31/01/2024
I saw lot of buzz around spritual destination of India especially VARANASI and I am sure it is magical place
Visited Varanasi during 2012 for the first time with
Anagha Uplekar Neenad Joseph Arul Ish*ta Manek
गंगाघाट आणि मी
काही जागा किती जादुई असतात . नेहमी लक्ष्यात राहाव्यात अश्या मनाच्या अगदी वरच्या कप्यात जागा करतात आणि त्या आठवणीची जागा तशी राहवी अशी इच्छा ....
हो गंगा घाटा बद्दल बोलतो आहे. बनारस शंकराने स्वतः बनविलेल शहर असे तिकडेच ऐकल्या सारखे वाटते.
गंगा नदीचे उगम स्थान गंगोत्री आणि शेवटी ती अल्ल्हाबाद ला जाऊन यमुने ला मिळते असे लहान पणी भूगोलाच्या पुस्तकात सगळ्यांनी वाचले असावे ,भारताची महत्वाची नदी , लहान पाणी ऐकलेली एक म्हण पण आठवते " झालं गेल गंगेला मिळाले " पहिले मी ते काय काय गंगेला मिळते ते . असो तो भाग वेगळा , शेवटी गंगा नदी आणि माझी भेट झाली दुपारी १२ चा प्रहर आणि मुन्शी घाटावर आम्ही बसलो होतो
मला लहर आली आणि टाकली उडी मनसोक्त पोहून घेतले . माझ्या आई च्या मते मी पवित्र झालो. म्हणजे आई च्या नजरेत अपवित्र होतो हे नक्की हाहाह मजेत . लोकांना असे का वाटते गंगेत उडी मारली कि मी पवित्र झालो म्हणजे अपवित्र आहे या वर किती तो विश्वास .....
पाणी गार होते तेवढे खरे आणि बाहेर येउन फक्त एक टक तिच्या प्रवाहाकडे बघत बसलो
दमली असावी बिचारी वाहुन .एवढ्या लांबचा प्रवास म्हणजे काय खायचे काम नाही त्यात सगळ्यांची पापं पण धुवायची म्हणूनच कदाचित इकडे आल्यावर तिचा प्रवाह संथ होत असावा आणि शिवाय आता प्रवास संपणार कारण पुढे तिचा प्रवाह यमुने ला जाऊन भेटणार आहे. तिचे काम संपणार पुढेचे काय ते यमुने ने बघायचे . अगदी पहिल्याच दिवशी माझी आणि त्या गंगा घाटची मैत्री झाली मस्त आता रोज भेटायचे बर का असा वायदा केला आणि निघालो
ठरल्या प्रमाणे आमची भेट रोज होत होती. सकाळी हा घाट हळू हळू उठत असतो . कुणी मारुती च्या मंदिरात जोर बैठका मारतंय , तर कोणी हर हर महदेव म्हणत पाण्यात उडी मारतंय , नावाडी आपल्या होड्यांची सफाई करतो आहे ,आणि एक बाजूला एक बाबा मस्त चिलम जळतो आहे . अशीच रोजची कामे चालू होतात आणि मी शांत पणे पाहत बसायचो
हिंदू धर्मा मध्ये चार चार वर्ण ब्राम्हण , क्षत्रिय , वाणी ,शुद्र आणि मग पुढच्या ज्या काही जाती असतील त्या असतील पण या मुख्या त्यांच्या त्यांचा कामा वरून त्यांची विभागणी, कामा वरून बर का बाकी कशावरून नाही आणि अशी सारी लोक गंगेच्या किनार्यावर येउन वसली आजही विविध राज्यांचे घाट इकडे आढळतात . जसे कर्नाटक घाट ,पेशवा घाट , भोसले घाट आणि त्यांची महाले सुद्धा अजून चांगल्या स्थितीत आहेत
साधारण २०० ते ३०० वर्ष पाठी गेलो तर किती सुंदर असावे हे शहर , घाट, लोकं . सूर्य नारायांचे स्वागत बासरी आणि वीणेचे सुरांनी व्हावे , कोणी गायक शास्त्रीय संगीताचा रियास
करत असावा , आणि कोणी ब्राम्हण साधना करत बसला असावा , गंगेचे पाणी स्वच्छ निर्मळ आणि पिण्या योग्य असावे ..सर्वात महत्वाचे म्हणजे लोकांची मन सुद्धा गंगे प्रमाणे निर्मळ असावी जणू जशी गंगा दुषित होत गेली तसे लोकांचे मन हि दुषित होत गेले ....म्हणजेच गंगा शुद्धीकरण दोन्ही बाजून व्हायला हवे असे सांगू इच्छितो ...
असेच ४ दिवस आम्ही सकाळ संध्याकाळ घाटा वर बसत होतो पण दर वेळी काही तरी वेगळे अनुभवले
मग ती हरिश्चंद्र घाट आणि मानिकारणी घाटा वर बसून पाहिलेल्या चिता त्यांच्या आप्तेष्टांच्या चेहऱ्यावरचे भाव , किवा तो माणूस ज्याचे काम आहे कि अग्नी दिल्यानंतर ते शव मी शव म्हणेन कारण त्याच्या साठी ते शव आहे आणि त्याचे काम एवढेच कि अग्नी दिलेले शव चारी बाजूने जळते आहे कि नाही , नसेल तर दिवस भर लाकडे आत सारणे आणि तेही तो इमानदारी ने करत होता .
संध्याकाळी बरोबर ६,३० वाजता " दश्वमेध" घाटावर गंगा आरती चालू होते ती भव्य आरती बघणे आणि सोबत बघण्यासाठी बसलेले श्रद्धाळू लोकं अगदी परदेशी लोकांच्या डोळ्यात तीच श्रद्धा आरती नंतर दिवस संपला सगळे मोकळे ....
आणि एक नवीन जग चालू होते रात्री १० नंतर घाटावर घालवलेल्या त्या रात्री एवढ्या सुंदर नसत्या झाल्या जर तो ब्रिजवासी बासरी वाला भेटला नसता त्याच्या सोबत मारलेल्या गप्पा एवढासा पोरगा पण किती धर्माच्या गप्पा , सेक्षो फोन वाजवणारा तो फ्रान्से वाला आणि त्याच्या तोंडातून भारतीय वाद्यांची स्तुती ऐकून छाती अभिमानाने भरून आली कारण सेक्षो फोन वाजवताना तो सनई ची स्तुती करत होता आपल्या रामप्रसाद चौरासिया आणि बिस्मिल्ला खान याच्या बद्दल बोलताना डोळ्यातली चमक दिसत होती , आणि हा सोबत असलेली व्यक्ती आणि शाळेतल्या गप्पा २ तास सगळे विसरून आणि घड्याळ्यात १२ वाजले आहेत याचे जरा हि भान नाही ....
एकंदरीत म्हणजे फक्त उंच डोंगर किवा गर्द जंगले आणि बर्फ म्हणजेच पर्यटन असा गैरसमज करून घेऊ नका जरी हि जागा थोडी अध्यात्मिक असली तरी इकडे मनाला मिळणारी शांती एका वेगळ्या जगात घेऊन जाते आणि अर्थात सगळ्यांचे अनुभव विविध असू शकतात पण मनांत घर करून जाणारी जागा आहे हे नक्की