25/01/2022
सिंधुदुर्ग जिल्हा अजिंक्य, सक्षम, सुदृढ आणि निरोगी मनोवृत्तीच्या युवकांचा जिल्हा म्हणून नावारूपाला आला पाहिजे; इथला सांस्कृतिक, ऐतिहासिक, धार्मिक वारसा आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा सुयोग्य वापर करीत इथे पर्यटकांसाठी पर्यटनाची विविध दालने खुली झाली पाहिजेत या ध्येय आणि उद्देशातून सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघ आणि सिंधुदुर्ग अॅडव्हेंचर रेस्क्यू टीमच्या मार्गदर्शनाने पर्यटकांना 100% vellue for money आणि secure पर्यटनाचा लाभ देण्यासाठी Kokan Trek n Trail हे YouTube Channel काम करीत राहिल.
हिमालयासारखा बर्फ आणि राजस्थानसारखे वाळवंट सोडले तर जगभरातील समस्त पर्यटकांना आकर्षित करू शकणारी सर्व शक्तिस्थळे सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभलेली आहे. जिल्ह्यातील देवगड, मालवण, वेंगुर्ला या तालुक्यांना विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. यासोबतच इतर पाच तालुक्यांना अनेकविध वैशिष्ट्यानी नटलेल्या निसर्गरम्य डोंगरदर्या, जंगले, नद्या-नाले, सरोवरे, तलाव, फेसाळणारे धबधबे, घाटमाथे, पशुपक्षी आणि सृष्टिसंपन्नता यांचा वारसा लाभलेला आहे. मंदिरे, देवालये, गडकिल्ले, ऐतिहासिक वारसे, डॉल्फिन, प्रवाळबेटे, स्नॉर्कलिंग -स्कूबा, वाईल्ड लाईफ टुरिझम या पर्यटनपूरक बाबींनी सिंधुदुर्ग संपन्न आहेच त्या खेरीज जगभरातील पर्यटकांच्या पहीली पसंत असलेला तारकर्ली बीच, शुभ्र वालूकामय रत्नजडित समुद्रकिनारे, स्वच्छ आरस्पानी समुद्र, जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट असलेला गिरीराज सह्याद्री आणि त्यावर शोभिवंत दिसणारी गडदुर्गांची रांग, सह्याद्रीच्या उत्तरेला वाईल्ड लाईफ आणि बायोडायव्हर्सिटी टुरिझमसाठी प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आंबोली आणि दक्षिणेला वन्य प्राणी व पक्षी यासाठी प्रसिद्ध दाजीपूर अभयारण्य या सारख्या स्वर्गीय निसर्ग वरदानाचे समृद्ध रूप म्हणजे सिंधुदुर्ग! याही पुढे जाऊन पहीला साक्षर जिल्हा सिंधुदुर्ग! पहिला पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग! स्वच्छ जिल्हा सिंधुदुर्ग!
पर्यटनक्षेत्रामध्ये नामांकित गोवा राज्यांची पर्यटनदृष्ट्या भौगोलिक स्थिती सिंधुदुर्गापेक्षा निराळी मुळीच नाही, तरीही वेगळेपणाच्या शोधात असलेले पर्यटक आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रेमात पडू लागले आहेत. या जिल्ह्यातील पुर्वजांनी राखली गेलेली निसर्ग पर्यावरणाची परंपरा अभ्यासता ही समृद्ध जैवविविधता राखायची असेल तर पर्यावरणपूरक असा जनसामान्य निसर्गप्रेमी यांना रूचणारी आणि भविष्यातही गरज असणारा पॅटर्न सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबवावा लागेल.
Kokan Trek n Trailची वैचारिक भुमिका:- विधात्याने मुक्तहस्तानं सिंधुदुर्ग जिल्ह्यावर जे ऐश्वर्य उधळलेय त्यात जगातील कोणत्याही कानाकोपर्यातील, कोणत्याही वयोगटातील प्रत्येक पर्यटकाला आकर्षित करण्याची ताकद या निसर्गात आहे. या नैसर्गिक वातावरणाशी नाळ जुळलेल्या शेकडो भुमीपुत्राने त्यातूनच सुयोग्य रोजगार निवडू शकतो, नव्याने निर्माण करू शकतो. याच निसर्गाच्या अंगाखाद्यावर निसर्गभ्रमण, गिर्यारोहण, रॉक क्लायंबिंग, रॅपलिंग, झुमारींग, प्रथमोपचार, जलतरण, योगा यासारखे शेकडो प्रकार राबवले जाऊ शकतात. निसर्ग आणि पर्यावरण वाचवण्यासाठी जगभर विविध खर्चीक प्रयोग चालले असताना आपण येथील परिपुर्णतेने नटलेल्या निसर्गाला आणि नैसर्गिक संपदेला वाचवण्याकरता काहीच करणार नसू तर आपल्या सारखे दुर्दैवी आपणच. आज शहरीकरणाच्या लाटेत मुलांचे बालपण हरवलेय. निसर्गातले रागंडे संस्कार नसल्याने अत्यंत संकुचित मनोवृत्तीची, आपण बरे की आपले बरे या भावनेने जगणारी, साहस अंगी नसलेली, एकाकीपणा आणि भयाने ग्रासलेली पुढची पिढी कोणते समर्थ राष्ट्र निर्माण करू शकेल? हा भविष्याला ग्रासणारा गंभीर प्रश्न आहे. म्हणूनच केवळ रोजगार निर्मिती म्हणून किंवा निसर्ग वाचवण्यासाठी नव्हेच तर समर्थ राष्ट्रनिर्मितीसाठी सुद्धा साहसी क्रीडा प्रकाराची गरज आहे हे विचारात घेतले गेले पाहीजे आणि त्यासाठीच अभ्यासपूर्ण कठोर परिश्रम, कल्पकता, उपक्रमशीलता आणि भविष्याकडे नजर ठेऊन केलेल्या नाविन्यपूर्ण बदल या मध्यमातून युवकवर्गाने स्वत:चा उत्कर्ष कसा करून घ्यावा याचे मार्गदर्शन करीत स्वयंविकासाचा आणि पर्यायाने या जिल्हाचा अचूक विकास करण्यासाठी युवकवर्गाचे संघटन करावे हाच Kokan Trek n Trail च्या स्थापनेमागे मुळ उद्देश आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीचे रक्षण करत त्यामधून साहसी उपक्रमांतर्गत रोजगार करणे, पर्यटकांमध्ये आवश्यक ती सुरक्षा निर्माण करणे, गावागावात सक्षम आणि सुप्रशिक्षित पर्यटन गाईड निर्माण करणे यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना आणि पर्यटकांना 100% vellue for money आणि secure पर्यटनाचा लाभ देण्याचा वसा घेतलेल्या Kokan Trek n Trail या YouTube Channel ला आपणा सर्वांचे सहकार्य मिळत राहावे अशी अपेक्षा आहे.
डॉ. कमलेश चव्हाण
8999215679
9420207055
सिंधुदुर्ग जिल्हा अजिंक्य, सक्षम, सुदृढ आणि निरोगी मनोवृत्तीच्या युवकांचा जिल्हा म्हणून नावारूपाला आला पाहिजे; ....