07/12/2022
भटकंती --
अगदी नावाप्रमाणेच माझ्यासारख्या भटकण्याची प्रचंड आसक्ती असणा-यांसाठी एक पर्वणीच. नुकतीच भटकंती टुर्स सोबत केरळ सहल करुन आलो. चाकरमानी असल्याने लिहायला तसा उशीरच झाला. पण एवढा सुंदर अनुभव तुम्हा सर्वांपर्यंत पोहचवल्याशिवाय मन शांत राहीना.
तर एकुण सहा दिवसांची आमची ही केरळ दर्शन सहल भटकंती आणि टीम ने अक्षरशः आठवणींच्या प्रवाहतील एक mile stone बनवली. मी, पत्नी, मुलगी, मुलगा आणि माझी आई (वय 72) एवढेजण रात्री 12.15 ला मुंबई एअरपोर्टवरुन कोचिन कडे रवाना झालो. सर्वांचाच पहिलाच विमान प्रवास असल्याने वेगळीच धमाल आली. एअरपोर्टवर भटकंती द्वारा नियोजित आमचे ड्रायव्हरने (प्रेजीश) सुहास्य वदनाने स्वागत करुन अगदी घरच्या माणसासारखी बॅगा गाडीत ठेवण्यापासून ते अखेरीस परतीसाठी एअरपोर्टवर सोडेपर्यंत उत्तम साथ दिली. केवळ ड्रायव्हर म्हणून नव्हे तर एक उत्कृष्ट गाईड म्हणून ही त्यांनी सेवा दिली. माझ्या आईची तर माझ्या पेक्षा अधिक काळजी ते घेत होते. सोबत आजीची लाडकी दोन नातवंडे होतीच.
संपूर्ण प्रवासात आमची राहण्याची खाण्याची उत्तम सोय तर होतीच पण गर्दीमुळे हाउसबोट हा पर्याय आमच्या पॅकेजमध्ये नसताना ही अशोक आणि सुनिल जाधव सरांनी प्रयत्न पूर्वक आम्हास मिळवून दिला. विशेष म्हणजे हे दोघेही तेव्हा दुबई टूर वर होते. तरीही दररोज किमान एकतरी Whatsapp कॅाल करुन आमची काळजी घेत होते. इतर so called नामांकित टूर्स सारखे केवळ नफाखोरी पेक्षा आपल्या ग्राहकांसाठी प्रत्येक सहल अविस्मरणीय कशी होईल यासाठी ते विशेष प्रयत्न करत होते. ते ही अत्यल्प किंमतीमध्ये.
या संपूर्ण प्रवासात आम्ही मुन्नार मधील सर्व प्रेक्षणीय स्थळे, कॅक्टस् गार्डन, फ्लॅावर गार्डन, फोटो स्पॅाटस्, विविध मंदिरे, चर्चेस, थेकडी मधील ठिकाणे, हत्ती सफर, मसाला शॅापिंग, पेरियार आयुर्वेदिक बाग, बलुन राईडस्, हातमाग, जीप सफारी द्वारे तळ केरळ आणि ग्रामीण केरळ दर्शन, मसाल्याच्या बागा, चहाचे मळे, चहा फॅक्टरी, खूप सारे धबधबे, रबराची झाडे, हाऊस बोट मुक्काम, म्युझियम, समुद्री अन्नपदार्थ, स्पीड बोट, दीपस्तंभ, ज्यू मार्केट, बेट सफारी, मरीन ड्राईव्ह बीच असा खजिना अनुभवला. त्रासदायक होती ती एकच गोष्ट म्हणजे बायकोची माझ्या दृष्टीने अनावश्यक खरेदी. पण. .. . . .
आमचे ड्रायव्हर अगदी उत्साहाने आम्हाला सर्व ठिकाणी योग्य वेळेवर घेऊन जात होते. त्याशिवायही सदर ठिकाणी अगोदर फोन करुन तिकिटे आरक्षित करुन ठेवणे, गर्दी असेल तर इतर ठिकाणे पाहून मग तिकडे जाणे असे नियोजन करत होते. याशिवाय आमच्या साैं. नी गुगल मॅप वर शोधलेली ठिकाणेही कसलीच कुरकुर न करता आम्हाला दाखवत होते. मोडक्या तोडक्या हिंदीत पुन्हा पुन्हा आम्हाला एकच वाक्य सांगत होते, *"आप बटकंती से आए हो, तो बिनदास्त रहो."* (त्यांचा 'भ' 'ब' असा होता.😄 )
शेवटच्या दिवशी आमचे कोचीन ते मुंबई विमान स. 9.00 ला असले तरी बोर्डींग वेळ 7.45 ची होती. तरी देखील हॅाटेल ने आमचा नाष्टा स. 6.00 ला च नीट पॅक करुन आमच्या स्वाधीन केला.
एअरपोर्टवर पोहचताच घरी परतण्याची खुशी होतीच पण त्याहीपेक्षा पृथ्वीवरचा हा स्वर्ग पुन्हा पुन्हा पहायला हवा अशी इच्छाही. केवळ साैं नी च नव्हे तर मुले आणि आईने ही तिथूनच फर्मान सोडले, "इथून पुढच्या सगळ्या सहली फक्त भटकंती टूर्स सोबत च करायच्या." नकार देऊन करतो काय. हो. १०००% टक्के असं जाहीर आश्वासन देऊन मायभूमीत परतलो पण अजूनही केरळच्या आठवणी भटकंती टीम ने केलेले परिश्रम चेहरा-यावर आपसूक हास्य आणतात. धन्यवाद अशोक शिंदे सर, सुनिल जाधव सर आणि टीम भटकंती!