कर्दळीवन पंच परिक्रमा - माहिती
कर्दळीवनात एकूण ५ प्रमुख ठिकाणे आहेत. या पाचही दर्शन घेतल्यावरच आपली पंच-परिक्रमा पूर्ण होते. (१) श्री अक्कमहादेवी मंदिर व श्री गणेश्वर तपोभूमी (२) श्री वेंकटेश किनारा
(३) कर्दळीवन श्री अक्कमहादेवी गुहा (४) श्री स्वामी समर्थ प्रकट स्थान
(५) बिल्ववन - श्री मार्कंडेय ॠषी तप:स्थळी
या पाच ठिकाणांना भेट दिल्यावर कर्दळीवन पंच-परिक्रमा पूर्ण होते. या परिक्र
मेत घनदाट जंगलाबरोबरच वन्य प्राणी, पशू, पक्षी, नाग, सर्प यांचेही वास्तव्य आहे. त्यामुळे अनुभवी मार्गदर्शका बरोबरच ही परिक्रमा पूर्ण करणे हिताचे ठरते. एकूण अंतर खालीलप्रमाणे आहे. (१) वेंकटेश किनारा ते अक्कमहादेवी गुहा – ९ कि.मी.
यामध्ये जाण्यासाठी दगडधोंड्यानी भरलेली पायवाट आहे. तसेच आजूबाजूला जंगल आहे.या टप्प्यावरील पर्वतांचे खडे (उभे) चढण आहे. यामध्ये कोठेही पाण्याची किंवा कसलीही सोय नाही. सगळ्यात जास्त दमछाक या टप्प्यामध्ये होते. सोबत आपल्यासाठी पाण्याची बाटली बरोबर घेऊन जावे लागते. साधारण चालीने सुदृढ व्यक्तीला ३ ते ४ तासात हे अंतर पार करता येते. वयस्कर व्यक्तींना हळूहळू गेल्यास जास्तीत जास्त ५ ते ६ तास लागू शकतात. (२) अक्कमहादेवी गुहा ते प्रकट स्थान – ५ कि. मी.
हा मार्ग तुलनेने सरळ आहे. फारसे चढण वा उतरण नाही. मात्र यामध्ये अतिशय घनदाट जंगल आहे. दुतर्फा उंच वारुळे आहेत. अनेकदा पायवाटेवर पडलेल्या वृक्षवेली बाजूला सारून पुढे वाट काढत जावे लागते. पायवाट नागमोडी वळणावळणांची आणि खाचखळग्यांनी भरलेली आहे. या ठिकाणी अक्कमहादेवी गुहेपासून साधारणपणे २ ते ३ तासात पोहोचता येते. मूळ स्थानी पाण्याचा छोटा धबधबा, एक छोटी गुहा आणि त्यामध्ये शिवलिंग आणि स्वामींची मूर्ती आहे. येथे स्नान करून पूजा करता येते. (३) प्रकटस्थान ते मार्कंडेय ऋषी तपोभूमी – ३ कि. मी.
ही पायवाट देखील घनदाट जंगलाने, दाट वृक्षवेलींनी वेढलेली आहे. तेथे जाण्यास प्रकट स्थानाहून दीड ते दोन तास लागतात. (४) मार्कंडेय ॠषी तपोभूमी ते अक्कमहादेवी गुहा – ९ कि.मी.
गेलेल्या मार्गाने प्रकट स्थानावरुन पुन्हा अक्कमहादेवी गुहेत यावे लागते. तेथे मुक्काम करता येतो. (५) वेंकटेश किनारा ते श्री अक्कमहादेवी मंदिर – ३ कि. मी.
वेंकटेश किना-याच्या डाव्या बाजूला पाताळगंगा नदी पार करुन अक्कमहादेवी मंदिराकडे जावे लागते. त्यासाठी बांबूच्या किंवा फायबरच्या बुट्टीत (छोट्या होडीत) बसून साधारणपणे १५ मिनिटे प्रवास करावा लागतो. त्यानंतर १ कि.मी. चालत गेल्यावर अक्कमहादेवीचे मंदिर लागते. पर्वताला नैसर्गिक छिद्र पडून हे मंदिर तयार झाले आहे. साधारणपणे ३०० मीटर आत बॅटरी किंवा मेणबत्तीच्या प्रकाशात चालत गेल्यावर तेथे एक छोटे शिवलिंग आहे. हा एक अदभूत अनुभव आहे. तेथेच बाहेर श्री अक्कमहादेवीची दगडी शिळेमध्ये कोरलेली अप्रतिम मूर्ती आहे.
अधिक माहितीसाठी कर्दळीवन सेवा संघाच्या कार्यालयामध्ये संपर्क साधावा. तसेच www.kardaliwan.com या वेबसाईटवरही सर्व माहिती उपलब्ध आहे.
कर्दळीवन सेवा संघ
६२२, जानकी रघूनाथ, पुलाचीवाडी, डेक्कन जिमखाना, पुणे – ४११००४
मो - ९६५७७०९६७८ / ९३७११०२४३९ फोन : ०२०-२५५३४६०१ / २५५३०३७१
ईमेल : [email protected] वेबसाईट : www.kardaliwan.com
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
कर्दळीवन स्थान आणि महात्म्य
अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे कर्दळीवनात प्रकट झाले. गुरूचरित्रामध्ये कथा भाग असा आहे की श्री नृसिंह सरस्वती हे १३ व्या शतकात श्री शैल्य जवळील कर्दळीवनात पाताळगंगेच्या पात्रात बुट्टीत बसून गेले आणि तेथे एका अश्वत्थ वृक्षाखाली बसून त्यांनी तप:साधना केली. ते बसलेल्या ठिकाणी त्यांचेभोवती वारूळ तयार झाले. अशीच साडेतीनशे वर्षे गेली. एक लाकूडतोड्या झाडाचे लाकूड तोडताना त्याचा आघात होवून त्यांची समाधी भंग पावली. तेव्हा त्या वारूळातून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ प्रकट झाले. कर्दळीवन हे स्थान आंध्र प्रदेशामध्ये हैद्राबादपासून २१० किमी अंतरावर असलेल्या श्रीशैल्यजवळ आहे. श्री शैल्य या ज्योतिर्लिंगाजवळ कृष्णा नदी पाताळगंगा रूपाने जवळजवळ २०० कि.मी. वाहते. हा सर्व परिसर अत्यंत घनदाट अरण्याने वेढलेला आणि दुर्गम असा आहे. तेथे जाण्यासाठी किमान सोयी उपलब्ध व्हायला इ.स. २००० हे साल उजाडले. कर्दळीवनात चेंचुआ या जमातीचे आदिवासी लोक रहात आहेत. कर्दळीवन यात्रेसंबंधी अनेक समज, अपसमज आणि श्रद्धा आहेत. इतर तीर्थक्षेत्री आपल्याला इच्छा झाली की लगेच जाता येते. कर्दळीवनात जायला अवधुतांची आणि स्वामींची इच्छा असल्याशिवाय जाता येत नाही. भारतात दरवर्षी १ लाखातून १ व्यक्ती काशी-रामेश्वरला जाते, १० लाखातून १ बद्री केदारनाथला जाते, २५ लाखातून १ नर्मदा परिक्रमा करते, ५० लाखातून १ कैलास मानस सरोवर यात्रेला जाते. मात्र कर्दळीवनात १ कोटीतून १ च भाग्यवान व्यक्ती जाते. त्यामुळे कर्दळीवना विषयी लोकांना फार माहिती नाही. कर्दळीवन नवनाथ आणि नाथपंथी साधू, योगी यांचे साधनास्थळ आहे. तसेच ती सिद्धांची भूमी आहे. नागार्जून, रत्नाकर इ. सिद्धांची प्रयोगशाळा म्हणजे कर्दळीवन. कोणत्याही मूलद्रव्याचे सुवर्णामध्ये रूपांतर करायचे तंत्र त्यांनी विकसित केले होते. कर्दळीवनात विलक्षण दैवी अनुभव येतात.
फ़क्त रु. १०० “ कर्दळीवन : एक अनुभूती ” पुस्तकाची जनआवृत्ती
कर्दळीवनावरील पहिलेच पुस्तक “ कर्दळीवन : एक अनुभूती ” लेखक - प्रा. क्षितिज पाटुकले २७ ऑक्टोबर २०१२ रोजी प्रकाशित झाले आहे. एक वर्षामध्ये या पुस्तकाच्या १० आवृती आणि ५०,००० प्रती वितरित झाल्या. हे पुस्तक आता प्रत्येक श्रीदत्तात्रेय भक्ताकडे आणि श्रीस्वामी सर्मथ सेवेक-याकडे असावे, या हेतूने या पुस्तकाची विशेष जन आवृत्ती तयार होत असुन ती फक्त रु.१००/- यामध्ये उपलब्ध होत आहे . तिची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरु असून हि जन आवृत्ती १ जानेवारी २०१४ रोजी प्रकाशित होत आहे. प्रत्येकाने स्वत:साठी हे पुस्तक घ्यावे आणि सर्वांना भेट द्यावे. प्रकाशनपूर्व नोंदणी २० डिसेंबर २०१३ पर्यंत कर्दळीवन सेवा संघाच्या कार्यालयामध्ये करता येईल. तसेच बँक खात्यावर पैसे भरून आणि ऑन लाईन खात्यावर पैसे भरूनही नोंदणी करता येईल. घरपोच हवे असल्यास कुरियर आणि पोष्टेजसाठी महाराष्ट्रामध्ये रू. २०/- आणि महाराष्ट्राबाहेर रू.३०/- एवढा खर्च येईल. महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील सर्व पुस्तक विक्रेत्यांकडे आणि आमच्या प्रतिनिधिंकडेही प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू आहे.
इंग्रजी,गुजराती आणि इतर भाषांमध्ये “ कर्दळीवन : एक अनूभूती ”
हे पुस्तक १ जानेवारी २०१४ रोजी १) इंग्रजी २) गुजराती ३) हिंदी ४) कन्नड ५) तेलगू ६) संस्कॄत ७) तमिळ प्रकाशित होत आहे. त्याची किंमत रु.२००/- एवढी असून प्रकाशनपूर्व सवलतीमध्ये १५०/- रुपये मध्ये नोंदणी सुरु आहे.
व्हिडिओ डॉक्युमेंटरी डिव्हिडी
घरबसल्या संपूर्ण कर्दळीवन दर्शन घडविणारी व्हिडिओ डॉक्युमेंटोरी दिव्हिडी तयार करण्यात येत असून तिचे प्रकाशन १ जानेवारी २०१४ रोजी होणार आहे. तिची किंमत रू.३०/- इतकी असून नोंदणी सुरू आहे.
कर्दळीवन सेवा संघ ट्रस्ट
कर्दळीवन सेवा संघ ट्रस्ट मध्ये वेंकटेश किनारा येथील दत्त आश्रमाचे श्री अप्पाराव स्वामी उर्फ दत्त बाबा हे मुख्य विश्वस्त असुन “कर्दळीवन : एक अनुभुती” या ग्रंथाचे लेखक प्रा.क्षितीज पाटुकले हे अध्यक्ष आहेत. याच बरोबर देशभरातील पुजनीय शंकराचार्यांनी, दत्त संप्रदायातील अनेक महनीय व्यक्ती ,आचार्य आणि अधिकारी व्यक्तींनी या कार्याला आशीर्वाद दिलेले आहेत. कर्दळीवन सेवा संघ ट्र्स्टच्या वतीने कर्दळीवन बृहत विकास आणि कार्यविस्तारासाठी विविध प्रकारचे धार्मिक आणि सेवा उपक्रम हाती घेण्यात आले. त्याची माहिती खालील प्रमाणे
१ कर्दळीवन बृहत विकास योजना २.कर्दळीवन प्रचार आणि प्रसार योजना
३. ‘अन्नदान योजना’ ४. श्रीदत्त / श्रीस्वामी संप्रदाय अभ्यासक्रम
५. तालुके – जिल्हा - शहरे या ठिकाणे मंदिरे स्थापन करणे
६. प्रकाशने ७. धार्मिक + सामाजिक कार्ये +अनुष्ठान + यज्ञ + याग
८. गोसेवा + गोदान ९. कर्दळीवन परिक्रमा १०. इतर संलग्न कार्ये
अन्नदान : कर्दळीवनामध्ये प्रवेश करताना वेंकटेश किनारा येथील दत्त आश्रमामध्ये नित्य अन्यदान सुरु करण्यात आले आहे. कर्दळीवनामध्ये प्रक्रियेसाठी जाण्या-या सर्व भक्तांना तसेच तेथील चेंचु आदिवासींसाठी या अन्नदानाचा उपयोग केला जाणार आहे. कर्दळीवनामध्ये अन्नदानाचे वेगळेच पुण्य आहे. प्रत्येक दत्त भक्ताने आणि स्वामी भक्ताने कर्दळीवनातील अन्नदानामध्ये सहभागी व्हावे.
रस्ते बांधकाम आणि विकास : कर्दळीवनामध्ये रस्ते, मंदिर, बांधकाम, इतर आवश्यक सुविधा आणि विकास यासाठी प्रत्येकाने सहभागी होणे गरजेचे आहे. एका वीटेच्या बांधकामासाठी रु.१००१ /- आणि एका पायरीच्या बांधकामासाठी १०,००१ /- तसेच अन्य कामासाठी प्रत्येकाने आपल्या ऎपतीप्रमाणे खारीचा वाटा उचलावा, ही विनंती.
धार्मिक कार्ये : कर्दळीवनामध्ये आपल्याला अनुष्ठान, अभिषेक, दत्त्याग, आणि पुजा करता येतील. त्यासाठी आपले नाव,पत्ता .गोत्र आणि तिथी कळवावी.
१) अभिषेक : रु.१२१ /- २) श्रीस्वामी तारकमंत्र अनुष्ठान : ५२१ /-
३) श्री सत्यदत्त पुजा रु.१०२१ /- ४) श्रीदत्त याग २०२१ /-
मंदिर : वेंकटेश किनारा म्हणजे कर्दळीवन घाटाची जिथे सुरुवात होते,त्या ठिकाणी श्रीदत्तात्रेय पादुका मंदिर आणि यज्ञवेदी - यज्ञमंडप उभे करण्याचे काम सुरु झाले आहे. कर्दळीवाचा प्रचार आणि प्रसार यासाठी सर्वांना प्रतत्न करावेत हातभार लावावा ही विंनती .
स्थानिक प्रातिनिधी आणि केंद्र : कर्दळीवन सेवा संघ ट्र्स्टच्या कार्यामध्ये विविध शहरे, तालुका,विभाग, जिल्हा, देशात आणि परदेशामध्ये ज्या व्यक्तींना प्रतिनिधी म्हणुन कार्य करायचे आहे, त्यांनी संपर्क साधावा . त्यांना वैयक्तिक किंवा सामूहिक रितीने या कार्यामध्ये सहभागी होता येईल आणि आपल्या परिसरामध्ये केंद्र सुरु करता येईल.
कर्दळीवन सेवा परिवार
कर्दळीवन सेवा संघाच्या वतीने कर्दळीवन बृहत विकास आणि कार्यविस्तारासाठी विविध प्रकारचे धार्मिक आणि सेवा उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. यासाठी कर्दळीवन सेवा परिवाराची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक श्रीदत्त भक्ताने आणि श्रीस्वामी समर्थ भक्ताने कर्दळीवन सेवा परिवाराचे सभासद बनून या ईश्वरी कार्यामध्ये आपला वाटा उचलावा.
१) अजीव सभासद - रु. १,१११/-
२) मानद सभासद - रु.५,१११ /-
३) आश्रयदाता सभासद – रु.११,१११ /-
एका कुटुंबातील अनेक व्यक्तींनाही सभासद होता येईल.
आपणा सर्वांना या कार्यामध्ये सक्रीय सहभागी होण्याचे निमंत्रण देत आहोत. प्रत्येकाने या कार्याचा अधिकाधिक प्रचार आणि प्रसार करावा आणि श्रीदत्त कार्यामध्ये आणि श्रीस्वामी समर्थ कार्यामध्ये सहभागी व्हावे, ही विनंती. प्रत्यक्ष ज्या ठिकाणी श्रीदत्तप्रभू गुप्त झाले आणि श्रीस्वामी समर्थ प्रकट झाले, त्याठिकाणी आपली सेवा रूजू करून आपले इहलौकिक आणि पारलौकिक कल्याण साधता येईल.
आपली देणगी रक्कम आपल्या शहरातील स्टेट बॅंक ऒफ इंडियाच्या कोणत्याही शाखेमध्ये रोखीने / चेकने / ऑनलाईन NEFT द्वारे भरता येईल. आमच्या कार्यालयामध्ये देखिल येवून प्रत्यक्ष भरता येईल.
बॅंक खात्याचा तपशिल
खात्याचे नाव :- कर्दळीवन सेवा संघ ट्रस्ट
स्टेट बॅंक ऑफ इंडिया, डेक्कन जिमखाना, पुणे शाखा
बचत खाते क्रमांक :- ३३३९१६४५३१४ IFS Code :- SBIN0001110
`