Iconic Sindhudurg

Iconic Sindhudurg Its all about konkan

24/10/2021

कोकण Diaries with रान माणूस ह्या सिरीज मधून सह्याद्री च्या माथ्यावर उगम पावून समुद्राशी नाते जोडणाऱ्या नद्यांच्या खोऱ्.....

03/09/2021

सुप्रसिद्ध Vloger Jeevan Kadam यांनी आपल्या Youtube Channel वर पर्यटन करताना केल्या जाणार्‍या कचरा संबंधित मत मांडले. ही खूप मोठी समस्या आहे. मला असे वाटते प्रत्येक पर्यटन व्यवसायिकाने आपल्याकडे येणार्‍या पर्यटकांना जबाबदारी ची जाणीव करून दिल्यास परिस्थिती सुधारण्यासाठी हातभार लागेल.

_*पृथ्वीवरचा स्वर्ग झगडतोय स्वतःच्या अस्तित्वासाठी...*_          _*वाचकहो, पृथ्वीवरचा स्वर्ग अस संबोधल जाणार आमचं तळाशिल...
15/08/2021

_*पृथ्वीवरचा स्वर्ग झगडतोय स्वतःच्या अस्तित्वासाठी...*_

_*वाचकहो, पृथ्वीवरचा स्वर्ग अस संबोधल जाणार आमचं तळाशिल गाव इतरवेळी महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशविदेशातल्या पर्यटकांनी हे गाव नटलेलं असत. परंतु सध्या ह्या गावातील प्रत्येक व्यक्ती भीतीच्या छायेखाली जगतं आहे. कारण पाऊस सुरू झाल्यावर येणारी वादळं, समुद्राच्या तुफानी लाटा, सोसाट्याचे वारे या व अशा अनेक परिस्थितीमुळे तळाशिलवासीयांना जीव मुठीत धरून राहावं लागत आहे इतरवेळी सौंदर्याच्या कितीही उपमा देऊन संपणार नाही असा हा समुद्र पावसाची चाहूल लागताच आपल आक्राळविक्राळ रौद्ररूप दाखवायला चालू करतो. गावाच्या एकाबाजूला खाडीपात्र असून दुसऱ्या बाजूला महाकाय असा समुद्र आहे इथली लोक अनेकवर्ष मच्छीमारी हा पारंपरिक व्यवसाय चालवतात.*_
_*आज हा शब्दप्रपंच करण्याचं कारण हेच आहे की हा आमचा पृथ्वीवरचा स्वर्ग स्वतःच्या अस्तित्वासाठी अक्षरशः झगडतोय कारण सद्यपरिस्थिती पाहता या गावाच्या भविष्यातील अस्तित्वावर शंका येऊ लागली आहे मी अस का म्हणतोय तर त्याला कारणही तसच आहे...समुद्रकिनाऱ्याची मोठ्या प्रमाणावर धूप होत चालली आहे, समुद्राच्या तुफानी लाटा गावाच्या किनाऱ्यावर वारंवार आदळत आहेत त्यामुळे आतापर्यंत साधारणपणे किनाऱ्याचा सुमारे 15 ते 20 मीटर भूभाग हा समुद्राने गिळंकृत केलेला आहे तसेच समुद्राला येणारी मोठी उधाणं, वारंवार येणारी वादळं आणि यामुळेच समुद्राचे तसेच नदीचे पाणी लोकवस्तीत घुसायची भीती अजूनच वाढली आहे यामुळे तळाशिल गावाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. बदलणार ऋतुचक्र आपण थांबवू शकत नाही परंतु येणाऱ्या धोक्याची चाहूल लक्षात घेऊन आपण उपाययोजना नक्कीच करू शकतो आणि हीच गोष्ट गावातल्या लोकांनी तळाशिलवासियांनी आधीच ओळखली होती आणि 2005 पासूनच गावाच्या संरक्षणासाठी कायमस्वरूपी उत्तम दर्जाच्या दगडी बंधाऱ्याची मागणी करण्यात आली होती त्यावर तेव्हाच्या प्रशासनाने काम तर सुरू केलं परंतु थोड काम सुरू होऊन काही टप्पा पूर्ण झाल्यावर काम बंद झालं आणि गावातल्या लोकांच्या पदरी निराशाच पडली त्यानंतर प्रशासन बदलत राहिली लोक मागणी करत राहिले आणि लोकांना मात्र फक्त आणि फक्त शासनदरबाराचे उंबरे झिजवावे लागले त्यातही प्रशासनाची माणसं येतात परिस्थिती बघतात आश्वासनांचा पाऊस पाडून जातात हीच स्थिती आता अनेक वर्ष चालू आहे आणि लोकांचा विषय शासनदरबारी धूळ खात पडलेला आहे त्यामुळे तळाशिलमधील प्रचंड मोठ्या लोकवस्तीच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. आपण लोकशाही लोकशाही म्हणतो अरे कुठे आहे लोकशाही इकडे जर लोकांनी निवडून दिलेले प्रशासन लोकांच्या मागण्या पूर्ण करत नसेल तर कशाला हव अस प्रशासन आणि कशाला हव्या निवडणुका...?*_
_*आता आमच्या ह्या पृथ्वीवरच्या स्वर्गाला न्याय हवाय आणि तोही कायमस्वरूपी, फक्त कागदोपत्री नव्हे तर प्रत्यक्षात त्यावर अंमबजावणी व्हायला हवी अन्यथा लोकांचा रोष हा वाढलेला आहेच त्यात जर प्रशासनाने अजून हलगर्जीपणा केला तर मात्र लोकांचा आक्रोश आणि रोष शासनाला परवडणारा नाहीय. एकाबाजूला पर्यटन गाव म्हणून गौरव करायचं आणि दुसऱ्या बाजूला या गावाच्या समस्यांवर कानाडोळा करायचा ही स्थिती बदलली पाहिजे.*_
_*शासनाला आमची हीच मागणी आहे की गावात येऊन इथल्या स्थानिक ग्रामस्थांशी बोलून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर तात्काळ मार्ग काढावा अन्यथा हे गाव आपल अस्तित्व गमवून बसेल. प्रशासन कुठेतरी हे विसरतय की मोठमोठे प्रकल्प नवनवीन गोष्टी आणण्याच्या नादात गावाला विसरून नाही चालणार हे सर्व आणले पाहिजेच खरतर त्यावर देशाचा विकास आणि पर्यायाने आपला विकास अवलंबून असतो पण त्यासोबतच खरोखरच आपल्या देशाचा जो श्वास आहे अश्या गावांना आपण विसरता कामा नये आमच्यासारख्याच इतर अनेक गावांच्या व्यथा आहेत त्यामुळे शासनाने याकडे लक्ष द्यावं कारण गाव टिकली तरच देश टिकेल बरोबर ना...?*_
_*गावाच्या बंधाऱ्यासाठी तात्काळ प्रयत्न व्हावे यासाठी आणि आमच्या न्याय्य मागण्यांसाठी आम्ही तळाशिलवासीय 15 ऑगस्ट 2021 पासून बेमुदत उपोषण करत आहोत शासनाला या उपोषणाची दखल घ्यावीच लागेल अन्यथा शासनाला गावच्या जनआक्रोशाला सामोर जावं लागेल. गावाला वाचवण्यासाठी गावाचं अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी गावातील प्रत्येक लोक प्रयत्न करत आहेत त्यांच्या या प्रयत्नांना एक जोड मिळावी म्हणून मी माझा हा शब्दप्रपंच तुमच्यासमोर मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे वाचकांना माझ हेच मागणं आहे की तुम्हालाही जर आमच्या या गावाची तळमळ जाणवत असेल तर आम्हाला तुमची साथ हवीय तळाशिल गावातील हे भीषण वास्तव्य सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी मला तुमची मदत हवीय म्हणून तुम्हां सर्व वाचकांना माझी कळकळीची विनंती आहे की तुम्हीसुद्धा ही माहिती आणि माझा हा प्रयत्न सर्वांपर्यंत पोचवा, शासनापर्यंत पोचवा जेणेकरून झोपलेल्या प्रशासनाला जाग येईल.*_

_*...धन्यवाद...*_

_*सुमित चोडणेकर*_
_*तळाशिल, मालवण*_

माझा गांव... माझी जबाबदारी... *तळाशील.....* निसर्ग सौंदर्याने नटलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील एक गांव. य...
13/08/2021

माझा गांव... माझी जबाबदारी...

*तळाशील.....* निसर्ग सौंदर्याने नटलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील एक गांव. या गावाचा भौगोलिक दृष्ट्या विचार करता पुर्वेला गड नदी, पश्चिमेला अथांग विस्तारलेला अरबी समुद्र आणि दक्षिणेस नदी आणि समुद्राचा मनमोहक असा संगम. अशाप्रकारे आपल्या तीन बाजूंनी पाणी असलेले हे तळाशील गांव.

सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाला आणि हे गाव जगाच्या इतिहासात नावारूपास आले. आज देश - विदेशातील लाखो पर्यटक दरवर्षी या गावात येतात. येथील समुद्र किनाऱ्याचा, इथल्या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेतात.

मित्रांनो आज हे ईथे लिहीण्याचा प्रपंच म्हणजे आज या गावावर निसर्गाची वक्रदृष्टी पडलेली आहे. आज हा गांव जगाच्या नकाशावरून नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. गेले महीनाभर पाऊस आणि बारदानी वा-यांनी जोर धरल्यामुळे तळाशील किनारपट्टी ची कधीही भरून न येणारी नैसर्गिक हानी झालेली आहे. समुद्राच्या अजस्त्र लाटा थेट किनाऱ्यावर धडकत आहेत. आणि जाताना आपल्या बरोबर किनाऱ्याची माती घेऊन जात आहेत. महिन्याभरात जवळ जवळ १५ ते २० मिटर चा भूभाग समुद्राने गिळंकृत केलेला आहे. आजमितीला नदी आणि समुद्र यांच्या मधील अंतर फक्त आणि फक्त १० ते १५ मिटर एवढेच आहे.
गावातील मुख्य व्यवसाय हा मच्छीमारी असल्याने इतर वेळी आपल्या पोटापाण्यासाठी समुद्रावर आरूढ होणारा इथला ग्रामस्थ उद्या आपला गांव नष्ट होणार या भीती खाली आहे.
शास्त्रीय दृष्ट्या या घटनेची भौगोलिक कारणे असु शकतात किंबहुना ती आहेतही पण यावर जर अगोदरच उपाययोजना झाली असती तर आज तळाशील गावाचे एवढे मोठे नुकसान झाले नसते. गेली कित्येक वर्षे या गावातील ग्रामस्थ समुद्राच्या बाजुने कायमस्वरूपी असा धुपप्रतीबंधक दगडी बंधारा बांधण्याची मागणी करताहेत. वेळोवेळी शासनाकडे, संबंधित खात्याकडे, लोकप्रतिनिधींकडे पत्रव्यवहार करताहेत. पण आजमितीस कोणीही दाद दिलेली नाही. आमचा गांव नष्ट होऊन आम्ही उध्वस्त व्हायची वाट शासन, लोकप्रतिनिधी बघत आहेत काय? हा एकच प्रश्न ग्रामस्थांच्या मनात घर करून आहे.
आज या गावावर अन्याय झालेला आहे आणि या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, आपली बंधा-याची मागणी पूर्ण करण्यासाठी. आपला गांव वाचवण्यासाठी, स्वत: जगण्यासाठी आणि आपल्या कुटुंबाला जगवण्यासाठी, झोपलेल्या शासनाला आणि लोकप्रतिनिधी यांना जागे करण्यासाठी, आपल्या न्याय हक्कांसाठी १५ ऑगस्ट ला आपल्या संपूर्ण कुटुंबासहीत बेमुदत उपोषण करणार आहेत. गावची एकजुट आहेच पण त्या सोबतच आपली सर्वांची साथ खुप मोलाची आहे. आम्हाला आशा आहे तुम्ही आमच्या सोबत आहात.शक्य आहे ते सर्वजण येणार पण जर तुम्हाला येणं शक्य नसेल तर कृपया तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून रिप्लाय देऊन आम्हाला पाठींबा द्या.
चला तर मग आपण सर्वांनी एकत्र येऊन एकजुटीचा विजय करूया. एकीचे बळ शासनाला दाखवून देऊया.

जय हिंद..... जय महाराष्ट्र.... जय तळाशील...

अभिप्राय द्यायला विसरू नका. सोबत आपल्या गावाचे पुर्वीचे आणि आताचे फोटो शेअर करत आहे. काही चुकल्यास क्षमस्व

पोस्ट क्रेडिट

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तोडवळी तळाशीलवाडी समुद्र गिळंकृत करण्याच्या मार्गावर*पहा स्पेशल रिपोर्ट....
09/08/2021

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तोडवळी तळाशीलवाडी समुद्र गिळंकृत करण्याच्या मार्गावर*
पहा स्पेशल रिपोर्ट....

​ ​ ​ ...

30/07/2021

Address

Malvan
416606

Alerts

Be the first to know and let us send you an email when Iconic Sindhudurg posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Iconic Sindhudurg:

Videos

Share