Awesome Possum Explorers

Awesome Possum Explorers We organize the awesomest backpacking trips to different parts of India. We currently offer trips to Ladakh, Maharashtra and Goa.
(18)

Awesome Possum Explorers are dedicated to creating a kickass travel experience during each trip.

खर्दूंगला पास एकदा पार केला की खाली दुर्वर निल्याक्षार पाण्याची वळणावळनाची शायोक नदी दिसू लागते. नागमोडी वळणे संपली की न...
05/06/2024

खर्दूंगला पास एकदा पार केला की खाली दुर्वर निल्याक्षार पाण्याची वळणावळनाची शायोक नदी दिसू लागते. नागमोडी वळणे संपली की नुब्रा खोरे सुरु होते. लडाखी भाषेत नुब्रा म्हणजे फुलांचे खोरे.
काही वाळणांनंतर राजस्थानमध्ये जसे वाळूचे डोंगर दिसतात. एका वेगळ्या जगात प्रवेश झाल्याची जाणीव होते.
खालील चित्र हुंदरमधलि आहेत. वाळूच्या डोंगरात उंटावर बसून 2000 वर्ष जुन्या सिल्क रूट वर उंटावरून प्रवास करणाऱा व्यापारी जसा क्षितिजाकडे बघत असेल तसे बघायची संधी मिळते.
तुम्हाला लडाखला आमच्याबरोबर यायचे असेल तर संपर्क करा!
तरिख- 11-19 ऑगस्ट.
संपर्क -9673320888

नुकत्याच customised टुर मध्ये आमचे पर्यटक एका लहानशा हिमाचली गावात राहिले. सुरवातीला फोनवर बोलून समजले की यांना ट्रेक कर...
04/06/2024

नुकत्याच customised टुर मध्ये आमचे पर्यटक एका लहानशा हिमाचली गावात राहिले. सुरवातीला फोनवर बोलून समजले की यांना ट्रेक करायला आवडतं आणी मनाली आणी शिमलाचा घोंगाट शक्यतो नको असे समजले.
पर्यटकांबरोबर स्थानिक गेहरी देवी ट्रेक वर गेल्या. हा ट्रेक सोयल गावच्या एका छोट्या नदीच्या काठाशी सुरु झाला आणी एका jamadagni ऋषींच्या एका लहानशा मंदिरापाशी संपला.
वाटेवर लिंगडी नावाची भाजी वेचत वेचत आमचे पर्यटक वरती पोचले. रात्री टेन्तमध्ये राहिले आणी दिवसा गोळा केलेली भाजी सिद्दू बरोबर मस्त खाल्ली.
तुम्हाला अशी ट्रिप करायला आवडेल का?
संपर्क -9673320888

'आलोच जाऊन दोन तासात थांग ला!' असे  म्हणून खत आणायला पोते घेऊन अली फिरणू गावातून निघाला. एक बारीक वाट सिंधू नदीच्या काठा...
03/06/2024

'आलोच जाऊन दोन तासात थांग ला!' असे म्हणून खत आणायला पोते घेऊन अली फिरणू गावातून निघाला. एक बारीक वाट सिंधू नदीच्या काठाला लागून फिरणू ते थांगला जात होती. या वाटेने हा प्रवास आलीने शेकडो वेळा केला असेल. परंतु या वेळेस नियतीने त्याच्यासाठी एक वेगळाच खेळ रचला होता. पण ते त्याला तेव्हा ठाऊक नव्हतं.
अगदी रोजच्यासारखा तो शिटी मारत स्वतःशी गुणगुणत जात होता. तासाभराने तो त्याच्या काकाच्या घरी पोचला. जेवण करून एक डुलकी काढायला गेला.
साल होते 1970. भारत आणी पाकिस्तानची सैन्य तेव्हाचा इस्ट पाकिस्तान मध्ये एकमेकांविरुद्ध जुम्पली होती. दोन दिवसाने लडाख स्काऊट्स ने अत्यंत धैर्य आणी चतुराईने गिलगीत बालतीस्तन वर अचानक आक्रमण केले. काही दिवसांच्या युद्धानंतर 4 गावे आपण परत घेतली.
आलीला त्याची दुपारची झोप लागतच होती तेव्हा अचानक बॉम्ब पडण्याचे आवाज आले. घर भूकंप आल्यासारखे हालू लागले. बाहेर बघितले तर लोक घाबरून घराच्या बेसमेंट मध्ये जाऊन लपत होती. तोही गेला. तीन दिवसानंतर आवाज थांबल्यावर तो बाहेर आला ते त्याने पाऊल भारताच्या मातीवर ठेवलं. त्या दिवसानंतर त्याला त्याचा आई वडिलांना भेटता आले नाही. पाकिस्तानने विसा नकारला.
ही थरारक सत्य घटना आलीने आम्हाला त्याच थांग गावात उभी राहून संगीतली. मनात त्याच्या थोडी खंत दिसत होती पण त्याने त्याच्या मुलांचे वर्णन अभिमानाने केले. त्याचे अनेक नातेवाईक आता पुणे मुंबई मध्ये स्थायिक होते. अखेरला त्याच्या गोष्टीला गोड वळण आलेच.
आमच्या सुद्धा डोळ्यात पाणी आले आणी आम्ही अली ला अलविदा म्हणून परत हुंदर ला गेलो.
प्रवासात असे अनेक अनुभव येतात जे आपला दृष्टिकोन बदलतात. अलीबरोबर घालवलेला वेळ नक्कीच लक्षात राहील.
आमची पुढची लडाख सहल- 11-19 ऑगस्ट.
सम्पर्क- 9673320888

सप्टेंबर्मध्ये पूर्ण हिमाचल मध्ये सफरचंदाचे बगीचे फळानी लागडलेले असतात.आमच्या एका ट्रिप मध्ये आम्ही बगायतकराच्या बगीच्या...
03/06/2024

सप्टेंबर्मध्ये पूर्ण हिमाचल मध्ये सफरचंदाचे बगीचे फळानी लागडलेले असतात.आमच्या एका ट्रिप मध्ये आम्ही बगायतकराच्या बगीच्यात टुर साठी गेलो. मनसोक्तपणे सफरचंद खाल्ली आणी खाली पडलेली सफरचंद गोळा करून घरी आणली.
तशीही वाया जाणार होती ती सफरचंद आम्ही त्यांच्यापासून wine बनवली.
सप्टेंबर्मध्ये तुम्हाला हिमाचलला यायचे असेल तर संपर्क करा!
संपर्क - 9673320888

लहाउल जिल्हा हा अटल tunnel ओलांडले की येतो. इथलि खासियत म्हणजे रंगीबेरंगी कौलारू घरे. आमचा इथला homestay एक निवृत्त झाले...
30/05/2024

लहाउल जिल्हा हा अटल tunnel ओलांडले की येतो. इथलि खासियत म्हणजे रंगीबेरंगी कौलारू
घरे. आमचा इथला homestay एक निवृत्त झालेले स्थानिक colonel चालवतात. मनाली लेह हायवे वर स्थित सुमनाम गावातल्या या homestay मधून चंद्रा नदीचे खूप सुंदर दर्शन होते. आजूबाजूला लहाउल पर्वत रांग सतत साथीला असते.
आजूबाजूला broccoli, सत्तू आणी गव्हाची शेती आहे आणी जुन महिन्यात आलात तर शेतात छान फिरता येते.
तुम्हाला तुमच्या ग्रुपसाठी अशी ट्रिप प्लॅन करायची असली तर नक्की संपर्क करा!
Contact 9673320888

29/05/2024

आमच्या स्पिटी ट्रिपमध्ये कॉमिक गावाला भेट द्यायला गेलो असताना तिथे समजले की एक गावाचा उरूस सुरु आहे. समजले की एक मोठे लामा प्रवचन द्यायला आले आहेत. पोचल्यावर आम्ही तिथल्या मोनास्टरी मध्ये लोकांबरोबर बसलो.
मुळात कॉमिक हे गाव जगातले सर्वात उंचावरचे गाव आहे जिथे रोड पोचला आहे. एका पठारावर स्थित हे गाव अत्यंत सुंदर आहे.
मग काय थोडावेळ तिथे टाईमपास झाल्यानंतर समजले की तिथेच मोनास्टरी मध्ये जेवणाची सोय आहे. दुपारचे 2 वाजले होते. पोटातून आवाज यायला लागले होते. आणी खमंग जेवणाचा सुगंध येऊ लागला होता. मग काय! फार विचार न करता आम्ही पण गावकर्यांबरोबर पंगतीत बसलो आणी जेवणाचा आनंद घेतला.
तुम्हाला पण असे स्पिटी बघायचे असले तर नक्की संपर्क करा!
संपर्क - 9673320888
follow

माणसाला माणूस ज्या गोष्टी बनवतात. एका आगीभोवती गोळा होऊन गप्पा मारणे, रोज सकाळी उठून् श्रम करणे. या सगळ्या सवई आपण अगदी ...
18/05/2024

माणसाला माणूस ज्या गोष्टी बनवतात. एका आगीभोवती गोळा होऊन गप्पा मारणे, रोज सकाळी उठून् श्रम करणे. या सगळ्या सवई आपण अगदी काही फुटकळ गोष्टींसाठी सोडून दिल्या आहेत. अशा जगात 'mental illnesses' हे अपवाद नाही,तर 'new normal' बनले आहेत. आणी यात आश्चर्यजनक सुद्धा काही नाही. आपले शरीर निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासाठी बनले आहे. ज्या गोष्टी या आजारी समाजात नॉर्मल बनल्या आहेत त्या आपल्या शरीरासाठी अत्यन्त abnormal आहेत.
आमच्या ट्रिपसद्वारे आम्ही निसर्ग आणी माणूस हे दोन दृव जे खरे तर एक आहेत पण ज्यांच्यातली नाळ तुटली आहे ती जोडण्याचा प्रयत्न करतो.
तुम्हाला ज्या गोष्टी माणूस बनवतात त्या गोष्टी पुन्हा एकदा स्वतःसाठी शोधून काढायच्या असतील तर नक्की आमच्याबरोबर ट्रिप customise करा!
संपर्क - 9673320888

आमच्या हिमाचलच्या प्रत्येक ट्रिप मध्ये आम्ही आमच्या पर्यटकांना लोकल लोकांच्या घरी भेट घ्यायला नेतो.गेल्या तीन वर्षांपासू...
17/05/2024

आमच्या हिमाचलच्या प्रत्येक ट्रिप मध्ये आम्ही आमच्या पर्यटकांना लोकल लोकांच्या घरी भेट घ्यायला नेतो.
गेल्या तीन वर्षांपासून आम्ही सोयल नावाच्या गावात गेहरी देवींकडे लोकांना दुपारच्या जेवणासाठी नेतो.त्या प्रेमाने आम्हाला राजमा चावल आणी लोकल लिंगडी नावाची भाजी करून देतात.
त्यांचा लाकडी काठकुनी घरात राहून गप्पा मारत मारत कधी संध्याकाळच्या चहाची वेळ होते कळत नाही.
त्या माग आम्हाला त्यांच्या सफरचंदाच्या बगीच्यांची टुर करायला घेऊन जातात. त्यांच्या घरापासून दोन मिनिटावर असलेल्या ओढ्याचा आवाज सतत आमच्या साथीला असतो.
तुम्हाला हे असे हिमाचल बघायचे असेल तर नक्की संपर्क करा!
संपर्क - 9673320888

तीर्थन खोऱ्यात असलेले शोजा गाव आहे पावसानंतर एखाद्या स्वप्नातल्या गावासारखे दिसते. खिडकीतून ढगांना हात लावत गरमागरम चहा ...
16/05/2024

तीर्थन खोऱ्यात असलेले शोजा गाव आहे पावसानंतर एखाद्या स्वप्नातल्या गावासारखे दिसते. खिडकीतून ढगांना हात लावत गरमागरम चहा प्यायला फार मजा येते. या गावाच्या वर थोड्याच अंतरावर एक देवदार झाडांचे जंगल आहे. त्यात थोड्यावेळासाठी का होईना हरवून गेले की मनाला जी शांतता मिळते ती शब्दात मांडू शकत नाही.
तुम्हाला या गावाला ट्रिप customise करायची असेल तर संपर्क करा!
सम्प्र्क- 9673320888

Big shout out to our newest top fan! 💎 Sonal Modak
15/05/2024

Big shout out to our newest top fan! 💎 Sonal Modak

15/05/2024

नुकत्याच झालेल्या ऑफबीट हिमाचल ट्रिपमध्ये आमचा ग्रुप एका लोकल फॅमिलीबरोबर राहिला. आम्ही रांगडी नावाच्या एका छोटाशा टुमदार गावात एकांकडे राहिलो.
एका दुपारी आमच्या पर्यटकांनी लोकल ड्रेस पट्टू हा घालून बघितला. लोकरीपासून बनवलेला हा ड्रेस खरेतर लोकरीच्या साडीसारखाच. आमच्या पर्यटकांनी हा ड्रेस कसा बनतो हे देखील जाणून घेतले.
तुम्हाला ऑफबीट हिमाचल अनुभवायचं असेल तर नक्की संपर्क करा!
9673320888

14/05/2024

आमच्या प्रत्येक लडाख ट्रिपमध्ये आम्ही गावात चालायची ऍक्टिव्हिटी करतो. तूर्तूक हे गाव गिलगीट बालतीस्तन नावाच्या प्रदेशात आहे. ही 4 गावे 1971 पर्यंत पाकिस्तानात होती.
इथे अजूनही 1970 च्या युद्धाच्या खुणा दिसतात. बॉम्ब चे तुकडे आणी स्थानिक् लोकांच्या गोष्टी अजूनही तेव्हाची दृश्ये अगदी डोळ्यासमोर आणतात.
कुठलीही जागा जर स्वतःच्या दोन पायानी अनुभवली तर ती वेगळ्या पद्धतीने कळते.
तुम्हाला देखील इथे जायचे असेल तर नक्की संपर्क करा!
9673320888

नमस्कार मी इंद्रनील वर्तक, मी घेऊन येत आहे Awesome Possum Explorers तर्फे स्पिटी ची एक आगळीवेगळी ट्रिप.या ट्रिप मध्ये आप...
13/05/2024

नमस्कार मी इंद्रनील वर्तक, मी घेऊन येत आहे Awesome Possum Explorers तर्फे स्पिटी ची एक आगळीवेगळी ट्रिप.
या ट्रिप मध्ये आपण लोकल स्टेस मध्ये राहू, लोकल खानपान चाखून बघू आणी अत्यंत सुंदर अशा सृष्टीचा अनुभव घेऊ. आपला एक स्टे चंद्रताल लेक च्या काठाशी असेल. निळ्या पाण्याचा हा 15000 फुट उंचीवरचा लेक अफाट सुंदर आहे.
तुम्हाला यायचं असेल तर संपर्क करा!
तरिख- 20- 27 जुलै
संपर्क 9673320888

स्पिटी मध्ये अशी टुमदार मातीची घरे बघायला मिळतात. शेण आणी माती कुजवून बनवलेली ही घरे अनेक वर्ष जसीच्या तशी राहतात. वरती ...
12/05/2024

स्पिटी मध्ये अशी टुमदार मातीची घरे बघायला मिळतात. शेण आणी माती कुजवून बनवलेली ही घरे अनेक वर्ष जसीच्या तशी राहतात. वरती गचीवर गवत आणी भाज्या थंडीसाठी वाळवण्यासाठी जहा असते. याचा दुसरा उपयोग म्हणजे इथे बसून तासंतास गप्पा टाकणे.
तुम्हाला अशा एका घराला भेट द्यायची असेल तर नक्की संपर्क करा.
ट्रिप तारीख - 20-27 जुलै
संपर्क - 9673320888

11/05/2024

असं म्हणतात एक अखं आयुष्य फक्त अप्रिकॉट ब्लॉसम बघण्यात गेले तरी ते सार्थक आयुष्य गणलं जाईल.
हिच फुले ऑगस्टमध्ये जारदाळूच्या फलांमध्ये रूपांतरीत होतात. तुम्हाला अशा बागा बघायच्या असतील तर नक्की तुमची लडाख ट्रिप customise करा.
संपर्क 9673320888

10/05/2024

ऊत्तरेला कारकोरम पर्वत, दक्षिणेला लडाख रेंज आणी सभोवतली बर्फाच्या पाण्याचे खळखळते झरे. नुब्रा खोरे ही एक अद्भुत जागा आहे.
बगीच्यांमध्ये चक्कर मारताना असंख्या पक्ष्यांचे मधुर आवाज साथीला असतात.
सकाळच्या कोवळ्या उन्हात आमची camp साईट किती सुंदर दिसत आहे ना?
तुम्हाला इथे राहायचे असेल तर संपर्क करा.
आमच्या custmised ट्रिप असतात लडाखच्या.
संपरक-9673320888

कोकणात जाऊन मासे आणी आंबे न खाणे आणी हिमाचलला येऊन मनसोक्तपणे सफरचंद न खाणे हा घोर अपराध असतो!आमच्या मनाली, तीर्थन आणी क...
08/05/2024

कोकणात जाऊन मासे आणी आंबे न खाणे आणी हिमाचलला येऊन मनसोक्तपणे सफरचंद न खाणे हा घोर अपराध असतो!
आमच्या मनाली, तीर्थन आणी कसाउलीच्या च्या सहलींमध्ये मनसोक्तपणे बगीच्यांमध्ये बागडत सिझनल फळे खायचा आनंद घेता येतो.
इथे हा अनुभव घ्यायचा असला तर जुलैनंतर इथे यायचं.
तुम्हाला तुमच्या मित्रपरिवारासोबत इतर यायचं असेल तर नक्की संपर्क करा!
9673320888

कसौलि हे ब्रिटिशांच्या काळापासून चंदीगड पासून जवळ असे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. फक्त 4 तासावर असलेले स्थित कस...
07/05/2024

कसौलि हे ब्रिटिशांच्या काळापासून चंदीगड पासून जवळ असे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. फक्त 4 तासावर असलेले स्थित कसाउलीच्या जवळ बरोग, शिमला आणी सोलन सारख्या जागा आहेत. आम्ही आमच्या पर्यटकांना एका सफरचंदाच्या बगिच्यात स्थित एका लक्सरी कॉटेज मध्ये ठेवतो. आजूबाजूला मुलांना बागडायला ऐसपैस जागा आहे आणी वाटलेच तर शिमल्याला ही एका दिवसात जाऊन येता येतं.
तुम्हाला इथे स्टे बुक करायचा असला तर नक्की कॉन्टॅक्ट करा!
9673320888

Come explore Spiti with us this year!We will visit ancient monasteries, high altitude passes and stunning villages.Get i...
04/05/2024

Come explore Spiti with us this year!
We will visit ancient monasteries, high altitude passes and stunning villages.
Get in touch know more!

Stay in a magical place surrounded by tall Himalayan peaks. We have a stunning mud house with a beautiful farm and a lov...
03/05/2024

Stay in a magical place surrounded by tall Himalayan peaks. We have a stunning mud house with a beautiful farm and a loving family who runs the place.
If you want to plan a trip to Lahaul! Get in touch with us.
Contact- 967332088

आज तीर्थन customised टुर मध्ये आमचे पर्यटक एक उंचीवर वासलेल्या गावात चालायला गेले. त्यांच्याबरोबर आमचा स्थानिक गाईड होता...
02/05/2024

आज तीर्थन customised टुर मध्ये आमचे पर्यटक एक उंचीवर वासलेल्या गावात चालायला गेले. त्यांच्याबरोबर आमचा स्थानिक गाईड होता. उन्हाळा सुरु झाला की संपूर्ण हिमालय परिसरात कारवंदासारख्या berries ची झुडपे दिसतात. आमच्या पर्यटकांनी या berries खात खात हा लहान ट्रेक पूर्ण केला.
जवळच एका प्राचीन देवताच्या मंदिराला देखील भेत दिली. नंतर एका गावातच्या मैदानात बसून मोकळ्या आकाशाखाली जेवायचा आनंद लुटला.
तुम्हाला इथे ट्रिप प्लॅन करायची असली तर नक्की contact करा!
संपर्क - 9673320888

30/04/2024

प्रतिकूल परिस्थितींमध्ये लोक घडतात. हे वाक्य स्पिटीसारख्या परिसरात पदोपदी खरं ठरताना दिसते.
आमच्या एका स्पिटी ट्रिपमध्ये आम्हाला लांबून लहान मुलांचा आवाज आला! लक्ष देऊन ऐकलं तेव्हा समाजलं ती मुले हिंदी मध्ये पाढे म्हणत होती.
कुतूहल म्हणून आम्ही त्यांच्या दिशेने गेलो तेव्हा त्यांचे शिक्षक आम्हाला हसून 'बसा'असे खुणवून म्हणाले. त्यांचा वर्ग संपेपर्यंत आम्ही ती लहानशी शाळा बघायला गेलो. मातीने लेपलेली इमारत त्यात जेमतेत 50 मुले बसतील एवढी जागा आणी शेजारीच एक स्वयंपाकघर ज्यात काही बायका midday meal बनवत होत्या.
साल 2021 होते आणी कोविड नुकताच गेला होता. तेव्हा आम्हाला त्या शिक्षकांनी समजावलं की कोविड मध्ये शाळा बंद असल्या कारणाने लहान मुले लिहायला वाचायला सरावाशिवाय विसरली होती. तेव्हा त्या शिक्षकांनी स्वतःची जबाबदारी म्हणून घरोघरी जाऊन मुलांना परत शाळेत येण्यासाठी मनवलं. हिटर ची सोय नसल्याकारणाने वर्ग सुद्धा बाहेर उन्हात बसून घेत होते.
त्यांची त्यांच्या कामासाठी निष्ठा बघून आम्हाला त्यांच्यासाठी कौतुक वाटलं.
भारतासारख्या बलाढ्या देशाला तारून नेण्याचे काम individual व्यक्ती घेतात. कर्मयोग त्यादिवशी आम्ही अनुभवला.
तुम्हाला अशा interesting लोकांना भेटायचं असलं तर आमच्या स्पिटी ट्रिप वर चला .
तारिख- 9673320888

29/04/2024

Awesome Possum Explorers सुरु केलं तेव्हा लोकांना त्या जागा दाखवायच्या आधी स्वतः आधी फिरायला बाहेर निघालो. एक bag त्यात मोजके काही कपडे आणी सगळीकडे लोकल गाडयांनी प्रवास. फिरत असताना सर्वात आठवणी देऊन जाणारे अनुभव म्हणजे लोकांच्या घरी त्यांच्या बरोबर राहताना. गावातले लोक कसे पटकन एका अनोळखी माणसावर विश्वास टाकतात हे बघून मला थोडा त्यांचा हेवाच वाटला. ही mentality स्वतः मध्ये आत्मासात करण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे सांगत बदलायची ठरवली. जास्तीत जास्त साध्या गावात राहणाऱ्या लोकांमध्ये राहायचं ठरवलं.
व्हिडिओ मधला होमेस्ट लेह मधला आहे. यांचा घरी सुद्धा एका दिवशी असा भटकत् भटकत पोचलो होतो. त्या परिवारातील् आजी आजोबा , टिल्ली पिल्ली पोरं कधी आपलीशी वाटायला लागली हे कळलं सुद्धा नाही.
त्या दिवसापासून आपल्या सगल्या लडाख ट्रिप चा पहिला मुक्काम इथे असतो. मी जे अनुभवले ते माझे पर्यटक अनुभवताना पाहताना थोडीशी समाधानाची भावना येते.
Contact 9673320888

27/04/2024

नुकत्याच झालेल्या तीर्थन valley च्या customised ट्रिप मधल्या काही आठवणी.
आमचा ग्रुप एका लहानशा गावात भटकायला गेला. आमच्या स्थानिक guide ने त्यांना खाता येऊ शकणारी mushroom कशी ओळखायची हे शिकवलं.
तिथेच जवळ काही लोकल मुले क्रिकेट खेळत होती. आमच्या travellers साठी आम्ही तिऱ्हेच गवतात लोकल राजमा चावल आणी वेचलेल्या mushroom ची भाजी असा बेत बनवला.
तुम्हाला अशी ट्रिप तुमच्या मित्रांबरोबर कारायची असली तर नक्की संपर्क करा!
contact- 9673320888

24/04/2024

आमच्या हिमाचल customised ट्रिप मध्ये आम्ही दर वेळेस रूमसू गावाला भेट देतो. तिथे आमचे दुपारचे जेवण एका लोकल घरात असतं. याच घरातल्या महिला पट्टू नावाचे कपड बनवत होत्या.
पट्टू म्हणजे सोप्प्या शब्दात सांगायचं तर लोकरापासून बनवलेली साडी. एक पट्टू बनवण्यात साधारण 20 दिवस लागतात. शेतकाम आणी घरकाम सांभाळून इथल्या बायका हे काम सांभाळतात. परंपरिक रित्या काही designs चालत आली आहेत पण प्रत्येक पट्टू बनवणारी आपली एक छाप या कपडावर सोडून जाते.
आमच्या पर्यटकांनी सुद्धा काही पट्टू विकत घेतले आणी ते घालून फोटो काढले!
पर्यटन म्हणजे आयुष्य एका वेगळ्या तर्हेनी थोड्या का होईना वेळासाठी जगण्याची संधी.
तुम्हाला हिमाचलला तुमच्या मित्रांबरोबर केव्हा नातेवाईकांबरोबर ट्रिप प्लॅन कारायची असेल तर संपर्क करा!
संपर्क - 9673320888

22/04/2024

Pangong is a dream one doesn't want to get out of!

To travel here come alomg on our trips.!
Dates-
18 to 24 may
1st to 7 june

Contact 9673320888

What's your favorite travel movie?Mine are -1) Secret life of Walter Mitty2) Curious case of Benjamin Button3) Into the ...
22/04/2024

What's your favorite travel movie?
Mine are -
1) Secret life of Walter Mitty
2) Curious case of Benjamin Button
3) Into the Wild

21/04/2024

Can you guess whats special about this camel?

To see this camel. Travel with us to Ladakh.
Dates-
18 to 24 May
1st to 7 june.

Hello ! I am planning a trip to Spiti in july  for around 20 people. The route will be-Manali-Atal Tunnel- Kaza-Hikkim-K...
21/04/2024

Hello ! I am planning a trip to Spiti in july for around 20 people. The route will be-

Manali-Atal Tunnel- Kaza-Hikkim-Komik - Ki-Kibber-Tabo- Kaza- Chandratal-Manali.
The trip will take us through Atal tunnel and through some of the best sceneries in the Himalayas.
We will witness the Langza Gompa, the fossils, world's highest post office, and stay in some of the prettiest homestays!.

Anyone interested to join?
Contact - 9673320888
Follow Awesome Possum Explorers

धर्मकोट गावात Awesome Possum Explorers साठी सहल आयोजित करण्यासाठी फिरत होतो. एक लहान पयवत मुख्य रस्ता सोडून गावातून खाली...
20/04/2024

धर्मकोट गावात Awesome Possum Explorers साठी सहल आयोजित करण्यासाठी फिरत होतो. एक लहान पयवत मुख्य रस्ता सोडून गावातून खाली जाताना दिसली. पहिल्यापासूनच मला अशा वाटंवर चालायला आवडायचं. नेहमी कुठली वाट दिसली की कुतूहल ही असतं. ही वाट कुठे जात असेल बर?
म्हणून या वाटेचा पाठलाग करत या सुरेख् तुमदार घरापाशि पोचलो. अत्यंत साधं पण छान साजवलेलं घर होतं. आत कोणी आहे बघायला डोकावलं तर काही छोटी मुले खेळताना दिसली. त्यांच्या आई वडिलांनी आग्रहानी चहा पाजला. मी सुद्धा मनात नोंद केली. परत पर्यटकांना घेऊन आलो की नक्की यांच्याकडे दुपारच्या जेवणासाठी थांबायचे.
तुम्हाला इथे ट्रिप customise कारायची असली तर नक्की संपर्क करा!
संपर्क - 9673320888

Address

Abhinandan/B Apartments, Lane No. 2, Prabhat Road
Pune
411004

Alerts

Be the first to know and let us send you an email when Awesome Possum Explorers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Awesome Possum Explorers:

Videos

Share

Category

Our Story

Travel. Explore. Live

We are not only a travel company but also your partners in exploration.

We believe that travelling and exploring new places, meeting new people and learning about different culture keeps everyone happy and rejuvenates them for life. We want to spread this joy in the world!

We currently offer Eco- trips to Sikkim, Spiti and Goa.

Nearby travel agencies


Other Travel Agencies in Pune

Show All

You may also like