Dada Travels and Yatraa Company

Dada Travels and Yatraa Company दादा टूर्स आणि ट्रॅव्हल मार्फत दोन धा? सुखद व आरामदायी प्रवास, गाडीसोबत स्वयंपाकी असल्याने घरचे जेवण ,काळजी घेणारी टीम, अवश्य एकदा यात्रा करा

🚩चार धाम यात्रा🚩दिनांक 16 मे 2022 रोजी लातूर येथून लातूरतील अग्रगण्य यात्रा कंपनी दादा टूर्स अँड ट्रॅव्हल्स मार्फत चार ध...
19/12/2021

🚩चार धाम यात्रा🚩
दिनांक 16 मे 2022 रोजी लातूर येथून लातूरतील अग्रगण्य यात्रा कंपनी दादा टूर्स अँड ट्रॅव्हल्स मार्फत चार धाम यात्रा निघत आहे.
यात्रेचे ठळक वैशिष्ट्य
✳️ अद्ययावत 2 x 2 पुशबॅक लक्झरी सीट असलेली 20 सीटर मिनी लक्झरी, टीव्ही ,साउंड सिस्टिम सह ऐसपैस आरामदायी सीट मूळे वयस्कर भाविकांचा संपूर्ण प्रवास सुखकर होतो
✳️दादा टूर्स अँड ट्रॅव्हल्स च्या अनुभवी स्टाफ कडून संपूर्ण प्रवासाचे काटेकोरपणे नियोजन असल्याने 30 ते 40 दिवसांचा प्रवासाचा आनंद घेता येतो
✳️ बाहेरचे जेवण/ पदार्थ खाण्यामुळे तब्येत बिघडण्याचा संभव असतो, त्यामुळेच गाडीसोबत आचारी असतो व आपले घरगुती पद्धतीने रोज बनविलेले ताजे, सकस व पचनाला सुलभ नास्ता तसेच जेवण दिले जाते.पॅकेज मध्ये चहा, नास्ता व जेवण समाविष्ट आहे.
✳️यात्रेमध्ये खालील पवित्र स्थळांचा समावेश असेल

१) सोर्टी सोमनाथ मंदिर गुजरात बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मंदिर(गुजराथ)
२) द्वारका (पाहिले धाम )
३) बेट द्वारका,
४) माउंट अबू,
५) नाथद्वारा,
६) मथुरा,
७) अमृतसर येथील सुवर्णमंदिर,
८) हरिद्वार,
९) बद्रीनाथ (दुसरे धाम)
९) वैष्णवी देवी,
१०) अयोध्या,
११) काशी विश्वनाथ,
१२) जगन्नाथ पुरी,(तिसरे धाम )
१३) रामेश्वरम,(चौथे धाम)
१४) धनुष्यकोडी,
१५) कन्याकुमारी, शेवटी पुन्हा काशी,माहूर गड

✳️निवासासाठी स्वच्छ व निर्मळ धर्मशाळा किंवा लॉजिंग असणार आहे

💐यात्रेचे एकूण भाडे रु ६००००/- आहे
बुकिंगसाठी
ऍडव्हान्स रु १००००/-
२) २००००/- ३० जानेवारी २०२२ पर्यंत
३) २००००/- १५ मार्च २०२२ पर्यंत
४) १००००/- ०१ मे २०२२ पर्यंत

💐

एकूण २० सीट आहेत
लवकर आपली सीट बुक करा

संपर्क

दादा नवगिरे
दादा टूर्स अँड ट्रॅव्हल्स
लातूर.
फोन व व्हाट्सएप
7249370993
8975070993
6 पेक्षा अधिक सीट एकदाच बुक करणाऱ्यांना प्रत्येकी 5% सूट देण्यात येईल

२५ मुखी दत्त भगवान की सुबक मूर्ती,तमिलनाडु मैं स्थित इस मूर्ती के हर मुख का भाव अलग हैं.आज दत्तजयंती हैं, सबको प्रभु की ...
18/12/2021

२५ मुखी दत्त भगवान की सुबक मूर्ती,
तमिलनाडु मैं स्थित इस मूर्ती के हर मुख का भाव अलग हैं.

आज दत्तजयंती हैं, सबको प्रभु की असीम कृपा प्राप्त हो ये हमारी प्रार्थना हैं 🙏🏼

श्री गुरुदेव दत्त 🙏🏼

🚩देवीच्या यात्रेचा विषयआला की, भाविकांची पाऊले राज्यातील देवीच्या साडेतीन पीठांकडे  वळायला लागतात. वर्षातून एकदा तरी सहक...
16/12/2021

🚩देवीच्या यात्रेचा विषयआला की, भाविकांची पाऊले राज्यातील देवीच्या साडेतीन पीठांकडे वळायला लागतात. वर्षातून एकदा तरी सहकुटुंब कुलदेवतेच्या दर्शनाला जायला पाहिजे त्यामुळे आपल्या कुटुंबाला सुख शांती ऐश्वर्य प्राप्त होत असते, राज्यातील कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आणि नाशिक या ठिकाणी देवीची साडेतीन पीठं आहेत.

या सर्वच तिर्थक्षेत्रांना मोठा मान असून त्यांच्याबद्दलच्या अनेक आख्यायिकाही आहेत. ही सर्वच स्थळे जागृत मानली जातात. त्यामुळे भाविक मनोभावाने या स्थळांना नेहमीच भेटी देतात. मात्र, नवरात्रोत्सवात इथे जास्त गर्दी बघायला मिळते. या साडेतीन पीठांचं महत्व आणि त्यांच्याबद्द्लच्या आख्यायिका काय आहेत याची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

🚍१८ ते २० जणांचा ग्रुप असेल तर आम्ही आपली ट्रिप प्रतिसीट 7000 प्रमाणे साडेतीन शक्तीपीठाचे दर्शन जेवण व राहण्याच्या व्यवस्थेसह घडवून आणतो संपर्कासाठी 7249370993 वर कॉल करा🚍

🚩महालक्ष्मी मंदिर - कोल्हापूर🚩

कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर (अंबाबाईचे देऊळ) हे पुराणात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी एक, व महाराष्ट्रात असलेल्या देवीची साडेतीन पीठांपैकी एक आहे. मंदिराच्या मांडणीवरून ते चालुक्यांच्या काळात इ.स. ६०० ते ७०० मध्ये बांधले असण्याची शक्यता आहे. मंदिराचे पहिले बांधकाम राष्ट्रकूट किंवा त्या आधीचा शिलाहार राजांनी सुमारे आठव्या शतकात केले असावे. पुराणे, अनेक जैन ग्रंथ, ताम्रपत्रे व सापडलेली अनेक कागदपत्रे यांवरून अंबाबाई मंदिराचे पुरातनत्व सिद्ध होते आणि कोल्हापूरची अंबाबाई खर्‍या अर्थाने अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी ठरते.
🔱🔱🔱🔱

🚩तुळजाभवानी-तुळजापूर🚩

भारतातील शक्तिदेवताच्या पीठापैकी साडे तीन पीठे महाराष्ट्रात आहे. त्यातील श्री क्षेत्र तुळजापूर हे पूर्ण व आद्यपीठ मानले जाते. महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात वसलेले तुळजापूर हे महत्वाचे तीर्थक्षेत्र असून त्याठिकाणी तुळजाभवानी देवीचे प्राचीन मंदिर आहे. तुळजाभवानी देवीची महती तशी हिंदू पुराणातून खूपच विस्ताराने सांगितली गेली आहे. त्या माहितीनुसार असुरांचा, दैत्यांचा संहार करून विश्वात नीती व धर्माचरण यांची पुनर्स्थापना करण्याचे महत्त्वाचे कार्य तुळजाभवानी देवीने प्रत्येक युगामध्ये केले आहे.

स्वराज्य स्थापना करणारे छत्रपती श्री शिवाजी महाराज, भोसले घराण्याची ही कुलदेवता आहे. तुळजाभवानी देवीच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली होती. देवीने महाराजांना दृष्टांत देऊन महाराष्ट्रावरील दुष्टचक्राचे निवारण करण्यासाठी भवानी तलवार दिली होती, अशी आख्यायिका आहे. देवीचे मंदिर बालाघाटातील एका डोंगरमाथ्यावर असल्याने अगदी जवळ गेल्यावर देखील या मंदिराचा कळस दिसत नाही. मंदिराच्या काही भागाची बांधणी हेमाडपंती आहे. महाराष्ट्रात या देवीस विशेष महत्त्व असून नवरात्रीचा उत्सव जरी नऊ दिवसांचा असला तरी तुळजापूरला मात्र, हा उत्सव एकूण एकवीस दिवस चालतो.
🔱🔱🔱🔱🔱🔱

🚩रेणुकादेवी – माहूर🚩

माहूर हे देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक असून येथील पीठाची देवता रेणुकादेवी आहे. रेणुकादेवी तसेच दत्तात्रेय आणि परशुराम यांचीदेखील प्राचीन मंदिरे माहूरगडावर आहेत.येथे मंदिरासमोरच एक किल्ला आहे. देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे, माहूरची श्री रेणुकामाता होय. श्री परशुरामाची माता म्हणूनही रेणुकामातेला ओळखले जाते. महाराष्ट्रातील अनेक परिवारांची ही कुलदेवता आहे.देवीचे मंदिर १३ व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले आहे असे म्हटले जाते. माहूरगडावरच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला अशी भाविकांची श्रद्धा आहे.

एका कथेनुसार, माता पार्वतीने कुब्ज देशाच्या राजाच्या पोटी जन्म घेतला. तिचे नाव रेणू असे ठेवण्यात आले. शंकराचा अवतार मानलेल्या जमदग्नी ऋषीबरोबर तिचे लग्न झाले. जमदग्नीच्या आश्रमात अनेक शिष्य शिकत असत. सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारी कामधेनू गाय जमदग्नीकडे होती. राजा सहस्रार्जुनाला या कामधेनूचा मोह झाला. त्याने जमदग्नीकडे कामधेनू मागितली. ऋषीने राजाची मागणी मान्य केली नाही. तेव्हा पराक्रमी जमदग्नीपुत्र परशुराम आश्रमात नाही, हे साधून सहस्रार्जुनाने आश्रमावर हल्ला केला. आश्रम उद्ध्वस्त करून जमदग्नींना ठार मारले व कामधेनू हिरावून नेली. नंतर त्यांचा पुत्र परशुराम तिथे आला. घडला प्रकार बघून परशुरामाने क्षत्रियांचा विध्वंस करण्याची प्रतिज्ञा केली. पित्याला अग्नी देण्यासाठी कोरी भूमी हवी म्हणून त्याने कावडीच्या एका पारड्यात जमदग्नींचे पार्थिव व दुसऱ्या पारड्यात माता रेणुकेला बसवले. रानोमाळ भटकत अखेर तो माहूरगडावर आला. तिथे वास्तव्यास असलेल्या दत्तात्रेयाने त्याला कोरी भूमी दाखवली व ‘इथेच पित्यावर अग्निसंस्कार कर’ असे सांगितले. परशुरामाने प्रथम बाण मारून मातृतीर्थ व सर्वतीर्थ निर्माण केले. या पाण्याने स्नान घालून जमदग्नीवर अंत्यसंस्कार केले. यावेळी माता रेणुका सती गेली. या सर्व विधींचे पौरोहित्य दत्तात्रेयांनी केले.

त्यानंतर परशुरामाला माता रेणुकेची खूप आठवण येऊ लागली. तो दु:खी होऊन शोक करत होता, तोच आकाशवाणी झाली. ‘तुझी आई जमिनीतून वर येऊन तुला दर्शन देईल. फक्त तू मागे पाहू नकोस. ‘परंतु परशुरामाची उत्सुकता चाळवली गेल्याने त्याने मागे वळून बघितले. त्यावेळी रेणुकामातेचे केवळ मुखच जमिनीतून वर आले होते. तेवढेच परशुरामाला दिसले. या तांदळारूपातल्या मुखाचीच माहूरला पूजा होते. परशुरामाला या डोंगरावर मातेचे दर्शन झाले म्हणून याला ‘मातापूर’ म्हणू लागले. शेजारच्या आंध्रप्रदेशात ‘ऊर’ म्हणजे गाव ते ‘ माऊर ‘ आणि पुढे ‘ माहूर ‘ झाले..!!
🔱🔱🔱🔱

🚩सप्तशृंगीदेवी - नाशिक🚩

महाराष्ट्रात देवीच्या साडेतीन पीठांपैकी अर्धे पीठ असलेली सप्तशृंगीदेवी नाशिकपासून ६५ किलोमीटरवरील ४८०० फूट उंचावरील सप्तशृंगगडावर वसलेली आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेवरील सात शिखरांचा प्रदेश म्हणजे सप्तशृंगगड. एकीकडे खोल दरी, तर दुसरीकडे छाती दडपविणारे कडे आणि यात फुललेली नाजूक हिरवाई, असा निसर्ग घेऊन येथे उभी ठाकलेली देवी जणू या निसर्गाच्या रौद्र रूपाशीच नाते सांगणारी आहे, असे वाटते.

आदिमायेच्या या गडावर वस्ती करण्याची आख्यायिकाही तिच्या या रूपातूनच जन्माला आली आहे. मातलेल्या महिषासुर राक्षसाच्या निर्दालनासाठी देवादिकांनी देवीची याचना केली अन्‌ होमाद्वारे ती प्रकटही झाली. तिचे प्रकट रूप हेच सप्तशृंगीचे होते, असे सांगितले जाते. या देवीचे महात्म्य मोठे आहे. देवी भागवतात देवीची देशात १०८ शक्तिपीठे असल्याचा उल्लेख आहे. त्यांपैकी महाराष्ट्रात साडेतीन पीठे आहेत. त्यांपैकी सप्तशृंगीचे अर्धे पीठ आहे. याव्यतिरिक्त अर्धे पीठ असल्याचा कोणताही उल्लेख त्यात सापडत नाही. या देवीला श्री ब्रह्मस्वरूपिणी असेही म्हणतात.ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगीदेवी. महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वतीचे त्रिगुणात्मक स्वरूप म्हणजे सप्तशृंगीदेवी, असे मानले जाते. नाशिकच्या तपोवनात राम, सीता व लक्ष्मण वनवासासाठी आले असता, येथे येऊन गेल्याचीही आख्यायिका आहे.

देवीच्या अवताराबरोबरच मूर्तीविषयी असलेली आख्यायिकाही भाविकांकडून मोठ्या भक्तिभावाने सांगितली जाते. एका धनगराला दिसलेले मधमाशांचे पोळे काढण्यासाठी त्याने त्यात काठी खुपसली तेव्हा काठीला शेंदूर लागला. त्याने पोळे काढल्यानंतर तेथे देवीची मूर्ती सापडली, अशीही एक दंतकथा आहे. येथील निसर्गाचे रूप रम्य आहे. डोंगराची कपार खोदून तयार केलेल्या महिरपीत देवीची आठ फूटी मूर्ती आहे. तिला अठरा भुजा आहेत. मूर्ती शेंदूरअर्चित असून, रक्तवर्ण आहे. डोळे टपोरे व तेजस्वी आहेत. सर्व हात एकमेकांना लागून आहेत. सर्व देवांनी महिषासुराशी लढण्यासाठी देवीला शस्त्रे दिली होती

दादा ट्रॅव्हल लातूर व्यवसाय | Latur Marketplace

🚩हिन्दू धर्म 🚩 में यात्रा करने का बहुत महत्व है। इसीलिए  तीर्थ यात्री, परिव्राजक और परिक्रमा जैसे शब्द अनेक धार्मिक कथाओ...
15/12/2021

🚩हिन्दू धर्म 🚩 में यात्रा करने का बहुत महत्व है। इसीलिए तीर्थ यात्री, परिव्राजक और परिक्रमा जैसे शब्द अनेक धार्मिक कथाओ में आते हैं। आओ आज हम जानते हैं कि तीर्थ यात्रा क्यों कि जाती है।
और उसके करने के क्या लाभ हो सकते हैं।🌏🏖️🏕️

🔱हिन्दू धर्म 🔱🚩के अनुसार व्यक्ति का जन्म मोक्ष के लिए हुआ है। मोक्ष का व्यावहारिक अर्थ होता है आत्मज्ञान या परमज्ञान को उपलब्ध होना। इसे योग में समाधि,
😷जैन धर्म में कैवल्य,😷
✍️बौद्ध धर्म में निर्वाण ✍️
प्राप्त करना कहा जाता है।

धर्म के सारे उपक्रम, रीति रिवाज या परंपरा इसी के लिए हैं। उसी में एक है 🚍तीर्थ यात्रा करना।


हर हिन्दू के लिए तीर्थ करना है पुण्य कर्म है। तीर्थों में चार धाम की यात्रा सर्वोपरि मानी जाती है ।
अत: जिसने यात्राएं की उसका जीवन सार्थक हो गया। हिन्दू धर्म मानता है कि जन्म लेकर मनुष्‍य जीवन में आएं हैं तो संपुर्ण दुनिया को देखना जरूरी है। देखने से भी बढ़कर है दर्शन करना। तीर्थ दर्शन करना। दर्शन का अर्थ होता है इस तरह से देखना की आपके इस देखने के बीच में विचारों या खयालों की दीवार ना हो।

तीर्थ परिक्रमाएं:-

तीर्थ यात्रा के दौरान कई तरह की परिक्रमाएं की जाती है। सभी परिक्रमाओं के करने के अलग अलग समय होते हैं। तीर्थ परिक्रमाएं:- जैसे चौरासी कोस परिक्रमा,
अयोध्या, उज्जैन या प्रयाग पंचकोशी यात्रा,
राजिम परिक्रमा आदि। इसके अंतर्गत नदी परिक्रमा भी आती है। जैसे नर्मदा, गंगा, सरयु, क्षिप्रा, गोदावरी, कावेरी परिक्रमा आदि। चार धाम परिक्रमा:- जैसे छोटा चार धाम परिक्रमा या बड़ा चार धाम यात्रा। पर्वत परिक्रमा:- जैसे गोवर्धन परिक्रमा, गिरनार, कामदगिरि, तिरुमलै परिक्रमा आदि

तीर्थ मार्ग में सत्संग:- तीर्थ यात्रा के लिए शास्त्रीय निर्देश यह है कि उसे पद यात्रा के रूप में ही किया जाए। यह परंपरा कई जगह निभती दिखाई देती है। पहले धर्म परायण व्यक्ति छोटी-बड़ी मंडलियां बनाकर तीर्थ यात्रा पर निकलते थे। यात्रा के मार्ग और पड़ाव निश्चित थे। मार्ग में जो गांव, बस्तियां, झोंपड़े नगले पुरबे आदि मिलते थे, उनमें रुकते, ठहरते, किसी उपयुक्त स्थान पर रात्रि विश्राम करते थे। जहां रुकना वहां धर्म चर्चा करना-लोगों को कथा सुनाना, यह क्रम प्रातः से सायंकाल तक चलता था। रात्रि पड़ाव में भी कथा कीर्तन, सत्संग का क्रम बनता था। लेकिन इस आधुनिक काल मे पैदल यात्रा करनेवाले विरले ही है आवागमन की अच्छी व्यवस्था होने के कारण अब ऐसी यात्राएं स्वयं की कार से या फिर ग्रुप बनाकर किराये की गाड़ियों से की जाने लगी है।
🚩🚩🚩
दार्शनिक महत्व:- इसका एक दार्शनिक महत्व यह भी है कि संपूर्ण ब्रह्मांड का प्रत्येक ग्रह-नक्ष‍त्र किसी न किसी तारे की परिक्रमा कर रहा है। यह परिक्रमा ही जीवन का सत्य है। व्यक्ति का संपूर्ण जीवन ही एक चक्र है। इस चक्र को समझने के लिए ही परिक्रमा जैसे प्रतीक को निर्मित किया गया। भगवान में ही सारी सृष्टि समाई है, उनसे ही सब उत्पन्न हुए हैं, हम उनकी परिक्रमा लगाकर यह मान सकते हैं कि हमने सारी सृष्टि की परिक्रमा कर ली है। परिक्रमा का धार्मिक और वैज्ञानिक महत्व भी है।

🚍
ऐसीही कई प्रकार की धार्मिक यात्राओ का आयोजन हम करते है।
आपको अगर कोई यात्रा करनी है तो संपर्क करे।

दादा टूर्स एंड ट्रैवेल्स लातूर
Dada Navgire
दादा नवगिरे
72449370993

श्री गणेशाच्या आराधनेने समूळ दुःखाचा नाश होतो, आपल्या प्रापंचिक चिंता, दुःख विसरून सुखकर्ता दुःखहर्ता गणेशाच्या दर्शनाचा...
14/12/2021

श्री गणेशाच्या आराधनेने समूळ दुःखाचा नाश होतो, आपल्या प्रापंचिक चिंता, दुःख विसरून
सुखकर्ता दुःखहर्ता गणेशाच्या दर्शनाचा लाभ घेऊ या, 20 तारखेला यात्रा निघते आणि दिनांक 22 डिसेंबर रोजी संकष्टी चतुर्थी अप्रतिम योग आहेच.

लातूर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून अष्टविनायक यात्रा दिनांक 20 डिसेंबर रोजी निघणार आहे.
आठही गणपती दर्शनासोबतच समुद्र किनाऱ्यावर प्रकट झालेल्या स्वयंभू गणेशाचे दर्शन गणपती पुळे समाविष्ट आहे.
असे म्हणतात की योग आल्याशिवाय देवदर्शन होत नसते, स्वतः ला सांसारिक व्यापामुळे आईवडील यांना त्यांची इच्छा असूनही आपण नेऊ शकत नाही ,तरी ही जबाबदारी आम्ही घेत आहोत, आपल्या स्वकीयांची काळजी घेऊन त्यांना यात्रा घडवून आणण्याची जबाबदारी दादा ट्रॅव्हल्सची आपुलकीची माणसे घेणार आहेत.

आपण निर्धास्त पणे आपल्या जेष्ठांना व आईवडीलांना आमच्या जबाबदारी वर यात्रेला पाठवू शकता.

हा योग आपल्या वडीलधाऱ्यासाठी आपणास दादा ट्रॅव्हल्स च्या माध्यमातून घडवून आणत आहोत
7000/- रुपयांत राहणे व शुद्ध शाकाहारी हॉटेल्स मध्ये खाण्याच्या व्यवस्थेसह लातूर अष्टविनायक सोबत गणपतीपुळे लातूर अशा यात्रेचे नियोजन केलेले आहे.
20 सीटर मिनी लक्झरी ने
आपली सीट बुक करणेसाठी संपर्क करा

दादा टूर अँड ट्रॅव्हल्स

7249370993 या नंबर वर

‘ सागरी किनारा, आणि ओलाव्याने भरलेला सुगंधी वारा…’ समुद्र म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर दृश्य येतं खळखळणार्‍या निळ्याशार ...
09/12/2021

‘ सागरी किनारा, आणि ओलाव्याने भरलेला सुगंधी वारा…’ समुद्र म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर दृश्य येतं खळखळणार्‍या निळ्याशार लाटाचे आणि स्वच्छंद वारा! या अथांग पसरलेल्या समुद्राकडे पाहिलं की, असं वाटतं कसा आणि कुठवर पसरला आहे हा विशाल सागर?

चंद्राच्या मंद प्रकाशात रात्रीच्या वेळी मंद चांदण्यात समुद्राकडे बघत बसलं तर जो आनंद मिळतो तो पैशाने नाही विकत घेऊ शकत आपण . खरंच समुद्र खूप काही देऊन जातो आपल्याला. लहान मुलाला तो अवखळ मित्र वाटतो. त्याच्यात डुंबण्याचा तो आनंद घेतो.

तर वृद्ध किंवा ज्यांना डुंबायला आवडत नाही त्यांना समुद्र किनारी बसलं तरी तितकंच प्रफुल्लित वाटतं. एकंदर काय तर समुद्रकिनारी फिरण्याचा आनंद हा अवर्णनीय आहे.

गेल्या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे सहल, मनमोकळी सफर, धम्माल देवदर्शन या गोष्टी काहीशा दूरावल्या होत्या आपल्याला।

आणि त्यासोबतच जर देवदर्शन झाले तर???

आहे ना कमाल!!!

अशा निसर्गाच्या कुशीत आपल्या आवडत्या गणपती बाप्पाच्या जागृत देवस्थानाला भेट देऊन यायचे का?

चला मग आमच्या सोबत येणाऱ्या
13 तारखेला

अष्टविनायकाच्या दर्शनासाठी आणि सोबतच निळ्याशार समुद्राच्या काढावर स्वयंभू गणेशाच्या दर्शनाला गणपतीपुळे येथे

आरामदायी 20 सीटर मिनी लक्झरी बस ने!
सोबत करायला आणि आपली काळजी घ्यायला दादा ट्रॅव्हल्सची जिव्हाळ्याची माणसे आहेतच!

मात्र 6999/- मध्ये

संपर्क करा
दादा नवगिरे यांना
7249370993 या क्रमांकावर

दुसरा गणपती – सिद्धटेकचा श्री सिद्धेश्वरसिद्धटेक हे स्थान भीमा नदीच्या काठावर आहे-या स्थानाला सिद्धटेक असे का म्हणतात? –...
09/12/2021

दुसरा गणपती – सिद्धटेकचा श्री सिद्धेश्वर

सिद्धटेक हे स्थान भीमा नदीच्या काठावर आहे-या स्थानाला सिद्धटेक असे का म्हणतात? – येथील गणेशाला सिद्धिविनायक असे नाव का पडले?

फार प्राचीन काळी, एकदा ब्रह्मदेवाला वाटले, आपण सृष्टीरचना करावी. यासाठी त्याने गणेशाच्या आज्ञेनुसार तपश्चर्या सुरु केली. गणेशाने त्याला एकाक्षरमंत्राचा जप दिला होता. ब्रह्मदेवाच्या उग्र तपश्चर्येने गणेश प्रसन्न झाला व ‘तुझ्या सर्व मनःकामना पूर्ण होतील’ असा ब्रह्मदेवाला त्याने वर दिला. मग ब्रह्मदेवाने सारी सृष्टी निर्माण केली. त्या वेळी क्षीरसागरात गाढ झोपलेल्या भगवान विष्णूच्या कानातून मधु व कैटभ हे दोन राक्षस निर्माण झाले. त्यांनी ब्रह्मदेवास त्रास देण्यास सुरुवात केली. सारी पृथ्वी भयभीत झाली. तेव्हा सर्व देवांनी भगवान विष्णूला जागे केले. विष्णूचे व मधु-कैटभांचे घनघोर युद्ध झाले. पाच हजार वर्षे युद्ध चालले, तरी विष्णू त्या दैत्यांना मारू शकला नाही; म्हणून तो शंकराकडे गेला.

युद्धारंभी तू गणेशाचे स्तवन केले नाहीस, म्हणून तुला विजय मिळत नाही, असे शंकर म्हणाले. तेव्हा विष्णू एका पवित्र टेकडीवर आला. तेथे त्याने ‘श्रीगणेशाय नमः’ या षडाक्षर मंत्राने गणेशाची आराधना केली. त्या तपश्चर्येने विनायक (गणेश) प्रसन्न झाला. विनायकाच्या कृपेने विष्णूला सिध्दी प्राप्त झाली. मग त्याने मधु-कैटभांना ठार केले. विष्णूला विनायक ज्या ठिकाणी प्रसन्न झाला व ज्या ठिकाणी सिध्दी प्राप्त झाली, त्या ठिकाणी विष्णूने एक मोठे मंदिर बांधले व त्यात गंडकीशिलेची विनायकाची मूर्ती स्थापन केली. या ठिकाणी विष्णूची कार्यसिद्धी झाली, म्हणून या स्थानाला सिद्धटेक असे म्हणतात व येथील विनायकाला ‘श्रीसिद्धिविनायक’ असे म्हणतात. या वेळेपासून सिद्धटेक हे स्थान गणेशाचे पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते
कालांतराने ते मंदिर नष्ट झाले. पुढे एका गुराख्याला या टेकडीवर विनायकाने दृष्टांत दिला. तो गुराखी रोज भीमा नदीच्या पाण्याने गणेशाला स्नान घालीत असे व आपल्या शिदोरीचा नैवेद्य दाखवीत असे. तेव्हा गणेशाने त्याला सांगितले. तू स्वतः माझी पूजा न करता एखाद्या ब्राह्मणाकरवी कर. तेव्हा त्याने पुरोहित नावाच्या ब्राह्मणाकडून श्रींची पूजा सुरु केली. पुढे पेशवे काळात येथे मंदिर बांधण्यात आले, अशी एक आख्यायिका आहे.

दादा टूर अँड ट्रॅव्हल्स तर्फे
छत्रपती शिवाजी महाराज चौक लातूर येथून 20 सीटर मिनी लक्झरी बस ने अष्टविनायक यात्रा दिनांक 13 डिसेंबर रोजी निघणार आहे,
प्रतिव्यक्ती 6999/- रुपयात प्रवासखर्च जेवण व राहणे समाविष्ट असून गणेशभक्तांनी अवश्य लाभ घ्यावा

संपर्क करा
दादा नवगिरे
7249370993 कॉल आणि व्हाट्सअप्प वर

08/12/2021

मोरगावच्या गणेशाला मोरेश्वर किंवा मयुरेश्वर असे नाव का मिळाले?

फार प्राचीन काळी गंडकी नगरीत चक्रपाणी नावाचा एक थोर राजा राज्य करीत होता. त्याला सूर्याच्या उपासनेने एक पुत्र झाला. त्याचे नाव सिंधू. सिंधुनेही सूर्याची उपासना करून अमरत्वाचा वर मिळवला. त्यामुळे सिंधू उन्मत्त झाला. अवघ्या त्रैलोक्याचे राज्य आपणास मिळावे असे त्याला वाटले. मग त्याने पृथ्वी जिंकली. इंद्राच्या अमरावतीवर त्याने स्वारी केली. इंद्राचा अगदी सहज पराभव केला. त्याने स्वर्ग व्यापला; तेव्हा विष्णूने त्याच्याशी युद्ध सुरु केले. पण विष्णूलाही सिंधूचा पराभव करता येईना. सिंधूने आपल्या अतुल पराक्रमाने विष्णूला वश केले व त्याला गंडकी नगरीत राहण्याची आज्ञा केली. मग सिंधूने सत्यलोक व कैलास यांवरही स्वारी करण्याचे ठरवले. सर्व देवांना त्याने गंडकी नगरीत बंदिवासात टाकले. तेव्हा दुःखी झालेल्या देवांनी गणेशाची आराधना सुरु केली. प्रसन्न झालेल्या गणेशाने देवांना आश्वासन दिले. मीलवकरचपार्वतीच्या पोटी मयुरेश्वर या नावाने अवतार घेईन व तुमची सिंधूच्या जाचातून सुटका करीन.


सिंधूच्या त्रासाला कंटाळलेले शंकर पार्वतीसह मेरूपर्वतावर राहत होते. पुढे भाद्रपद शुद्ध चतुर्थीला पार्वती गणेश पूजन करीत असता ती गणेशमूर्ती सजीव झाली. ती बालकाचे रूप घेऊन पार्वतीला म्हणाली, ”आई, मी तुझा पुत्र होऊन आलो आहे.’ याच वेळी गंडकी नगरीत आकाशवाणी झाली, ‘सिंधुराजा, तुझ्या नाशासाठी अवतार झाला आहे.”


गणेशाचे व सिंधूचे प्रचंड युद्ध झाले. गणेश एका प्रचंड मोरावर बसून युद्ध करू लागला. त्याने कमलासुराचा वध केला. कमलासुराच्या शरीराचे तीन तुकडे तीन दिशांना फेकले. कमलासुराच्या मस्तकाचा भाग जेथे पडला ते ठिकाण म्हणजेच मोरगाव क्षेत्र. मग गणेशाने सिंधू राजाचा पराभव केला व सर्व देवांची मुक्तता केली. तेथेच गणेश भक्तांनी विनायकाच्या मूर्तीची स्थापना केली. मोरावर बसून गणेशाने दैत्यसंहार केला, म्हणून त्याला मयुरेश्वर किंवा मोरेश्वर म्हणतात व त्या स्थानाला मोरगाव असे नाव मिळाले

13 डिसेंबर 2021 रोजी संध्याकाळी 8 वाजता अष्टविनायक यात्रा निघणार आहे, काही मोजकेच सीट शिल्लक आहेत
भाविकांना आवाहन आहे की आपली सीट लवकर बुक करा।
लातूर-अष्टविनायक-गणपतीपुळे-लातूर प्रवास खर्च जेवण व मुक्काम सह रु 6999/- प्रतिव्यक्ती आहे

बुकिंगसाठी
दादा नवगिरे
7249370993 या क्रमांकावर कॉल करा

दादा टूर्स आणि ट्रॅव्हल मार्फत दोन धा?

अष्टविनायक दर्शन संपूर्ण माहिती -अष्टविनायक गणपती नावे पहिला गणपती – मोरगांवचा श्री मयुरेश्वरदुसरा गणपती – सिद्धटेकचा श्...
07/12/2021

अष्टविनायक दर्शन संपूर्ण माहिती
-अष्टविनायक गणपती नावे

पहिला गणपती – मोरगांवचा श्री मयुरेश्वर

दुसरा गणपती – सिद्धटेकचा श्री सिद्धेश्वर

तिसरा गणपती – पालीचा श्री बल्लाळेश्वर

चौथा गणपती – महाडचा श्री वरदविनायक

पाचवा गणपती – थेऊरचा श्री चिंतामणी

सहावा गणपती – लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक

सातवा गणपती – ओझरचा श्री विघ्नेश्वर

आठवा गणपती – रांजणगांवचा श्री महागणपती

गणपती हे महाराष्ट्राचे प्रिय आराध्यदैवत आहे. आपले इच्छित कार्य सफल व्हावे यासाठी सर्वप्रथम गणपतीचे पूजन करून त्याचे शुभाशीर्वाद घेतले जातात. अष्टविनायक म्हणजे स्वयंभू गणपतीची आठ देवळे होय. ही आठही मंदिरे निसर्गरम्य अशा ठिकाणी आहेत. आजच्या धावपळीच्या आयुष्यात या आठ गणपतीच्या मंदिरांना भेट देण्याने मनाला शांत आणि शिथिल वाटते.

अष्टविनायक हा शब्द ‘अष्ट’ आणि ‘विनायक’ या दोन शब्दांना जोडून तयार झालेला आहे. अष्ट म्हणजे आठ आणि विनायक म्हणजे आपल्या सर्वांचे प्रिय दैवत गणपती होय. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्याआधी सर्वप्रथम गणपतीची पूजा केली जाते. कारण विद्येचे दैवत असलेला हा गणपती सर्व विघ्नांना दूर करून समृद्धी प्रदान करतो. ही मंदिरे निसर्गरम्य अशा ठिकाणी आहेत. ही आठही मंदिरांची स्थापत्यकला अतिशय उत्कृष्ठ असून ती मनाला सुखावह वाटतात.
अष्टविनायकाची तीर्थयात्रा म्हणजे पुणे आणि त्याच्या आजूबाजूच्या क्षेत्रात वसलेल्या आठ प्राचीन पवित्र गणपतींच्या मंदिराचे दर्शन घेणे होय. या प्रत्येक मंदिरांचा स्वतःचा असा एक स्वतंत्र इतिहास आणि त्यासोबत जोडलेली स्वतःची आख्यायिका आहे. आणि ही सर्व माहिती तितकीच अद्वितीय आहे जितक्या प्रत्येक मंदिरातील गणपतीच्या मुर्त्या विलक्षण आहेत. या प्रत्येक मंदिरातील गणेश मूर्तीचे रूप आणि गणपतीच्या सोंडेची ठेवण ही एकमेकांपासून भिन्न आहे. आठही देवळातील प्रत्येक गणपती हा स्वयंभू असून अतिशय जागृत आहे असे मानले जाते. या विविध देवळांमध्ये मोरश्वर, महागणपती, चिंतामणी, गिरिजात्मक, विघ्नेश्वर, सिद्धिविनायक, बल्लाळेश्वर आणि वरद विनायक अशी गणपतीची वेगवेगळी नांवे आहेत.

ही मंदिरे मोरगांव, रांजणगांव, थेऊर, लेण्याद्री, ओझर, सिद्धटेक, पाली आणि महड येथे वसलेली असून ती पुणे, अहमदनगर आणि रायगड जिल्ह्यात स्थित आहेत. या ८ मंदिरांपैकी ६ ही पुणे जिल्ह्यात आणि २ रायगड जिल्ह्यात आहेत.

चरैवेति-चरैवेति...एक शब्द में जीवन का चित्र खींचना हो तो वह है यात्रा। इसीलिए जीवन के क्रम को जीवनयात्रा कहा जाता है। या...
07/12/2021

चरैवेति-चरैवेति...

एक शब्द में जीवन का चित्र खींचना हो तो वह है यात्रा। इसीलिए जीवन के क्रम को जीवनयात्रा कहा जाता है। यात्राओं का महत्व हर धर्म में है। हिंदू धर्म में तीर्थयात्रा का उद्देश्य केवल पुण्यलाभ तक सीमित नहीं है, वास्तव में यह देश की बहुरंगी प्रकृति को देखने और

एक शब्द में जीवन का चित्र खींचना हो तो वह है यात्रा। इसीलिए जीवन के क्रम को जीवनयात्रा कहा जाता है। यात्राओं का महत्व हर धर्म में है। हिंदू धर्म में तीर्थयात्रा का उद्देश्य केवल पुण्यलाभ तक सीमित नहीं है, वास्तव में यह देश की बहुरंगी प्रकृति को देखने और एक ही धारा में रची-बसी असंख्य संस्कृतियों को समझने का एक उपक्रम भी है।
नव जीवन यात्राओं का ही परिणाम है। सनातन धर्म की मान्यता के अनुसार परमात्मा से अलग हुई जीवात्मा, चौरासी लाख योनियों का भ्रमण करते हुए मानव शरीर धारण करती है। मानव जीवन में यह अपनी सांसारिक जिम्मेदारियों को निभाने के बाद परमात्मा से पुनर्मिलन के अंतिम पडाव पर पहुंचती है। इसी पडाव से शुरू होती है, मोक्ष के लिए सबसे महत्वपूर्ण यात्रा। ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ और संन्यास के चार चरणों से होकर मानव इस यात्रा पथ पर आगे बढता जाता है। शायद यही कारण है कि प्रत्येक देश-काल के मनुष्य को यात्रा से स्वाभाविक लगाव रहा है। घर, परिवार, गांव और शहर से बाहर निकलकर अपने परिवेश, देश, दुनिया को देखने की चाह ने ही वसुधैव कुटुंबकम की परिकल्पना की होगी। इसी चाह ने मनुष्य को भीषण कष्ट सहकर नदी-नाले, पर्वत-खाइयां पार करके अपने लक्ष्य तक पहुंचने के लिए प्रेरित किया होगा।
भारतीय मनीषा ने हजारों साल पहले ही यात्राओं के इस महत्व को जान-समझ लिया था। इसीलिए हमारे संस्कृत ग्रंथों में अनेक ऐसे प्रसंग भरे पडे हैं, जिनमें यात्राओं का सामाजिक, सांस्कृतिक और आध्यात्मिक महत्व प्रकट होता है। ब्रह्मा जी के पुत्र नारद तो 'कहीं भी, कभी भी पहुंचने में सक्षम हैं। तीनों लोकों की सैर करना उनके लिए बाएं हाथ का खेल है। सभी देवी-देवताओं के साथ वाहन के रूप में किसी न किसी प्राणी का जुडे रहना भी यही साबित करता है। विष्णु के साथ गरुड तो शिव के साथ नंदी, लक्ष्मी के साथ उल्लू और सरस्वती के साथ हंस, दुर्गा का वाहन शेर, गणेश का मूषक, कार्तिकेय के साथ मोर जनमानस में स्थायी हो गए हैं। यह भी वास्तव में इस बात का प्रतीक है कि ये सभी देवी-देवता भी प्राय: यात्रा करते रहते होंगे। इतना ही नहीं, विष्णु जी के त्रेता युग में अवतार भगवान श्रीराम चंद्र तथा द्वापर में श्रीकृष्ण भी यात्राओं के लिए लालायित रहते थे। चाहे घर से गुरुकुल जाना हो या पिता के आदेश पर 14 वर्ष के वनवास या कृष्ण का मथुरा-वृंदावन से द्वारका की यात्रा। चाहे महात्मा बुद्ध हों, या महावीर स्वामी, सभी अपने-अपने ढंग से किसी-न-किसी कारणवश यात्रा करते रहे।
हमारे वैज्ञानिक ऋषि-मुनि अखिल ब्रह्मांड के रहस्यों पर से पर्दा उठाने के लिए आजीवन शोधरत रहे। उन्होंने पुराणों में चौदह लोकों का उल्लेख किया है। ये चौदह लोक हैं - भू: (पृथ्वी लोक), भुव: (वह लोक जो भूमि और सूर्य के अंतर्गत है, अंतरिक्ष), स्व: (स्वर्ग या देव लोक), मह: (महालोक), जन: (महालोक के ऊपर का लोक), तप:, और सत्य (सबसे ऊपर का लोक, जिसमें ब्रह्मा जी रहते हैं)। ये सात पृथ्वी के ऊपर के लोक हैं और अतल, सुतल, वितल, गभस्तिमत, महातल, रसातल और पाताल - ये सात पृथ्वी के नीचे के लोक। इसके अलावा वैकुंठ लोक (विष्णु लोक), गोलोक (श्रीकृष्ण का निवास स्थान, जो सब लोकों से ऊपर माना जाता है), इंद्र लोक, चंद्र लोक, नाग लोक आदि की भी चर्चा होती है। यह इस बात का साक्षात प्रमाण है कि भारत में यात्रा केवल धरती तक न मानकर, अन्य लोकों तक भी मानी जाती थी।
प्राचीन भारत में तीर्थयात्राओं का बडा महत्व था। ये यात्राएं प्राय: पैदल ही की जाती थीं। मार्ग कष्टकर होते थे, सुविधाएं नाममात्र की थीं। फिर भी धर्म में आस्था होने के कारण लोग कष्टों की परवाह न करते हुए यात्राएं करते थे। कालांतर में यात्राओं के इसी महत्व को ध्यान में रखते हुए केरल में जन्मे, अद्वैत मत के प्रवर्तक आदि शंकराचार्य ने चार धाम की यात्रा की परिकल्पना की। उन्होंने भारत के चार कोनों - उत्तर में बद्रीनारायण धाम, दक्षिण में रामेश्वरम, पूर्व दिशा में जगन्नाथ पुरी तथा पश्चिम में द्वारका धाम स्थापित किए। चार धाम की ये यात्राएं जहां जीवन की एकरसता को दूर करती थीं, वहीं व्यक्ति को अपने राष्ट्र को जानने-पहचानने, उससे जुडऩे, उसे प्रेम करने का भी अवसर प्रदान करती थीं। इन यात्राओं से सुदूर दक्षिण भारत के उष्ण समुद्रतटीय प्रदेशों में रहने वाला भारतीय उत्तर में हिमालय की हिमाच्छादित चोटियां देखता, तो रोमांचित हुए बिना नहीं रहता। इसी प्रकार उत्तर भारत में रहने वाला कडकती सर्दी के मौसम में दक्षिणी, पूर्वी या पश्चिमी भारत में स्थित समुद्रतटीय प्रदेशों में जाकर वहां गरमी का मौसम पाता तो शायद दांतों तले अंगुली दबा लेता होगा।
ये यात्राएं मानव को प्रकृति की गोद में जाने का अवसर देती हैं, भारत के विविधतायुक्त भोजन, भाषा, वेशभूषा, जलवायु, जीव-जंतुओं से परिचित करवाती हैं, वहीं भारतीय संस्कृति की अनेकता में विद्यमान एकता के तत्वों का भी ज्ञान करवाती हैं।
इन यात्राओं का आध्यात्मिक, सामाजिक, धार्मिक महत्व तो है ही, आर्थिक दृष्टि से भी अत्यंत लाभदायक हैं। इन यात्राओं के कारण ही पर्यटन एक व्यवसाय से आगे बढकर उद्योग में परिणत हो जाता है। आज पूरे विश्व में पर्यटन उद्योग में लाखों लोगों को रोजगार मिला है, बडी परिवहन कंपनियों, होटलों से लेकर छोटे-छोटे व्यवसायियों, लघु उद्यमियों के लिए भी पर्यटन एक दुधारू गाय है।
यात्रा से मिलने वाला सुख एक अलग ही प्रकार का होता है, इसे हम आध्यात्मिक सुख कह सकते हैं। यह आध्यात्मिक सुख इतना अधिक होता है कि इससे यात्रा के दौरान हुई सारी शारीरिक थकान पल भर में गायब हो जाती है। शायद यही कारण है कि शिशु से लेकर वृद्ध तक प्रत्येक व्यक्ति यात्रा का नाम सुनते ही हर्षोल्लास से भर जाता है। गोद में रहने वाले शिशु को जब कहते हैं कि चलो घूमने चलते हैं, तो वह तुरंत बांहें उठाकर चलने को तैयार हो जाता है।
बच्चों के लिए तो यात्राएं सुख का आगार होती हैं। बच्चे दो-चार दिन की यात्रा से खेल-खेल में जितना सीख जाते हैं, उतना कभी कक्षा में महीनों बैठकर भी नहीं सीख पाते। यात्रा से बच्चों में उत्तरदायित्व की भावना, सहनशीलता, समायोजन, सहयोग का भाव विकसित होता है। वे जीवन में आने वाली कठिन चुनौतियों का सामना करने में सक्षम हो जाते हैं। यात्रा के दौरान कभी खाना अच्छा नहीं मिलता, कभी सोने की जगह ठीक नहीं होती, फिर भी बच्चों को मजा आता है, वह क्या है? वही तो है - यात्रा का आध्यात्मिक सुख। इसीलिए स्कूल-कॉलेज में शैक्षिक भ्रमण का विशेष महत्व है।

इसी प्रकार घर के किसी बुजुर्ग को तीर्थ यात्रा पर चलने के लिए कहें तो वह अपने सब दर्द-परेशानी भूलकर युवाओं की भांति उत्साह और बच्चों जैसी चपलता से भर जाता है। जो थोडी दूर चलने पर हांफने लगता है, वही पहाडों की चढाई भी हंसते-हंसते चढ जाता है। सदा गंभीर तथा चुप रहने वाले भी यात्रा के दौरान चुटकले-शेरो-शायरी सुनाते, हंसते-गाते नजर आते हैं।
वैसे तो यात्राएं किसी भी उम्र में की जा सकती हैं, किंतु युवावस्था यात्रा के लिए सर्वाधिक उपयुक्त होती है। इस अवस्था में असीम ऊर्जा, उत्साह, जोश, जिज्ञासा तथा सहनशीलता होती है। वह कुछ नया जानने-करने के लिए उत्सुक होता है, उसे ख्ातरों से लगाव होता है, प्रकृति उसे सम्मोहित करती है, उसकी कल्पनाओं में नए रंग भरती है। यात्रा का उद्देश्य और स्थान भी उसके प्रभाव को निर्धारित करता है। धार्मिक उद्देश्य से की गई यात्रा के दौरान भीतर एक अनोखी शक्ति का अहसास होता है। अमरनाथ, कैलाश-मानसरोवर जैसी कठिन एवं जोखिम भरी यात्राएं, जिनमें कभी चट्टान फिसलने तो कभी बर्फीले तूफान के रूप में कदम-कदम पर ख्ातरे सामने आ जाते हैं, भी लोग धार्मिक आस्था के कारण सहज ही कर लेते हैं। ऐतिहासिक स्थलों की यात्रा विशेष रूप से ज्ञानवर्धक होती हैं, तो व्यावसायिक यात्राएं आर्थिक दृष्टि से लाभप्रद होती हैं। पर्वतीय प्रदेश की यात्रा जहां हमें प्रकृति के मनमोहक रूप से जोडती है, तो रेगिस्तान तथा समुद्री इलाकों की यात्राएं हमें एक दूसरे ही लोक में ले जाती हैं।

प्राचीन काल में यात्रा के लिए साधन सीमित थे। तब केवल राजा-महाराजा या धनी लोग ही घोडे, हाथी या रथ से यात्रा कर पाते थे। अधिकतर लोग तो पैदल ही लंबी यात्राएं किया करते थे। इसीलिए तीर्थयात्रा में महीनों लगते थे। कुछ जगहों के लिए तो लोग घर से जाते समय अंतिम विदा लेकर ही जाते थे कि शायद वापस न आ पाएं। समय के साथ-साथ वाहनों का प्रयोग बढा। बैलगाडी, नाव से आगे बढते-बढते मनुष्य ने कार, बस, रेलगाडी, पानी का जहाज, स्टीमर, हवाई जहाज आदि का इस्तेमाल यात्रा में करने से यात्रा सुगम, सुविधाजनक तो हो ही गई है, इसमें अब समय भी बहुत कम लगने लगा है। पदयात्रा एवं रथयात्रा का भी स्वरूप अब काफी बदल गया है।
यात्राएं विविध रूपों में मानव जीवन का अनिवार्य अंग रही हैं और रहेंगी। सामाजिक, धार्मिक, आर्थिक एवं आध्यात्मिक दृष्टि से ये यात्राएं मनुष्य को शारीरिक एवं मानसिक लाभ प्रदान करती हैं। यात्रा के बिना मानव जीवन की कल्पना भी नहीं की जा सकती क्योंकि जन्म से लेकर मृत्यु तक, जीवात्मा निरंतर यात्रा ही तो करती रहती है। लगातार चलते रहने की इस प्रक्रिया के लिए ही तो कहा गया है- चरैवेति-चरैवेति...।
बात एक बार की
साधु और दीया
एक बडे ज्ञानी राजा थे। राजमहल में भारी ठाट-बाट होते हुए भी वे उसमें लिप्त नहीं थे। एक साधु उनसे मिलने आए। राजा ने साधु का सम्मान किया और आने का कारण पूछा। साधु ने कहा, 'राजन, सुना है कि इतने ठाट-बाट के बीच रहते हुए भी आप इनसे अलग रहते हैं। मैंने वर्षों तप किया, फिर भी ऐसा न बन सका। आपने महल में रह कर ही यह कैसे साध लिया?
राजा ने कहा,'महात्मा जी! यह मेरा काम का समय है। आपके सवाल का जवाब मैं थोडी देर बाद दूंगा। तब तक आप इस दीये को लेकर मेरे महल को पूरा देख आएं। बस यह ध्यान रखें, दीया बुझने न पाए। बुझा तो आप रास्ता भूल जाएंगे।
साधु दीया लेकर राजमहल देखने चले। कई घंटे बाद लौटे तो राजा ने पूछा, 'कहें स्वामी जी, कैसा लगा महल?
साधु बोले, 'मैं आपके महल के हर भाग में गया। सब देखा, फिर भी अनदेखा रह गया।
राजा ने पूछा, 'क्यों?
साधु ने कहा, 'राजन, मेरा सारा ध्यान इस दीये पर लगा रहा कि कहीं बुझ न जाए!
राजा ने उत्तर दिया, 'महात्मा जी! मेरे साथ भी यही बात है। मेरा सारा ध्यान परमात्मा पर लगा रहता है। सारा राजकाज चलाते हुए एक ही बात सामने रहती है कि सब कुछ उसी का है और मैं जो कुछ कर रहा हूं, उसी के लिए कर रहा हूं।
डॉ. रवि शर्मा 'मधुप

दादा टूर्स अँड ट्रॅव्हल्स की और से धार्मिक यात्रा जैसे दो धाम, चार धाम, तिरुपती दर्शन, अष्टविनायक दर्शन, साडेतीन शक्तीपीठ आदी का बुकिंग सुरू है।
कृपया अधिक जाणकारी हेतू संपर्क करे।
दादा नवगिरे
7249370993

07/12/2021
07/12/2021

हिमालय की गोद में बसे चार धाम में बद्रीनाथ का सबसे‍ अधिक महत्‍व है. बद्रीनाथ के अलावा इसमें केदारनाथ (शिव मंदिर) और यमुनोत्री और गंगोत्री (देवी मंदिर) शामिल हैं. बद्रीनाथ भगवान विष्णु का पवित्र धाम है, जहां इन्हें बद्री विशाल भी कहा जाता है. केदारनाथ भगवान शिव की भूमि है और यह पंचकेदारों में से एक है. गंगोत्री और यमुनोत्री धाम पवित्र गंगा और यमुना नदियों के उद्गम स्थल हैं. बद्रीनाथ उत्तराखंड के चमोली, केदारनाथ रुद्रप्रयाग और गंगोत्री-यमुनोत्री उत्तरकाशी जिले में स्थित हैं. गढ़वाल के इन तीनों जिलों में स्थित चारो धामों पर 12 हजार करोड़ का कारोबार टिका है. चार धाम के दर्शन के लिए 4,000 मीटर से भी ज्‍यादा ऊंचाई की चढ़ाई करनी पड़ती है. यह डगर कहीं आसान तो कहीं बहुत कठिन है. चार धाम यात्रा केवल गर्मी के महीनों में होती है और शीतकाल में सभी धामों के कपाट बंद कर दिए जाते है. पिछले वर्ष केवल गंगोत्री-यमुनोत्री में 10 लाख श्रद्धालु पहुंचे थे.


जीवन-मृत्यु के बंधन से हो जाते हैं मुक्‍त

सनातन धर्म में चारो धामों को बहुत ही पवित्र और मोक्ष प्रदाता बताया गया है. धर्म ग्रंथों के अनुसार, जो लोग चार धाम के दर्शन करने में सफल होते हैं, उनके न केवल इस जन्म के पाप नष्ट हो जाते हैं, बल्कि वे जीवन-मृत्यु के बंधन से भी मुक्‍त हो जाते हैं. इस स्थान के बारे में यह भी कहा जाता है कि यह वही स्‍थल है, जहां पृथ्‍वी और स्‍वर्ग एकाकार होते हैं. तीर्थयात्री इस यात्रा के दौरान सबसे पहले यमुनोत्री (यमुना) और गंगोत्री (गंगा) का दर्शन करते हैं. फिर यहां से पवित्र जल लेकर केदारेश्‍वर पर जलाभिषेक करते हैं. उसके बाद अंत में बद्रीनाथ धाम के दर्शन करते हैं.

क्या है पौराणिक कथा

पौराणिक कथाओं के अनुसार पीड़ित मानवता को बचाने के लिए जब देवी गंगा ने पृथ्‍वी पर आना स्‍वीकार किया तो हलचल मच गई, क्‍योंकि पृथ्‍वी, गंगा के प्रवाह को सहन करने में असमर्थ थी. फलस्वरूप गंगा ने खुद को 12 भागों में विभाजित कर लिया. इन्‍हीं में से अलकनंदा भी एक हैं, जो बाद में भगवान विष्‍णु का निवास स्‍थान बनीं. इसी स्थान को बद्रीनाथ के नाम से जाना जाता है. बद्रीनाथ 'पंचबद्री' में एक है.

चार धाम यात्रा मे

द्वारका, बद्रीनाथ, काशी जगन्नाथ पुरी रामेश्वरम पुनः काशी का समावेश है।

दादा टूर्स अँड ट्रॅव्हल्स चारधाम यात्रा का आयोजन किया है।
प्रतिव्यक्ती रु 69999/- मे आचारी द्वारा बनाया गया घरगुती खानपान एवं रहने की व्यवस्था के साथ एक सुखद आरामदायी यात्रा का अनुभव करे
अपनी सीट शीघ्र बुक करे
संपर्क करे

दादा नवगिरे
7249370993 पर

Address

Latur
413512

Telephone

+917249370993

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dada Travels and Yatraa Company posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category