निसर्गरम्य जुन्नर तालुका

  • Home
  • India
  • Junnar
  • निसर्गरम्य जुन्नर तालुका

निसर्गरम्य जुन्नर तालुका सत्यं शिवम सुंदरम

अंगारक चतुर्थीच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा मित्रांनो 🌹 🌹  श्री सिद्धिविनायक जुन्नर शहराचे आराध्य ग्रामदैवत
25/06/2024

अंगारक चतुर्थीच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा मित्रांनो 🌹 🌹
श्री सिद्धिविनायक जुन्नर शहराचे आराध्य ग्रामदैवत

24/06/2024

क्रांतीवीर राजगुरू जन्मस्थळ

श्री क्षेत्र देहू - गाथा मंदिर
24/06/2024

श्री क्षेत्र देहू - गाथा मंदिर

"*नारायण टाके स्वच्छता मोहीम सहभागी व्हा*...       आपले गड... आपणच राखणार*उदक पाहून दुर्ग बांधावेत* हे आज्ञापत्रातील वाक...
22/06/2024

"*नारायण टाके स्वच्छता मोहीम सहभागी व्हा*...

आपले गड... आपणच राखणार

*उदक पाहून दुर्ग बांधावेत* हे आज्ञापत्रातील वाक्य किल्ल्यावरील पाण्याचे महत्व अधोरेखित करते.

किल्ले नारायणगड (खोडद), तालुका जुन्नर ,जिल्हा पुणे हाही इतिहासातील महत्त्वपूर्ण घडामोडींचा साक्षीदार....

याही किल्ल्यावर पिण्यायोग्य असणारे एकच पाण्याचे टाके आहे ते म्हणजे *नारायणटाके*....
या नारायण टाक्यांमध्ये वर्षानुवर्ष शेवाळ/माती साचून अस्वच्छता झाली आहे .

ही टाकी साफ करण्याची हिच ती योग्य वेळ आहे या साठी....

#"*नारायण टाके स्वच्छता मोहीम*"
#रविवार दिनांक *23 जून 2024*
# सकाळी *8.30 वाजता*
#जमण्याचे ठिकाण : *गडपायथा* मुकाई माता मंदिर

आयोजित केली आहे.

तरी सर्व दुर्गप्रेमी,ग्रामस्थ ,तरुण मित्रांनी या मोहिमेमध्ये सहभागी होऊन दुर्गसंवर्धनासाठी हातभार लावावा.

ही नम्र विनंती

(*येताना बादली, दोरी खोरे, घमेले इतर साहित्य यापैकी जे साहित्य उपलब्ध असेल ते घेऊन यावे*.)

आपले नम्र: समस्त दुर्गप्रेमी ग्रामस्थ गडाचीवाडी खोडद/ हिवरे तर्फे नारायणगाव

20/06/2024

पाऊस चालू झाल्यामुळे सर्प आपल्या बुट, सॅडेल व चप्पल मध्ये येऊन बसतात त्यामुळे चप्पल, बूट,सॅडेल घालताना मित्रांनो विशेष काळजी घ्या.

19/06/2024

जुन्नर तालुक्यातील छत्रपती हायस्कूल येणेरे येथील विद्यार्थ्यांनी गायिलेली प्रार्थना ऐकून नक्कीच प्रार्थनेच्या प्रेमात आपण पडाल. एकदा जरूर ऐका व विद्यार्थ्यांचे कौतुक करायला विसरू नका 🙏🌳

राजगड चिलखती बुरुज व नेढे सुंदर दृश्य.
18/06/2024

राजगड चिलखती बुरुज व नेढे सुंदर दृश्य.

जुन्नर शहरातील पाडळी- बारव ग्रामपंचायतीचा स्वच्छतेसाठी बॅंनर लावून स्तुत्य उपक्रम.   खरेतर अशी दृश्ये गाव सुरू होताच पहा...
15/06/2024

जुन्नर शहरातील पाडळी- बारव ग्रामपंचायतीचा स्वच्छतेसाठी बॅंनर लावून स्तुत्य उपक्रम.
खरेतर अशी दृश्ये गाव सुरू होताच पहायला मिळतात. कदाचित हे बॅनर थोडाफार तरी बदल घडवून आणण्यासाठी उपयुक्त ठरतील किंवा स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी जनजागृतीचा संदेश तरी देतील.

15/06/2024

प्राणी तरस दर्शन

शेतात बैले जुंपूण धान्य पेरणी केली जायचे लाकडी यंत्र अर्थात  पाभर उर्फ तिफण.
14/06/2024

शेतात बैले जुंपूण धान्य पेरणी केली जायचे लाकडी यंत्र अर्थात पाभर उर्फ तिफण.

किल्ले शिवनेरी बालेकिल्ला.
13/06/2024

किल्ले शिवनेरी बालेकिल्ला.

13/06/2024

आयुर्वेदिक फळ भोकर आपल्याकडे कोणत्या नावाने ओळखले जातात.

12/06/2024
जुन्नर तालुक्यातील वडगाव कांदळी येथील २६५ वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक वारसा उजेडात.       लेखक - अनिल दुधाणे सर आणि सहकारी य...
11/06/2024

जुन्नर तालुक्यातील वडगाव कांदळी येथील २६५ वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक वारसा उजेडात.
लेखक - अनिल दुधाणे सर आणि सहकारी यांनी विशेष योगदान दिले बद्दल निसर्गरम्य जुन्नर तालुका फेसबुक पेज परीवारातर्फे खूप खूप हार्दिक अभिनंदन 🌹🌹

किल्ले चावंडवर संवर्धनात सापडले १ महाकाय तोफ, ३ ब्रिटिश कालीन बंदुकीचे बॅरल व १ तोफगोळा    चावंड उर्फ  प्रसन्नगड येथे छत...
11/06/2024

किल्ले चावंडवर संवर्धनात सापडले १ महाकाय तोफ, ३ ब्रिटिश कालीन बंदुकीचे बॅरल व १ तोफगोळा
चावंड उर्फ प्रसन्नगड येथे छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत शिवाजी ट्रेलच्या मार्गदर्शनाखाली मरहट्टे सह्याद्रीचे या किल्ले संवर्धन संस्थे मार्फत आयोजित पुष्करणी संवर्धन मोहिमेत पुष्करणी मध्ये एक महाकाय तोफ तसेच तीन ब्रिटिश कालीन बंदुकीचे बॅरल आणि एक तोफगोळा भेटला या कामी गेली सहा महिने अविरत राबणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात हातांचे निसर्गरम्य जुन्नर तालुका फेसबुक पेज परीवारातर्फे खूप खूप हार्दिक अभिनंदन.🌹🌹

स्वराज्यलक्ष्मी
शिवराय असे शक्तिदाता

जुन्नर तालुक्यात पिकणाऱ्या शिवनेरी हापूसची प्रत्येक आंबा मार्केट मध्ये होतेय उत्कृष्ट चविची व आवडीची चर्चा.
11/06/2024

जुन्नर तालुक्यात पिकणाऱ्या शिवनेरी हापूसची प्रत्येक आंबा मार्केट मध्ये होतेय उत्कृष्ट चविची व आवडीची चर्चा.

10/06/2024

जुन्नर शहरात खोदकामात आढळले महाकाय शिवलिंग.🚩🚩
जुन्नर शहरातील कल्याण पेठ येथे बांधकामासाठी खड्डे खोदाईचे काम सुरू असताना ५ ते ६, फुट खोलीवर असताना मुरूमाच्या थराखाली भगवान महादेवांची शालुंकायुक्त पिंड आढळली . अंदाजे तीन फुट व्यासाची व ३ फुट लांबी असलेली पुर्ण अखंड पाषाणातील पिंड सोमवारच्या (१०जुन)दिवशी सापडणे याला दैवी योगायोग म्हणावे लागेल.याठिकाणी पूर्वी मंदिर अस्तित्वात असेल असे गृहीत धरले तर काळाच्या ओघात ,निसर्गाच्या तडाख्यात मातीखाली अवशेष गाडले जाऊ शकतात. परंतु या ठिकाणी जवळपास कोणतेही मंदिराचे बांधकामाचे अस्तित्व नाही तरी पण मुरुमाच्या थराखाली पिंड सापडणे कुतुहलाची गोष्ट गोष्ट आहे.पिंडी मध्ये असलेली शालुंका चुन्याच्या माध्यमातून बसविन्यात आली असल्याचे दिसते.
🚩🚩 हर हर महादेव 🚩🚩

ओम जय जगदीश हरे 🚩🚩किल्ले रायगड
08/06/2024

ओम जय जगदीश हरे 🚩🚩
किल्ले रायगड

६जून...हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त त्रिवार मानाचा मुजरा...🙏🙏*आपणा सर्वांना शि...
06/06/2024

६जून...
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त त्रिवार मानाचा मुजरा...🙏🙏
*आपणा सर्वांना शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा 🌹🌹

लोकसभा निवडणुकीत शिरूर लोकसभा मतदारसंघातून  'खासदार ' पदी निवडून आल्याबद्दल जुन्नर तालुक्याचे भुमिपुत्र संसदरत्न खासदार ...
04/06/2024

लोकसभा निवडणुकीत शिरूर लोकसभा मतदारसंघातून 'खासदार ' पदी निवडून आल्याबद्दल जुन्नर तालुक्याचे भुमिपुत्र संसदरत्न खासदार डॉ. अमोलजी कोल्हे यांचे निसर्गरम्य जुन्नर तालुका फेसबुक पेज परीवारातर्फे मनःपूर्वक अभिनंदन! व पुढील वाटचालीसाठी खुप खुप हार्दिक शुभेच्छा 🌹 🌹

03/06/2024

येणेरे गावचा ईवराई माता मंदिर अप्रतिम ऐतिहासिक नैसर्गिक भौगोलिक वारसा.

किल्ले चावंड संपूर्ण दर्शन छायाचित्रांच्या माध्यमातून नक्कीच पहा. येण्याचे मार्ग -१) पुण्याहुन भोसरी-चाकण-मंचर-नारायणगाव...
02/06/2024

किल्ले चावंड संपूर्ण दर्शन छायाचित्रांच्या माध्यमातून नक्कीच पहा.
येण्याचे मार्ग -
१) पुण्याहुन भोसरी-चाकण-मंचर-नारायणगाव-जुन्नर - आपटाळे मार्गे चावंड.
२) मुंबईहुन कल्याण - मुरबाड- सरळगाव- माळशेज घाट- मढ पारगावफाटा- गणेशखिंड मार्गे जुन्नर - आपटाळे मार्गे चावंड.
३) नाशिकहून सिन्नर - संगमनेर - आळेफाटा - ओतुर - बनकरफाटा मार्गे जुन्नर - आपटाळे मार्गे चावंड.
४) अहमदनगरहुन आणे - आळेफाटा- ओतुर - बनकरफाटा मार्गे जुन्नर - आपटाळे मार्गे चावंड.

छायाचित्र - रमेश खरमाळे, माजी सैनिक
मो.नं. ८३९०००८३७०

🌳 धर्ती सोडण्याची वेळ जवळ आली आहे 🌳     माणसं आज मंदिरातील देवाला सोडून झाडांच्या सावलीत थंडावा शोधू लागलेत. वेळीच जागे ...
31/05/2024

🌳 धर्ती सोडण्याची वेळ जवळ आली आहे 🌳
माणसं आज मंदिरातील देवाला सोडून झाडांच्या सावलीत थंडावा शोधू लागलेत. वेळीच जागे व्हा. थोडयाच दिवसांत पावसाळा सुरू होतोय झाडे लावा झाडे फक्त लावून सोडू नका ती जगविण्यासाठी यशस्वी प्रयत्न करा. आपल्या कर्मांच्या फळांमुळे धर्ती सोडण्याची वेळ जवळ आली आहे 🌳🌳
✍️ रमेश खरमाळे, माजी सैनिक

बागलोहरे (नारायणगाव) वसले होते पुर्वी वडज धरणात.      पुर्वी २५/३० घरे असलेले बागलोहरे गाव मीना नदी तीरावर  वडज धरणाच्या...
31/05/2024

बागलोहरे (नारायणगाव) वसले होते पुर्वी वडज धरणात.
पुर्वी २५/३० घरे असलेले बागलोहरे गाव मीना नदी तीरावर वडज धरणाच्या भिंतीजवळ आतमध्ये वसले होते. ग्रुप ग्रामपंचायत बागलोहरे गावाचा कारभार धामनखेल- बागलोहारे - खानापूर असा चालत असे. सन १९६२ ला तिन्हीही गावाच्या ग्रुप ग्रामपंचायत चे प्रथम सरपंच दगडू जणाजी वर्पे हे होते.
मीना नदीच्या उत्तर तीरावर बागलोहरे तर दक्षिण तिरावर काटेडे गाव आमनेसामने सामने दक्षिणोत्तर पसरलेली होती. कालांतराने वडज धरण बांधण्यात आले व या धरणात संपूर्ण बागलोहरे गावचे नामोनिशाण कायमस्वरूपी धरणात बुडाले. आज वडज धरणाची पाणी पातळी खाली गेल्यामुळे बागलोहरे गावच्या पाऊलखुणा येथील महादेव मंदिरातील शिवलिंग,नंदी तसेच काही दगडी शिल्पे उघड्या पडू लागल्याने येथील भुतकाळातील आठवणींना उजाळा मिळत आहे. विशेष म्हणजे त्या काळी बागलोहरे गावची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा केली जायची ती श्री. बाबुराव भिमाजी नाईक (बाबू डंगर) या प्रख्यात बैलगाडा मालकाच्या बैलगाड्यमुळे. स्थानिक सांगतात की ही बैलगाडा शर्यत पाहील्याशिवाय यात्रेतील कुणी बैलगाडाघाट सोडत नसत. बागलोहरे धरणात गेले व येथील धरणग्रस्तांना नारायणगाव येथे जमीन देण्यात आल्या व बागलोहरे नारायणगाव कॉलनी येथे ४५ वर्ष झाले कायमस्वरूपी जरी वसले असले तरी शिवजयंती दिनी येथे टेन्टसिटी उभारण्यात येत असुन जणू प्रत्येक वर्षी या बागलोहरे गाव या धरण किणा-यावर नव्याने जन्म घेताना पहायला मिळते. गावातील ग्रामस्थांची जागा आता येथे मच्छी खायला येणाऱ्या खवय्यांनी घेतली असुन येथील मच्छी व्यवसायाने मोठी भरारी घेतलेली पहायला मिळते व असे वाटते की बागलोहरे गावाचा आठवडे बाजार आता येथे रोजच भरु लागला आहे.
✍️ छायाचित्र - रमेश खरमाळे, माजी सैनिक
मो.नं. ८३९०००८३७०

Address

Junnar
Junnar
410502

Alerts

Be the first to know and let us send you an email when निसर्गरम्य जुन्नर तालुका posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to निसर्गरम्य जुन्नर तालुका:

Videos

Share

Nearby travel agencies


Other Tourist Information Centers in Junnar

Show All