09/12/2019
मानव अधिकार संवर्धन संघटन
आदिवासी शेतकरी ते ग्राहक थेट खरेदीसाठी "आपला बाजार"
प्रिय ,
हितचिंतक मित्र मैत्रिणींनो
आम्ही काम करत असलेल्या कायरे,सावरना, कुंभाळे, बोरीची बारी, मोहाचा पाडा, ता.पेठ जि नाशिक या आदिवासी गावांमध्ये उत्पादित झालेले रासायनिक खते-फवारण्या न करता गांडूळखत, गांडुळपाणी( व्हर्मी वॉश) दशपर्णी अर्क, जीवामृत, यांचा उपयोग करून आदिवासी शेतकऱ्यांनी नैसर्गिक रित्या पिकवलेले धान्य भाज्या ,रानमेवा घेऊन आम्ही आपल्या पर्यंत पोहचू इच्छित आहोत. यासाठी दि. २२ डिसेंबर २०१९ पासुन सुरू करत आहोत आपला बाजार हा उपक्रम.
शहरी मंडळींना चांगले खात्रीशीर कसदार अन्न व ते पिकवणाऱ्या गरीब आदिवासी शेतकऱ्यांना त्याचा योग्य भाव मिळावा त्याची बाजारात होणारी फसवणूक टाळावी, शहरी ग्राहक ते आदिवासी शेतकरी यांचे नाते दृढ व्हावे याच उद्देशाने आपला बाजार दर महिन्यात दुसरा व चवथा रविवार भरणार आहे.
आम्ही खालील वस्तू घेऊन येतोय.....
भाजीपाला
गावठी मिरची
गावठी टोमॅटो
रान भेंडी
कारले गावठी
तोंडले
मुळा
वऱ्याचे कंद
माठाची भाजी
धान्य
तांदूळ (पॉलिश आणि एकसडीचा)
सुगंधी वाण- इंद्रायणी, भोगावती
साधे वाण- दप्तरी, कोळपी
नागली
भगर
कुळीद
उडीद
तूरडाळ
खुरासनी
गावठी अंडी
प्रोसेस पदार्थ
निर्गुडी तेल
जास्वंद माका तेल
शेती व बाग बगीचासाठी उपयुक्त
गांडूळखत
दशपर्णी अर्क
जीवामृत
बांबूच्या वस्तू
शिबं (भाकरी पोळ्या फळं ठेवायची टोपली)
सूप
आपला बाजार भरण्याचे ठिकाण
डॉ मिलिंद वाघ यांच्या घराच्या आवारात,
१५ , हेमंत, स्वामी समर्थ मंदिरा समोर , श्रमिक सोसायटी नं१, शहीद सर्कल ते आकाशवाणी टॉवर रस्ता गंगापुर रोड, नाशिक.
दिनांक २२.१२.२०१९
वेळ सकाळी ११ ते ४
कृपया आपण आवश्य यावे व या उपक्रमास सहकार्य करावे ही विनंती.
अधिक माहिती व सहभागा साठी संपर्क
श्यामला चव्हाण डॉ मिलिंद वाघ, शांताराम चव्हाण, पुंडलिक सातपुते,श्याम सातपुते
9822612091 / 9422668394
टीप: धान्य फूड ग्रेड प्लास्टिक मध्ये पॅकींग मिळतील भाजीपाल्यासाठी कृपया पिशव्या घेऊन याव्या.