06/11/2023
.........किमया स्टेटसची..........
सांज सावली गावरान कोंबडी पालन व्यवसायाच्या ट्रेनिंग मध्ये अजून न नावाजलेले नाव. इतर अनेक बाबी करत करत करावयाचा व्यवसाय. जनसंपर्क भरपूर, पण तरीही मार्केटिंग मध्ये खूप मागे.
मग का कुणास ठाऊक?, एक आयडिया सुचली. फोन मधील 2200 Contact List मधील 440 लोकांना ट्रेनिंगच्या Pamplet चा Status ठेवण्याची विनंती केली. आम्हाला मानणारे, जपणारे, हित पाहणारे अशा एकूण 48 लोकांनी Status ठेवला. 4 जणांनी Facebook Story ठेवली. काहींनी Group मध्ये Share केले आणि या व्यतिरिक्त काहींनी ज्याच्या त्याच्या प्रमाणे माहिती प्रसारित केली.
ते ट्रेनिंग काल सांज सावलीत पार पडले. आमच्याकडे फक्त 2 व्यक्तींचे Booking होते, हे ट्रेनिंग शेवटी 12 व्यक्तींचे पार पडले. कोणी म्हणेल!, हा आकडा तुम्ही केलेल्या मार्केटिंगच्या मानाने खूप कमी आहे. पण आम्ही तो सकारात्मक घेतो कारण, 1) विडणी ता फलटण 2) विखळे ता खटाव 3) कामेरी ता वाळवा 4) गोटखिंडी ता वाळवा 5) संभाजीनगर ता करवीर..... हा नकाशा काढला तर, मार्केटिंग केलेलेची व्याप्ती कळते. तसेच हा प्रयोग 1-2 दिवस अगोदर केल्याने काहींनी पुढच्या ट्रेनिंगबाबत ही विचारणा केली. शिवाय अरविंद खबाले या मित्राचा Status बद्दलचा अभिप्राय ही खूप काही सांगून गेला.
So ज्यांनी ज्यांनी यात सहकार्य केले त्यांचे सांजसावली मार्फत मनापासून आभार. ज्यांना काही अडचणीमुळे Status किंवा इतर बाबी शक्य झाल्या नाहीत, त्यांचेही मनापासून आभार.
आपले प्रेम, सहकार्य सांजसावलीवर असेच राहू द्या ...................धन्यवाद.