18/06/2021
आज जागतिक मगर दिवस आहे. मगर हा प्राणी कितीही ओंगळवाणा आणि क्रूर वाटला तरी तो जल-परिसंस्थेचा महत्वाचा घटक आहे. मगर मुख्यतः अशा माशांवर उपजीविका करते जे दुर्बल, आजारी असतात (कारण ते पटकन सापडतात) किंवा कॅटफिशसारखे परभक्षी मासे जे अन्य माशांचा फडशा पाडतात. तसेच मगरीची पिल्ले लहान असताना कावळे, घारी, बगळे, घोरपडी यांचे भक्ष्य बनतात. त्यामुळे मगरी नैसर्गिक जलस्रोतातील अन्नसाखळीचा महत्वाचा भाग आहेत. तसेच यामुळे नदीतील उत्तम प्रतीच्या माशांची चांगली पैदास होत असल्याने अप्रत्यक्षपणे मच्छीमार लोकांचाही फायदा होतो. भारतात प्रामुख्याने ३ प्रकारच्या मगरी आढळतात...
१) गोड्या पाण्यातील मगर
२) खाऱ्या पाण्यातील/नदीमुखाजवळील मगर
३) घडियाल
माणसे आणि त्यांची गुरेढोरे यांच्यावर मगरींचे हल्ले अधूनमधून होत असले तरी माणूस हे मगरीचे मुख्य अन्न नाही, भारतात तर नाहीच नाही. त्यामुळे मगरींना नदीतून हाकलून देणे किंवा मारून टाकणे हा माणूस-मगर संघर्षावरील उपाय नक्कीच नव्हे. आपण त्यांच्याशी संघर्ष टाळून सहजीवन जगायला शिकलं पाहिजे. 🐊💚
फोटो सौजन्य: फ्रेंड्स ऑफ वाईल्डलाईफ
Today is the 'World crocodile day'. No matter how much ugly and cruel it looks, crocodile is an important part of aquatic ecosystem. It mainly feeds on weak and diseased fish (because they are vulnerable). Baby crocs are devoured by crows, herons, kites and monitor lizards. Thus, crocodile is an important part of aquatic food chain. Humans, especially fishermen also get indirectly benefited by crocodile since it helps to maintain a healthy fish population in water bodies. Indian hosts 3 species of crocodiles namely.....
1) Marsh crocodile or Mugger (Crocodylus palustris)
2) Euschurine or salt water crocodile (Crocodylus porosus)
3) Gharial (Gavialis gangeticus)
Although crocodiles occasionally attack humans and livestock, humans are not their main prey. Most of the attacks are accidental. Therefore, culling out and killing the crocodiles can not be a solution to human-crocodile conflict. We have to learn to avoid conflict and coexist with them. 🐊💚
Photo courtesy: Friends of wildlife