Travela Dandeli

Travela Dandeli Back to Nature , Talk to Nature is theme of the Camp. A Nature Expert make this forest talk to nature lovers.

Vijayanagar Empire has left  indelible heritage footprints. Hampi, Badami, Aihole , Pattadkall  and surroundings stand a...
10/10/2024

Vijayanagar Empire has left indelible heritage footprints. Hampi, Badami, Aihole , Pattadkall and surroundings stand a strong testimony to our rich cultural treasure.

निसर्गरम्य उत्तर कर्नाटक  :  मलनाड भाग   ४   माले ची ललिता आक्काकुदरेमुख अरण्यातून प्रवास करून आम्ही बाहेर आलो . साधारण ...
03/10/2024

निसर्गरम्य उत्तर कर्नाटक : मलनाड भाग ४

माले ची ललिता आक्का

कुदरेमुख अरण्यातून प्रवास करून आम्ही बाहेर आलो . साधारण साडेनऊ ची वेळ झाली असावी आणि सकाळच्या न्याहारीसाठी आम्ही काही सोय होते का पाहत होतो. पोट काव काव करत होतंच.

समोरच एक टपरी वजा उपहारगृह दृष्टीस पडलं. सावध पावले टाकत तिथल्या आक्काला काय काय मिळेल म्हणून विचारणा केली. पण तिने काही सांगण्याआधी तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह पाहून मनोमन ठरवलेलं या आक्काकडेच आज न्याहारी करायची आणि तिने त्याला पुरेपूर न्यायही दिला. ही होती ललिता आक्का. आम्हाला ललिता आक्काच्या रूपाने एक हसतमुख, उत्साही अन्नपूर्णाच भेटली. इडली सांबार चटणी लगेच उपलब्ध होतं आणि मागणी नुसार मिरची भजी , बटाटा भजी , डोसा सुद्धा तयार करून मिळणार होता. एकदम गावठी आणि साधं असं तिचं हे उपहारगृह. सर्वप्रथम आक्काने इडली चटणी सांबार ज्यांना हवं होतं त्यांना ते वाढले . मग एका बाजूला बटाटा भजी आणि मिरची भजी तळायला सोडली , सोबतच डोसे सुद्धा बनवायला घेतले . गरम डोसे , गरम भजी ...... आहाहा काय तो स्वाद , काय ती स्थानिक रुची. आमच्यातील प्रत्येकाने आवडीप्रमाणे इडली डोसा तर घेतलाच पण प्रत्येकाने बटाटा भजी आणि मिरची भजी चवीने खाल्ली. निरोपाला गरमागरम चहा आणि कॉफी होतीच. षड्रिपु प्रसन्न.

फारशा साधन सुविधा नसताना सुद्धा पर्यटकांना स्थानिक खाद्य संस्कृतीचा अतिशय रुचकर थाट अनुभवाला आला. रस्त्याच्या कडेला उपहारगृह चालवून उपजीविका करणारी ही ललिता आक्का गावाकडची अशिक्षित महिला असली तरी स्वभावाने आणि व्यवहाराने खूपच सुसंस्कृत, आपुलकीने वागणारी होती. नऊ जणांच्या गरगरीत नाश्त्याचे जेमतेम ५७० रुपये झाले . आक्काला सहाशे रुपये देऊ केले आणि वरचे ३० रुपये खुशी म्हणून ठेव असे सांगितल्यावर पहिल्यांदा तिला त्यावर विश्वास बसला नाही , तिने सविनय त्याला नकार दिला. परंतु खूपच आग्रह केल्यावर तिने ते ठेवले आणि ताटामध्ये शिल्लक असलेल्या भज्या किती खायच्या त्या खा, असा निर्मळ प्रेमळ पर्याय समोर ठेवला.

कुठे ते माले , कोण ती ललिता आक्का , कोण कुठले आम्ही , सगळे मिळून तीस मिनिटे भेटलो, तरी पण आक्काने , बहिणीच्या हक्काने आम्हा सर्वांना जिंकले. वंदन अन्नपूर्णेला , वंदन भारत मातेला .

न्याहरी नंतर चहा कॉफी घेऊन आम्ही उडपीकडे रवाना झालो.

ट्रॅव्हेला ट्रॅव्हल कॉन्सेप्टस् ....................पर्यटनातून जोडो भारत

भ्रमण : ७९७२०५०७५१ / ९८२२०६३३७० whatsapp

निसर्गरम्य उत्तर कर्नाटक  :  मलनाड भाग   ३  कुद्रेमुखची तोंड ओळख आणि जळवांचा जलवा  सकाळी उडुपी कडे निघालो.  हा मार्ग सुर...
02/10/2024

निसर्गरम्य उत्तर कर्नाटक : मलनाड भाग ३

कुद्रेमुखची तोंड ओळख आणि जळवांचा जलवा

सकाळी उडुपी कडे निघालो. हा मार्ग सुरुवातीला चहा , कॉफी चे मळे , त्यातील मासाल्याच्या वेली नी आणि जळवांचा जलवा
होर्नाडूचा निरोप घेऊन आम्ही झुडुपांच्या प्रदेशातून आम्हाला घेऊन गेला. वाटेमध्ये कॉफीची लगडलेली छोटी छोटी फळ पाहण्यासाठी आम्ही गाडीतून उतरलो, जवळ छान पैकी चहाचा मळा सुद्धा आमच्याकडे टवकारुन पाहत होता. एक निर्झर पायातून वाहत होता. ठिकठिकाणी थांबून छायाचित्र काढण्यामध्ये आम्ही रममान झालो. समोरच्या डोंगरावर सुपारीच्या बागा आणि लांब वर पसरलेल्या सह्याद्रीच्या डोंगर रांगा पाहण्यात मश्गुल झालो.

आमचा हा गाफील पणा परिसरातील ओलसरपणावर बागडणाऱ्या जळवांनी हेरला. त्यांनी आमच्यासोबत उडूपीला यायचे ठरवून आम्हाला कधी जवळ केलं हे समजलच नाही. परंतु गाडी सुरू व्हायच्या आधी आमच्यातल्या एका पर्यटकांना हे आगंतुक प्रवासी दिसले आणि मग सर्वांचा जो काही तांडव सुरू झाला, तो पाहून आणि ऐकून बिचाऱ्या जळवांना पश्चाताप झाला असावा. या पंचवीस तीस जळवाना गाडीतून बाहेर फेकणे कर्म कठीण काम होतं. एका दोघांना त्यांनी प्रेमाने लोंबकळायला सुरु केले होते. पण यथातथा त्यांच्यापासून सुटकारा मिळाला.

पुढे लगेचच कुदरेमुख अभयारण्याचा प्रवेशद्वाराशी आम्ही पोहोचलो . येथून साधारणपणे चाळीस किलोमीटरचा प्रवास या राखीव अरण्यामधून करताना कुदरेमुख अभयारण्य काय नायाब चीज आहे हे लक्षात आले. त्यातील वनविविधता , उंच डोंगरराजी , त्यातून वाहणाऱ्या नद्या , ओढे पहात पहात आम्ही माले नावाच्या दुसऱ्या द्वारापाशी कधी येऊन पोहोचलो समजलेच नाही. गाडीतील या प्रवासात वन्य प्राणी, पक्षी काही नजरेस पडले नाहीत .

भविष्यात कुद्रेमुख ची सहल आयोजित करणेचा बेत नक्की .

ट्रॅव्हेला ट्रॅव्हल कॉन्सेप्टस् ....................पर्यटनातून जोडो भारत

भ्रमण : ७९७२०५०७५१ / ९८२२०६३३७० whatsaap

निसर्गरम्य उत्तर कर्नाटक  :  मलनाड भाग   २ सी गोडू कॅफे शृंगेरीचा निरोप घेऊन आम्ही होर्नाडूकडे  रवाना झालो.  सर्वदूर चहा...
28/09/2024

निसर्गरम्य उत्तर कर्नाटक : मलनाड भाग २

सी गोडू कॅफे

शृंगेरीचा निरोप घेऊन आम्ही होर्नाडूकडे रवाना झालो. सर्वदूर चहाचे आणि कॉफीचे मळे , त्यामध्ये विसावलेल्या मसाल्यांच्या झाडांना, झुडूपांना न्याहाळत , वळणा वळणाच्या डोंगरांमधून जाताना वाटेत बाळेहुन्नूर गावाच्या अलीकडे बगीच्या मध्ये वसलेले एक उपहारगृह आमचे आवडीचे ठिकाण झाले आहे.

रस्त्याच्या कडेला, कॉफीचा मळ्यात असलेले , सर्व सुविधांनी युक्त छानशा व्यवस्था, असे हे “सी गोडू कॅफे “ नावाचे हे उपहारगृह. येथे दक्षिणात्य थाळी, दक्षिणात्य पदार्थ आणि सोबतच उत्तर भारतीय थाळी भोजनासाठी मिळते. पोटोबाचा फोटोबा व्हावा इतके खावून येथील बागेत झोपाळ्यावर झुलायला आणि पारांवरती गप्पा मारत बसायला कितीही वेळ कमीच पडावा असे इथले सहज सुंदर निवांत वातावरण आहे

ट्रॅव्हेला ट्रॅव्हल कॉन्सेप्टस् ....................पर्यटनातून जोडो भारत

भ्रमण : ७९७२०५०७५१ / 9822063370 whatsaap

निसर्गरम्य उत्तर कर्नाटक  :  मलनाड भाग   १  सहस्त्रलिंग दर्शन सुपारीच्या व्यापारासाठी प्रसिद्ध असलेले कर्नाटकमधील उत्तर ...
26/09/2024

निसर्गरम्य उत्तर कर्नाटक : मलनाड भाग १

सहस्त्रलिंग दर्शन

सुपारीच्या व्यापारासाठी प्रसिद्ध असलेले कर्नाटकमधील उत्तर कन्नड जिल्ह्यातील , शिरसी हे गाव अतिशय साफसुतरे आणि शिस्तबद्ध दिसले. गजबजलेली बाजारपेठ , भाजी बाजार पाहताना येथील लोकांच्या आवडी निवडी लक्षात येतात. या गावापासून साधारण १५ किलोमीटर अंतरावर शाल्मला नदीचे पात्र एक वेगळेपण घेऊन शतकानु शतक वाहत आहे. घनदाट अरण्यात , नदीच्या पात्रामध्ये जे खडक विसावलेले आहेत त्यावर अतिशय देखणी शिवलिंग कोरलेली पाहायला मिळतात. त्याचसोबत दगडात कोरकेले एक दोन नंदी आपल्याकडे पाहताना आढळतात. नदीचा नितळ प्रवाह या शिवलिंगांना सदोदितपणे अभिषेक करत असतो. या ठिकाणाला सहस्त्रलिंग म्हणून संबोधले जाते.

जवळच नदीचे पात्र ओलांडून जायला येथे एक लांबच्या लांब झुलता पूल आपली वाट पाहत असतो. साधारण १५० मीटर लांबीचा हा पूल पलीकडच्या बाजूला अरण्यात वसलेल्या गावांना पायी अथवा दुचाकीवरून मुख्य भागाशी जोडतो.

ट्रॅव्हेला ट्रॅव्हल कॉन्सेप्टस् ....................पर्यटनातून जोडो भारत
भ्रमण : ७९७२०५०७५१

मलनाड , अर्थात निसर्गरम्य कर्नाटकचा सह्याद्री व्याप्त प्रदेश . यातील रम्य सहल , ज्यामध्ये   शूर वीरांच्या  गाथा,  उत्तम ...
25/09/2024

मलनाड , अर्थात निसर्गरम्य कर्नाटकचा सह्याद्री व्याप्त प्रदेश .

यातील रम्य सहल , ज्यामध्ये शूर वीरांच्या गाथा, उत्तम स्थापत्याची शिल्पे आणि मंदिरे, नारळी, पोफळी, चहा ,कॉफी , मिरी , वेलदोडा , दालचिनी , जायफळ यांच्या डोंगर उतारा वरती केलेल्या लागवडी पहात पहात सह्याद्रीच्या हिरव्यागार डोंगर रांगा न्याहाळत, कधी घनदाट तर कधी विरळ अरण्याच्या छायेतून , समुद्र किनारे , खाड्या , त्यात डोलणाऱ्या होड्या, या सर्वांच्या अवतीभोवती गुंफलेले जन जीवन नजरेने टिपत प्रवास करताना भारत नावाच्या या नायाब ठेव्याचा प्रवास कधी संपूच नये असे मनोमन वाटते.

मलनाडच्या नुकत्याच केलेल्या सहलीतील काही निरीक्षणे आणि अनुभव क्रमशः सादर करत आहे .

ट्रॅव्हेला ट्रॅव्हल कॉन्सेप्टस् ....................पर्यटनातून जोडो भारत

भ्रमण : ७९७२०५०७५१

27/04/2024
Gothane awaits you.
24/04/2024

Gothane awaits you.

गोठणे ग्राम पर्यटन , शाहूवाडी, कोल्हापूर मधील महीला दिनाचा सोहळा सामुदायिक वृक्ष सेवेने साजरा झाला.
10/03/2024

गोठणे ग्राम पर्यटन , शाहूवाडी, कोल्हापूर मधील महीला दिनाचा सोहळा सामुदायिक वृक्ष सेवेने साजरा झाला.

Address

12th Street Rajarampuri
Kolhapur
416005

Alerts

Be the first to know and let us send you an email when Travela Dandeli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category