यानंतर त्यामध्ये #थायामिथोक्‍झाम ५० ग्रॅम चांगल्या प्रकारे मिसळावे. हे आमिष शेतामध्ये ढिगाच्या स्वरुपात किंवा बांधाच्या कडेने पट्टा स्वरुपात टाकावे. प्रतिबंधात्मक उपाययोजना :

•सोयाबीनच्या पेरणीनंतर
पूर्ण शेताभोवती (बांधाच्या आतल्या बाजूने) 05 सेमी रुंदीचा #चुन्याचा पट्टा ओढून घ्यावा.
सोयाबीनच्या पेरणीनंतर लगेच बांधाच्या आतल्या साईडने मेटाल्डीहाईड 2.5% (स्नेलकिल) या औषधाच्या पेलेटला कट करून बारीक गोळ्यात रुपांतर करावे आणि संपूर्ण शेताच्या भोवती (बांधाच्या आतल्या साईडने) 5 ते 7 फुट अंतरावर एक गोळी टाकावी.
स्नेलकिल हे औषध गोगलगायींना आकर्षून घेते आणि गोगलगायीने या गोळीला चाटल्यानंतर 4 ते 5 तासांनी गोगलगायीच्या आतला स्त्राव बाहेर येऊन ती नियंत्रणात येते.

…….. शेतकरी हितार्थ…यापुढे “अद्यावत शेती म्हणजे विपणनाभिमुख शेती होय”…!!!
—-
🦚🌹🦚 !! अन्नदाता सुखी भव: !!🦚🌹🦚
काळजी घ्या…आपला जिव्हाळा कायम राहो
🙏विचार बदला! जीवन बदलेल!!🙏
#गोगलगाय #कृषि #नियंत्रण

1 वर्ष पण नाही झाल अन रोड ची अवस्था ही ?....    (मार्गे नेवरी).... राहिलेल्या सीमेंट रोड च काम तर सोडाच, देवास ठाऊक ते क...
30/05/2023

1 वर्ष पण नाही झाल अन रोड ची अवस्था ही ?....
(मार्गे नेवरी).... राहिलेल्या सीमेंट रोड च काम तर सोडाच, देवास ठाऊक ते कधी पूर्ण होणार पण जे बनवला ते पण असा..?
तुमच मत काय ठेकेदार जबाबदार 🤔 की प्रशासन 🤔..?
नेमके असले भ्रस्टाचार का होतात हाच प्रश्न नेहमी समोर येतो 🙏
#भ्रस्टाचार

आपल्या आई वडिलांच्या कष्टाचं चीज करत जिल्ह्यातील एका कामगाराच्या मुलाने जिद्द आणि मेहनतीच्या बळावर सहायक कामगार आयुक्तपद...
30/05/2023

आपल्या आई वडिलांच्या कष्टाचं चीज करत जिल्ह्यातील एका कामगाराच्या मुलाने जिद्द आणि मेहनतीच्या बळावर सहायक कामगार आयुक्तपदी मजल मारली आहे. अक्षय भीमराव तुरेराव असं मुलाचं नाव असून तो जिल्ह्यातील कुंडलवाडी हजापूर येथील रहिवासी आहे. २०२१ च्या राज्यसेवेमधून त्याची सहायक कामगार आयुक्तपदी निवड झाली आहे. त्याच्या या यशाने कुटुंबियांना आभाळ ठेंगणं झालं आहे. संपूर्ण तालुक्यातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. विशेष म्हणजे अक्षयचा मोठा भाऊही वस्तू कर विभागात अधिकारी आहे
जिल्ह्यातील कुंडलवाडी शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर हज्जापूर हे छोटसं गाव आहे. अक्षयचे वडील भीमराव तुरेराव हे मोलमजुरी करतात तर आई अंगणवाडी सेविका आहे. भीमराव तुरेराव यांना अजय आणि अक्षय असे दोन मुले आहेत. घरची परिस्थिती हालाखीची असताना देखील त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना चांगले शिक्षण दिले. शिक्षणासाठी कुठली गोष्ट कमी पडू दिली नाही.

अक्षयने पहिली ते बारावीपर्यंतचं शिक्षण कुंडलवाडी आणि धर्माबाद शहरात पूर्ण केलं. त्यानंतर कोल्हापुरातून बी.टेकची पदवी प्राप्त केली. आयुष्यात मोठा शासकीय अधिकारी बनण्याचं अक्षयचं स्वप्न होतं. आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली. २०१८ मध्ये त्याने एमपीएससीची परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात तो नायब तहसीलदार बनला. तीन वर्ष वर्धा येथे नायब तहसीलदारपदी तो कार्यरत आहे
सेवेत असताना देखील अक्षयने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरूच ठेवली होती. २०२१ मध्ये त्याने पुन्हा एमपीएससीची परीक्षा दिली. त्यात देखील यश मिळवत त्याची सहायक कामगार आयुक्तपदी निवड झाली. आपल्या आई वडिलांच्या कष्टाचं चीज करत त्याने हे यश संपादन केलं आहे.


For sale स्कॉर्पिओ 2018 मॉडेल Shyam Deshmukh टाकली परभणी 🙏Mobile number 7387244087
30/05/2023

For sale स्कॉर्पिओ 2018 मॉडेल
Shyam Deshmukh
टाकली परभणी 🙏
Mobile number 7387244087

पाटील कुटुंबात ३५ वर्षांनंतर आनंदी आनंद, सेलिब्रेशनसाठी मागवले हत्ती, ढोल-ताशे; पंचक्रोशीत चर्चा
30/05/2023

पाटील कुटुंबात ३५ वर्षांनंतर आनंदी आनंद, सेलिब्रेशनसाठी मागवले हत्ती, ढोल-ताशे; पंचक्रोशीत चर्चा


नांदेड:- GNM गुरुगोविंदसिंग महाविद्यालयामध्ये प्रथम वर्षामध्ये शिकत असलेल्या मुलीचा मृत्यूप्रजापती शंकर लांडगे रा. कोलंब...
29/05/2023

नांदेड:- GNM गुरुगोविंदसिंग महाविद्यालयामध्ये प्रथम वर्षामध्ये शिकत असलेल्या मुलीचा मृत्यू

प्रजापती शंकर लांडगे रा. कोलंबी ता. नायगाव जि. नांदेड ही विद्यार्थिनी GNM गुरुगोविंदसिंग नर्सिंग महाविद्यालय नांदेड येथे शिकत होती या मुलीला ताप आला व उपचादरम्यान दिनांक 19.5.2023 रोजी सकाळी मृत्यु झाला. चुकीचे इंजेक्शन दिल्यामुळे मृत्यू झाला असा नातेवाईकांचा आरोप व पोलीस प्रशासन FIR घेत नसल्याचा देखिल आरोप आहे. तसेच तिचा घात करून हत्याकांड केले की काय याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे अशी पीडितांची मागणी आहे.

यामुळे 24 तास होऊनही अजून पर्यंत अंत्यविधी नाही जोपर्यंत FIR दाखल करणार नाही व न्याय दिला जाणार नाही. तोपर्यंत अंत्यविधी करणार नाही असा इशारा मुलीच्या नातेवाईकांनी दिला आहे.

नांदेड अनेक हाल अपेष्टा मानापमान , सहन करत आपल्या जीवनाचा गाडा कसा बसा ओढणाऱ्या तृतीयपंथीयांच्या जीवनातही आता अमुलाग्र ब...
27/05/2023

नांदेड अनेक हाल अपेष्टा मानापमान , सहन करत आपल्या जीवनाचा गाडा कसा बसा ओढणाऱ्या तृतीयपंथीयांच्या जीवनातही आता अमुलाग्र बदल होऊ लागले आहेत. तृतीय पंथी ही आता शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येऊ लागले असून नांदेड जिल्ह्यातील पहिली तृतीयपंथी म्हणून बारावी परीक्षेत उत्तीर्ण होण्याचा मान #अमोल_सर्जे हिने मिळविला आहे...

 #हदगाव तालुक्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा!  #हिंगोली लोकसभा मतदारसंघातील हदगाव तालुक्यातील तळणी-साप्ती-कोहळी-शिरड...
27/05/2023

#हदगाव तालुक्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा!
#हिंगोली लोकसभा मतदारसंघातील हदगाव तालुक्यातील
तळणी-साप्ती-कोहळी-शिरड-पेवा-कोराडी-उचेंगाव-भानेगाव-हदगाव येथे कयाधू नदीवर उंचेगाव जवळ मोठ्या पुलाचे आणि जोडरस्त्याचे बांधकाम करणे. या सार्वजनिक विकास कामाचे भूमिपूजन आज #हेमंत_पाटील, कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा.श्री डॉ. #श्रीकांत_एकनाथजी_शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संपर्कप्रमुख #आनंदराव_जाधव ,शिवसेना माजी जिल्हाप्रमुख #बाबुराव_कदम कोहळीकर,जिल्हाप्रमुख #उमेश_मुंडे,यांच्यासह आदी उपस्थित होते.
#खासदार

अंबाळा तालुका hadgoan येथे होणाऱ्या रेल्वेस्टेशन ला आपल्या परीसरातील महान कर्मयोगी  #श्री_संत_दत्ताबापु यांचे नाव देण्या...
25/05/2023

अंबाळा तालुका hadgoan येथे होणाऱ्या रेल्वेस्टेशन ला आपल्या परीसरातील महान कर्मयोगी #श्री_संत_दत्ताबापु यांचे नाव देण्यात येणार आहे....🙏

24/05/2023

आज लग्नाची परिस्थिती अवघड आहे. लग्न होणार नाही अश्या मुलांनी आयुष्यात काय करावे. एकटे पण कसा घालवणे?
लग्न नाही झाले तर खूप काही नुकसान नाही होत. अर्थात हे प्रत्येकाच्या मानसिकतेवर अवलंबुन आहे. विवाहित लोक काही स्वर्ग सुख अनुभवतात अशातला भाग नाही.. मानवी स्वभावच असा आहे की, एखादी गोष्ट मिळेपर्यंत त्याची ओढ असते.. एकदा प्राप्त झाले की विशेष काही वाटत नाही.

लग्न म्हणजे क्षणिक सुखासाठी आयुष्यभरासाठी खूप मोठ्या बंधनाचे, जबाबदार्यांचे जोखड पत्करणे आहे.. मुलं जन्माला घाला, त्यांच्यासाठी आयुष्यभर राबा ती उतारवयात पालकांकडे ढुंकूनही बघत नाहीत तेव्हा पश्चात्ताप झाल्याशिवाय राहत नाही हे खुप लोकांचे अनुभव आहेत.

तेव्हा विकतचे दुखणं नशिबानेच टाळलं समजा आणि जबाबदारीशुन्य आयुष्याचा आनंद घ्या.. स्वतः साठी कमवा स्वतः साठी खर्च करा, करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी प्रयत्न करा, आईवडीलांची काळजी घ्या.. जग फिरा, वाटल्यास लिव्ह इन मध्ये रहा, मस्त दरवर्षी बॅंकॉक टूर करा, जुगार खेळा, दारू प्या, पुस्तके वाचून लायब्ररी संपवा, इच्छा असेल तर अध्यात्मात मन गुंतवा, पेट सांभाळून त्याला जीव लावा, समाजसेवेसाठी स्वतः ला झोकून द्या, राजकारणात नशीब आजमावून बघा, आध्यात्मिक क्षेत्रात बाबा/बुवा बनता येते का पहा संसारिक लोक रांगा लावून पाया पडतील काय वाटेल ते करा कोण विचारणार आहे? अविवाहित राहण्याची काही वेगळीच मजा असते पण जगता आले पाहिजे...

#परिस्थिती

केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी २० मे २०२३ ला सकाळी १०:४० वाजता श्री क्षेत्र माहूरगड - रेणुका देवी मंदिर येथे स्कायवॉ...
19/05/2023

केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी २० मे २०२३ ला सकाळी १०:४० वाजता श्री क्षेत्र माहूरगड - रेणुका देवी मंदिर येथे स्कायवॉकचे (लिफ्टसहित) भूमिपूजन करतील.



nitingadkari #दूरदृष्टी #2025 #एजेंडा

चित्रपट क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या आपल्या ग्रामीण भागातील  कलाकारांसाठी मी घेऊन आलोय "मॉडर्न ॲक्टिंग अँड डान्स क्लासे...
18/05/2023

चित्रपट क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या आपल्या ग्रामीण भागातील कलाकारांसाठी मी घेऊन आलोय "मॉडर्न ॲक्टिंग अँड डान्स क्लासेस"

योग्य #वेळी...योग्य #ठिकाणी...योग्य तज्ञाकडून #प्रशिक्षण घेतलं तरच योग्य #संधी आणि अपेक्षित #यश मिळते...

चला तर मग आजच भेट द्या आणि आपला प्रवेश निश्चित करा...

18/05/2023

माझी रेणुका माऊली,
कल्प वृक्षाची सावली!
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या हिंगोली लोकसभा मतदारसंघातील श्रीरेणुका देवी माहूरगड येथे दि 20 मे रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा.श्री नितीनजी गडकरी साहेब यांच्या पुढाकाराने व माझ्या सातत्यपूर्ण प्रयत्नाने स्कायवॉक रोप -वे चा भूमिपूजन सोहळा मा.मंत्री महोदयांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.या स्कायवॉक व रोप -वे मुळे श्रीरेणुका देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या वृद्ध, महिला व लहान बालकांना दर्शन सुलभ व सोयीचे होणार आहे.या वचनपूर्तीचा मनस्वी आनंद होत आहे.
माहुर येथिल स्काय वॉकच्या उद्घाटनास उपस्थित रहाण्याच खासदार हेमंत पाटिल यांच आवाहन.....

#लोकार्पण #रेणुका

Address

Nanded District
Hadgaon

Telephone

+918698859603

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when हदगांव_हिमायतनगर_नांदेड_Tehsil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share

Category


You may also like