18/07/2022
दर वर्षी मुंबई लोकल ट्रेन अपघातात हजारो लोकं मरतात म्हणून मुंबई लोकल ट्रेन बंद करणार का ?
२६९१ लोकांचा मृत्यू झाला २०१९ वर्षी
दर वर्षी महाराष्ट्र मध्ये रस्ते अपघात लाखो लोक मरतात म्हणून आपण सगळी रस्ते वाहतूक बंद करणार का ?
६३४७५ लोक १५८९६० रस्ते अपघात महाराष्ट्र मध्ये रस्ते अपघातात मरण पावली मागील ५ वर्षात
ही आकडेवारी देण्याचे कारण महाराष्ट्र सरकारने घेतलेला तुघलकी निर्णय पावसाळी पर्यटन स्थळी पर्यटक बंदीचा
महाराष्ट्र मध्ये पावसाळी पर्यटन वाढतं आहे गेल्या १० वर्षात पावसाळी पर्यटनासाठी गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तरेकडील राज्यं मधून पावसाळी पर्यटनासाठी सह्याद्री मध्ये लाखो लोक यायला लागली आहेत. पावसाळी पर्यटन सामान्य पर्यटकांच्या सुद्धा बजेट मध्ये असते त्यामुळे अनेक कुटुंबं पावसाळी पर्यटनासाठी बाहेर पडतात. महाराष्ट्रातील पावसाळी पर्यटनामुळे लाखो लोकांना रोजगार मिळतो आणि त्यामुळे अनेक लोकांच्या कुटुंबाचा वर्षभराचा उदरनिर्वाह या ४ महिन्याच्या सीझन मधून होतो.
पावसाळी पर्यटनामुळे शेतकऱ्यांना त्यांचा मालं थेट पर्यटन स्थळी ग्राहकांना विकता येतो, या पावसाळी पर्यटनामुळे स्थानिक रिक्षावाले, टमटमवाले, घोडागाडीवाले, फळ - भाज्या विक्रेते, रानभाज्या विकणारे स्थानिक आदिवासी महिला आणि पुरुष, छोटे - मोठे हॉटेल विक्रेते, स्थानिक किराणा - डेरी - आइस्क्रीम दुकानदार, वाटाडे, गाईड, पार्किंगवाले, प्रशिक्षित - मान्यताप्राप्त गाईड / लीडर, टूर ऑपरेटर, ट्रॅव्हल - ट्रेकिंग आयोजित करणाऱ्या कंपन्या, ट्रॅव्हल्स बस मालक - चालक, गावातील कपडे बदलण्यासाठी आणि सामान ठेवण्यासाठी घरे भाड्याने देणारे ग्रामस्थ असे अनेक जण या व्यवसायाशी निगडित आहेत आणि शासनाच्या एका बंदीच्या निर्णयामुळे लाखो लोकांचा रोजगार बुढत आहे.
पर्यटन स्थळे बंद न करता शासन काय करू शकते
१) स्थानिक प्रशासन, पोलिस, ग्रामस्थ, टूर ऑपरेटर आणि तज्ञ यांची समिती स्थापन करून प्रत्येक परिचित पर्यटन स्थळांचा आढावा घेऊन त्या पर्यटन स्थळांची क्षमता बघून ऑनलाईन पद्धतीने बुकिंग सुरू करावी आणि तेवढ्याच लोकांना पर्यटन स्थळी जाण्याची परवानगी देण्यात यावी जेणेकरून गर्दी नियंत्रणात येईल
२) प्रत्येक पर्यटन स्थळी पोलिस यंत्रणे बरोबर होमगार्ड/ महाराष्ट्र बोर्ड सेक्युरीटी/ महाराष्ट्र सेक्युरीटी फोर्स यांची यंत्रणा वापरता येईल, यांना पोलिसांसारखे हक्क आहेत आणि त्याचा हुद्दाडबाज पर्यटकांवर नियंत्रण ठेवण्यात मदत करतील, स्थानिक तरुण ग्रामस्थांची एक टीम तयार करून त्यांना प्रशिक्षण देऊन या कामासाठी वापरता येईल
३) प्रत्येक पर्यटन स्थळी दारू, सिगरेट, गुटखा, मावा, हुक्का, गांजा आणि ईतर मादक पदार्थ सेवन आणि विक्रीला १००% बंदी आणावी जेणेकरून नशेबाज तरुण - तरुणी या ठिकाणी येणार नाही आणि कोणतेही अपघात होणार नाही
४) प्रत्येक पर्यटन स्थळी १००% प्लास्टिक बंदी करावी, प्लास्टिक बंद पाण्याच्या बॉटल वर सुद्धा बंदी आणावी आणि गावात RO फिल्टर प्लांट लाऊन स्वतःच्या पाण्याच्या बॉटल पैसे देऊन त्यामधून भरून घ्याव्यात
५) पर्यटन स्थळांवर नियम मोडल्यास गैरवर्तन केल्यास पर्यटक आणि आयोजकांवर गंभीर गुन्हा दाखल करावा
६) सर्व पर्यटन स्थळांवर माहिती फलक, दिशा दर्शक फलक लावावे, अवघड ठिकाणी तज्ञांच्या सल्ल्याने उपाययोजना कराव्यात
७) पर्यटन स्थळी जाणारे रस्त्यांचे डांबरीकरण, रुंदीकरण करावे
८) प्रत्येक पर्यटन स्थळी कपडे बदलण्यासाठी स्वच्छ टॉयलेट बाथरूम बांधावे आणि स्थानिक महिलांच्या संस्थेला मेंटेन्स साठी द्यावा जेणेकरून ते स्वच्छ राहील आणि लोक उपयोगात येईल, पाणी उपलब्ध करून द्यावे जेणेकरून स्वच्छ्ता राहील
९) छोटी मोठी गावं पर्यटनाच्या नकाशावर आणावी आणि त्याची माहिती शासनाच्या पर्यटन विभागाच्या संकेस्थळावर आणावी त्यामुळे पर्यटक विभागले जातील आणि अजून लोकांना रोजगार भेटेल आणि ग्रामीण भागातील लोक रोजगारासाठी शहरात येणार नाही आणि गावांचा विकास होईल
१०) कोणत्याही पर्यटन स्थळी शासन आणि इतर सर्व फीस मध्ये रोखीचा व्यवहार ठेऊ नका सगळं ऑनलाईन करा नाहीतर यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांकडून गैव्यवहार होऊ शकतो
आताच्या स्थितीला ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, नाशिक आणि अजून काही जिल्ह्यात बंदी जाहीर झाली आहे
लोकांना प्रत्यक्षरित्या रोजगार देऊ शकतं नसाल तर त्यांचा
रोजगार हिराऊ नका आणि त्यांचा रोजगार आहे तो चालू राहू द्या
सगळ्या संकटांवर उपाययोजना आहेत फक्त त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे
मंगेश बाळू कोयंडे