30/07/2022
🙏"ड्रायव्हर लोकांची खाजगिवाहन मालकाची व्यथा"
RTO-वाहतुक नियंत्रन पोलीस ह्याचे संबधी ची हि तक्रार,
मी एक चालक किंवा मालक आहे माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती सगळे आँनलाईन झाले टैक्स , इन्षुरन्स , पासिंग , खुप छान झाले भ्रष्टाचार कमी झाला असे वाटत आहे , झाला पण असेल कदाचित , पण साहेब रस्त्यावरचा त्रास आजुन कमी झाला नाही , साहेब सगळे पेपर , ड्राईवर परवाना, विमा पॉलिसी, टी.पी.परमिट क्लियर असताना हा पोलीसाचा त्रास कशासाठी , काही ना काही वाद घालून ड्राइवर ला १००/२००/५००/१०००/२०००/३०००/४०००/५०००/१००००/-₹ मागणी केली जाते कारण काय आहे साहेब कशासाठी..?? जर पैसे नाही दिले तर काहीतरी कारण काढून गाडीवरती खोटे गुन्हे व केस करण्याची धमकी देत असतात काय साहेब माणसाने जगायचे कसे हे तरी सांगा ....??
*साहेब आम्ही गाडीवाले संपूर्ण भारत फिरत असतो , महाराष्ट्र सोडून बाहेर पण जातो महाराष्ट्र च्या बाहेर गेल्यावर पण आम्ही पोलीस पाहतो , कर्नाटक, गुजरात , राजस्थान , केरळ , यू.पी. , एम्.पी. कोठेही त्रास नाही,* ऊलट ते बाहेर ची गाडी म्हणुन आपल्याला मार्ग सांगतात कुठल्याही गोष्टीचा त्रास देत नाहीत तर आपण असे का ..??
आपल्या कडे सरकार कडून सगळे मिळते त्यांना तरी पण .... दादागिरी ची भाषा व धमक्या निट नाही आरे रावी करतात साहेब त्यांना खाकी आहे आणि आम्हाला पण खाकी आहे तर असा भेदभाव कशासाठी ... ? ४ पैसे मिळावे म्हणुन कशासाठी हा तळतळीचा पैसा घेत आहेत साहेब ..? बाहेर चा गाडीवाला आला की आपल्या पोलिसांना शिव्या देतो का तर तुम्हारा महाराष्ट्र पोलीस बहोत पैसा खाता है , साहेब आपणच आपली किंमत कमी करून घेत आहोत , साहेब गाडी मध्ये पँसेंजर असतात कोणी लग्नाचे वराड आहे तर कोणी मयतीला चालले आहे तरी कधी सीरियस पेशंट असते,पण हे कोणालाही सोडत नाहीत यांच्या हातापाया पडावे लागते , साहेब जाऊद्या मयत झाली आहे , ऐ चल पावती फाड.नाही तर ५००/-₹ दे त्यांना कोणाचे काही देणे घेणे नाही, साहेब थोड लक्ष द्या पोलीस यंत्रणा काय करत आहे , गाडी चेकींगच्या नावाखाली पैसा काढत आहे , या जिल्ह्यात पैसे दीले लगेच पुढच्या जिल्ह्यात दूसरे हद्दवाले परत डबल पैसे मागतात,,
साहेब शेती पिकत नाही म्हणुन शेतकरी आत्महत्या करतो आता गाडीवाल्यांनी काय करायचे ह्या त्रासाला कंटाळुन ....
साहेब आगोदरच सरकार सांगतय स्वयं-रोजगाराकडे वळा , गाड़ी घेन्यायासाठी व्याजाने पैसे पण सरकारी बँक च देते,सगळे (Business) व्यवसाय ठप्प झाले आहेत, कोणत्याही क्षेत्रात नोकऱ्या उपलब्ध नाहीत त्यात हा त्रास ... प्रत्येक गोष्टीला यांना पैसा पाहिजे , बघाव तीथे सेटलमेंट हवी आहे , काय करायचे तरी काय माणसाने...
यांना पगार आहे सगळ्या सुविधा आहेत, सरकारी नोकरी असल्यामुळे तरी त्यांचे पोट भरत नाही , ,,,, ,,, साहेब टैक्स परमिट , ड्राईवर पगार , इंशुरन्स , पोलिस एंट्री , गाडीचा मेंटेननम्स हे सगळे जरी केले तरी गाडीचा बँक हप्ता मग नंतर पोर बाळ कसे सांभाळायचे तुम्ही सांगा..🙏🏻
नाही तर एक दिवस असा येईल सरकार आणि कायद्यावरचा सर्व सामान्य माणसाचा विश्वास राहणार नाही .. 🙏🏻
तरी साहेब मनापासून विनंती करतो हे सगळं थांबले पाहिजे ...। 🙏🏻
एक ...... चालक किंवा मालक 🙏🏻🙏ज्याच्यावर पूर्ण कुटुंबाची जाबाबदारी असते?????
*मानवाधिकार* *सुरक्षा* *संघटना* ( *महाराष्ट्र* *राज्य** )
हा मेसेज आपल्याकडे असलेल्या ग्रुपमध्ये पाठवा मंत्री साहेबा प्रतेक मंत्री,लाचलचत प्रतीबंदक अधिक्षक,प्रतेक जिल्हाचे परिवहन अधिकारी(RTO)पर्यत हि व्यथा पोहचली पाहिजे🙏