Travel With Girish Dighe

Travel With Girish Dighe A Travel Company

Sandi's Tours and Travels❄️Shree Amarnath with Vaishnodevi!! "02 Night Baltal 03 Night Srinagar 02 Night Katra" Tour Dat...
21/06/2023

Sandi's Tours and Travels

❄️Shree Amarnath with Vaishnodevi!!

"02 Night Baltal 03 Night Srinagar 02 Night Katra"

Tour Date:-
14 July and 26 July 2023
7Nights/08days

Tour cost :-

32,450/- PP for Double sharing

Inclusions
- Breakfast, Lunch and Dinner
- Sightseeing
- Transport
- Hotel Stay
- Tour Manager
- All taxes
- Darshan Pass fees Amarnath
Hurry up!! Book Now✌🏻

Contact on
9960000445/9890711155

😊 keep travelling🤘🏻😎

26/04/2022
 #व्हॅली ऑफ फ्लॉव्हर्स हे भारतातील उत्तराखंड राज्यातील राष्ट्रीय उद्यान आहे. नंदादेवी राष्ट्रीय उद्याना बरोबर हे नंदादेव...
12/08/2021

#व्हॅली ऑफ फ्लॉव्हर्स हे भारतातील उत्तराखंड राज्यातील राष्ट्रीय उद्यान आहे. नंदादेवी राष्ट्रीय उद्याना बरोबर हे नंदादेवी रिझर्व बनवते. या उद्यानाला येथील अत्यंत वैविध्यपूर्ण निसर्गामुळे जागतिक वारसा स्थान म्हणून मान मिळालेला आहे. या उद्यानाचे एकूण क्षेत्रफळ ८७.५ चौ.किमी इतके आहे. याची मुख्य पर्वतरांग हिमालयातील झांनस्कार रांगआहे. तसेच सर्वोच्च ठिकाण गौरी पर्वत आहे ज्याची उंची ६७१९ मी इतकी आहे. हे उद्यान वर्षातील जवळपास ९ महिने बर्फाच्छादीत असल्याने बंद असते.
१९३१ मध्ये इंग्रज गिर्यारोहक फ्रँक स्मिथ व होल्डवर्थ यांनी गढवाल मधील कॉमेट हे शिखर सर केले व परतीच्या मार्गावर त्यांनी पश्चिम खिंडीचा मार्ग घेतला व दोघे गिर्यारोहक रस्ता भरकटले व भटकून भटकून या दरीत पोहोचले. इथे पोहोचल्यावर बहारलेल्या फुलांच्या गालिच्यांनी त्यांची हरवल्याची भीती पूर्णपणे घालवली व फ्रँक या जागेच्या प्रेमात पडला. फ्रँक ने तेथेच तंबु गाडला व पुढील कित्येक दिवस तिथे उगवणार्‍या अनेक फुलांचे नमुने गोळा केले. त्यातील कित्येक फुले जगाला पहिल्यांदाच ज्ञात होत होती. १९३७ मध्ये तो परत येथे आला व अभ्यास करून त्याने व्हॅली ऑफ फ्लॉवर्स हे पुस्तक प्रकाशित केले.
१९८० मध्ये याची राष्ट्रीय उद्यान म्हणून स्थापना झाली. व १९८२ मध्ये याची जागतिक वारसा स्थान म्हणून निवड झाली. अत्यंत वैविध्यपुर्ण फुले हे येथील वैशिठ्य आहे. फुलांच्या एकुण ५०० हून अधिक जाती येथे आढळतात. त्यातील कित्येक केवळ येथेच आढळणार्‍या आहेत. फुलांमध्ये मुख्यत्वे ओर्चिड्स पॉपिस असे अनेक प्रकार येथे पहावयास मिळतात. वर्षातील नऊ महिने बर्फाच्छादित असल्याने केवळ तीनच महिने बहाराची असतात व त्यासाठी येथील फुलांनी आपापले फुलायचे दिवस ठरवून घेतले आहे असे दिसते.

#हेमकुंड साहिब व #लक्ष्मण मंदिर - बद्रीनाथ जवळ १५,१९७ फुट उंचीवर स्थित स्थानिक भाषेत लोकपाल लेक ज्याला आता हेमकुंड म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी तुम्हाला स्वर्गातल्या वातावरणाचा आनंद घेता येतो. घांगारिया य ठिकाणाहून ४-६ तासांचा ट्रेक केल्यानंतर पोहचता येते. हे ठिकाण हिंदू आणि शीख दोघांनाही पवित्र आहे. या तलावाकाठी तुम्हाला शीख गुरुद्वारा व लक्ष्मण मंदिर बघायला मिळते. गुरु गोविंद सिंग ज्यांनी शीख धर्माची व गुरु ग्रंथ साहिब यांची रचना केली, त्यांचा पूर्व जन्मा राजा पांडू हे या ठिकाणी तप करत असतांना ईश्वराने त्यांना सांगितले होते कलीयुगात तुम्ही गुरु गोविंद सिंग यांचा नावाने जन्म घ्या आणि खालसा पंथाची स्थापना करा. लक्ष्मण हे शेष नागाचे अवतार होते, या ठिकाणी शेषनागाने खूप कठीण तप करुन मोठी शक्ती प्राप्त करुन घेतली होती. रावणाच्या मुलगा मेघनाद बरोबर युद्ध करत असतांना लक्ष्मण जेव्हा घायाळ होतात तेव्हा आपली शक्ती परत घेण्यासाठी ते य ठिकाणी परत तप करुन आपल्या शक्ती परत प्राप्त केल्या होत्या. गुरु गोविंद सिंग जग भ्रमण करत असतांना य ठिकाणी काही दिवस तप केले होते म्हणून या जागेला खूप महत्व आहे.
#केदारनाथ - बारा #ज्योतिर्लिंगांपैकी एक, पंचकेदार व छोटा धाम या अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्रांपैकी केदारनाथ एक मानले जाते. हिमालय पर्वतांमध्ये असलेल्या केदारनाथ मंदिराची उभारणी पांडवांनी केली असून, आद्य शंकराचार्यांनी या मंदिराचे पुनरुज्जीवन केले, अशी मान्यता आहे. गौरीकुंडहून चौदा कि.मी. अंतराचा खडतर प्रवास करूनच केदारनाथ मंदिरापर्यंत पोहोचता येते आणि केदारनाथांचे दर्शन घेता येते. २०१३ साली उत्तराखंडमध्ये आलेल्या विध्वंसक पुरामध्ये केदारनाथ गाव पूर्णपणे वाहून गेले. मात्र, दगडी केदारनाथ मंदिराला किंचितसा धक्काही पोचला नाही, हे आपण सर्वांनीच पाहिले. सहा महिने हे मंदिर पूर्ण बर्फाच्छादित असते. अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर किंवा त्या आसपास हे मंदिर भाविकांसाठी खुले केले जाते. केवळ सहा महिने हे मंदिर भाविकांसाठी खुले असते.

लेह लडाख ची भटकंती करणे हे प्रत्येक भटक्याचे स्वप्न असते.गर्द निळे आकाश,उंचच उंच बर्फाच्छादित पर्वतराजी व स्फटिकासारखे न...
24/07/2021

लेह लडाख ची भटकंती करणे हे प्रत्येक भटक्याचे स्वप्न असते.गर्द निळे आकाश,उंचच उंच बर्फाच्छादित पर्वतराजी व स्फटिकासारखे नितळ पाणी हे सर्व लेह-लडाख येथेच पाहायला मिळते.
दरवर्षी हजारो दुचाकीस्वार #लेह-लडाख वारी करतात.लडाख किंवा लद्दाख हे एक केंद्रशासित प्रदेश असून भारतातील सर्वात सुंदर पर्यटन स्थळ आहे.लद्दाख चे क्षेत्र उत्तरेला काराकोरम पर्वतरांगेपासून दक्षिणेला हिमालय पर्वत यांच्या दरम्यान पसरलेले आहे.
३१ ऑक्टोबर २०१९ पासून लद्दाख हा केंद्रशासित प्रदेश म्हणून ओळखला जाऊ लागला.तो पर्यंत तो जम्मू कश्मीर राज्याचा एक भाग म्हणून अस्तित्वात होता. या मध्ये लेह व कारगिल हे दोन जिल्हे असून पर्यटनासाठी प्रसिध्द आहेत. लेह लद्दाख हे दुर्गम रस्ते,बर्फाच्छादित पर्वत शिखरे,अनोखी भूरूपे आणि साहसी पर्यटनासाठी प्रसिध्द आहेत.तुम्ही जर लेह लद्दाख पर्यटनाचा विकार करत असाल? तर हा लेख आवश्य वाचा.
लडाख चे एकूण क्षेत्रफळ ९७७७६ चौरस कि.मी.आहे.व लेह ही या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे. लडाख प्रांतात प्रामुख्याने बौध्द,मुस्लीम व हिंदू लोक राहतात. लडाख हा भारतातील एकमेव प्रदेश आहे की,जिथे दोन कुबडाचे उंट पाहायला मिळतात. #नुब्रा व्हॅली येथे हे उंट असून दरवर्षी लाखो पर्यटक खास हे उंट पाहायला लेह-लडाख ला येतात.लडाख हा भारतातील सर्वाधिक उंचीवरचा केंद्रशासित प्रदेश आहे,जो सुरु खोरे ते #झंस्कार खोरे यांच्या दरम्यान पसरलेला आहे.लडाख प्रांतात असलेला बैली ब्रिज हा जगातील सर्वात उंचीवरील पूल असून याची समुद्र सपाटीपासून उंची ५६०२ मीटर (१८३८९ फुट)इतकी आहे.याची निर्मिती १९८२ मध्ये भारतीय सैन्याद्वारा केली गेली.लडाख ची राजधानी असलेल्या लेह पासून ३० कि.मी. अंतरावर मॅग्नेटिक हिल नावाचे स्थान आहे,जिथे कार न्युट्रल अवस्थेत उभी केली असता,उताराच्या विरुद्ध दिशेला जाऊ लागते.असे म्हणतात,की,या ठिकाणी असलेल्या चुंबकीय शक्तीमुळे असे होत असावे. लडाख हे हिम बिबट्यांचे (Snow Leopard)माहेरघर समजले जाते कारण जगातील ७००० #हिम #बिबट्या पैकी २०० पेक्षा जास्त बिबटे लडाख प्रांतात आढळतात.लडाख प्रांतातील लोकसंख्येपैकी ४६% लोकसंख्या मुस्लिम, ४१% बौध्द,१२% हिंदू तर उर्वरित अन्य धर्मीय लोकांची आहे. लडाख मध्ये असलेले #पॅन्गोंग लेक हे जगातील सर्वात उंचीवरील खाऱ्या पाण्याचे सरोवर असून त्याची समुद्र सपाटीपासून उंची ४३५० मीटर आहे.खाऱ्या पाण्याचे सरोवर असूनही हिवाळ्यात गोठले जाते. अत्यंत सुंदर असलेले हे सरोवर पर्यटकांचे प्रमुख आकर्षण केंद्र आहे.अमीर खान च्या #थ्री #इडियट या चित्रपटाचा शेवट इथे चित्रित केला गेला आहे. लडाख मध्ये तुम्हाला उष्माघात(Heat stroke) आणि हिमदंश(Frostbite) हे दोन्ही एकाच वेळी होऊ शकते, कारण इथले तापमान उन्हाळ्यात ३ अंश ते ३५ अंश पर्यंत जाते.तर हिवाळ्यात शून्याच्या खाली २० अंशापर्यंत जाते. #झंस्कार ही लडाखमधील प्रमुख नदी असून ती हिवाळ्यात गोठते.या गोठलेल्या नदीपात्रावरून लोक चालत जातात.यालाच #चादर ट्रेक असे म्हणतात,दरवर्षी हजारो लोक चादर ट्रेक(Chadar trek) करण्यासाठी डिसेंबर/जानेवारी महिन्यात लडाखला जातात. लडाख मधील लोकांचा मुख्य व्यवसाय पर्यटन सेवा हा आहे.दरवर्षी लाखो पर्यटक लडाखला भेट देतात. त्यामुळे इथल्या लोकांना पर्यटन पूरक सेवा मधून उत्पन्न मिळते. जगातील सर्वात उंच वाहन जाण्यायोग्य खिंड खारदुंग-ला लेह पासून जवळच आहे. अनेक साहसी दुचाकीस्वार स्वतःची अगर लेह मधून भाड्याने दुचाकी घेऊन या अत्यंत उंचीवरील खारदुंग-ला खिंडीत जातात. लडाख ला उंचावरील थंड वाळवंट (Cold desert) म्हटले जाते.हिमालय पर्वतामुळे हा पर्जन्य छायेचा प्रदेश असून अत्यंत कमी पाऊस या भागात पडतो. मुस्लिम,बौध्द व हिंदू लोक एकोप्याने इथे राहतात.व वर्षभर अनेक सण-उत्सव उत्साहात साजरे केले जातात.त्यामध्ये बौध्द व तिबेटी संस्कृतीचा प्रभाव दिसून येतो.

कोरोना नंतर चे  #पर्यटन......“ #पर्यटन” हा मागील काही वर्षात आपल्या जीवनातील एक अविभाज्य घटक झाला आहे. सातत्याने धार्मिक...
10/06/2021

कोरोना नंतर चे #पर्यटन......

“ #पर्यटन” हा मागील काही वर्षात आपल्या जीवनातील एक अविभाज्य घटक झाला आहे. सातत्याने धार्मिक स्थळ, समुद्र किनारे, गड किल्ले अश्या अनेक स्थळांना भेटी देतच असतो.

सध्या कोरोना काळात आपण सर्व जण घरातच आहोत, #पर्यटन_व्यवसाय आणि त्याच्यावर अवलंबून असणारे मग ते व्यवस्थापन संस्था, कामगार, हॉटेल, गाडी मालक आणी #गाइड यांची चांगलीच वाताहत झाली आहे. सरकार ने पण पूर्णपणे दुर्लक्षित केल्या मुळे हे सर्व घटक पूर्णपणे बुडाले आहेत.

तुम्हाला #फिनिक्स पक्षी माहित आहे ना? तो जशी आपली सुरूवात आपल्या राखेतुन करत असतो, तशीच सुरूवात हा कोरोना संपला कि आपण करु, असा विश्वास मलाच नाही तर माझ्यासारख्या सर्व #पर्यटन_विश्वातील लोकांना आहे.

आपण यावर्षी एका पुन्हा #भटकंतीला सुरूवात करत आहोत, या स्थळाचे नाव आहे #भदरवाह_मिनी_कश्मीर.

मिनी काश्मीर – भदरवाह जम्मु पासून साधारण पणे २०० किलोमीटर अंतरावर ५२५० फुट उंचीवर वसलेले डोडा जिल्ह्यातील हे ठिकाण. भदरवाह चा इतिहास खुप मोठा आणी वैशिष्ट्यपूर्ण आहे. #ऋषी_कश्यप यांची भूमी म्हणजे काश्मीर, त्यांची मुले #नाग आणी #गरूड यांची भूमी म्हणून भदरवाहला ओळखले जाते. #हडप्पा आणि #मोहेंजोदडो काळातील दोन शहर दुंगा नगर आणी उधो नगर या ठिकाणी होते. हा येथील सुवर्ण काळ होता, तसेच पाचव्या शतकात #नालन्दा विश्वविद्यालयाहून मोठे विद्यापीठ या ठिकाणी असल्याचा इतिहास आहे. उच्च साक्षरतेच्या दरावर भदरवाहला दुसरे #केरळ म्हणून ओळखले जाते. तसेच निसर्ग सौंदर्याच्या दृष्टीने याला भदरवाहला भारताचे मिनी #स्वित्झर्लंड असेही म्हंटले जाते. भदरवाह मधील देवळामध्ये उत्कृष्ट वास्तू स्थापत्य आपणास बघायला मिळते. तेथील स्वच्छ निळे आकाश, भव्य पर्वत, अल्पाइन वनस्पतींचा विस्तार; भावनिक लोक आणि विविध संस्कृती; अध्यात्मिक शांतता आणी #ट्यूलिप्सचा सुगंधित मोहोर, प्रत्येक पर्यटकला मोहिनी घालतो. या ठिकाणी 9000 फुट उंचीवर असलेल्या पद्रि पास येथून आशा ग्लेसियर चे सुंदर दर्शन होते. आपण 3000 हजार वर्षापूर्वीचा भदरवाह किल्ल्याला भेट देऊन त्याचा इतिहास जाणून घेतो. भदरवाह चे आश्चर्य म्हणजे वासुकिनाथ मंदिर, या मंदिरातील मूर्ती, शतकोशतके 85 अंशाच्या कोनात उभी आहे.

भदरवाह च्या सुंदर अश्या आठवणी घेऊन आपण पुढच्या ठिकाणी म्हणजे डलहौसी कडे प्रस्थान करतो. भदरवाह ते #डलहौसी अंतर साधारण 180 कि. मी आहे. आणी वाटेत #चंबा खोरे 135 कि. मी वर आहे.
चंबा या ठिकाणी आगमन झाल्यावर आपण 10 व्या शतकातील लक्ष्मी नारायण मंदिराला भेट देतो.
दुपारचे जेवण झाल्यानंतर आपण #खज्जियार या डलहौसी च्या नयनरम्य अश्या ठिकाणी मुक्काम करतो.

दुसर्‍या दिवशी आपण खज्जियार या बशी च्या आकारच्या सुंदर तळ्याला भेत देतो. दुपारी सुभाष बाउली, सातधारा धबधबा, तिबेटीयन बाजार इ. ठिकाणी भेट देऊन मुक्काम डलहौसी येथे करतो.

दुसर्‍या दिवशी डलहौसीहून आपण #धरमशाळा या तिबेटीयन धर्मगुरू दलाई लामा यांचा मुख्य मंदिराला भेट देण्यासाठी निघतो. साधारण 120 कि. मी चा प्रवास करुन आपण #दलाई_लामा यांच्या बुद्ध मंदिर समुहाला भेट दिल्यानंतर भग्सु नाग हे पूरातन हिंदू मंदिर पाहतो आणी कांगडा जिल्हाच्या ठिकाणी मुक्काम करायला निघतो. #कांगडा ला जाताना उंचावरून धरमशाळेचे जग प्रसिद्ध क्रिकेट मैदान आपणास बघायला मिळते.

सकाळी न्याहारीनंतर आपण पुरातन वस्तू संग्रहालय भेट देऊन ज्वालामुखी देवीच्या मंदिर कडे निघतो.
#ज्वालामुखी_देवी मंदिर हे ज्ञात असलेल्या 51 शक्तीपीठ मधील एक प्रमुख शक्तीपीठ आहे.

या ठिकाणी देवीची जिभ पडली आहे असे मानले जाते. कांगडा चे राजा भुमिचंद यांनी प्रथम मंदिर बांधले, ज्या वेळेस चंबा आणी नूरपुर येथील युद्ध संपले त्या वेळी अकबर बादशाह ने देवीच्या मंदिर बद्दल आणी अखंड ज्योति बद्दल तर त्याने ति ज्योत लोखंडी झाकण लावून बंद करुन पाहिली पाणी वळवून एक मोठा प्रवाह सोडला तरी काहि होत नाही हे पाहुन त्यांनी मंदिर तोडले. चंबा चे राजा संसारचंद यांनी नविन मंदिर बांधले आणी त्यावर राजा रणजीत सिंह यांनी सुवर्णा छत्री अर्पण केली.
देवी ज्वालामुखी चे दर्शन घेऊन आपण #अमृतसर येथे मुक्काम करतो.
सकाळी आपण अमृतसर येथील शिख लोकांचे पवित्र #सुवर्ण_मंदिर, त्याचबरोबर जलियानवाला बाग, दुर्गना मंदिर आणी अकाल तक्त इ. प्रमुख ठिकाणी भेट देतो. संध्याकाळी भारत पकिस्थान सिमेवर असलेली #वाघा (अटारी) बॉर्डर ला भेट दररोज होत असलेल्या परेड बघनार आहोत. दुसर्‍या दिवशी आपण आपल्या परतीच्या प्रवासाला सुरूवात करणार आहोत.
आपले जर जम्मु आणी #वैष्णोदेवी दर्शन रहिले असेल तर आपण दोन दिवस अगोदर जाउन आपण आमच्या सहल मध्ये सह्भगि होवून हे स्थळ पाहू शकता.

या सहलीचे आयोजन आम्ही या वर्षी आम्ही गौरी गणपती झाले की आम्ही करत आहोत, तर येता ना आमच्या बरोबर..........







& Travellers

 #रहस्यमय_कैलास_पर्वतकैलास पर्वत  #महादेव शिवशंकराचे स्थान म्हणून ओळखला जातो.मृत्यूनंतर ज्या व्यक्तीचे कर्म चांगले असेल,...
09/06/2021

#रहस्यमय_कैलास_पर्वत
कैलास पर्वत #महादेव शिवशंकराचे स्थान म्हणून ओळखला जातो.
मृत्यूनंतर ज्या व्यक्तीचे कर्म चांगले असेल, त्या व्यक्तीला कैलास पर्वतावर स्थान मिळते, असे मानले जाते.
जगातील सर्वांत #रहस्यमय पर्वत म्हणून कैलास पर्वत ओळखला जातो.
शास्त्रज्ञ, संशोधक कैलास पर्वताला पृथ्वीचा केंद्रबिंदू मानतात. कैलास पर्वताचे पृथ्वीवर स्थान थक्क करणारे आहे. पृथ्वीच्या एका बाजूला उत्तर ध्रुव तर दुसर्‍या बाजूला दक्षिण ध्रुव आहे. विशेष म्हणजे या दोन्ही ध्रुवांचा मध्य हिमालय पर्वत आहे. हिमालयासह पृथ्वीचा अगदी मध्यबिंदू वा केंद्रबिंदू कैलास पर्वत मानला जातो. #कैलास पर्वताची ही रचना अगदी अनोखी मानली जाते.
कैलास पर्वताची संरचना कंपासच्या चार बाजूंप्रमाणे असल्याचे सांगितले जाते.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे जगातील सर्वांत उंच पर्वत असलेल्या माऊंट एव्हरेस्टवर आतापर्यंत सुमारे ७ हजारपेक्षा अधिक जणांनी यशस्वी चढाई केली आहे. मात्र, माऊंट एव्हरेस्टपेक्षा २ हजार मीटर कमी उंची असलेला कैलास पर्वत आजपर्यंत कोणीही सर करू शकलेले नाही.
कैलास पर्वताचा आकार एखाद्या #पिरॅमिड प्रमाणे आहे. छोट्या छोट्या आकारातील तब्बल शंभर पिरामिड मिळून कैलास पर्वत बनलेला आहे, असे सांगितले जाते.
नासाच्या शास्त्रज्ञांच्या दाव्याप्रमाणे चुंबकीय शक्तींमुळे या प्रकाश छटा वेगवेगळ्या रंगांमध्ये दिसतात. परंतु, ठोस अशी माहिती अद्याप कुणाच्याही हाती लागलेली नाही. कैलास पर्वतावर चढाई करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे.
कैलास पर्वताच्या एका बाजूला संपूर्ण जगभरातील शुद्ध असा नैसर्गिक पाण्याचा झरा #मानससरोवर आहे. दुसऱ्या बाजूला क्षारांनी भरलेले व मनुष्याच्या पिण्यालायक नसलेल्या पाण्याचा स्त्रोत असून, त्याला राक्षस सरोवर म्हटले जाते. मानससरोवराचा आकार सूर्याप्रमाणे आहे, तर राक्षस सरोवराचा आकार चंद्राप्रमाणे आहे.
सिंधू, ब्रम्हपुत्रा व सतलज या महत्त्वाच्या नद्या कैलास पर्वतावर उगम पावतात, असे सांगितले जाते.
एका गिर्यारोहकाने त्याच्या पुस्तकात लिहिले होते की, त्याने कैलास पर्वतावर चढण्याचा प्रयत्न केला होता. पण या पर्वतावर राहणं अशक्य होते. कारण इथे शरीरावरील केस आणि नखे वेगाने वाढू लागतात.
कैलास पर्वत चढण्यास सुरूवात करताच व्यक्ती दिशाहीन होतो. कैलास पर्वताचे शिखर दिसत असते. मात्र, तो त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही. पर्वताच्या मध्यावर पोहोचताच हिमवादळे सुरू होतात आणि भयानक परिस्थिती निर्माण होतो, असा अनेकांनी अनुभव सांगितला आहे.
कैलास पर्वताचा आकार #शिवलिंगाप्रमाणे असून, चहूबाजूने तयार झालेल्या हिमनद्यांच्या घळ्या या एखाद्या पिंडीप्रमाणे दिसतात, असे सांगितले जाते. याशिवाय कैलास मानससरोवराजवळील क्षेत्रात नियमितपणे एक ध्वनी ऐकू येत असतो. नीट लक्ष देऊन ऐकल्यास त्याचा आवाज डमरू आणि ओमकार नादासारखा तो भासतो.
हे शिखर तिबेट इथल्या #मिलारेपा ह्या बौद्ध भिक्षूने ९०० वर्षापूर्वी सर केल्याचं बोललं जातं. पण त्यांनीही पुन्हा ह्यावर चढाई केली जाऊ नये असं बोलल्याची आख्यायिका आहे.
संदर्भ - #वेद, #पुराण, कर्नल विल्सन, रशियन गिर्यारोहक सर्जी क्रिस्तीकोव, रशियन नेत्ररोग तज्ञ एरनेस्ट मुलाडेशेव आणि इतर.

09/06/2021
09/06/2021

Thanks for like my page. Enjoy world of Tourism.

Address

Sandis Tours & Travels, 5 Amit Complex, 474 Sadashiv Peth Pune
Pune
411030

Opening Hours

Monday 10am - 6:30pm
Tuesday 10am - 6:30pm
Wednesday 10am - 6:30pm
Thursday 10am - 6:30pm
Friday 10am - 6:30pm
Saturday 10am - 6pm

Telephone

+919960000445

Alerts

Be the first to know and let us send you an email when Travel With Girish Dighe posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Travel With Girish Dighe:

Share

Nearby travel agencies


Other Tourist Information Centers in Pune

Show All