13/10/2023
विरगळी कश्या वाचायच्या.?
विरगळी कश्या वाचायच्या ह्या बाबत अनेक भागात वेगवेगळे प्रकार आहेत. पण साधारणतः विरगळी खालून वर वाचल्या जातात. युद्धात विरगती प्राप्त झालेल्या विरांच्या स्मरणार्थ विरगळी उभारल्या जातात. त्यातील सर्वात खालच्या भागात त्या व्यक्तीच्या जीवनाचा आढावा सापडतो. दुसऱ्या भागात साधारणतः युद्धाचा प्रसंग असतो. तिसऱ्या भागात त्या व्यकीला विरगती प्राप्त झाल्याचा उल्लेख असतो आणि सर्वात वरील भागात त्या व्यक्तीची आठवण ठेवली जाते.
उदा. वरील चित्रातील विरगळी ह्या पशुधन संरक्षणासाठी युद्धात विरगती प्राप्त झालेल्या सैनिकांच्या आहेत. ह्या विरगळीच्या सर्वात खालच्या भागात पशुधन दिसेल. अर्थात त्या व्यक्तीच्या जीवनाचा पशुधनाशी संबंध असावा. दुसऱ्या भागात युद्धाचा प्रसंग आहे. तिसऱ्या भागात शिवलिंग दिसेल ह्यावरून ती व्यक्ती कैलासवासी झाल्याचा उल्लेख सापडतो. काहींच्या मते, तिसऱ्या भागाचा अर्थ व्यक्ती कोणत्या आराध्याची उपासक होती असा आहे कारण अनेक ठिकाणी तिसऱ्या भागात विष्णू, गणपती तसेच दुर्गेचे चित्र आढळते. सर्वात वरच्या भागात अमृतकलश आहे त्याच्या एका बाजूला सूर्य तर दुसऱ्या बाजूला चंद्र दिसेल ह्याचा अर्थ जोपर्यंत सूर्य चंद्र आहे तोपर्यंत हीं व्यक्ती स्मरणात राहील.
वरील विरगळी आजोबा पर्वतावरील वाल्मिकी ऋषींच्या आश्रमा समोर आहेत...
ह्याव्यतिरिक्त अधिक माहिती असल्यास किंवा दिलेल्या माहिती मध्ये त्रुटी असल्यास कमेंट्स मध्ये व्यक्त व्हा... 🙏
© सुमित शिर्के
P. C. : Nikhil Kapane आणि Aditya Thorat