21/06/2021
चारधाम यात्रा.....!!!
नमस्कार आज आपण चारधाम यात्रेबद्दल माहिती घेऊ...
खरंतर हिंदूंची चारधाम यात्रा म्हणजे "द्वारका - रामेश्वर - जगन्नाथ पुरी आणि बद्रीनाथ"..
पण आपण आज माहिती घेणार आहोत उत्तराखंड येथील "यमनोत्री - गंगोत्री - केदारनाथ - बद्रीनाथ यालाच येथे "चारधाम यात्रा".. असे म्हणतात,
"उत्तराखंड".. हे राज्य हे उंच उंच हिमशिखरे, नद्या, अनेक प्रकारची विविध फुले फळे अनेक सुंदर मदिरे आणि तीर्थक्षेत्र या सर्व निसर्ग संपतीने सुंदर आहे..
या चारधाम यात्रेला फार पुर्वी पासुन धार्मिक महत्व आहे,
उत्तराखंड राज्य हे दोन भागात विभागले आहे ते म्हणजे कुमाऊ आणि गाढवाल प्रदेश ..
चारधाम यात्रा ही गाढवाल या प्रदेशात हा संपूर्ण प्रदेशात श्रद्धाळू आणि यात्रेकरू, पर्यटक आणि भविक आणि गिर्यारोहक ज्यास्त प्रमाणात दिसतात, महत्वाचे म्हणजे हा प्रदेश ह्यांच्यावर खुप अवलंबून आहे, त्यांना जास्तीत ज्यास्त रोजगार या यात्रेवरच अवलंबून आहे,
ह्या गाढवाल प्रदेशात बहुतेक प्रत्येक गावात आपल्या हिंदू देवाची मंदिर आणि लीला दिसतात, येथे आपल्या भारतातील प्रमुख नद्या गंगा आणि यमुना ज्यांना आपण जीवन दायनी म्हणतो त्यांचा उगमस्थान आहे, विष्णुनचा सहवास असणारे बद्रीनाथ धाम, बारा ज्योतिर्लिंग पैकी एक केदारनाथ, पंचबदरी, पंचकेदार, पाच प्रयाग, त्रियुगीनारायण मंदिर अशी सुंदर आणि हिमालयात वसणारी मंदिर आहेत, येथे देवांचा वास आहे म्हणून याला देवभूमी असे म्हणतात,
हा प्रदेश त्याच्या निसर्गामुळे अतिशय प्रेक्षणीय आहे, ह्या ठिकाणी वातावरण कधीही बदलत असते परंतु त्यातल्या त्यात एप्रिल / मे महिन्यापासून वातावरण खुप चांगले असते ते नोव्हेंबर पर्यंत म्हणुनच यमनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ या चारधाम मंदिराची दरवाजे हिंदू पंचांगनुसार अक्षय तृतीया या दिवशी उघडतात आणि दिवाळी पासून बंद होतात, त्या मुळे यात्रेकरू, भाविक आणि पर्यटक काळात भरपुर दिसतात,
बाकीच्या सहा महिन्यात या हिवाळ्यात चारही धाम भरपुर हेमवृष्टी होत असल्यामुळे मंदिर बंद असतात, म्हणून त्या काळात बद्रीनाथ ची पूजा जोशीमठ येथे, केदारनाथ ची पूजा उखीमठ येथे यमनोत्री ची पूजा जानकीचट्टी येथे आणि गंगोत्री ची पूजा मुखवा येथे करण्यात येते,
आपल्या सर्व यात्रेकरुंना वेळे अभावी म्हणजे हरिद्वार पासून 10 दिवसात करता येते वातावरण बिघडा मुळे कधी कधी वाढू शकते, परंतु ज्यांना वेळ आहे आणि ज्यांना निसर्गावर खुप प्रेम आहे आणि जे फक्त भटकंती करण्यासाठी आवडतं ते कितीही दिवस ही यात्रा करू शकतात,
आम्ही "श्री अष्टविनायक ट्रॅव्हल्स".. 1997 पासून ह्या यात्रेच आयोजन करत आलो आहे, मला आठवत की मी, माझी आई आणि माझे आण्णा बरोबर असायचे, 1997 ते अंदाजे 2000 साला पर्यंत काही ठिकाणी लाईट सुद्धा नसायची त्या वेळेस चिमणी लाऊन तेथे जेवण आणि झोपायला लागायचे, प्रवासासाठी दुर्गमछोटे रस्ते, पण आता खुप चांगल्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत,
या यात्रेची सुरुवात ही हरिद्वार आणि ऋषिकेश पासून होते आणि हरिद्वार आणि ऋषिकेश येथून चारधाम यात्रेकारिता अनेक प्रवासी कंपन्या आहेत त्या चारधाम यात्रेची प्रवासाची व्यवस्था करतात, ज्या मुळे आपला प्रवास सहज होतो,
"चारधाम यात्रेतील प्रमुख स्थळ"..
"हरिद्वार"..
चारधाम यात्रेची सुरवात या हरिद्वार या प्रवेश द्वार शहारा पासून होते याला हर का द्वार किंवा हर की पौडी असे ही म्हणतात, (हे समुद्रसपाटी पासून उंची 280 मीटर आहे), हे गाव म्हणजे येथे मदिरे, हॉटेल आणि धर्मशाळा तसेच गंगेचे घाट आहेत या घाटावर गंगेची आरती ही खुप प्रसिद्ध आहे, चंडिदेवी आणि मानसादेवी ही मंदिर आहे आणि आपण येथे रोपवे चा आनंद घेऊ शकतो, कनखल ह्या ठिकाणी विविध मंदिर आहेत, हरिद्वार बद्दल एक कथा आहे, पार्वतीमाता शिवशंकरांना विचारतात आजारी, अपंग, वृद्ध लोक ही चारधाम कठीण यात्रा करू शकणार नाही तर त्यांनी ही यात्रा कशी करावी तेव्हा शिवशंकर म्हणाले अशा लोकांनी हरिद्वार इथे गंगेमध्ये स्नान केले तर त्यांना या चारधाम यात्रेचे पुण्य प्राप्त होईल त्यामुळे येथे स्नानाच पण खुप महत्व आहे, आणि या पवित्र ठिकाणापासून ही चारधाम यात्रा सुरु होते...
"यमुनोत्री"..
हरिद्वार हुन प्रथम यमनोत्री करिता प्रस्थान करायच वाटेत प्रवासात बडकोट, सायनचट्टी आणि जानकीचट्टी येथे कुठेही मुक्काम करू शकतात, यमुनोत्री हे हरिद्वार पासुन 230 किमी अंतरावर जानकी चट्टी येथे बस किंवा टेक्सीने आणि पुढे रस्ता थांबतो नंतर 6 किमी पायी, घोडा किंवा डोलीने जावं किंवा चालत जावं ..
उन्हाळ्यातही येथील वातावरण थंड असते. हिवाळा हिमवर्षाव असणारी तापमान 0 डिग्री सेल्सियसपेक्षा कमी होते,
उत्तराखंडातील गढवाल देवभूमी असल्याकारणाने हिमालयाला काही पवित्र तीर्थक्षेत्र ह्या भुमिवर आहे आणि यमुनोत्री अशीच एक आहे. हिंदू पौराणिक कथेनुसार चार धमांपैकी एक, यमुनोत्री हे पवित्र यमुना नदीचे उगम आहे. गरम पाण्याचे झरे आणि हिमनदींसाठी प्रसिद्ध, हिंदू यात्रेकरूंच् दर्शनीय स्थळ, जुन्या आख्यायिकेनुसार, असित ऋषीमुनि येथे राहत असत.
यमनोत्री 3293 मीटर उंचीवर वसलेले, यमुनोत्री उत्तरखंडातील उत्तरकाशी जिल्ह्यात आहे, सर्व बाजूंनी हिमालयीन वेढलेले आहे. यमुनोत्री, 4421 मीटर उंचीवर कालिंद पर्बतवरील सप्तरिशी कुंडचा हिमनद तलाव हेच यमुना नदीचा वास्तविक स्रोत आहे.
गंगे सोबत नाव घेणारी नदी म्हणजे यमुना नदी..
जयपूरच्या महाराणी गुलरिया यांनी 19 व्या शतकात मंदिर बांधले. 1923 मध्ये एका मोठ्या भूकंपात त्याचा नाश झाला आणि त्यानंतर त्याचे पुन्हा बांधकाम करण्यात आले. 1982 मध्ये हे पुन्हा एकदा खराब झाले होते. हे हिमनदीच्या खाली 6 किमी अंतरावर 3030 मीटर उंचीवर आहे. हे मंदिर यमुना नदीला समर्पित आहे. चांदीच्या मूर्तीच्या रूपाने ते पुष्पहारांनी सजलेले असते.
पौराणिक कथेनुसार,यमुना ही सूर्य, सूर्यदेवची कन्या आहे. यमुनामाता यमाची बहीण आहे, आणि म्हणून अशी मान्यता आहे नदीच्या पाण्याने स्नान करणार्या कोणालाही वेदनादायक मृत्यूपासून वाचवले जाऊ शकते. इथल्या गरम पाण्याच कुंड देवताला प्रसाद किंवा पवित्र अर्पणे तयार करण्यासाठी केला जातो. साधारणत: तांदूळ आणि बटाटे या कपड्यांच्या पिशव्यामध्ये गरम पाण्यात बुडवून शिजवले जातात ह्यास सूर्यकुंड गरम पाण्याचे झरे म्हणुन ओळखले जाते. दिव्य शिला यमुनोत्री मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी तीर्थयात्रेद्वारा समोर ठेवली आहे तीच दर्शन करुन मंदिरात जातात.
यमुनोत्री मंदिराजवळील सूर्यकुंड गरम पाण्याचा झरा आहे. यालाच यमुना नदीचे नाव देण्यात आले जे हिंदू पौराणिक कथेनुसार सूर्यदेवाची संतती आहे. यमुनोत्री मंदिराच्या परिसरात सूर्यकुंड हे पवित्र स्थान आहे.
"गंगोत्री"..
यमनोत्री दर्शन करून पुढे बडकोट मार्गे उत्तरकाशी इथे मुक्काम वाटेत सुंदर देवदार उंच झाडें रमणीय हिमाचल, ब्रम्हकपाल आणि धरासू बघत उत्तरकाशी आगमन मुक्काम, उत्तरकाशी येथील काशी विश्वनाथ शक्तिपीठ दर्शन,
दुसऱ्या दिवशी सकाळी गंगोत्री 100 किमी रम्य प्रवास गंगोत्री पोहचायचं वाटेत गंगनानी, भटवाडी बघायचं गांगनानी येथे गरम पाण्याची कुंड आहेत पुर्वी चारधाम यात्रा पायी करत असे त्यावेळेस गांगनानी येथे यात्रेकरू अंघोळ करून थकवा दूर करत असत, नंतर वाटेत हरशील हे रम्य अशा हिमालयात सजलेलं गाव नंतर भैरोघाटी तुन प्रवास सफरचंद बगीचा, धबधबे बघत भैरोघाटीतून लंका येथे आगमन गंगोत्री जवळील एक गाव लंका, येथील गंगा नदीपासून 410 मीटर उंचीवर असलेला आशिया खंडातील एक पूल, येथून जुना यात्रा मार्ग दिसतो, पुढे थोड्या वेळात गंगोत्री आगमन इथे निवासाची सोय आहे, स्वच्छ भागिरीथी गंगा आणि प्राचीन मंदिर, या मंदिराचा जीर्णोद्धार नेपाळ च्या गुरखा जनरल अमरसिह थापा यांनी केला आहे,
इथे भाविक राजा भारद्वाज राजाने गंगा जमिनीवर आणण्यासाठी जिथे तप केला होता ती शिला, खळखळत वाहणारी गंगा आणि गंगोत्रीहुन विविध हिमशिखरे आपल्याला दर्शन देतात, येथील हिम शिखरे पाहून खुप प्रसन्न वाटत,
गंगोत्री हुन गोमूख करिता 18 ते 20 किमी चा ट्रेक आहे सोबत मार्गदर्शन करणारे सुद्धा भेटतात गोमूख म्हणजे गंगेचे उगम स्थान, परंतु सद्या हा ट्रेक पर्यावरणाची हानी होत असल्यामुळे निर्बंध घातले आहेत,
गंगोत्री दर्शन करून पुन्हा उतरकाशी आगमन मुक्काम करायचा,
"केदारनाथ"..
सकाळी केदारनाथ करिता प्रस्थान खडतर प्रवास वाटेत कीर्तिनगर, श्रीनगर एक मोठं शहर जिथे प्रवासात लागणार सर्व सामान, हॉटेल्स उपलब्ध आहे ( उत्तरखंडातील ) रुद्रप्रयाग एक जिल्हा परंतु आता बायपास रोड बनवला आहे, पुढे आगस्तमुनी, गुप्तकाशी, फाटा, रामपूर आणि सीतापूर गौरीकुंड केदारनाथ असा खडतर पण रमणीय प्रवास आहे, गौरीकुंड येथे गाडीरस्ता थांबतो पुढे घोडे, डोली, कंडी किंवा पायी असा प्रवास आहे, ज्यांना हेलिकॉप्टर ने दर्शनाकरिता जायचे आहे त्यांच्या साठी गुप्तकाशी किंवा फाटा पासुन उपलब्ध आहेत परंतु याच बुकिंग ऑनलाईन करावं लागते पण वतावरण खराब झाल्यावर कधीही हेलिकॉप्टरच्या फेऱ्या बंद होतात त्या हिशेबाने बुकिंग करणे जरुरी आहे,
पायी रस्त्याने जाताना सुदंर धबधबे, जंगल फुले झाडें बघायचा आनंद मिळतो, गोरीकुंड पासून रामबाडा - गरुडचट्टी आणि पुढे केदारनाथ असा 16 किमी चा पायी प्रवास आहे,
केदारनाथ येथे राहण्यासाठी धर्मशाळा वैगरे ची सोय आहे,
केदारनाथ हे बारा ज्योतिर्लिंग पैकी एक आहे, केदारनाथ मंदिरामागे उंच हिमालय शिखरे आहे ( केदार पर्वत ) पहाटे च्या सूर्यकांराणामुळे ती शिखरे सोनेरी रंगानी उजळून निघतात, केदारनाथ समोरील परिसर खुप मोठा आहे,
2013 मध्ये झालेल्या महाभीषण पुरामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणावर मनुष्यहानी आणि रस्त्याचे नुकसान झाले त्यामुळे मंदिराच्या परिसरात खुप बदल झाला आहे, मंदिरामागे मोठी शिळा थांबली आहे असे म्हणतात की या शिळेमुळे मंदिराचे नुकसान होणे वाचलं, हिमशिखरे आणि ग्लशियर या मुळे वरती तळ निर्माण झाले आहे आणि तेथून मंदाकिनी नदीचा उगम स्थान आहे ही मंदाकिनी नदी केदारनाथ पासून रुद्रप्रयाग पर्यंत रस्त्याच्या कडेला लागून आहे,
पुढे बद्रीनाथला जाताना दोन रस्ते आहेत एक उखीमठ चोपता मार्गे जंगलातून आणि दुसरा मार्ग रुद्रप्रयाग - कर्णप्रयाग - नंदप्रयाग - हेलंग आणि जोशीमठ मार्गे बद्रीनाथ पर्यंत प्रवास करतात,
बद्रीनाथ हे विष्णू चे स्थान वाटेत
"बद्रीनाथ"..
बद्रीनाथ हे या चारधाम यात्रेमधील विष्णुक्षेत्र आहे, समुद्र सपाटी पासून 3110 मिटर 10200 फूट उंच आहे,
बद्रीनाथ हे मंदिर हिंदूचे प्रमुख चारधाम पैकी एक धाम आहे, हे अलकंनंदा नदीच्या काठी आहे, इथे गरम पाण्याचे कुंड आहेत त्यास तपोकुंड असे म्हणतात, तपोकुंडात अंघोळ करून संपुर्ण थकवा दूर होतो, मंदिराच्या महाद्वाराला सिंहद्वार असे म्हणतात, विष्णुना तुळशीपत्र आवडतात त्याच्याने अभिषेक करतात,
भारत भरात वैदिक मताची आणि अदैवत तत्वज्ञानाची प्रतिस्थापना करण्याचे काम आद्य शंक्रचार्य यांनी केले, त्यांनी भारताच्या चार टोकाना चार धाम वसवले, त्यातले एक बद्रीनाथ एक धाम,
मुख्य गाभारात भगवान विष्णुची सुबक मूर्ती सोन्या हिऱ्यांनी मडवली आहेत,सोबत गरुड, उद्धव, लक्ष्मीजी, गणेश, कुबेर, नर आणि नारायण यांच्या मुर्त्या सुद्धा प्रस्थापित आहेत, हे सर्व मनमोहक आणि सुंदर दिसते, मंदिराच्या गाभाऱ्यात लक्ष्मी, नगरपाल यांची मंदिर आहेत, श्री रामदास स्वामींनी स्थापन केलेलं वीर मारुती मंदिर सुद्धा आहे, बद्रीनाथाचे मंदिर खुप सुंदर, मनमोहक आणि रंगीबेरंगी आहे,
बद्रीनाथ पासून 3 किमी अंतरावर माना हे गाव आहे, भारतातील शेवटचे गाव आहे,
अलकंनंदा तिरावर माना गावा जवळील गुहेत श्री गणेशाना व्यासांनी महाभारत सांगितले ही व्यास गुफा आहे, आणि अजून एक गुफा आहे तेथे बसुन श्री गणेशानी महाभारत लिहिले ती गणेश गुफा आहे, बाजूला सरस्वती नदी आहे जी श्री गणेशानी शाप दिला होता आणि ती तेथून गुप्त स्वरूपातून एकदम प्रयाग ( अलाहाबाद ) येथील त्रिवेणी संगमावर मिळते,
सोबत भीम पूल आहे जो भीमानी एक मोठा दगड अलकंनंदा नदीवर स्वर्गारोहिणी साठी जात होते तो ओलांडण्यासाठी टाकला होता तो भीमपुल अजूनही आहे,
आता संपूर्ण चारधाम यात्रा संपन्न झाली पुढे गोविंदघाटी आहे, जेथे शीख धर्माचे पवित्र स्थान हेमंकुंड साहेब हा 22 किमी ट्रेकिंग रस्ता आहे, शीख बांधव भरपुर प्रमाणात दर्शनाकरिता येतात हेमंकुंड साहेब पासून पुढे 6 किमी फुलोंकी घाटी जिथे भरपुर ट्रॅकर्स जुलै, ऑगस्ट दरम्यान येतात,
बद्रीनाथ पासून 40 किमी वर जोशीमठ आहे येथे जेव्हा बद्रीनाथ मंदिर सहा महिने बंद असते त्या वेळेस बद्रीनाथचे दर्शन येथे घेतात,
पुढे जोशीमठ जवळ औली रोपवे आहे, भरपूर विदेशी पर्यटक हिमवृष्टी होते तेव्हा स्किईंग करण्यासाठी येथे येतात,
बद्रीनाथ हुन हरिद्वार जाताना अलकंनंदा नदीचे पाच संगम आहेत त्यास "पाच प्रयाग".. असे म्हणतात, दोन नद्यांचा संगम म्हणजे प्रयाग..
पहिला प्रयाग विष्णू प्रयाग".. जेथे अलकंनंदा आणि धोली नदी यांचा संगम,
दुसरा संगम पुढे "नंदप्रयाग".. आहे जिथे नंदनदी आणि अलकानंदा संगम..
तिसरा संगम "कर्णप्रयाग".. कर्णनदी आणि अलकंनंदा संगम येथे कर्णाने सूर्याची उपासना केली होती आणि त्याच्याकडून कवच कुंडल प्राप्त करून घेतली होती,
चौथा संगम "रुद्रप्रयाग".. येथे केदारनाथ येथून येणारी मंदाकिनी नदी आणि अलकंनंदा नदीचा सांगम,
पाचवा संगम "देवप्रयाग".. येथे जिथे अलकंनंदा नदी बरोबर जे चार संगम हुन अलकंनंदा नदी गंगोत्री वरून येणाऱ्या भागीरथी नदी यांचा संगम देवप्रयाग, पुढे हिच नदी गंगा म्हणून ओळखली जाते,
पुढे "ऋषिकेश".. येथील एकमेव लक्ष्मण मंदिर, रामझुला आणि
लक्ष्मण झुला बघून हरिद्वार आगमन..
या संपूर्ण चारधाम यात्रेला मध्ये आपल्याला देवदर्शन, निसर्ग, नाद्यांचा उगम, घोडे, डोली हेलिकॉप्टर आणि पायी पिट प्रवास या सर्व गोष्टी आपल्याला या चारधाम यात्रेमध्ये एन्जॉय करायला मिळतात,
चारधाम यात्रा उत्तराखंड येथील गढवाल मधील एक रमणीय आणि देव दर्शनीय यात्रा आहे,
रस्ते दुर्गम आहे खडतर आहेत पण भारतीय सैन्याच्या रस्ते बांधणे या विभाग ज्या ज्या वेळेस पहाड कोसळतात आणि रस्ते खराब होतात तेव्हा हे आपले जवान नेहमी तत्पर असतात आणि त्या सैन्य रस्ता विभागाचे नाव "दीपक".. आहे आपण चारधाम प्रवास करताना रस्तो रस्ती या विभागाचे स्लोगन दिसतात,
ठिसूळ हिमालय आणि छोटे दुर्गम रस्ते आणि सतत बदलणारे वातावरण या कारणाने जर आपलं यात्रेच नियोजन मर्यादित दिवसाकरिता असेल तर यात्रेतील एखाद ठिकाण वगळलं जाऊ शकते..त्यामुळे या यात्रेत एखादा दिवस तरी जास्तीचा ठेवावा..
तेथील लोक, डोली, कंडी किंवा घोडेवाले वातावरणा बाबत मुंबई च्या यात्रेकरुंना नेहमी बोलतात,
"मुंबई का फेशन और उत्तरांचल का मोसम कभीभी बदलता हैं,..
खरंच जीवनात एकदा तरी या देवभूमी आणि चारधाम बघण्याचा आनंद आपण भारतीयांनी घेतलाच पाहिजे..
वरील सर्व माहिती आम्ही आयोजन केलेल्या "चारधाम यात्रा".. याच्या अनुभवावरून आणी इतर काही ठिकाणी वाचून तयार केलेली आहे..
🙏🙏🙏