
31/01/2024
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे श्रद्धास्थान आदिमायेचा अवतार असलेली व नवसाला पावणारी मुणगे गावची जागृत ग्रामदेवता देवी श्री भगवती मातेचा वार्षिक जत्रोत्सव आजपासून सुरुवात होत आहे. पुढे पाच दिवस हा जत्रोत्सव चालणार आहे.
जत्रा म्हणजे कोकणातील माणसाचा जिव्हाळ्याचा विषय जत्रा म्हणजे त्याच्या गावच्या ग्रामदेवतेचा वार्षीक. ही जत्रा म्हणजे आई भगवती देवीचा उत्सव. हवशे, नवशे, गवशे दरवर्षी न चुकता जत्रेची वारी करतात. देवी भगवती मातेच्या दर्शनाला येणार्या अश्या सर्व भाविकांचे.. सहर्ष स्वागत...!
आई भगवती मातेचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहो हीच प्रार्थना..
*!! ओम नमो भगवती देवै नम: !!*