Melody Tours

Melody Tours Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Melody Tours, Tour Agency, Pune.
(1)

26/11/2023

Enjoy mesmerizing Goa with Melody Tours!!
३ रात्री ४ दिवस,नाष्टा,रात्रीचे जेवण, प्रवास, आणि अमर्यादित मौज,मजा,मस्ती.
चला तर मग तुम्ही फक्त बॅग भरा. आम्ही आलोच तुम्हाला आनंददायक सफरीवर न्यायला.

फक्त 8500/-

🩷Melody Tours🩷
सौ. ज्योती झुरंगे
+91 98605 96889
+91 90115 78582
सौ. मनीषा हापन
+91 820 876 9257

Wishing you all a very happy,healthy,exploring prosperous Diwali🪔🎇🪔
12/11/2023

Wishing you all a very happy,healthy,exploring prosperous Diwali🪔🎇🪔

Bond of ConnectionBond of care Celebration of life long affection Happy RakshabandhanMELODY TOURSConnect Care Celebrate
30/08/2023

Bond of Connection
Bond of care
Celebration of life long affection
Happy Rakshabandhan

MELODY TOURS

Connect Care Celebrate

Happy Independence Day!!
15/08/2023

Happy Independence Day!!

"मैत्री म्हणजे आयुष्याला मंत्रमुग्ध आणि सुंदर बनवणारा कधीही न संपणारा प्रवास"...Happy Friendship Day to you all lovely,c...
06/08/2023

"मैत्री म्हणजे आयुष्याला मंत्रमुग्ध आणि सुंदर बनवणारा कधीही न संपणारा प्रवास"...
Happy Friendship Day to you all lovely,caring, supporting,motivating FRIENDS💐💐💐

MELODY TOURS
Connect Care Celebrate

19/07/2023

अधिक महिन्याच्या सुरुवातीलाच संत ज्ञानेश्वर महाराज,गजानन महाराज, संत तुकाराम महाराज मंदिर,भंडारा डोंगर,प्रती शिर्डी साईबाबांचे आशीर्वाद घेऊन मेलेडी टूर्सची पावसाळी सहलीची सुरुवात झाली आहे. 🙏💐🙏

Melody Tours
Connect Care Celebrate

21/06/2023

I gained 5 followers, created 8 posts and received 255 reactions from March to June! Thank you all for your continued support. I could not have done it without you. 🙏🤗🎉

निसर्गाची दिवाळी, प्रकाश सोहळा पावसाच्या स्वागताचा. Fireflies festival is back. काजवा महोत्सव सुरू होतोय. 21 मे ते 21 जु...
17/05/2023

निसर्गाची दिवाळी, प्रकाश सोहळा पावसाच्या स्वागताचा. Fireflies festival is back. काजवा महोत्सव सुरू होतोय. 21 मे ते 21 जुन. दुपारी 4 ते रात्री 11 (शनिवार/रविवार).दुपारचा चहा,रात्रीचे जेवण,प्रवास वाहन. चला तर मग पाहायला काजव्यांची चमचम.
Melody Tours
Connect Care Celebrate

Happy Mother's Day!!
14/05/2023

Happy Mother's Day!!

12/05/2023

Beautiful moments & nature!!

12/05/2023

Heavenly experience at Heaven!!

Tour family-Mesmerizing clicks....
12/05/2023

Tour family-Mesmerizing clicks....

12/05/2023

Melodies of Kashmir with grace of Maa Vaishnodevi tour 18 April to 29 April. 11 दिवसांची सहल अतिशय कौटुंबिक,जिव्हाळा,आनंदमय,उत्साहपूर्ण,अविस्मरणीय,स्वर्गीय अनुभूतीत यशस्वी संपन्न झाली.
पुणे ते जम्मू हा झेलम एक्स्प्रेसचा 2150 किलोमीटर चां प्रवास 50 सहल कुटुंबीयांसोबत गप्पा,गाणी,हास्यकल्लोळ,रुचकर,खुसखुशीत,आणि जल्लोषात कधी पूर्ण झाला हे कळलेच नाही.
जम्मू ते श्रीनगर हा बस चा प्रवास नेत्रसुखद आणि निसर्गाचे रूप पाहण्यात तल्लीन पणे सुंदर झाला. श्रीनगर पर्यंत प्रत्येक सहल कुटुंबीय हा प्रवास डोळ्यात आणि मनांत साठवत कधी मोबाईल मध्ये चित्रीकरण करत पूर्ण झाला. निसर्गाचे सुंदर रूप, इंजिनिअरिंग चे कौशल्यपूर्ण 8/10 किलोमीटर चे बोगदे सर्वच अतिशय अविस्मरणीय.
श्रीनगर ला पोहोचता पोहोचता रात्रीचे 8 वाजले होते. 20 एप्रिल ला श्रीनगर चे तापमान अचानक पावसामुळे कमी झालेलं होते. हाऊसबोटच्या त्या रात्रीच्या मुक्कामात सहल कुटुंबीयांनी दल लेक च्या सौंदर्य बरोबरच आपलेपणा आणि जिव्हाळ्याचाही अनुभव घेतला.
शिकारा मधून सफर आणि सुंदर चित्रीकरणात सर्वांचा वेळ अगदी मजेत आणि आनंदात गेला.
21 एप्रिल सकाळी श्रीनगर मधील सुंदर बगीचे आज अधिकच सुंदर दिसायला लागले होते. मेलेडी कुटुंब आज पाना फुलात रमत त्या निसर्गाशी एकरूप होत,आठवणीचे सेल्फी,व्हिडिओ करत ह्या बागातल्या निसर्गाच्या उधळणीला, उत्साहाला आपल्यात सामावून घेत जणू काही सुंदर संगीत तयार करत होत.
श्री शंकराचार्य मंदिरात दर्शन घेऊन. वरून श्रीनगरच्या दिसणाऱ्या अप्रतिम दृष्याला डोळ्यात आणि कॅमेऱ्यात साठवून होटल मध्ये परतलो.
22 एप्रिल ला सकाळी मेडोज ऑफ गोल्ड सोनमर्ग कडे मेलडी चे सोनेरी कुटुंब निघाले. हा प्रवास नयनरम्य आणि निसर्ग सुंदर नटलेला होता. पाऊस नसल्यामुळे वातावरण अतिशय दर्शनीय होत.प्रत्येक ठिकाण सुंदर आणि इथेच थांबव अस सुंदर. बर्फाच्छादित डोंगर,नितळ,स्वच्छ,खळाळत वाहणारे निर्झर, हिरवी कुरणे,झाडी मनमोहक दृश्य आमच्या सोबतच असायचं.
ये हसी वादिया ये खुला आसमा, आ गये हम कहा.....ह्या गाण्याच्या ओळी प्रत्येकाच्या मनावर तरंग उमटवत सोनमर्ग च गाणं गुणगुणत आम्ही ह्या सुंदर ठिकाणाचा निरोप घेतला.
23 एप्रिल ला आम्ही श्रीनगरहून गुलमर्ग (मेडोज ऑफ फ्लॉवर) ला निघालो रस्ता वळणदार हिरवळ आणि डौलदार सुरूच्या झाडांच्या सोबतीन शानदार दिसत होता. गोंडोला सर्वांचे चे दोन्ही फेजचे बुकिंग महिनाभर आधी केलेलं असल्याने आम्ही लगेच फेज 1 कोंगडोरी आणि फेज 2 अफरवात ची जोषपूर्ण आणि नयनरम्य सफर डोळ्यात साठवत पूर्ण केली. फेज 2 पूर्ण बर्फाने आच्छादलेले सुंदर शुभ्र पिंजलेल्या कपासा सारखं दिसत होत. ह्या वातावरणात बर्फ खेळत रोमँटिक क्लिक घेत मेलडी कुटुंबाने आनंद घेतला. ह्यात आमचे सिनियर मंडळीही अगदी जोश आणि उत्साहात होती.
ये कहा आ गये हम युही साथ साथ चलते ह्या गाण्याच्या ओळी आपसूकच मनातून शीळ घालत होत्या. इथेच काही अंतरावर भारतीय सैन्याच्या एका चौकी वर तिरंगा डौलाने फडकत आमच्या सर्वांच्या मनात अभिमान आणि आदर दुणावत मन भारावून टाकणारं हे दृश्य होत. प्रत्येक जण त्या ठिकाणी जाऊन अभिवादन करून तिथल्या सैनिकांना आदराने नमस्ते करून येत होता. फेज 1 ला परत येऊन बच्चे कंपनी आणि मोठ्यांनीही मस्त स्कीइंग आणि स्लेज च्या राईड चा मनमुराद आनंद घेतला. रात्रीचा मुक्काम त्याच सुंदर ठिकाणी होता त्यामुळे सगळ्यांना गुलमर्ग चे सौंदर्य रात्रीही अनुभवता आले.
24 एप्रिल ला सहल कुटुंब पहलगामला निघाले. पहलगामला सगळ्यात जास्त चित्रपटांचे शूटिंग का होते हे तिथल्या निसर्गाने पटवून दिले. लिद्दर नदीचा सुंदर खळाळता प्रवाह. सुरुच्या झाडांनी हिरवे झालेले पर्वत,हिरवी कुरणे. बेताब,आरू, ॲडो व्हॅली चे अप्रतिम सौंदर्य.
कितनी खुबसुरत ये तस्वीर है,ये कश्मीर है ये कश्मीर है.
डोळे आणि मन दोन्ही ही पहलगाममय झालेलं होत.रात्रीचा मुक्काम इथेच असल्याने हा आनंद हे सौंदर्य सकाळीही आपल्यासोबत असणार ह्या विचाराने सगळेच कुटुंबीय खुश होते.
25 एप्रिल ला सगळ्यांचं मन भाव आणि भक्तिन भरून उत्साहाने भारावलेले होत. माता वैष्णोदेवी च्या दर्शनाला आता आम्ही सगळे निघालो होतो. कटरा येथे दुपारी पोहोचून आम्ही सगळ्यांचे दर्शन पास बनवून घेतले. श्री श्राईन बोर्ड यांनी भाविकांसाठी खूप सुलभ अशी व्यवस्था केली आहे. सायंकाळी 9 वाजता जय मातादीं ह्या गजरात आम्ही बाणगंगा गेट पासून त्रिकुट पर्वत दर्शनासाठी चालायला लागलो. 4 ते 75 वर्ष वयोगटाचे आमचे कुटुंब उत्साहात चालत एकमेकांची काळजी घेत मार्गक्रमण करत होते.
चलो बुलावा आया है. माता ने बुलाया है मातेच्या दर्शनासाठी आणि भक्तिभावात हा प्रवास अतिशय सुंदर झाला. पहाटे सगळ्यांचे श्री महालक्ष्मी,श्री सरस्वती,श्री कालिका देवी ह्यांच्या पिंडी चे दर्शन झाले. आपल्या कुटुंबासाठी आरोग्य,आनंद,समृध्दीची प्रार्थना आणि मातेचा आशीर्वाद सगळ्यांसाठी घेऊन सगळे हॉटेल वर परतले.
सहल यशस्वी होते ती सहभागी असलेल्या सर्वांमुळे. आपलं सहल कुटुंब खरच समंजस,प्रेमळ आणि आपुलकी असलेलं होत. ज्योती आणि तुकारामदादा झुरंगे कुटुंबीय नेहमी मदत आणि काळजी घेणार, मनमिळाऊ आणि प्रत्येक गोष्ट समजूतदारपने निभावणारे सुनीलदादा मीनाताई हंबिर,सुरेंद्रदादा अश्र्विनिताई हंबिर कुटुंब,हसतमुख उत्साही ओमकार आणि मोहिनिताई म्हस्के,सगळ्यांची काळजी आणि आमचे आधारस्तंभ असलेलं शांताराम नाना आणि स्वाती ताई चौधरी,प्रेमळ आणि आनंदी विजयाताई आणि अंकुशदादा कोलते,स्पष्ट पण प्रेमळ छायाताई आणि अशोकदादा सूर्यवंशी, उत्साही आणि सगळ्यात रोमँटिक जोडी कांताताई आणि सूर्यकांतदादा जगदाळे, विनोदी आणि प्रेमळ वैशालीताई आणि कृष्णकुमारदादा मोरे, हसतमुख आणि सगळ्यांना हसत ठेवणारे सुप्रियाताई आणि संजय पायगुडे, मनमिळाऊ आणि निसर्गाची आवड असणारे मनिषाताई आणि Dr. धनंजय पोतदार, मदतीसाठी तत्पर कुटुंबवत्सल केतकी आणि सचिन खरमाळे, आमची सगळ्यांची काळजी घेणारी खरंमाळे आई आणि बाबा,हसतमुख आणि उत्साही दिपालिताई टिळेकर, आनंदी आणि मनमिळाऊ तेजश्रीताई आणि युवराज होले, हरहुन्नरी आणि मदतीसाठी तत्पर असणारी अश्विनीताई जगताप, उत्साही हसतमुख मंदाकिनीताई लडकत. शर्विल,युगंधरा,तेजस्विनी, चीत्राक्षी, विश्र्वराज,विराज, तनिश,यश,प्रथमेश,आकाश,अवधूत,अदिती,कोमल,यज्ञेश, ज्ञानदा ह्या बच्चे कंपनीनं खरंच धमाल पण केली पण आपल्या खारीच्या वाट्यान सगळ्यांची काळजी पण घेतली.
27 एप्रिलला आपला सहलीचां परतीचा प्रवास सुरू झाला आणि 29 एप्रिल ला आपण सगळे घरी पोहोचलो. मन मात्र त्या अविस्मरणीय दिवसांच्या आठवणीत अजून रमले आहे. आपण सगळ्यांनी मिळून स्वर्ग पहिला, कुटुंब बरोबर असल्याने तो आनंद स्वर्गीय झाला.आनंद आणि आपुलकीचा सोबतीचा कळसही पहिला. व्यवसायिकत्वा पेक्षा आपुलकी आणि ममत्व हेच सहलीचं यश असत. आम्हाला तुमचे काही दिवस आनंदमय करण्याची संधी मिळाली ह्यासाठी सर्व सहल कुटुंबीयांचे मनःपूर्वक आभार. सहल संपली पण एकमेकांत जोडला गेलेला आदर,प्रेम,आपुलकी आणि जिव्ह्याळ्याचा ऋणानुबंध आयुष्यभर असाच वृध्दींगत होत राहील...........

Melody Tours
Connect Care Celebrate

01/05/2023
12/03/2023
12/03/2023

अलिबाग ची वाट
मैत्रिणींचा थाट
गाणी गप्पांचा गोंगाट
हास्याचा गडगडाट
एकदिवसीय सहलीचा घाट
MELODY TOURS चा Women's day सुसाट
खर तर प्रत्येक दिवस कुटुंबासाठी स्त्रीचाच असतो. तीच असते घराचं सौंदर्य,आत्मा,आणि कणा. कुटुंबातील सर्वांची काळजी घेणे आणि कुटुंब स्वस्थ,सुंदर,आरोग्यपूर्ण ठेवण्याची 24X7 जबाबदारी पेलणारी प्रत्येक स्त्री ही यशस्वी आणि स्वतःतच एक प्रेरणास्थान आहे.
अलिबाग,काशीद,नागाव,महड वरदविनायक दर्शन एकदिवसीय (10 मार्च) सहल ह्या सगळ्या कुटुंबवत्सल रणरागिणीबरोबर अत्यंत मौज,मज्जा आणि मस्तीची झाली.एक अफलातून,आनंद,नाच,गाणी ,हास्यकल्लोळ,मुक्त आणि मुग्ध दिवस. सगळ्यांना लहानपणीच्या आठवणी जाग्या करून देणारी स्पृहणीय सहल.
प्रत्येक नात्यात एक नजाकत,जबाबदारी पेलनाऱ्या तमाम women's power ला मानाच अभिवादन.

चला तर मग सहल कुटुंबीय पुन्हा भेटू नवीन ठिकाण नवीन आनंद नवीन कल्पना घेऊन.

*MELODY TOURS*

सौ ज्योती :9860596889
सौ मनीषा:8208769257

Connect Care Celebrate

❣️ *Melody Tours* ❣️💃💃 *Women's Day Special* 💃💃रोजच्या  जबाबदारीतून वेळ काढून करूयात महिला दिन स्पेशल..आपणच म्हणजेच महिल...
24/02/2023

❣️ *Melody Tours* ❣️

💃💃 *Women's Day Special* 💃💃
रोजच्या जबाबदारीतून वेळ काढून करूयात महिला दिन स्पेशल..
आपणच म्हणजेच महिलांनीच महिलांसाठी काढलेला वेळ..
स्वतः साठी..
चला तर मग एक दिवस आमच्याबरोबर..
म्हणजेच Melody Tours बरोबर..
कुठे..?
जाऊयात मस्त समुद्रकिनारी..
निसर्गाने नटलेल्या *अलिबाग* ला.. फक्त एक दिवस..❣️
येताय ना..?
अलिबाग समुद्र किनारा...
आणि बरेच काही.......

🌹तारीख:-10 मार्च 2023🌹

पॅकेज:- 1750/- प्रतिव्यक्ती

💃 *Melody Tours* 💃
सौ ज्योती:- 9860596889
9011578582
सौ मनीषा:- 8208769257
9011041671

20/02/2023

Melodies of Ootey
8 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी ट्रीप सुंदर आणि जबरदस्त मजेत पूर्ण झाली.
स्थळ दर्शनासाठी असलेले वाहनं हे ग्रूपसाठी डान्स फ्लोअर झालेलं. म्हैसुर पॅलेस,वृंदावन गार्डन. उटीच्या पायकरा लेक, निलिगिरी माउंटन ट्रेनच्या प्रवासात सर्वांच्या साथसंगतीच गीत महिफिलिसारख रंगतदार झाल. दोडाबेट्टा पीक पहाताना सहलही मैत्री, गप्पा,निसर्गाच्या सानिध्यात,आनंदाच्या अत्युच् उंचीत मग्न झाली.सचिन कदम ने Melody Tour वर विश्वास ठेऊन ही पूर्ण टूर आमच्यावर सोपवली. पण खर तर ह्या टुरचा मार्गदर्शक म्हणून आणि प्रत्येक जबाबदारी त्यानेच पूर्णपणे पेलली. अश्या मित्रांचा पाठिंबा आणि सहकार्य आणि प्रेमामुळेच Melody Tours चि मैत्री अनेकांपर्यंत पोहोचते आहे. हॅट्स ऑफ टू यू सचिन. आणि सहभागी झालेलेही सगळे खूप उत्साही आणि मनमुराद आनंद घेणारे होते. तुमच्या सर्वांमुळे ही सफर यशस्वी आणि मौज,मजेची झाली. आपल्या सगळ्यांचेही मनःपूर्वक आभार.
ऐ जिंदगी गले लगाले
दोस्तों के साथ मस्ती मे जीले.
असाच मस्त अनुभव घेऊन आणि मैत्रीच गाणं,रंगत,गुंफण घट्ट करत
हा स्वर मनात साठवत ...चला पुन्हा भेटू नव्या ठिकाणी नव्या महिफिलित.....
Melody Tours
CONNECT CARE CELEBRATE

04/02/2023

Melodies of Goa!!

04/02/2023

💃💃 *Melody Tours*. 💃💃
गोवा ट्रिप साठी आलेला मैत्रिणींचा ग्रुप.. वेगवेगळ्या स्वभावाच्या तरीपण 4 दिवस एकत्र राहून मैत्रीचे नाते अजून दृढ आणि घट्ट झाले. खुप मस्त एन्जॉय केला आणि नवीन जबाबदारी साठी सज्ज झाल्या..
आमच्याबरोबर तुम्ही परत एकदा कधीतरी येणार आणि येतच राहणार याची 100%👍खात्री आहे कारण तुम्हीही आमच्या Melody Tours च्या परिवारातील हिस्सा झालात..
त्यामुळे नंतर परत पुढच्या ट्रिप ला भेटूच..❣️🙏🏻
तोपर्यंत......... Miss You All Beautiful Girls💃💃💃

💃 *MELODY TOURS* 💃
*Connect Care Celebration*
Jyoti:- 9860596889
9011578582
Manisha:- 8208769257

26/01/2023

One Nation
One Dream
One Identify
We are proud INDIANS.
HAPPY REPUBLIC DAY 2023

Connect Care Celebrate

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा..तिळगुळ घ्या, गोड गोड बोला !!Connect Care Celebrate
15/01/2023

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा..
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला !!

Connect Care Celebrate

मजा मस्ती चला करूयात गोव्याला💓❣️कोणाबरोबर..?अर्थातच Melody Tours बरोबर😍येतंय ना..?
11/01/2023

मजा मस्ती चला करूयात गोव्याला💓❣️
कोणाबरोबर..?
अर्थातच Melody Tours बरोबर😍
येतंय ना..?

01/01/2023

Wishing you & your family a very Happy New Year 2023. May the year be filled with joy, happiness, health and harmony in every moment
CONNECT CARE CELEBRATE
💐🎆💐🎇💐

07/11/2022

श्री शक्तीपीठ माहूरगड आणि श्री ज्ञान सरस्वती बासर
साडेतीन शक्तिपीठांपैकी मूळ पीठ असलेले माहूरगड वनराईने नटलेले आणि माता रेणुकादेवी च्या अधिवासाने पावन असलेले सुंदर ठिकाण. गडावर पोहचताच मातेच्या ऊर्जेचा आणि भक्तीभावाचा दरवळ भाविकांना उल्हासित करतो.मातेचे दर्शन आणि श्री परशुरामाच्या दर्शनाने मन भक्तिरसाने ओथंबून जाते. इथला निसर्ग मनाला भुरळ घालतो. गडावरून दिसणारे सूर्योदय आणि सूर्यास्ताचे विलोभनीय दृश्य आयुष्यभर ह्या पावन ठिकाणाचे आशिर्वाद रोमारोमात आनंद तरंग देत राहतात खास.
जवळच श्री अत्रीऋषी, श्री माता अनुसया देवस्थान आहे. निसर्ग आणि पावित्र्याचा सुंदर संगम ह्या तिन्ही डोंगरांवर ओसंडून वाहत असतो.
जवळच चार तासांच्या अंतरावर असलेले श्री ज्ञान सरस्वती मंदिर (बासार) अतिशय सुंदर पवित्र ठिकाण. गोदावरी नदीच्या काठावर असलेले हे भारतात असलेल्या श्री सरस्वतीदेवीच्या तीन मुख्य मंदिरांपैकी एक. सुंदर मंदिर आणि देवीचे प्रसन्न आणि हसमुख रूप आपल्याला मंदिराच्या सभामंडपातच खिळवून ठेवत राहत. मोठेच नाही तर लहान मूल ही पुन्हा पुन्हा देवीच्या सुंदर मूर्ती कडे अत्यंत आनंद आणि भक्ती ने पाहतच राहतात.
लहान मुलांसाठी अक्षर अभ्यास हा देवीच्या समोर पाटी पेन्सिल ने अक्षर लिहून करण्याची एक सुंदर पद्धत पाहण्यात आली. श्री सरस्वती देवीची उपासना ही खरंच आयुष्यभर केल्यांस प्रगती,समृद्धी,यश देणारी.
Learning is a continual process ह्याची आठवण करून देणारीच.
नांदेडचा सुंदर गुरुद्वारा आणि श्री काळेश्वरमंदिराचा नयनरम्य परिसर सहलीचा कळसच.
ह्या सगळ्या बरोबरच सवणा गाव चे देशमुख कुटुंबाने केलेलं आदरातिथ्य खरंच मैत्रीचा आयुष्यभर जपावा असा प्रसादच.
पुण्याहून 4 रात्री आणि पाच दिवसात ही सुंदर सहल सफल आणि अविस्मरणीय झाली.
Melody Tours
Connect Care Celebrate

Address

Pune
411030

Telephone

+918208769257

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Melody Tours posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share

Category


Other Tour Agencies in Pune

Show All