Team Ashwamedh

Team Ashwamedh The World is a book, and those who do not travel read only a page. KEEP CHASING YOUR DESTINATIONS WITH US !!!!

*Team Ashwamedh _Trip to Ujjain* *(Jay Mahakal)**Date* : 13th & 14th of April 2024 (Saturday/Sunday)(Journey will commen...
05/12/2023

*Team Ashwamedh _Trip to Ujjain* *(Jay Mahakal)*

*Date* : 13th & 14th of April 2024 (Saturday/Sunday)
(Journey will commence on Friday, 12th April 2024 at 8.30 PM from Mumbai Central railway station)

*Number of seats* : 30 Tourists only

*Attraction*
1. Shri Mahakal Shivling darshan (Jyotirlinga)
2. Mahakal lok corridor darshan
3. Shree Kaal Bhairav nath temple

*Traveling*:
• Mumbai to Ujjain : Avantika Express (12961)
• Ujjain to Mumbai: Avantika Express (12962)
• Local Electric auto at Ujjain

*Cost (Per person)*
Mumbai - Ujjain - Mumbai

1) *Rs. 2300*
including *Non AC Train traveling* + Stay (AC Dormitory)+ 2 Breakfast+ 2 Lunch + 2 Dinner+ Local transport

2) *Rs 3800/-*
Including *AC Train traveling (3AC/3E)*
+ Stay (AC Dormitory)+ 2 Breakfast+ 2 Lunch + 2 Dinner+ Local transport

*Booking confirmation date*:
10th December 2023
(On 10th Dec,Railway booking Will get started for April 2024)

*Advance payment*
* On or before *10th Dec 2023* need to pay for Railway ticket fare, For AC coach Rs 2400 & Non AC coach Rs 900.
* Rest payment till 15th March 2024

** *Itinerary* **
*12th April 2024 (Friday)*
* To Depart from Mumbai Central at 8.30 PM on 12th April 2024

*13th April 2024 (Saturday)*
* To reach Ujjain at 7 AM & move to Hotel via local transport
* Morning rituals + Breakfast till 10 AM
* 10.30 AM to 12 PM, Shri Mahakal Darshan
* 12 PM to 4 PM : Lunch + Rest at hotel
* 5 PM : Tea & Move to Evening Aarti @ Shri. Mahakal temple
* 5.30 PM to 7 PM : Evening Aarti
* 7 PM to 9 PM : Mahakal lok Darshan
* 10 PM : Dinner + Rest

*14th April 2024 (Sunday)*
* 4 AM : Bhasma Aarti (Based upon online registration & *per individual choice*)
* 9 AM to 11.30 AM Breakfast & local shopping sight seeing
* Shri Kaal Bhairav nath Darshan by local transport
* 5 PM depart to Railway station
* 6.45 PM to catch the train for the return journey & train will reach mumbai by 6.30 AM on Monday.

For Booking & more information pls contact
Vikrant: 9930334781 /9967346067

Regards,
*Team Ashwamedh*

21/10/2018

*रायगड दर्शन*
मार्गदर्शक *- इतिहासतज्ञ श्री. प्र. के. घाणेकर सरांसोबत.*
रायगडावर आपण नेहमीच जातो आणि भटकत असतो. परंतू रायगडावरील शिवकालीन वास्तू व ऐतिहासिक महत्व जाणून घेणे नीटस जमत नाही. या साठी दुर्गतज्ञ गडभटके श्री. प्र. के. घाणेकर सरांसोबत दोन दिवस रायगड स्थलदर्शनाची संधी मिळाली आहे.
रायगडावरच त्या त्या स्थळी सरांकडून *ऐतिहासिक-सामरीक आणि वास्तू शास्त्रीय माहिती.* तसेच गडावरील *वनस्पती आणि शिवरायांचे दुर्गविज्ञान* इ. पूरेपूर माहीती मिळणार आहे.
या साठिच आम्ही हा ट्रेक आयोजित केलाय.

शुक्रवारी दि. २६. आॅक्टोबर २०१८ रोजी रात्रौ 10 वाजता ठाणे पूर्व रेल्वे स्थानक येथून बसने निघायचं आहे.
पहीला दिवस. -
शनिवार दि. २७ रोजी पहाटे रायगडावर पोचणार असून. सकाळीच गड पहाण्यास सुरवात करणार आहोत. दिवसभर स्थलदर्शन व माहिती घेत रात्रौ इतिहासा संबंधी कार्यक्रम असेलच.

*दरम्यान योग्य वेळी चहा - न्याहारी व जेवणं होतीलच. राहण्याचीही व्यवस्था असणार.*

दूसरे दिवशी-
रविवार दि. २८ सकाळपासून दुपार पर्यंत गडाची उर्वरीत बाजू पाहणार आहोत. प्र के घाणेकर सर च सर्व माहिती देणार आहेत.
दुपारी भोजन घेऊन ठाण्याकडे परतीचा प्रवास. रात्री साधारण 9 पर्यंत पोहचू. असे नियोजन आहे.

या करीता...
दोन दिवस चहा-नाश्ता-जेवण-राहणे व तज्ञांची फी आणि *ठाणे-रायगड-ठाणे* प्रवासासहीत सर्व खर्च रू. *१५००/- प्रत्येकी* येणार आहे.

*रायगड दर्शन आणि अभ्यास _या कार्यक्रमास_* येण्याकरता रू. १५००/- भरून नोंदणी करणे आवश्यक.
नोंदणी २० आॅक्टो अखेर पर्यंत करावी.
*संपर्क-*
सुनिल कदम. *9404606882* .
पंकज भोसले. *9821009137*
प्रविण मोहिते. *8898962712*

21/10/2018

दिवाळी फराळ

चकली ४०० रु किलो
शेव २५० रु किलो
पोहे चिवडा २५० रु किलो
शंकर पाळे २५० रु किलो
कडबोळी ३५०/- रु किलो
चिरोटे ४५०/- रु किलो
बेसन लाडू १५ रु नग
रवा लाडू १५ रु नग
रवा बेसन लाडू १५ रु नग
मोतीचूर १५ रु नग
मोतीचूर (साजूक तूप) २० रु नग
करंजी २० रु नग
अनारसे १५ रु नग

आपण ऑर्डर दिली ना ?

संपर्क
अनुप मालंडकर
आनंदी सदन,कोपरी गांव, ठाणे पूर्व
९०२९३७००३१ / ८३५५९४५७१७

06/10/2018
 #जनसेवा समिती, विलेपारलेइतिहास दर्पण-वारसा स्फूर्तीदायी इतिहासाचा!याअंतर्गत मराठ्यांच्या इतिहासातील काही गौरवशाली घटनां...
08/08/2018

#जनसेवा समिती, विलेपारले
इतिहास दर्पण-वारसा स्फूर्तीदायी इतिहासाचा!

याअंतर्गत मराठ्यांच्या इतिहासातील काही गौरवशाली घटनांचा,प्रसंगांचा आणि व्यक्तिरेखांच्या कर्तृत्वाचा आपण गेले काही महिने व्याख्यानाच्या मालिकेमधून वेध आणि आढावा घेत आहोत.

या मालिकेतील 4 थे पुष्प प्रसिद्ध इतिहास अभ्यासक, लेखक, ब्लॉगर आणि राफ्टर पब्लिकेशनचे प्रमुख #श्री उमेश जोशी
शनिवार दि 18 ऑगस्ट 2018 रोजी सादर करणार आहेत.

विषय आहे- #रणक्षेत्र पालखेड अर्थात वेध पालखेड रणसंग्रामाचा!

प्रतपासूर्य थोरले बाजीराव पेशवे यांनी आपल्या आयुष्यात सुमारे 40 लढायांमध्ये भाग घेतला आणि यापैकी एकाही लढाईत त्यांचा पराभव झाला नाही. एक अपराजित योद्धा म्हणूनच इतिहासात ते सुप्रसिद्ध आहेत. मुसलमानी इतिहासकारांनी त्याची नोंद घेऊन #साहेबी फुतूहाते उज्जाम म्हणजे प्रचंड विजय मिळवणारा योद्धा असा गौरवाने बाजीराव पेशवे यांचा उल्लेख केला आहे.

पालखेड येथे बाजीरावांनी निजमाशी केलेली लढाई त्यांच्या उत्कृष्ट युद्धनेतृत्वाची, रणकौशल्य आणि व्यूहनीतीची निदर्शक आहे असे मानले जाते. #फिल्डमार्शल मॉंटेगोमेरीने आपल्या युद्धशास्त्रावरील ग्रंथात पालखेडच्या लढाईसंबंधी जो उल्लेख केला आहे त्यावरून वरील विधानाची सत्यता लक्षात येते.

"They were at their best in Eighteen Century and the Palkhed Campaign of 1727-28 in which Bajirao outgeneralled Nizam Ul Mulk is a masterpiece of strategic mobility"

त्यांचे हे उद्गार बाजीराव पेशव्यांच्या युद्धकौशल्याची महती अधोरेखित करण्यास पुरेसे आहेत.

बाजीराव पेशवे यांनी 1727-28 च्या पालखेड येथे लढल्या गेलेल्या युद्धात निजामाचा कसा पराभव केला याचे तपशिलांसाहित विवेचन वरील कार्यक्रमात आपले वक्ते श्री उमेश जोशी व्याख्यान व स्लाईडशोच्या माध्यमातून करणार आहेत.

थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या या कार्यक्रमास इतिहासप्रेमी नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहून आपल्या गौरवशाली आणि स्फूर्तिदायी इतिहासाची यशोगाथा जाणून घ्यावी ही नम्र विनंती आहे.

हा कार्यक्रम निःशुल्क असून त्याचा तपशील असा आहे.

#रणक्षेत्र पालखेड
वक्ते: श्री उमेश जोशी- इतिहास अभ्यासक, लेखक व ब्लॉगर

#शनिवार,दि 18 ऑगस्ट 2018
सायंकाळी ठीक 6 वा

#स्थळ- साठ्ये महाविद्यालय, विलेपारले पूर्व

अधिक माहितीसाठी संपर्क-9987565738

#पोस्टर क्रेडिट-उमेश जोशी Umesh Mukund Joshi

उंबरखिंड म्हणजे जणू १५ कि। मी. लांबीची बंदुकीची नळीच होती. मोगली सैन्याने उंबरखिंड पुरती ओलांडलेली नव्हती. त्या अरुंद जं...
26/07/2018

उंबरखिंड म्हणजे जणू १५ कि। मी. लांबीची बंदुकीची नळीच होती. मोगली सैन्याने उंबरखिंड पुरती ओलांडलेली नव्हती. त्या अरुंद जंगली खिंडीत ते भयंकर ठेचून निघत होते किंवा थेट स्वर्गात जात होते. या भयंकर चित्तेहल्ल्याची खबर धडपडत , धावत मोगली सरदारांनी पिछाडीवर असलेल्या आपले सेनापती कारतलबखान साहेबांना दिली. बातमी देणारे व्याकूळ झाले होते. हा भयंकर प्रकार खानाला अनपेक्षित होता. हे सगळेच बादशाही सरदार आपल्या प्रचंड सैन्यसंख्येवर आणि युद्धसाहित्यावर भाळलेले असायचे. त्यांना वाटायचं , मराठे मूठभर आहेत. मारून काढू. पण त्या मूठभर मराठ्यांची ताकद सुरुंगाच्या दारूसारखी होती.

कारतलबखान सुन्नच झाला। कारण पाठोपाठ सर्वनाशाच्या खबरा येऊ लागल्या. यावेळी ती रायबाघन आपल्या घोड्यावर गप्प बसलेली होती. खानाने आपला घोडा रायबाघनकडे वळविला आणि तो अगतिक शब्दांत तिच्याशी बोलू लागला , ‘ रायबाघनसाहिबा , अब मैं क्या करूं ? क्या हालत हो गयी अपनी ?’

त्यावर रागावलेली रायबाघन खानाला म्हणाली , ‘ पुण्याहून निघताना आपण मला सल्ला विचारला होतात का ? आपण शिवाजीच्या कोणत्या भागांत नि कसे जाणार आहोत हे ठाऊक होतं का ?

‘ खानाला आपली चूक कळून चुकली होती. पण आता या बाईच्या शिकवणीचा ऐन कल्लोळात काय उपयोग ? तो म्हणत होता , ‘ अब मैं क्या करूं ?’

यावर रायबाघनने अगदी स्पष्ट शब्दांत त्याला सुनावलं की , ‘ हे असलं साहस म्हणजे आत्मघातकी वेडेपणा आहे. मी अजूनही आपल्याला सांगते की , आपण मुकाट्याने शिवाजीराजांकडे ताबडतोब वकील पाठवा. शरण जा. क्षमा मागा त्याची. तो राजा फार मोठ्या उदार मनाचा आहे. अजूनही तो तुम्हाला क्षमा करील. नाही तर सर्वनाश!

‘ खरंच होतं। खानानं आपला वकील पाठविला. पण त्या प्रचंड गोंधळगदीर्त शिवाजीराजाला गाठण्यासाठी जायचं कसं ? अखेर मोठ्या धडपडीनं तो वकील महाराजांपर्यंत जाऊन पोहोचला , हे मोगलांचं नशीब. त्यानं महाराजांच्या पुढे व्याकूळ होऊन विनवणी केली की , ‘ आम्ही माहीत नसलेल्या या मुलुखांत आलो. आमचे चुकले. आम्हाला माफ करा. आपल्या तीर्थरुपसाहेबांचा आणि कारतलबसाहेबांचा दोस्ताना फार मोठा आहे. आपण मेहरनजर करावी. आपण रहमदिल आहात.

‘ महाराजांनी मन मोठं केलं आणि म्हणाले , ‘ एकाच अटीवर. तुमच्या खानसाहेबांनी जे जे काही बरोबर आणलं आहे ते सर्व जागच्या जागी टाका. आणि रिकाम्या हाताने , निशस्त्र परत जा , कबूल ?’ ‘ जी , कबूल ‘

खजिना , तंबूडेरे , घोडे , डंकेझेंडे आणि सर्व जखीरा , म्हणजे युद्धसाहित्य जागच्याजागी टाकून खान परत जाण्यास कबूल झाला. त्याला हे भागच होते. त्याची प्रचंड फजिती मावळ्यांनी केली होती.

खान परत निघाला। मान खाली घालून निघाला. त्याचे महत्त्व आणि स्थान कायमचे संपले. तो आयुष्यातून उठला. या उंबरखिंडीच्या युद्धात नेताजी पालकर , तानाजी मालुसरे , पिलाजी सरनाईक इत्यादी उर्मट हत्याऱ्याचे सरदार महाराजांच्या बरोबर होते. सर्वांनी मोगलांच्या विरुद्ध हत्यार चालवून हौस फेडून घेतली.

शाहिस्तेखानाचे हिशोबवहीत आणखी एक जबर पराभव जमा झाला.

एक गोष्ट आपल्या लक्षात आली ना ? कारतलबखान लोणावळ्याकडून पश्चिमेला उंबरखिंडीत आला. पण महाराज आधीच (बहुदा एक फेब्रुवारी १६६१ ) पुण्याकडून ताम्हणीच्या किंवा सवाष्णीच्या घाटाने कोकणात उतरले आणि त्यांनी उंबरखिंडीच्या तोंडावरच खानाची वाट अडविली. त्याचं सगळं होतं नव्हतं तेवढं साहित्य कब्जात घेतलं. अंगावरचे कपडे शिल्लक ठेवले हे खानाचं आणि त्याच्या सैन्याचं नशीबच.

महाराज दि. 3 फेब्रुवारी १६६१ रोजी पाली , जांभूळपाडा , नागोठणे या मार्गाने महाडकडे निघाले. पण त्यांची सावधता केवढी! त्यांनी नेताजी पालकराला सुमारे दोन-एक हजार फौजेनिशी उंबरखिंडीतच ठेवले. न जागो , फजित पावलेला कारतलब पुन्हा युद्धसाहित्य जमवून कोकणात उतरू पाहिला , तर त्याच्या दुसऱ्या फजितीची व्यवस्था महाराजांनी नेताजीवर सोपविली.

महाराज आता चिपळूणजवळ श्री परशुरामाच्या दर्शनासाठी निघाले. महाराज धामिर्क होते. पण त्यांच्या कामाच्या आड ते देवधर्म , व्रतवैकल्य येऊ देत नव्हते. ते उरकूनच आता श्रीदर्शनास जात होते.

महाराष्ट्र भूषण श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे

परीक्षेत १००% पाहिजेत, कराटे क्लासमध्ये Black बेल्ट मिळवायचा आहे. त्यानंतर Dance क्लास attend करायचा. भगवतगीता स्पर्धेत ...
02/07/2018

परीक्षेत १००% पाहिजेत, कराटे क्लासमध्ये Black बेल्ट मिळवायचा आहे. त्यानंतर Dance क्लास attend करायचा. भगवतगीता स्पर्धेत जायचं आहे. श्लोकांचा अर्थ कळला नाही तरी ते तोंडपाठ
करायचेच. कारण first prize मिळालंच पाहिजे !! मग drawing competition असते. तिथून बाहेर निघाला की चालला तबला वाजवायला... संगीत विशारद बनायला.

Albert Einstein बनवून देणाऱ्या Multi -National School आल्या. पण Albert हा Einstein
बनण्यासाठी शाळेत गेला
नव्हता. एक अमिताभ बनला तर
हजारो acting school
उभ्या राहिल्या. पण अमिताभ अभिनेता बनण्यासाठी कोणत्याही शाळेत मध्ये गेला नव्हता. या कडे कोणाचेही लक्ष नाही.

*अनुभवातून शिक्षण हेच खरे शिक्षण !*

यासाठीच आपल्या रत्नागिरी मध्ये सुरु आहे..
रा. भा. शिर्के प्रशालेचा
*गुरुकुल प्रकल्प*
घरापासून दूर पण घरातच चालणारी एक उपक्रमशील शाळा...
विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास हे एकमेव ध्येय ठेवून *११ तास चालणारी एकमेव शाळा... ज्यातून परीक्षार्थी नाही तर अभ्यासू आणि आदर्श विद्यार्थी घडविले जातात.*

एकदा प्रत्यक्ष भेट देऊन पहा.
शैक्षणिक वर्ष २०१८-१९ साठी प्रवेश प्रक्रिया सुरु..
*इयत्ता : ५ वी ते १० वी*

आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी आजच गुरुकुल मध्ये त्याचा प्रवेश निश्चित करा.

*संपर्क*
श्री. किरण सनगरे ९४२१२३०९९२
श्री. स्वप्निल कर्लेकर ७५८८९१७१४०

साभार: Gaurav Pilankar

⛳✊ #जयमराठी, #जयमहाराष्ट्र ✊⛳✊ #आईशप्पथमराठी

एक पोलादी मानसिकतेची स्त्री जिने अत्यंत प्रतिकूल काळाशी झुंज देत अंधारमय भूतकाळाच्या मुसक्या आवळून उज्वल भविष्यचा वेध घे...
01/07/2018

एक पोलादी मानसिकतेची स्त्री जिने अत्यंत प्रतिकूल काळाशी झुंज देत अंधारमय भूतकाळाच्या मुसक्या आवळून उज्वल भविष्यचा वेध घेणारा युगंधर महापुरूष घडवला...
जिने आपल्या प्रखर इच्छाशक्तीच्या बळावर एक नाही दोन नाही तर तब्बल पाच पाच सुलतानशाह्या सुरूंग लावून पाताळात गाडल्या...
जिने आपल्या कणखर बाण्याने व करारी दरार्याने गुलामीच्या काटेरी शृंखला तहसनहस करत हिंदूस्तानला यवनी गुलामगिरीतून मुक्तता मिळवून दिली..
ती आई जिजाऊ आजही ह्या जगती जागृत आहे.
जय जिजाऊ.....!

📌सर्व निसर्गप्रेमी आणि पर्यटकांसाठी खास पर्वणी 📌*कोल्हापूर हायकर्स आणि बायसन नेचर क्लब* च्या वतीने तुमच्या  साठी घेऊन ये...
31/05/2018

📌सर्व निसर्गप्रेमी आणि पर्यटकांसाठी खास पर्वणी 📌
*कोल्हापूर हायकर्स आणि बायसन नेचर क्लब* च्या वतीने तुमच्या साठी घेऊन येत आहोत एक आगळा वेगळा.

*✨✨प्रकाशमहोत्सव✨✨*

🐝🐝 *राधानगरीच्या जंगलातील काजवामहोत्सव* 🐝🐝
💠 *तारीख: १९ मे ते ३१ मे २०१८*

🔹 *थोडक्यात कॅम्प बाबत :*
दरवर्षी मे महिन्याचा शेवटी शेवटी ते पाऊस सुरु होईपर्यंत राधानगरी दाजीपुर परिसरातील वृक्षराजीवर काजव्यांची ही मायावी दुनिया अवतरते. हिरडा, बेहडा, अंजनी, जांभूळ, आंबा, उंबर अशा निवडक झाडांवरच काजव्यांचा हा काही दिवसांचा 'बसेरा' असतो. ज्या झाडांवर काजव्यांची काही क्षणाची का होईना 'वस्ती' असते, ती झाडे 'ख्रिसमस ट्री'सारखी दिसतात! वर्षा राणीच्या स्वागतासाठी निसर्ग देवताच जणू काजव्यांची ही लक्ष लक्ष प्रकाश फुले मुक्तहस्ते उधळीत असल्याचा विचार मनात चमकून जातो. नभांगणातील तारांगणच जणू भुईवर उतरलेय... इथे रात्रच चांदणं झालीय... असा आभास काजव्यांची मायावी दुनिया निर्माण करते. काजव्यांच्या अस्तित्वाने रात्री उद्दीपित झाल्या आहेत. तासन-तास पाहत बसलो तरी मन काही तृप्त होत नाही. त्यामुळेच नुसतेच काजवे पाहणे, हादेखील जीवशास्राच्या अभ्यासकांच्या तसेच निसर्गप्रेमींच्या दृष्टीने एक अविस्मरणीय अनुभव असतो.

🔹 *आपण काय करणार आहोत ?*
▪️ काजव्यांच्या प्रकाशातील निसर्गाच्या दिवाळीचा अनुभव घेत पदभ्रमंती
▪रानमेवा आणि निसर्ग सानिध्यात सहभोजन
▪️राधानगरी ची ऐतिहासिक माहिती
▪️कॅम्पफायर 🔥 ( गप्पा- गोष्टी आणि हितगुज)

*💰 प्रत्येकी ७९९/- रू फक्त*

✅ *समाविष्ट असलेल्या बाबी*
▪️१ दिवस आणि १ रात्र
▪️ ️नाश्ता , दुपारचे आणि राञीचे जेवण
▪️राहण्याची सोय ( टेंटस् मध्ये शेयरींग बेसीसवर ) 🏕
▪️माहिती शुल्क.

❌ *समाविष्ट नसलेल्या बाबी*
▪थंडपेय आणि मिनरल वॉटर
▪ समाविष्ट बाबीं व्यतिरिक्त इतर काही.

*☎ अधिक माहिती आणि प्रवेशासाठी :*
Sagar - 9579997111 / 823707999
Rupesh - 9730886354
Samrat - 9421174337

*💻Website*
www.kolhapurhikers.com
www.radhanagari.in

16 Apr 2018 Dudhsagar Waterfall”🌧Trek 28-29 July 2018 kolhapurhikers | | 🚩Kolhapur Hikers 🚩 Most Awaited Trek Of The Year oon🔜 Special Trek Dudhsagar Waterfall”🌧 Date: 28-29 July 2018 Saturday (Night journey) Short info: Region :Mahaveer Wildlife Sanctuary,Goa Difficulty Level: Ea...

मी तो शिवाजीराजांचा सेवक............आपल्या मावळ्यांनी रक्ताचं थारोळं करून घडविललेला इतिहास सांगायचे मी पैसे का घेऊ. मी त...
10/05/2018

मी तो शिवाजीराजांचा सेवक............

आपल्या मावळ्यांनी रक्ताचं थारोळं करून घडविललेला इतिहास सांगायचे मी पैसे का घेऊ. मी तरी पैसे घेण्याइतका लाचार नाही

ह्या दोन ओळी माझ्या हृदयात मरेपर्यंत आहेत आणि राहतील, आणि तसे माझे आचरणही राहील आणि वरची वाक्य बोलणारे व्यक्तीमत्व हि.
अप्पा वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.

(साभार - Kiran Shinde Dada )

22/04/2018

......... *शिवमहोत्सव २०१८* ........
*गौरव इतिहासाचा..वेध शिवमहोत्सवाचा*

*अस्मिता प्रबोधिनी, बोरिवली आणि जनसेवा समिती, विलेपार्ले* यांच्या संयुक्त विद्यमाने शिवशाहीच्या इतिहासाचा मागोवा घेणारा एक भव्य, दिव्य, उत्तुंग असा *दिनांक २९, ३० एप्रिल व १ मे २०१८* असे तीन दिवसीय कार्यक्रम सुविद्या प्रसारक संघाच्या *श्री मुंबादेवी विद्यानिकेतन शाळेचे पटांगण, गोराई, बोरिवली(पश्चिम)* येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
या उपक्रमाला *महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे* यांचे शुभाशिर्वाद लाभले असून ते स्वतः कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी आपल्यात उपस्थित राहणार आहेत. अर्थात आपल्या विभागास श्रीमंतांचे पाय लागणं हे आपल्यासाठी भुषणार्थ आहे. कार्यक्रमाचा तपशील पुढील प्रमाणे....

*दि. २९ एप्रिल सायंकाळी ६.३० वा.*
वक्ते ; *श्री पांडुरंगजी बलकवडे* ज्येष्ठ इतिहास अभ्यासक व संशोधक
विषय ; *पानिपतचा रणसंग्राम*

*दि. ३० एप्रिल सायंकाळी ५.३० वा.*
*मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके*
सादरकर्ते ; शिवगर्जनाचे *श्री प्रणय शेलार* आणि सहकारी

*रात्रौ ७.०० वा.*
वक्ते ; *श्री पराग लिमये* इतिहास अभ्यासक
विषय ; *अपरिचित शिवाजी महाराज* (व्याख्यान व स्लाईडशोच्या माध्यमातून शिवरायांचे गुणविशेष)

*दि. १ मे रात्रौ ७.००वा.*
*महाराष्ट्र भुषण शिवशाहीर श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे*
यांचा *जाहीर सत्कार* व त्यानंतर त्यांचे *शिवचरित्रावर व्याख्यान*

उपरोक्त तिन्ही दिवशी *सकाळी १०.३० ते रात्रौ ९.००* या वेळेत कार्यक्रमाअंतर्गत खालील मांडणी करण्यात आलेली आहे.

दुर्गदुर्गेश्वर रायगड ही संकल्पना घेऊन शिवतिर्थ रायगडाच्या विविध पैलूंचे दर्शन घडवणारे छायाचित्रांचे भव्य प्रदर्शन. ज्यात *रायगडावरील वास्तू अवशेषांची आणि विविध ऋतूतील मनोवेधक छायाचित्रे*

रायगडावरील प्रसिद्ध वास्तूंची भव्य आकारातील *श्री शैलेश संसारे* यांनी काढलेली *त्रिमितीय (3 D) छायाचित्रे*

*वेध इतिहासाचा* यात शस्त्रेसंग्रहक *श्री सुनिल कदम* यांची *शिवकालीन शस्त्रास्त्रे, दुर्मिळ मोडी लिपी कागद पत्रे व शिवकालीन नाणी* यांचे प्रदर्शन.

किल्ले व साहस यावरील *लघुपट*

स्वखर्चाने श्रमदान करून *दुर्गसंवर्धन* करणारे *श्री संतोष हासुटकर* आणि त्यांचे सहकारी यांच्या कार्याची ओळख

*शिवनिर्मित कासा उर्फ पद्मदुर्ग* या जलदुर्गाची *प्रतिकृती* आरेखन/निर्मिती प्रमुख *श्री संजय तळेकर* कला सहाय्यक *श्री प्रविण घुमरे*

इतिहासप्रेमी वाचकांसाठी *ऐतिहासिक पुस्तकांची विक्री*....आणि बरेच काही.......

सर्वांसाठी *निःशुल्क* असलेल्या या कार्यक्रमात जास्तीत जास्त इतिहासप्रेमीनी व शिवप्रेमीनी सहभागी व्हावे असे आवाहन अस्मिता प्रबोधिनी आणि जनसेवा समिती यांच्या तर्फे करण्यात येत आहे.

*अधिक माहितीसाठी संपर्क*
98203 74619
98691 98494
86918 77767

नमस्कार मित्रांनो , मी मराठी उद्योजक देवेंद्र बंगे . काही दिवसांपूर्वी मी पोस्ट केली होती व त्यात मराठी मुलांना काॅलेजवय...
22/04/2018

नमस्कार मित्रांनो ,

मी मराठी उद्योजक देवेंद्र बंगे . काही दिवसांपूर्वी मी पोस्ट केली होती व त्यात मराठी मुलांना काॅलेजवयापासूनच बिझनेस ची आवड निर्माण होऊन अनुभव ही घेता यावा म्हणून उपाय सूचवला होता.
त्याप्रमाणे आम्ही स्वतः उन्हाळी सुट्टीतला उपक्रम म्हणून मालाड , मुंबई येथे सुरवात केली आहे.

कोकणातले अस्सल फळांपासून बनवलेले आमरस , कैरी पन्हे, कोकम सरबत सारखा मेवा काॅलेजची सुट्टी पडलेल्या मुलांना स्टाॅल द्वारे विक्रिला देउन त्यातून होणारा नफा तर त्यांना मिळणारच पण त्यांना व्यवसाय कौशल्य पण कसे विकसीत करायचे हे सुद्धा शिकवत आहोत .

ग्राहकाशी कसे बोलायचे , ग्राहकाला नाराज न करता आपले म्हणणे कसे पटवून द्यायचे व सर्वात महत्वाचे डोक्यावर बर्फ व जिभेवर साखर ठेउन धंदा कसा करायचा हे आपल्या मुलांना किशोरवयातच कळावे म्हणून हा सगळा खटाटोप.

यातून 1 जरी मुलगा व्यवसाय साक्षर झाला तरी माझा हेतू सफल झाला असे म्हणेन.

संपर्क :
दिनेश कोंडाळकर : 7021064223/9221044959
देवेंद्र बंगे : 9145369891

Address

Kokan Nagar
Mumbai
400078

Telephone

+919930334781

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Team Ashwamedh posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Team Ashwamedh:

Videos

Share

Category


Other Tour Agencies in Mumbai

Show All

You may also like