15/10/2023
||जय परशुराम, जय शिवराय||
||श्री राम समर्थ||
||अखंड अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त||
📞 98 34 69 38 00
खास पुणेकरांसाठी, श्री गजानन ट्रॅव्हल्स घेऊन येत आहेत एक दिवसीय 'कोल्हापूर दर्शन' सहल ज्यामध्ये आम्ही श्री महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर, खूप प्राचीन कोपेश्वर मंदिर खिद्रापूर, आणि नरसोबाची वाडी श्री गुरुदेव दत्ताचे स्थान या तीन मुख्य ठिकाणी फिरणार आहोत.
👇या सहलीमध्ये समाविष्ट असणाऱ्या गोष्टी खालील प्रमाणे
- घरापासून घरापर्यंत सेवा
-सकाळचा चहा/ कॉफी नाष्टा, दुपारचे जेवण, संध्याकाळचा चहा/कॉफी, रात्रीचे जेवण, मिनरल वॉटर बॉटल, ड्राय टिश्यू आणि वेट टिश्यू
-सर्वोत्तम आणि रुचकर शुद्ध शाकाहारी हॉटेलमध्ये नाष्टा आणि जेवण
- टोल, पार्किंग इत्यादी सर्व गोष्टी समाविष्ट
🫴नियोजन असे असेल
१) सकाळी सहा वाजलेपासून प्रवाशांना पिकप केले जाईल त्यांच्या घरापासून आणि पुढे प्रस्थान
२) सातारजवळ सकाळचा चहा नाष्टा केला जाईल. वेळ साधारण ३०-४५ मिनिट
३) पहिले नरसोबा वाडी येथील दर्शन घेतले जाईल, पुर्ण परिसर पाहून झाला की जोशी किंवा सोमण खानावळ येथे खुप सुंदर असे रुचकर जेवण अमर्यादित. वेळ साधारण १.५- २ तास
४) पुढील स्थान कोपेश्वर मंदिर खिद्रापूर पुढे २० किमी आहे. वेळ साधारण २५-३० मिनिट
५) शेवटचे स्थान श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिर कोल्हापूर.
देवीचे दर्शन झाल्यानंतर पुण्याकडे प्रस्थान केले जाईल.
वाटेमध्ये संध्याकाळचा चहा कॉफी
६) सर्वांना घरी सुखरुप आणि आनंदाने पोचवणे हे आमचे ध्येय आणि कर्तव्य आहे आणि ते आम्ही पार पाडणारच.
🙌आमची निवड का करावी? आमची वैशिष्ट्य आणि खासियत
- वृद्ध व्यक्तींची प्रवासादरम्यान जास्त काळजी घेतली जाते आपुलकीने
-महिला आणि मुलींसाठी १०००% सुरक्षित
- सुटसुटीत आणि आरामदायक प्रवासासाठी फक्त तीन पॅसेंजर सेदान गाडीमध्ये घेतले जातील. ( १ चालक + ३ प्रवासी)
-स्वतः चालक-मालक गाडीचे सारथ्य करतील जे प्रशिक्षित आणि निर्व्यसनी, मन मेळाऊ असतील.
-सर्व चालक मालक उच्चशिक्षित आहेत त्यामुळे पॅसेंजर सोबत वागणूक आणि व्यवहार उच्च दर्जाचा असेल.
- सुस्थितीतील वातानुकूलित गाड्या
- FIRDT AID KIT & TYRE INFLATOR गाडीमध्ये उपलब्ध आहेत.
Available Cars - TATA ZEST, SWIFT DZIRE, HYUNDAI XCENT
🙏महत्त्वाची टीप- जर आमची सेवा तुम्हाला खालील कारण साठी आवडली नाही तर १००% पैसे परत
- गाडीची गुणवत्ता आणि साफसफाई
-चालकाचा स्वभाव आणि वागणूक खराब असेल तर
- वाईट ड्रायव्हिंग स्किल्स, गाडी फास्ट चालवणे, असुरक्षित वाटणे
*किंमत*
प्रति व्यक्ती/ प्रति सीट - ३३३३/-
( फक्त तीन प्रवासी एका कारमध्ये कारण आम्हाला प्रवास आरामदायी करवयाचा आहे)
घरापासून घरापर्यंत वातानुकूलित कार मध्ये सर्व खर्च सर्व जेवण समाविष्ट. त्वरा करा आणि आजच आपले सीट कन्फर्म करा.
अमोल आचार्य, बावधन पुणे
📞 98 34 69 38 00
थोडीशी माहिती
*श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिर,कोल्हापूर*
महालक्ष्मी अंबाबाई मंदिर ,कोल्हापूर हे करवीर निवासिनी महालक्ष्मी (अंबाबाई)चे मंदिर आहे.हे मंदिर महाराष्ट्रात असलेल्या मंदिरांच्या साडेतीन पीठांपैकी एक आहे. देवीच्या माथ्यावर मातृलिंग आहे. वरच्या गाभाऱ्यात मातृलिंग आहे. बाहेर श्री काळभैरव आहे. काशी विश्वेश्वरचे मंदिर सहीत बारा ज्योतिर्लिंग ही आहेत. त्यामुळे हे मुळ आदिमाया सर्वस्याद्या त्रिगुणात्मक स्वरूपिनी भगवती महालक्ष्मीचे मंदिर आहे. आजही कोल्हापूरकर अंबाबाईचे मंदिर असाच उल्लेख करतात.
*श्री क्षेत्र नरसोबावाडी*
नरसोबाची वाडी हे महाराष्ट्र राज्यातील प्रसिद्ध तिर्थक्षेत्र आहे. हे तीर्थक्षेत्र श्रीनृसिंह सरस्वती यांच्यामुळे ओळखले जाते. श्रीनृसिंह स्वामी या ठिकाणी 12 वर्ष राहिले होते. स्वामींनी या ठिकाणी अनेक चमत्कार केले, अशी मान्यता आहे.
नरसोबाची वाडी किंवा नृसिंहपूर या ठिकाणी श्रीनृसिंह स्वामींनी तपश्चर्या केली होती. नृसिंह सरस्वती यांना श्रीपाद वल्लभ यांच्यानंतरचे दत्तात्रेयांचे दुसरे पूर्णावतार मानले जातात. अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज सर्वांना ठाऊक आहेतच. गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती यांचाच अवतार म्हणून श्रीस्वामी समर्थ प्रकट झाले, अशी मान्यता आहे.
*कोपेश्वर मंदिर, खिद्रापूर*
येथील महादेवाचे नाव कोपेश्वर आहे. कोपेश्वर म्हणजे रागावून इथे येऊन बसलेला. दक्ष कन्या सतीच्या जाण्याने, तिच्या विरहाने कोपलेला असा महादेव कोपेश्वर. मग त्याची समजूत काढण्यास कुणीतरी हवे होते ते काम श्री विष्णूनी केले.[३] त्यांचे नाव धोपेश्वर. मंदिराच्या गर्भगृहात दोन शाळुंका आहेत. एक कोपेश्वर दुसरा त्याहून थोडा उंच धोपेश्वर. दुसरे एक वैशिष्ट्य असे की येथे इतर मंदिरांप्रमाणे नंदी नाही. कदाचित कालौघात किंवा आक्रमकांमुळे त्याचे स्थलांतर झाले असावे. हा नंदी खिद्रापूरपासून १२ किलोमीटर दूर नैर्ऋत्य दिशेला कर्नाटकातील यडूर या गावी आहे. तेथे फक्त नंदीचे मंदिर आहे. असे फक्त नंदीचे स्वतंत्र मंदिर असलेले कदाचित दुर्मिळ उदाहरण असावे. खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर पूर्व दिशेला तोंड करून आहे आणि यडूर येथील नंदीच्या मंदिरातील नंदी पश्चिमेस तोंड करून बसला आहे.