![सह्याद्रीमध्ये भटकणार्या प्रत्येकाकडे "डोंगरयात्रा" हे पुस्तक हमखास असतेच. ग्रंथप्रेमी पॉडकास्टच्या या एपिसोड मध्ये आपण...](https://img5.travelagents10.com/573/273/1097373375732733.jpg)
22/11/2024
सह्याद्रीमध्ये भटकणार्या प्रत्येकाकडे "डोंगरयात्रा" हे पुस्तक हमखास असतेच. ग्रंथप्रेमी पॉडकास्टच्या या एपिसोड मध्ये आपण गप्पा मारतोय "डोंगरयात्रा" पुस्तकाचे लेखक आनंद पाळंदे यांच्याशी. ते एक उत्तम गिर्यारोहक, दुर्ग अभ्यासक आणि गिरीप्रेमी संस्थेचे सहसंस्थापक आहेत. या मुलाखतीत आपले विषय आहेत महाराष्ट्रातील गडकिल्ले, त्यांचा इतिहास, सह्याद्रीतील भटकंती ची सुरुवात कशी करावी? ट्रेकिंग मुळे होणारे प्रदूषण, अपघात, भटकताना नेमके काय चुकतेय, सरांची इतर पुस्तके, गिरीप्रेमी ची स्थापना का झाली? गिर्यारोहण, महाराष्ट्रातून यशस्वी झालेल्या हिमालयातल्या मोहिमा, त्यासाठी येणारी आव्हाने, तयारी, फंडिंग आणि बरेच काही!
सह्याद्रीमध्ये भटकणार्या प्रत्येकाकडे "डोंगरयात्रा" हे पुस्तक हमखास असतेच. या एपिसोड मध्ये आपण गप्पा मारतोय "डो...