Hirvai Nature Nd Wildlife Tourism

Hirvai Nature Nd Wildlife Tourism Hirvai Nature Nd Wildlife Tourism organizes dedicated wildlife and nature tours in India and out of India last 23 years...
(6)

Hirvai Nature Nd Wildlife Tourism organizes dedicated wildlife and nature tours in India and out of India last 23 years...we organize dedicate wildlife and nature tours and we are experts in it...come with us and explore the world of wildlife and nature... chala nisarg anubhavuyat...

SOME PHOTOGRAPHS PHOTOGRAPHED BY ME IN RANTHAMBHORE TIGER RESERVE INDIA IN HIRVAIS RECENT TOUR ...
26/04/2024

SOME PHOTOGRAPHS PHOTOGRAPHED BY ME IN RANTHAMBHORE TIGER RESERVE INDIA IN HIRVAIS RECENT TOUR ...

HIRVAIS RANTHAMBHORE TOUR GROUP DATED 10 TH APRIL TO 16TH APRIL 2024
18/04/2024

HIRVAIS RANTHAMBHORE TOUR GROUP DATED 10 TH APRIL TO 16TH APRIL 2024

चला हिरवाई सोबत निसर्ग अनुभवुयात...
19/03/2024

चला हिरवाई सोबत निसर्ग अनुभवुयात...

18/03/2024

हिरवाईच्या २०२४ ते २०२५ मधल्या जंगल सफारी...
झालाना लेपर्ड सफारी ३० सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर २०२४...
नागझिरा व्याघ्र सफारी ३ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबर २०२४...
ऑफबीट सातारा सहल २५ ते २८ सप्टेंबर २०२४...
ताडोबा व्याघ्र सफारी १८ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०२४...
पेंच व्याघ्र सफारी ३ ते ६ डिसेंबर २०२४...
नागझिरा व्याघ्र जंगल सफारी ७ ते १२ जानेवारी २०२५...
ताडोबा व्याघ्र सफारी २२ ते २७ जानेवारी २०२५...
रणथंभोर व्याघ्र सफारी ३ ते ९ फेब्रुवारी २०२५...
झालाना लेपर्ड सफारी १७ ते २३ फेब्रुवारी २०२५...
गीर लायन सफारी २२ ते २७ ऑक्टोबर २०२४...

COME ND JOIN THE TOUR WITH Hirvai Nature Nd Wildlife Tourism...
14/02/2024

COME ND JOIN THE TOUR WITH Hirvai Nature Nd Wildlife Tourism...

JAY HIND...
26/01/2024

JAY HIND...

SOME PHOTOGRAPHS PHOTOGRAPHED BY ME IN TADOBA TIGER RESERVE INDIA IN Hirvai Nature Nd Wildlife Tourism S RECENT TADOBA T...
19/01/2024

SOME PHOTOGRAPHS PHOTOGRAPHED BY ME IN TADOBA TIGER RESERVE INDIA IN Hirvai Nature Nd Wildlife Tourism S RECENT TADOBA TOUR THIS MONTH...

COME ND JOIN THE TOUR WITH Hirvai Nature Nd Wildlife Tourism
19/01/2024

COME ND JOIN THE TOUR WITH Hirvai Nature Nd Wildlife Tourism

Hirvai Nature Nd Wildlife Tourism S TADOBA TOUR GROUP...
15/01/2024

Hirvai Nature Nd Wildlife Tourism S TADOBA TOUR GROUP...

01/01/2024

To my loved ones -

All Four seasons came and went
away... and each time I could smell the scent
Of a new season

Laughed this summer , warmed this winter
Through drops of rain I cried
without reason

Said some things right
Struggled with some as they slipped from my clasp
And sank into the earth , they became dust
And some of them became silences I trust

Again an year ends with a song
Yes, it feels new after trotting along . A large circle for many days

The tall trees etched against the blue
A new me and a new you
A change and yet a déjà vu !

Prepping for a Lovely and creative 2024

Saurabh Mahadik...

11/11/2023
COME AND JOIN THE TOUR WITH Hirvai Nature Nd Wildlife Tourism ...
01/11/2023

COME AND JOIN THE TOUR WITH Hirvai Nature Nd Wildlife Tourism ...

Hirvai Nature Nd Wildlife Tourism S PENCH TOUR TOURIST GROUP...AFTER HAPPY ENDING TOUR...TOURISTS WATCHED 10 TIGERS, 8 L...
29/10/2023

Hirvai Nature Nd Wildlife Tourism S PENCH TOUR TOURIST GROUP...AFTER HAPPY ENDING TOUR...TOURISTS WATCHED 10 TIGERS, 8 LEOPARDS, 10 WILDDOGS, 10 JACKALS AND SOMANY BIRDS...

जागतिक प्रकाशचित्रण दिनाच्या निमित्ताने...आज "जागतिक प्रकाशचित्रण दिन"... म्हणजेच "वर्ल्ड फोटोग्राफी डे"... मला माझ्या आ...
19/08/2023

जागतिक प्रकाशचित्रण दिनाच्या निमित्ताने...
आज "जागतिक प्रकाशचित्रण दिन"... म्हणजेच "वर्ल्ड फोटोग्राफी डे"... मला माझ्या आयुष्यात मी फोटोग्राफर असल्यामुळे खूप प्रसिद्धी मिळाली, नाव मिळाले, अनेक मोठ्या लोकांशी नाते जोडता आले... त्यांना भेटता आले संवाद साधता आला...मग त्यात अगदी माझे काही बाल सवंगडी होते, काही वयस्कर होते... सर्वानाच मी करत आलेली फोटोग्राफी आवडत आलीय...माझ्या आयुष्यात मी फोटोग्राफी पहिल्यांदा शिकलो किंवा तिच्या प्रेमात पडलो ते "गौतम राजाध्यक्ष" ह्या अवलियामुळे...त्यांची चंदेरी मधली किंवा षट्कारमधली प्रकाशचित्र पाहत मी मोठा झालोय...
तर माझ्या महाविद्यालयीन दिवसांमध्ये मी "विठोबा पांचाळ" ह्या प्रकाशचित्रणातल्या मास्टरला भेटलो आणि त्यांचा शिष्य झालो...त्यांनी केलेल्या "महाराष्ट्र फाउंडेशनच्या कामामुळे त्यांचे त्या दिवसांमध्ये प्रचंड नाव झाले होते आणि मला त्यांचे ते काम प्रचंड आवडले होते... आणि मी त्या दिवसांमध्ये त्यांच्याकडून कधी फोटोग्राफी शिकेन अशा अवस्थेत होतो... तो योगही लवकरच आला...त्यांच्याकडून अगदी व्यवस्थित फोटोग्राफी शिकता आली... आणि नंतरच्या काही दिवसांतच मी ज्यांची प्रकाशचित्रे पाहत मोठा झालो त्या गौतम राजाध्यक्षांनाही भेटण्याचा त्यांचा सहवास लाभण्याचा योग आला...त्यांच्याकडूनही शिकता आले...गौतम सरांचे प्रेम मला त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत लाभले... त्यानंतर माझ्या आयुष्यात "उद्धव ठाकरे, पिट सूझा, अँडी राऊस, थिओ अल्लोफ्स, अॅलन ह्यूम, असे अनेक जागतिक पातळीवरचे फोटोग्राफेर्स आले आणि त्यांचा सहवास लाभला, त्यांच्याकडून मला शिकता आले...आज जो काही मी आहे ते ह्याच मास्टर लोकांमुळे आहे...
ह्याच सर्व माझ्या गुरूंना आज वंदन करण्याचा हा दिवस...ह्या सर्व लोकांकडून मी एक सर्वात मोठी गोष्ट शिकलो आणि जी मी आजही पाळतो ती म्हणजे आपण विद्यार्थी म्हणून वावरले पाहिजे, नवीन नवीन येणाऱ्या लोकांकडून शिकले पाहिजे ...आणि आपल्याला जे काही तंत्र आणि मंत्र येते ते नवीन येणाऱ्या लोकांना दिले पाहिजे, दुसऱ्यांचे केलेले चांगले खूप पहिले पाहिजे आणि त्याचे अवलोकन करून त्यातून शिकले पाहिजे हे महत्त्वाचे...
माझ्या ह्याच सर्व लहानथोर गुरूंना आजच्या जागतिक प्रकाशचित्रण दिनानिमित्त नमस्कार आणि माझ्या फोटोग्राफीमध्ये काहीतरी करू पाहणाऱ्या लहानथोर मित्रांना भरभरून शुभेच्छा....शेवटी एकच सांगू इच्छितो चांगल्या मोठ्या व्यक्तींचे काम भरभरून पहा, ते काय करतात त्यांचा खूप अभ्यास करा आणि आपल्या ज्ञानात भर घाला...इथे एक गोष्ट सांगू इच्छितो कि "उद्धव ठाकरेंसारखा मोठा फोटोग्राफर आज जरी राजकारणी असला तरी ते दिवसातला काही वेळ का होईना आपल्या व्यस्त कामकाजामधून काढून इंस्टाग्रामवर आजही घालवतात आणि नवीन नवीन लोकांचे काम पाहतात त्याचे अवलोकन करतात आणि त्यातून नवीन नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत असतात"... ज्यांना फोटोग्राफटीमध्ये काही करायचंय त्यांनी इंस्टाग्राम ह्या सामाजिक प्लॅटफॉर्मचा चांगला योग्य वापर करून घेतला तर त्यातून शिकण्यासारखे खूप आहे...पुन्हा एकदा भरभरून शुभेच्छा...
सौरभ महाडिक,..

स्वातंत्र्याच्या या अमृतमहोत्सवी वर्षात, एक भारतीय असल्याचे प्रत्येक कर्तव्य योग्य रीतीने बजावण्याचे वचन स्वतः ला व आपल्...
15/08/2023

स्वातंत्र्याच्या या अमृतमहोत्सवी वर्षात, एक भारतीय असल्याचे प्रत्येक कर्तव्य योग्य रीतीने बजावण्याचे वचन स्वतः ला व आपल्या मातृभूमीला देऊया. आपल्या देशाविषयी अभिमान बाळगून जगाच्या नकाशावर भारत सदैव उज्ज्वल स्थानी राहील यासाठी प्रयत्नशील राहूया.
विविधतेत एकता, अतिथी देवो भव व वसुधैव कुटुंबकम असे संस्कार असलेल्या आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून आज ७५ वर्षे पूर्ण होत आहेत.
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

CHALA NISARG ANUBHAVUYA...
05/08/2023

CHALA NISARG ANUBHAVUYA...

आज "जागतिक व्याघ्र दिन" त्यानिमित्ताने एक गोष्ट आठवली.. "वाघाच्या शेजार्याचे म्हणजे आदिवासिंचे दारिद्रयाचे वर्णन करणारी ...
29/07/2023

आज "जागतिक व्याघ्र दिन" त्यानिमित्ताने एक गोष्ट आठवली.. "वाघाच्या शेजार्याचे म्हणजे आदिवासिंचे दारिद्रयाचे वर्णन करणारी एक घटना पूर्वाश्रमीचा मिशनरी आणि समाजशास्त्रज्ञ व्हेरिअर एल्विन याने उल्लेखलेली... एकदा चंद्रपूरच्या जंगलात एका माडिया गोंडाने स्वतःचा जीव धोक्यात घालून एका विलायती गोऱ्या फाॅरेस्ट आॅफिसरची नरभक्षक समजल्या जाणार्या वाघाच्या तावडीतून सुटका केली. त्याबद्दल त्याला ब्रिटिश राजवटीतले शौर्याबद्दलचे अत्युच्च अल्बर्ट सुर्वणपदक जाहीर झाले. गव्हर्नरच्या हस्ते प्रत्यक्ष पदक बहाल करण्याचा जेव्हा प्रसंग आला, तेव्हा 'पदक कोठे खोचावयाचे' हा प्रश्न सर्वांना पडला, कारण उभ्या आयुष्यात त्या माडिया गोंडाने एक लंगोटी सोडता दुसरा कपडा अंगावर कधी वापरलेलाच नव्हता. केवढे हे दारिद्र्य?? "वाघाच्या शेजार्यांचा हा दारिद्र्याचा प्रश्न समाधानकारक सुटला तरच वाघ जगेल... तसे न झाल्यास पोट भरण्यासाठी या गरिबांची जंगलावर होणारी आक्रमणे कोणीही रोखू शकणार नाही. यासाठी सुशिक्षित-सुखवस्तूंचा फक्त वाघाकडे, निसर्गाकडे, जंगलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून भागणार नाही. त्यांच्या स्वतःकडे पाहण्याच्या दृष्टिकोनातच अमूलाग्र बदल झाला पाहिजे. मानवाची अधाशी मनोवृत्ती बदलण्याची गरज आहे... निसर्गाशी केवळ फारकत घेणारी नव्हे तर निसर्गाविरुध्द अहोरात्र निघृण युध्द लादणारी, निसर्गाच्या अस्तित्वाचीही कदर न करणारी आणि दिवसेंदिवस अधिक अवाढव्य आणि राक्षसी बनणारी माणसाची मनोवृत्ती, स्वार्थस्पर्धा, पिळवणूक, विषमता, अन्याय, हिंसा आणि त्याचबरोबर दूषित वातावरण आणि रोगराई यांना प्रसवणार्या आणि पोसणार्या आजच्या कृत्रिम उत्पादनव्यवस्थेमुळे माणसाच्या संस्कृतीचे तारू विनाशाकडे भरकटत चालले आहे. यात मूलभूत बदल झाला तरच निसर्गाचे पुनर्वसन होऊ शकेल व वन्यजीव साखळीत सर्वात वरचे स्थान भूषवणाऱ्या या जंगलच्या खऱ्या राजाचे म्हणजेच वाघाचे अस्तित्त्व टिकून राहील... जागतिक व्याघ्रदिनाच्या शुभेच्छा...

"हिरवाई आयोजित ऑफबीट सातारा निसर्ग सहल २५ ते २८ सप्टेंबर २०२३"आपली महाराष्ट्रातली माणसे दरवर्षी विठू माउलींची वारी करतात...
22/07/2023

"हिरवाई आयोजित ऑफबीट सातारा निसर्ग सहल २५ ते २८ सप्टेंबर २०२३"
आपली महाराष्ट्रातली माणसे दरवर्षी विठू माउलींची वारी करतात. तसेच हल्ली गेल्या काही वर्षात आपल्या महाराष्ट्रातील निसर्गप्रेमी "निसर्गरम्य साताऱ्याची" वारी करताना दिसतात. आपल्या भारतातली किंवा जगभरातील माणसे निसर्ग अनुभवण्यासाठी स्विझर्लंड ला जाताना दिसतात. परंतु आपल्या महाराष्ट्रालाही अशाच एका आगळ्यावेगळ्या निसर्गरम्य स्विझर्लंडची भेट मिळालेली आहे आणि ते म्हणजे महाराष्ट्रातील सातारा. साताऱ्याला निसर्गाची मनमुराद देणगी लाभलेली आहे. शिवाय साताऱ्याला महाराष्ट्राची लँडस्केप सिटी म्हणूनही ओळखले जाते. ह्या साताऱ्यामध्ये पाहण्यासारखी, अनुभवता येण्याजोगी अनेक निसर्गरम्य ठिकाणे आहेत. शिवाय ह्याच साताऱ्याला ऐतिहासिक तसेच सांस्कृतिक वारसाही मिळालेला आहे. "सातारा निसर्ग, संस्कृती आणि इतिहास ह्या सर्वच बाबतीत नावाजलेले आहे."
ह्याच साताऱ्याची हिरवाई ह्या निसर्ग व वन्यजीव पर्यटन ह्या क्षेत्रांमध्ये गेली २५ वर्षे भरीव कामगिरी करणाऱ्या संस्थेने २५ ते २८ सप्टेंबर २०२३ ह्या कालावधीमध्ये ४ दिवसांची एक आगळीवेगळी सहल आयोजित केलेली आहे.
ह्या सहलीमध्ये साताऱ्यातली जगप्रसिद्ध अशी "कास पुष्प पठार, चाळकेवाडी पुष्पपठार, ठोसे घर धबधबा, सज्जनगड, पवारवाडीचे पुष्प पठार, उरमोडी डॅम ह्या आणि अशा अनेक आगळ्यावेगया ठिकणांना भेट देऊन फोटोग्राफी चा आनंद घेता येणार आहे. तरी ह्या सहलीचे सहभाग शुल्क २६५००/- रुपये प्रत्येकी असून ह्या सहलीमध्ये सहभागी होण्यासाठी ३० जुलै २०२३ पर्यंत सहभाग शुल्क भरून नाव नोंदणी करता येईल. आपला सहभाग नोंदवण्यासाठी व अधिक माहितीसाठी ९६१९७५२१११ व ९६१९२४२८९७ ह्या नंबर्स वर संपर्क करता येईल.
हिरवाई.

05/06/2023

आज "पर्यावरण दिन" नुसत्याच परस्परांना शुभेच्छा देऊन साजरा करण्यापेक्षा प्रत्येकाने ठरवले की मी एक झाड आपल्या परिसरात लावेन आणि त्याची हयातभर जोपासना करेन.. त्याला जपेन तरी आजच्या ग्लोबल वौर्मिंगच्या जगात आपण येणाऱ्या संकटांवर मात करू शकू... माझे हे सांगणे प्रत्येकजण मनावर घेईल आणि एक झाड आपल्या परिसरात लावेल हि आशा बाळगतो... कारण इवलेसे रोप लावियेले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी हे सांगितलेलेच आहे... कदाचित आपल्या पिढीने हे केल्यास येणाऱ्या पुढच्या पिढ्याही आपल्यापासून प्रेरणा घेऊन पर्यावरण रक्षणाचा वसा घेतील व हि आपली पृथ्वी आपल्याला वाचवता येईल... हिरवाई जोपासता येईल... पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा...
हिरवाई परिवार...सौरभ महाडिक...

25/05/2023

Hirvais Ranthambhore Tour got Great Start Today we had our first safari in ranthambhores 4 number zone nd watched 2 tigers also 3 sloth bears...feeling happy...HIRVAI ALWAYS ROCKS...

Hirvai Nature Nd Wildlife Tourism s Ranthambhore Tiger Reserve India Tour Group DATED 24th May To 30th May 2023
25/05/2023

Hirvai Nature Nd Wildlife Tourism s Ranthambhore Tiger Reserve India Tour Group DATED 24th May To 30th May 2023

Traveling Towards Ranthambhore Tiger Reserve India With Hirvai Nature Nd Wildlife Tourism s 22 Tourists...Feeling Happy....
24/05/2023

Traveling Towards Ranthambhore Tiger Reserve India With Hirvai Nature Nd Wildlife Tourism s 22 Tourists...Feeling Happy...Air Vistara

काही दिवसांपूर्वी कुंभारगाव बर्ड सॅन्चुरी ला जाऊन आलो तिथे मी प्रकाशचित्रित केलेली हि काही प्रकाशचित्रे...सौरभ महाडिक...
20/05/2023

काही दिवसांपूर्वी कुंभारगाव बर्ड सॅन्चुरी ला जाऊन आलो तिथे मी प्रकाशचित्रित केलेली हि काही प्रकाशचित्रे...
सौरभ महाडिक...

30/04/2023

BACK TO HOME AFTER Hirvai Nature Nd Wildlife Tourism S SUCCESSFUL KUMBHARGAON BIRDING TOUR...HAD GREAT SIGHTING...ND GREAT PHTOGRAPHY with tourists...

"हिरवाई आयोजित कुंभारगाव पक्षीनिरीक्षण सहल २७ एप्रिल ते ३० एप्रिल २०२३. "साधारण ऑक्टोबर महिना उजाडला कि भारतात जागोजागी ...
30/03/2023

"हिरवाई आयोजित कुंभारगाव पक्षीनिरीक्षण सहल २७ एप्रिल ते ३० एप्रिल २०२३. "
साधारण ऑक्टोबर महिना उजाडला कि भारतात जागोजागी स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन होऊ लागते. त्यात "महाराष्ट्रातील भरतपूर" म्हणून ओळखले जाणारे "कुंभारगाव" प्रसिद्ध आहे. तिथे ऑक्टोबर ते जून अगदी पाऊस पडेपर्यंत पक्ष्यांचे आगमन होत असते. कुंभारगाव येथील उजनी जलाशयाच्या पात्रात आपल्याला "फ्लेमिंगो, व्हिसलिंग डक्स, पाणकावळे, सीगल्स" अशा हजारो पक्ष्यांना अनुभवता येते. त्यांचे प्रकाशचित्रण करता येते. त्यासाठी हिरवाई ह्या वन्यजीवन व निसर्ग या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संस्थेने "२७ एप्रिल ते ३० एप्रिल २०२३" रोजी ४ दिवसांची पक्षीनिरीक्षण सहल आयोजित केली आहे. ह्या सहलीमध्ये प्रसिद्ध छायाचित्रकार व वन्यजीव अभ्यासक सौरभ महाडिक माहिती देणार आहेत व पक्षी कसे ओळखायचे छायाचित्रण कसे करायचे ह्याचे मार्गदर्शन करणार आहेत.
ह्या सहलीमध्ये सहभागी होण्यासाठी ९६१९७५२१११ व ९६१९२४२८९७ वर संपर्क साधावा.
"कुंभारगाव पक्षी अभयारण्य सहल. २७ एप्रिल ते ३० एप्रिल २०२३. "
# २७ एप्रिल २०२३.
# सकाळी ६.३० वाजता बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे पीक अप.
# सकाळी ७ वाजता आरे कॉलोनी गेटवर पिकअप.
# सकाळी ७:३० ऐरोली कडे वळताना पूर्व चेकनाक्याकडे पिकअप.
# सकाळी ८:४५ बसमध्येच नाश्ता दिला जाईल.
# सकाळी ९:३० च्या दरम्यान एक्सप्रेस वे वर चहा साठी आणि फ्रेश होण्यासाठी बस अर्धा तास थांबेल.
# ११ च्या दरम्यान पुण्यातील चांदणी चौक येथे पुण्यातल्या लोकांसाठी पिकअप.
# दुपारी २ च्या दरम्यान बारामती जवळील कुंभारगाव येथे पोहोचू.
# फ्रेश होऊन दुपारचे जेवण व थोडी विश्रांती.
# ४ वाजता उजनी धरणाच्या बॅक वॉटर मध्ये बोटींमधून पक्षी निरीक्षणासाठी प्रयाण. (प्रत्येक बोटीत ५ ते ६ जणांचा ग्रुप व एक गाईड असेल.) संध्याकाळी सूर्यास्तापर्यंत हि सफारी असेल.
# सफारीनंतर परत येऊन चहा घेऊन "बारामती" येथे हॉटेल वर राहण्यासाठी प्रयाण.
# "हॉटेल अमरदीप बारामती" ह्या हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था. (एका रूममध्ये ३ जणांना राहता येईल. (२ प्रॉपर बेड आणि एक जमिनीवर प्रॉपर बेडींग टाकून देण्यात येईल.)
# रात्री ८:४५ जेवण.
# २८ एप्रिल २०२३.
# सकाळी ४.३० पर्यंत उठून सकाळी ५.१५ पर्यंत तयार होणे.
# सकाळी ५.२० वाजता अमरदीप हॉटेलमधून कुंभारगाव येथे सकाळच्या सफारीसाठी प्रयाण.
# सकाळी ६.०० वाजता चहा व नाश्ता घेऊन सकाळच्या पहिल्या सफारीसाठी उजनी बॅकवॉटर मध्ये बोटींमधून प्रयाण. ६.३० ते १०.३० सकाळची सफारी.
# दुपारी १:३० वाजता दुपारचे जेवण अमरदीप हॉटेल येथे.
# दुपारी ३ वाजेपर्यंत विश्रांती व ३.१५ वाजता कुंभारगाव येथे पक्षिनिरीक्षणासाठी संध्याकाळच्या सफारीसाठी प्रयाण.
# संध्याकाळी ४ वाजता पक्षी निरीक्षणासाठी उजनी बॅकवॉटर मध्ये बोटींमधून पक्षी निरीक्षणासाठी प्रयाण. संध्याकाळी सूर्यास्तापर्यंत हि सफारी असेल.
# संध्याकाळी सफारीनंतर चहा व कॉफी घेऊन अमरदीप हॉटेल येथे निवासासाठी प्रयाण.
# रात्री ८:४५ वाजता रात्रीचे जेवण.
# २९ एप्रिल २०२३.
# सकाळी ४.३०पर्यंत उठून सकाळी ५.१५ पर्यंत तयार होणे.
# सकाळी ५.२० वाजता अमरदीप हॉटेलमधून कुंभारगाव येथे सकाळच्या सफारीसाठी प्रयाण.
# सकाळी ६.०० वाजता चहा व नाश्ता घेऊन सकाळच्या पहिल्या सफारीसाठी उजनी बॅकवॉटर मध्ये बोटींमधून प्रयाण. ६.३० ते १०.३० सकाळची सफारी.
# दुपारी १:३० वाजता दुपारचे जेवण अमरदीप हॉटेल येथे.
# दुपारी ३ वाजेपर्यंत विश्रांती.
# संध्याकाळी ४ वाजता पक्षी निरीक्षणासाठी उजनी बॅकवॉटर मध्ये बोटींमधून पक्षी निरीक्षणासाठी प्रयाण. संध्याकाळी सूर्यास्तापर्यंत हि सफारी असेल.
रात्री ८:४५ वाजता रात्रीचे जेवण.
# ३० एप्रिल २०२३.
# सकाळी ४.३० पर्यंत उठून सकाळी ५.१५ पर्यंत तयार होणे.
# सकाळी ५.२० वाजता अमरदीप हॉटेलमधून कुंभारगाव येथे सकाळच्या सफारीसाठी प्रयाण.
# सकाळी ६.०० वाजता चहा व नाश्ता घेऊन सकाळच्या पहिल्या सफारीसाठी उजनी बॅकवॉटर मध्ये बोटींमधून प्रयाण. ६.०० ते ९.४५ सकाळची सफारी.
# सकाळी १० वाजता पुन्हा मुंबईकडे परतीचा प्रवास सुरु.
# दुपारी २ वाजता वाटेत जेवणासाठी थांबण्यात येईल.
# सहलीसाठी साठी पर्यटकांनी बरोबर घेण्याच्या वस्तू. (डोक्यावर घालण्यासाठी टोपी, पक्षिनिरीक्षणासाठी व छायाचित्रणासाठी दुर्बीण व कॅमेरा, पाण्याची बाटली, स्कार्फ डोक्यावर लपेटून घेण्यासाठी, वैयक्तिक औषधे, ग्लुकोज वॉटर, लिमलेटच्या गोळ्या)
# ह्या कुंभारगाव पक्षीनिरीक्षण सहलीत ६ सफारी व एक पक्ष्यांवरील स्लाईड शो तसेच प्रवास खर्च, रोजचा चहा नाश्ता, सफारी दरम्यानचे ड्राय स्नॅक्स, सकाळ संध्याकाळचे जेवण व हॉटेलवरील राहणे ह्यांचा खर्च समाविष्ट करण्यात आला आहे.
# ह्या सहलीचे शुल्क २५५००/- रुपये आहे.
# अमरदीप हॉटेल येथे एका खोलीत ३ जणांना खोली विभागून देण्यात येईल. (२ प्रॉपर बेड आणि एक जमिनीवर प्रॉपर बेडींग मॅट्रेसेस टाकून देण्यात येईल.)
# २ जणांनाच खोली हवी असल्यास २५००/- रुपये पर पर्सन एक्सट्रा चार्ज करण्यात येईल.
हिरवाई. ०९६१९७५२१११/ ०९६१९२४२८९७.
Things To Carry :-
Water Bottle, Cap, Shoes, Small Sack / Bag (No Plastic Please), Binoculars, Torch, Personal Medicines, Summer Wear / Shawls, Dull / Camouflaged Clothes for Birding Rounds, Biscuits and Dry Snacks.
Please Notes :-
* Special Room for two person charges Rs.2500/- extra.
* Cancellation within 1 month 20% Amount Get Back.
* Cancellation within 2 month 10% Amount Get Back.
* Cancellation within Last 1 month 0% Amount Get Back.
* Drinks are not allowed in tour.
* Tour cost- 25500/- per person.( we take full payment at the booking time.)

नुकताच १२ मार्च ते १८ मार्च २०२३ दरम्यान भारतातल्या झालाना ह्या एकमेव लेपर्ड रिझर्व्ह ला जाऊन आलो... गेल्या २७ वर्षांमध्...
27/03/2023

नुकताच १२ मार्च ते १८ मार्च २०२३ दरम्यान भारतातल्या झालाना ह्या एकमेव लेपर्ड रिझर्व्ह ला जाऊन आलो... गेल्या २७ वर्षांमध्ये वन्यजीव अभ्यासक किंवा वन्यजीव प्रकाशचित्रकार म्हणून काम करत असताना भारतातल्या तसेच भारताबाहेरीलही अनेक राष्ट्रीय उद्यानांना भेटी दिल्या. शिवाय मुंबईमध्ये बोरिवली येथे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हाकेच्या अंतरावर राहत असल्यामुळे अगदी वयाच्या ३ ऱ्या वर्षांपासून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये फिरत आलो... तिथे असणाऱ्या लेपर्ड रेस्क्यू टीम मूळे तिथल्या बिबट्यानां जवळून अनुभवता आले, पाहता आले... परंतु तरीही अनेक वर्षे बिबट्यांचे आयुष्य, त्यांचे जंगलांमध्ये वावरणे, शिकार करणे, त्यांचे प्रणयाराधन हे सर्व तेवढ्या जवळून अनुभवता आले नव्हते कारण संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट्यांचा वावर हा खूपच मोजका आणि मानवाच्या समजण्यापलीकडचा होता. तो बराचसा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाभोवती राहणाऱ्या श्रीकृष्ण नगर किंवा अभिनव नगर ह्या कॉलोनीज पुरता आणि तिथल्या लोकांपुरता किंवा बिबट्यांकडून होणाऱ्या कुत्र्यांच्या शिकारीपुरता मर्यादित होता. परंतु २०१३ साली भारतातले पहिले अधिकृत लेपर्ड रिझर्व्ह जयपूर येथील झालाना डुंगरी येथे घोषित करण्यात आले आणि भारतातले पहिले हक्काचे असे बिबट्यांसाठीचे खास त्यांचे असे घर किंवा राष्ट्रीय उद्यान त्यांना मिळाले. मी जवळपास तिथे २०१७ पासून जातोय. आधी स्वतःसाठी फिरण्यासाठी ३ ४ सफारीसाठी तिथे जायचो, परंतु नंतरच्या काळामध्ये तिथे हिरवाई ह्या माझ्या वाईल्ड लाईफ टुरिझम कंपनी च्या माध्यमातून सहली घेऊन जाऊ लागलो. तिथले जंगल हे माझ्यासाठी आणखीनच ओळखीचे होऊ लागले. तिथल्या जंगलांमधले बिबटे आणि त्यांचा अधिवास, त्यांच्या सवयी ह्या माझ्या ओळखीच्या होऊ लागल्या. आणि गेल्या वर्षांपासून मी ठरवले कि ह्या झालानामधल्या बिबट्यांवर पूर्णपणे काम करायचे, त्यांचे प्रकाशचित्रण करायचे, त्यांच्या वेगवेगळ्या सवयींचा अभ्यास करायचा आणि मग तिथे मी जास्तीत जास्त सफारी करू लागलो. नुकताच तिथे जाऊन आलो. ह्या माझ्या ८ सफारीच्या सहलीमध्ये मी साधारण ९ वेगवगेळे बिबटे नर माद्या पहिल्या त्यांचे प्रकाशचित्रण केले. त्यातलीच हि काही प्रकाशचित्रे तुम्हा सर्वांसाठी...
सौरभ महाडिक...
वन्यजीव अभ्यासक व प्रकाशचित्रकार.

VAN HAIN TO JIVAN HAIN...JAGTIK VAN DINACHYA SHUBHECHHAA...
21/03/2023

VAN HAIN TO JIVAN HAIN...JAGTIK VAN DINACHYA SHUBHECHHAA...

HIRVAI NATURE ND WILDLIFE TOURISMS 12TH TO 18TH MARCH JHALANA TOUR HAPPY TOURISTS GROUP AFTER WATCHING 9 LEOPARDS BACK T...
17/03/2023

HIRVAI NATURE ND WILDLIFE TOURISMS 12TH TO 18TH MARCH JHALANA TOUR HAPPY TOURISTS GROUP AFTER WATCHING 9 LEOPARDS BACK TO BACK IN 8 SAFARIS...

Traveling Towards Ranthambhore Tiger Reserve by Air Asia... With 40 Tourists Of HIRVAI NATURE ND WILDELIFE TOURISM...FEE...
21/02/2023

Traveling Towards Ranthambhore Tiger Reserve by Air Asia... With 40 Tourists Of HIRVAI NATURE ND WILDELIFE TOURISM...FEELING SOMUCH HAPPY...

Address

Borivli
Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hirvai Nature Nd Wildlife Tourism posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Hirvai Nature Nd Wildlife Tourism:

Videos

Share

Category


Other Travel Agencies in Mumbai

Show All