Indigo Roots

Indigo Roots Mesmerized by the beauty of India's rich heritage, Indigo Roots is dedicated to explore our glorious Organise Heritage site tours.
(4)

Organise Web events related to Indian History, Indology, Art, and Culture

🪻*INDIGO ROOTS* 🪻 प्रस्तुत एक वेगळी व्याख्यानमाला :                                                   🌿🪷*महाभारतामधली अन...
14/04/2024

🪻*INDIGO ROOTS* 🪻 प्रस्तुत एक वेगळी व्याख्यानमाला : 🌿🪷*महाभारतामधली अनवट उपाख्यानं*🪷🌿
महाभारत म्हटलं की सर्वप्रथम डोळ्यांसमोर उभं राहतं ते पांडव आणि धार्तराष्ट्रांमध्ये झालेलं भीषण रणकंदन. मात्र एका महायुद्धावर आधारलेलं हे महाकाव्य केवळ वीर, भयानक, रौद्र आणि करुण या रसांच्या चौकटीमध्ये सीमित न राहता, सर्वरस-रंगांचं आगार ठरलं, त्याला कारण म्हणजे त्यामधील विविध आख्यानं आणि उपाख्यानं.. भारतीय कला आणि संस्कृतिविश्वामधली अनेक दालनं या महाभारतातल्या आख्यान-उपाख्यानांनी समृद्ध केली. चला तर मग *इंडिगो रुट्स*🪻च्या आगामी व्याख्यानमालेतून जाणून घेवूयात महाभारतातील अशीच काही 🌸💮अपरिचित पौराणिक उपाख्यानं, *संस्कृत , प्राकृत व मिथक शास्त्राचे तज्ञ आणि भारत विद्या अभ्यासक श्री. प्रणव गोखले यांजकडून*💮🌸
*तारखा* -24 एप्रिल ते 1 मे (8 दिवसांची आख्यानमाला)
*वेळ* सायंकाळी -8.30pm
*शुल्क* रु.1200/- प्रती व्यक्ती
*माध्यम* - मराठी
*Recordings available for participants only*
*To Register*:🔗 https://forms.gle/HnVoX51ihoibx3PWA. *अधिक माहितीसाठी संपर्क*: 9359589292/9226862079

12/04/2024

Vishnu Murti in AngkorVat Temple, Cambodia

👣*इंडिगो रुटस्* तर्फे आयोजित ऑनलाइन व्याख्यान *कानडी मुलखातील सिद्दीच्या शोधात...!!*👣🌺🌿कधीकाळी गुलाम म्हणून अफ्रिकेतून भ...
11/04/2024

👣*इंडिगो रुटस्* तर्फे आयोजित ऑनलाइन व्याख्यान
*कानडी मुलखातील सिद्दीच्या शोधात...!!*👣

🌺🌿कधीकाळी गुलाम म्हणून अफ्रिकेतून भारतात आणलेले लोक सिद्दी म्हणून ओळखले गेले. बहुतांश सिद्दी गुलामांना समुद्रामार्गे किनारी भागात आणण्यात आलं. या जमातीने मध्ययुगीन इतिहासावर कायमचा ठसा उमटवलेला आहे. भयानक छळ आणि अत्याचारामुळं कर्नाटकातील कारवार, धारवाड आणि बेळगाव परिसरातल्या जंगलात त्यांनी आश्रय घेतला. या जंगलांमध्ये टिकून राहिलेल्या सिद्दी वाड्या वस्त्यांना भेटी देऊन त्यांच्यांशी संवाद साधला. या अनोख्या भटकंतीची कथा ऐकूया *श्री.प्रणव पाटील (लेखक आणि लोकसंस्कृती अभ्यासक)*यांजकडून 🌿🌺
*आज गुरुवार दिनांक ११ एप्रिल सायं - 8.30वाजता*
*प्रवेश विनामूल्य*. *नोंदणीसाठी लिंक" https://forms.gle/5S6mpGq6PaZeM6qf9
*अधिक माहितीसाठी संपर्क* -*9359589292/ 9226862070*

31/03/2024
*इंडिगो रूटस्*तर्फे आयोजित*नेपाळ टूर*. हिमालयाच्या कुशीत निवांत पहुडलेला देश म्हणजे नेपाळ. भारताचा सख्खा शेजारी. अनेक वर...
23/03/2024

*इंडिगो रूटस्*तर्फे आयोजित*नेपाळ टूर*. हिमालयाच्या कुशीत निवांत पहुडलेला देश म्हणजे नेपाळ. भारताचा सख्खा शेजारी. अनेक वर्षे जगातले एकमेव हिंदू राष्ट्र असल्याचे गर्वाने सांगणारा नेपाळ निसर्ग आणि वारसास्थळांनी समृद्ध आहे. हिंदू आणि बौद्ध धर्मीयांची विविध वारसास्थळे इथे वसली आहेत. सीतामातेचे माहेर, भगवान गौतमबुद्धांची जन्मभूमी, गुप्त सम्राट समुद्रगुप्ताचे आजोळ असलेला नेपाळ मनसोक्त हिंडण्यासारखा आहे. हिमाच्छादित शिखरांचे सतत सान्निध्य असलेला हा प्रदेश आकर्षक तर आहेच, पण त्याशिवाय इथे असलेले लाकडी काम, थंका पेंटींग्ज पाहण्यासारखी असतात. काष्ठमंडप म्हणजेच काठमांडू, तिथला दरबार चौक, तिथले लाकडी कलाकुसर केलेले राजवाडे, कुमारी देवीचे निवासस्थान, पशुपतीनाथ मंदिर, भव्य विष्णुमूर्ती, स्वयंभूनाथ सारखे भव्य स्तूप, भक्तपूर इथली प्राचीन मंदिरे आणि निसर्गरम्य पोखरा, तिथून दिसणारा अन्नपूर्णा शिखराचा अप्रतिम नजारा हे सगळे प्रत्यक्ष जाऊन अनुभवण्यासारखे आहे. याशिवायही नेपाळमध्ये बरेच काही आहे. ते प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन याची देही याची डोळा बघणे हे तितकेच रमणीय असते. चला तर निसर्गाने नटलेल्या भारताच्या या सख्ख्या शेजाऱ्याला भेट देऊया *लेखक आणि भारतीय विद्या अभ्यासक* *श्री. आशुतोष बापट* यांच्या बरोबर ...!!
*27th May to 3rd June' 24*
अधिक माहितीसाठी संपर्क: *+919359589292/ 92268 62079*

🪷*सरस्वती*🪷*“गंगेच यमुनेचैव गोदावरी सरस्वती”*लहानपणापासून ऐकलेल्या या स्तोत्रामुळे आपल्याला सरस्वती नदीची अंधुक ओळख पटले...
10/03/2024

🪷*सरस्वती*🪷
*“गंगेच यमुनेचैव गोदावरी सरस्वती”*
लहानपणापासून ऐकलेल्या या स्तोत्रामुळे आपल्याला सरस्वती नदीची अंधुक ओळख पटलेली असते. गंगा , यमुना आणि सरस्वती यांचा प्रयाग ला त्रिवेणी संगम आहे, तिथे ही सरस्वती गुप्त रूपाने वाहते अशी कथा पण कधीतरी कानावर पडलेली असते.
अशा या सरस्वतीचा साहित्यिक , भौगोलिक इतिहास , सरस्वतीच्या अजूनही दिसणाऱ्या पाऊलखुणा यांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न.🍀 पुराप्रवाह ,सर्व्हे ,शास्त्रीय संशोधने यांच्या आधारे नदीचा प्रवाह आणि काल याविषयीचे तज्ज्ञांचे मत आणि इतर मतप्रवाह यांचा मागोवा घेणार आहोत 🌊 *इंडिगो रुटस्* तर्फे आयोजित*सरस्वती*🌊 या *ऑनलाईन* व्याख्यानात
🍀 *गुरुवार दिनांक -14 March'24. सायं.-8.30pm*
*व्याख्यात्या - मनीषा चितळे*
*प्रवेश - विनामूल्य*
🌷*नोंदणीसाठी संपर्क -+91 9359589292/ 92268 62079* 🌷
Please message your name on What's App
Or *Register on Link given below* -
https://forms.gle/8Vrp33VnYoGgCZUN9

*वसंतपंचमी - मदनोत्सव*🌺धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थांच्या आधार स्तंभांवर मानवी आयुष्याचा प्रासाद उभा राहतो...
12/02/2024

*वसंतपंचमी - मदनोत्सव*🌺
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थांच्या आधार स्तंभांवर मानवी आयुष्याचा प्रासाद उभा राहतो. यांतील काम हा पुरुषार्थ सर्वांत जास्ती हवाहवासा वाटत असला तरीही चुकीच्या संकल्पना वा तथाकथित नैतिकता यांच्यामुळे एकतर त्यावर उघड बोललं जात नाही किंवा जे बोललं जात ते असभ्य वा हिडीस स्वरुपाचं असतं. भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून या विषयावर खूप बोललं आणि लिहिलं गेलं आहे. केवळ बौद्धिकतेच्या चौकटीतून नव्हे तर जनसामान्यांच्या व्यवहारांतूनही हा 'काम' साजरा होत आला आहे. चला तर मग, जाणून घेवूयात आगामी Valentine's Day च्या पार्श्वभूमीवर, प्राचीनकाळापासून भारतामध्ये प्रचलित असणार्‍या 🌈वसंतपंचमी - अर्थात् मदनोत्सवा बद्दल.💮🌸🪷
*Indigo Roots* च्या उपक्रमातून....
दिनांक -१४ फेब्रुवारी सायंकाळी -८.३० मि
*वक्ते - श्री. प्रणव गोखले*
*On Zoom Platform*
Entry -Free
*Link to Register* https://forms.gle/WFkFhLCduNqjKhMi9
Or
*Register on 9359589292/ 92268 62079*

Avlokiteshwara Bodhisattva on Siem Reap Airport !!
11/02/2024

Avlokiteshwara Bodhisattva on Siem Reap Airport !!

An Evening in Phnom Penh.. Riverside
01/02/2024

An Evening in Phnom Penh.. Riverside

पुन्हा एकदा *शिल्पकथा@ राई म्हणजे  एक संपन्न वारसा आणि निसर्गानुभव..!!*  कोकणातील रम्य अशा संगमेश्वर परिसरात *श्री. आशुत...
16/10/2023

पुन्हा एकदा *शिल्पकथा@ राई म्हणजे एक संपन्न वारसा आणि निसर्गानुभव..!!* कोकणातील रम्य अशा संगमेश्वर परिसरात *श्री. आशुतोष बापट* आणि *इंडिगो रूटस्* सोबत ही कोजागिरी साजरी करूयात..
प्राचीन मंदिरे,
भवानी गड किल्ला
गरम पाण्याचे कुंड
कातळशिल्पे
दोन सुंदर संग्रहालये असा अनोखा संगम .. आणि स्वादिष्ट अस्सल कोकणी पदार्थ!!
शिवाय मोकळ्या आकाशाखाली कोजागिरी साजरी करायची ती मसाला दूध आणि भरपूर गप्पासोबत...!!! *अधिक माहितीसाठी संपर्क*: *सुषमा 9359589292/ अमोल 9822118855*

*इंडिगो रूटस् तर्फे एक दिवसीय वाई, किकली, धावडशी वारसा सहल* *डॉ. मंजिरी भालेराव* यांच्या बरोबर..*किकली* -यादव काळात बांध...
23/09/2023

*इंडिगो रूटस् तर्फे एक दिवसीय वाई, किकली, धावडशी वारसा सहल* *डॉ. मंजिरी भालेराव* यांच्या बरोबर..

*किकली* -यादव काळात बांधल्या गेलेल्या काही
मंदिरांपैकी एक आहे साताऱ्याजवळचे किकलीचे
मंदिर. या मंदिराच्या बाकीच्या वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे मंदिराच्या परिसरातील अनेक वीरगळ.
*धावडशी*- साताऱ्याजवळच छत्रपती शाहू महाराज आणि पेशव्यांचे गुरू ब्रह्मेंद्रस्वामी यांचे समाधी मंदिर असलेले हे ठिकाण म्हणजे मराठा स्थापत्य शैलीचा उत्तम नमुना आहे
*वाईचा ढुण्डीविनायक आणि पांडे*- वाईचे सर्वात प्राचीन गणपती मंदिर आणि येथल्या गाणपत्य संप्रदायाचे महत्त्व दर्शविणारे वीरगळ.

*तारीख:२ऑक्टोबर '२३*
*शुल्क: २१००/- ( सर्व खर्च समावेश)*
अधिक माहितीसाठी संपर्क *सुषमा*@ *इंडिगो रुटस्*- 9359589292/8308843438
*Link for Registration*:https://forms.gle/WZ3jzjRHMRvdke4n9

सातारा जिल्ह्यातील आणि पुण्यापासून जवळच असणारे पाटेश्वर अल्पपरीचीत शिवस्थान आहे . इथल्या लेण्यांमध्ये विविध प्रकारची आणि...
04/08/2023

सातारा जिल्ह्यातील आणि पुण्यापासून जवळच असणारे पाटेश्वर अल्पपरीचीत शिवस्थान आहे . इथल्या लेण्यांमध्ये विविध प्रकारची आणि अभावानेच दिसणारी अनेक शिवलिंगे तर पाहायला मिळतातच पण काही दुर्मिळ मूर्ती ही पाहायला मिळतात. ह्या सर्वाचा कार्यकारण भाव आणि कित्येक कोडी उलगडवून देणार आहेत *श्री. प्रणव गोखले*.
ह्या शिवस्थानाचा लेण्यांपासून मंदिरापर्यंतचा प्रवास जाणून घेण्यासाठी चला इंडिगो रुटस् बरोबर ..
एकदिवसीय पाटेश्र्वर वारसा सहल
श्री .प्रणव गोखले यांच्या बरोबर
दिनांक - रविवार २७ ऑगस्ट'२३
शुल्क - ₹२१००/- (सर्व खर्च समाविष्ट)
अधिक माहितीसाठी संपर्क /व्हॉटस् ॲप:
सौ. सुषमा रामनकुट्टी- ९३५९५८९२९२
नोंदणीसाठी लिंक 🖇️ -https://forms.gle/FW26Jps1AXn8zNn58

*महाराष्ट्रातील लोकसंप्रदाय*महाराष्ट्राचे आणि पर्यायाने भारताचे सांस्कृतिक ऐश्वर्य वारशाच्या रूपांत जतन केले ते या भूमीत...
02/06/2023

*महाराष्ट्रातील लोकसंप्रदाय*
महाराष्ट्राचे आणि पर्यायाने भारताचे सांस्कृतिक ऐश्वर्य वारशाच्या रूपांत जतन केले ते या भूमीतील लोकसंप्रदायांनी! आराध्य दैवत असो वा तत्त्वज्ञान, आचार-विचारांच्या पद्धती असोत वा तीर्थक्षेत्रे अशा सर्वच बाबतीत असणारं वैविध्य, वैपुल्य यांनी समृद्ध लोकसंप्रदाय हे कायमच सश्रद्ध आणि चिकित्सक अशा दोन्ही प्रकारच्या दृष्टींना खुणावत आलेले आहेत.
चला तर मग *इंडिगो रुट्स* च्या आगामी व्याख्यानमालेतून जाणून घेऊयात नाथ,गाणपत्य, रामदासी, वारकरी, दत्त, महानुभव असे *महाराष्ट्रातील लोकसंप्रदाय!*
*ऑनलाइन व्याख्यानमाला*
*व्याख्याते:श्री. प्रणव गोखले*
*दिनांक -१२ जून ते २२ जून'२३* (१० दिवस)
*वेळ- सायं.८.३० ते ९.३०*
*शुल्क*- *रू.१५००*/-
*नोंदणीसाठी लिंक*- https://forms.gle/pL68eaU3C3c3j64L6

अधिक माहितीसाठी संपर्क - सौ. सुषमा चोपडा +919359589292

*Indigo Roots* invites you for a Heritage Walk of -*Gothic Pune*A walk exploring the Gothic Monuments of the city.You’ve...
01/05/2023

*Indigo Roots* invites you for a Heritage Walk of -
*Gothic Pune*

A walk exploring the Gothic Monuments of the city.

You’ve heard about Maratha and Peshwa architecture in Pune,
but do you know about the city’s Gothic architecture?
Would you like to know more about its history?

Join us on this walk that will take you to structures in Pune that have been influenced by Gothic architecture and the stories surrounding them.

*Walk Leader- Ashwin Chitale*
Day,Date & Time *Sunday 7th May @7.30am*

*Charges -300/Per person*

To, *Register:https://forms.gle/s2rq5AY12bpy6B1R7*

*For more details* - Contact *Mrs. Sushama Chopda*: +919359589292

On the occasion of celebrating the  World Heritage Day,we also held a talk  on Britishers Contribution in rebuilding the...
27/04/2023

On the occasion of celebrating the World Heritage Day,we also held a talk on Britishers Contribution in rebuilding the Indian History.

Speaker was Mrs. Vibhavari Thakar.Today, though it is always a topic of debate or controversy,we just can't ignore how they introduced us to scientific study of our own history and some of their sincere efforts to explore it and introduce to the world..Be it rediscovering of Bramhi, ASI, Asiactic Society... Many Many more to list here...

Vibhavari nailed it well and made the talk very interesting and informative. Coming back soon..stay tuned :)

Sushama Ramankutty #पुणेकर Vibhawari Thakar

Last but not the least and the best ... Heritage Walk of Prachin Pune ( प्राचीन पुणे)with Dr. Manjiri Bhalerao. प्राचीन ...
23/04/2023

Last but not the least and the best ... Heritage Walk of Prachin Pune ( प्राचीन पुणे)with Dr. Manjiri Bhalerao. प्राचीन पुण्याच्या विविध काळातील पाऊलखुणाचा खूप छान मागोवा ..
Thank you All participants for your enthusiastic participation and your love for heritage.You made this possible.

Those who could not join us .. We are coming up with many more such activities.

आजचा लहान मुलांसाठींचा शनिवार वाडा वॉक..एक्स्पर्ट - अनघा साने..  मुलांना छान रंगवून सांगितल्या शनिवार वाड्याच्या गोष्टी....
23/04/2023

आजचा लहान मुलांसाठींचा शनिवार वाडा वॉक..
एक्स्पर्ट - अनघा साने.. मुलांना छान रंगवून सांगितल्या शनिवार वाड्याच्या गोष्टी.मुलांनी लक्ष देवून महिती ऐकली .. प्रश्न विचारले आणि परत भेटायाची इच्छा व्यक्त केली .. हे असाच तर वारसा पुढे चालवायचा आहे सुपूर्द करायचा आहे.
Thank you Parents for encouraging your children and attending this walk .


#पुणेकर

Day4- Today's Heritage Walk at Parvati Hills with Supradsad Puranik.Temples, Samadhi of Shrimant Nana saheb Peshwe, Muse...
22/04/2023

Day4- Today's Heritage Walk at Parvati Hills with Supradsad Puranik.Temples, Samadhi of Shrimant Nana saheb Peshwe, Museum, Must visit..!!

#पुणेकर

Address

Pune
411048

Opening Hours

Monday 9:30am - 5:30pm
Tuesday 9:30am - 5:30pm
Wednesday 9:30am - 5:30pm
Thursday 9:30am - 5:30pm
Friday 9:30am - 5:30pm
Saturday 9:30am - 5:30pm
Sunday 10:30am - 1:30pm

Telephone

+919359589292

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Indigo Roots posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Indigo Roots:

Videos

Share