14/10/2023
चारधाम यात्रा सुफळ संपूर्ण .
यावर्षी श्री केदारनाथ बद्रीनाथ दर्शन घ्यावे अशी खूप प्रबळ इच्छा मनात आली त्यामुळे काही मोजक्याच मित्रमंडळींसह २७ सप्टेंबर या जागतिक पर्यटन दिनाच्या मुहूर्तावर हि ट्रिप चालू केली.
यामध्ये आम्ही ऋषिकेश, हरिद्वार, यमुनोत्री,गंगोत्री, श्री केदारनाथ, श्री बद्रीनाथ, यांसह गुप्त काशी, उत्तरकाशी, जिथे श्री महादेव व पार्वती यांचा विवाह सोहळा संपन्न झाला ते ठिकाण म्हणजे श्री त्रियुगी नारायण मंदिर , गंगनानी हि सर्व यात्रा यशस्वीपणे पूर्ण केली.
सर्व ठिकाणी दर्शन फार उत्तम रितीने पार पडले.
श्री केदारनाथ येथे तर स्वहस्ते देवाला अभिषेक व विशेष पूजा करता आली.. स्वयंभू महादेवांना स्पर्श करुन चंदन विलेपन पूजा केली, डोकं टेकून नमस्कार केला तेव्हाची मनातील भावना ही सांगण्यापलिकडील आहे..
श्री महादेवांनी आम्हाला एवढे छान दर्शन घेऊ दिले हि परमेश्वर कृपाच !!
श्री बद्रीनाथ येथेही खूप छान दर्शन झाले, सोबत बोनस म्हणून दुरुन का होईना योगी श्री आदित्यनाथ यांना सुद्धा बघायला मिळाले.. विशेष कौतुक म्हणजे त्यादिवशी त्यांची उपस्थिती तिथे असूनही त्यांनी भक्तांचे दर्शन थांबवले नव्हते..
हे झाले यात्रेबद्दल पण उत्तराखंडला निसर्गानेही भरभरून बरंच काही दिलं आहे त्यात आम्ही गरतांग गली हा भगीरथी नदीकाठचा एक खूप सुंदर ट्रेक ही केला, औली हे हिलस्टेशन रोपवेने बघितले, हर्सिल व्हॅली बघितली ,जगप्रसिद्ध असे ऋषिकेश येथील रिव्हर राफ्टिंग केले-- यात मध्यावर गंगा नदीत दोरी धरुन मारलेल्या उड्या तर निव्वळ अविस्मरणीय !
भगीरथी, अलकनंदा, या नद्यांमध्ये निसर्गाच्या सान्निध्यात थांबून केलेलं फोटो शूट...सगळं काही एकदम भारी होतं.
विष्णूप्रयाग, नंदप्रयाग, कर्णप्रयाग, रुद्रप्रयाग, देवप्रयाग या पंचप्रयागांनी गंगा नदीच्या स्थापनेत घेतलेला पुढाकार बघितला..
आज एवढ्या सोई, बरेपैकी रस्ते असूनही ही यात्रा एवढी चॅलेंजिंग आहे तर जेव्हा या सोई नव्हत्या तेव्हा काय परिस्थिती असेल ही कल्पनाही अवघड आहे.
चारधाम बद्दल जाणवलेले काही तथ्यं आणि मुद्दे
१) हि यात्रा फक्त यात्रा म्हणून न करता सोबत निसर्ग भेटीसाठी ही निवांत वेळ प्लॅन करावा.
२) शक्यतो हि टूर कुठल्याही यात्रा कंपनीतर्फे न करता कस्टमाईज टूर अरेंज करुन घ्यावी
३) रस्ते आणि प्रवास तसेच ट्रॅफिक जाम साठी लागणारा वेळ हा टूर प्लॅन करताना गृहीत धरावा, त्यानुसारच प्लॅन करावा.
४) रोज १५०- १८० किमी पेक्षा जास्त प्रवास ठेऊ नये
५) प्रवासापूर्वी एक महिना रोज किमान ८ किमी चालण्याची सवय करावी.
६) योग्य वयात आणि जनरल फिटनेस चांगला आहे तोवरच ही यात्रा करावी.
७)हि यात्रा दरवर्षी अक्षयतृतीयेला चालू होते व नरक चतुर्दशी पर्यंत चालू असते.
मे व जून, जुलै महिन्यात प्रचंड गर्दी असते,
ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात गर्दी खूप कमी असते पण तिथे प्रचंड पाऊस ही असतो जो बरेचदा धोकादायक आणि विध्वंसक असू शकतो
ऑक्टोबर नोव्हेंबर ( निम्मा ) हे दिवस जरा त्यातल्या त्यात कमी गर्दीचे व योग्य असतात.
चारधाम अधिक उत्तराखंड अशी टूर कोणाला पाहिजे असल्यास, जॉयफुल जर्नीज तर्फे फर्स्ट हॅंड मॅनेजमेंटसह कस्टमाईज आयोजित करुन देण्यात येईल
Joyful Journeys
Contact
9637210130
9158750500
6006295770