Pune Darshan - पुणे दर्शन

Pune Darshan -  पुणे दर्शन Information about the Tourism, Heritage Spots in and around Pune!

शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे ।वसिष्ठा परी ज्ञान योगीश्वराचे ॥कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा।नमस्कार माझा सद्गुरु रामदा...
05/03/2024

शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे ।
वसिष्ठा परी ज्ञान योगीश्वराचे ॥
कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा।
नमस्कार माझा सद्गुरु रामदासा॥
॥ जय जय रघुवीर समर्थ॥
आज दास नवमी!

दोन विद्यार्थांचे प्राण वाचवण्यासाठी पुणेकरांनी बस ऊचललीपुणेकरांचे हेही रूप पाहावे फर्ग्युसन काॅलेज रस्त्यावर झालेल्या ए...
05/10/2022

दोन विद्यार्थांचे प्राण वाचवण्यासाठी पुणेकरांनी बस ऊचलली
पुणेकरांचे हेही रूप पाहावे

फर्ग्युसन काॅलेज रस्त्यावर झालेल्या एका विचित्र अपघतात
बसखाली सापडलेल्या दोघाजणांना वाचवण्यासाठी
पुणेकरांनी सामुहीक प्रयत्न करत बस ऊचलून धरली.
ज्या पुणेकरांनी या दोघांना वाचवण्यासाठी अथक प्रयत्न करून
त्यांचे प्राण वाचवले केले त्यांना सलाम !

पुणेकरांवर केलेले खूप जोक्स वाचले असाल !
तर त्यांच्यावर हसणाऱ्यानी पुणेकरांचे हेही रूप पाहावे

 उत्सुकता म्हणून माहिती काढली. पुण्यातला चांदणी चौकातला ब्रिज ३० वर्षांपूर्वी बार्ली इंजिनिअर्स या कंपनीने काही लाखात बा...
03/10/2022


उत्सुकता म्हणून माहिती काढली. पुण्यातला चांदणी चौकातला ब्रिज ३० वर्षांपूर्वी बार्ली इंजिनिअर्स या कंपनीने काही लाखात बांधला होता. त्याचं डिझाईन PWD चं होतं. बार्ली ही अनंत लिमये आणि सतिश मराठे यांची कंपनी होती. तेव्हा पूल उभा करणं मोठं चॅलेंज होतं. पण अतिशय सचोटीने काम करणाऱ्या टीमनं ते आव्हान पेललं. हा पूल बांधण्यासाठी बिहारचे मजूर होते तर PWD चे कुलकर्णी नावाचे एक प्रामाणिक अधिकारी होते. त्यांचं सुरुवातीपासून या कामावर बारीक लक्ष होतं. 1982 ते 2002 या काळात बार्ली या कंपनीने जवळपास २० पूलांची बांधणी केलीय. आळंदीतला मंदिराकडे जाणारा पूलही त्यांनीच बांधला. अनंत लिमये आज आपल्यात नाहीत, पण ७६ वर्षीय मराठे सरांना काॅल करून अभिनंदन केल्यावर त्यांना भरून आलं. ते म्हणाले, कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की आपल्या कामाचं असं कौतुक होईल. पण देश अशाच माणसांमुळे उभा राहातो. हेच आपलं वैभव. समाज म्हणून अशा माणसांचं आपण कौतुक करणं आपलं कर्तव्य आहे. पिण्याच्या पाण्याच्या टाकीचा ग्लास जिथे साखळीने बांधून ठेवावा लागतो तिथं प्रामाणिक माणसांचं कौतुक वाटतं.
आपण अशा माणसांचा गौरव करायला हवा.

(फोटो सतिश मराठे सरांचा आहे.)
-विलास बडे

20/08/2022

सुवर्णयुग तरुण मंडळ (दगडूशेठ हलवाई गणपती)...
पुणे, दहीहंडी उत्सव.
साहसाची परिसीमा चित्तथरारक अनुभूति !

टिमवर्क, धडाडी, धैर्य, एकमेकांवरचा विश्वास, सुयोग्य आखणी आणी आखणी प्रमाणे बेमालूम कामाची अंमलबजावणी...

एडवेंचर स्पोर्ट्स

🌹 🙏🏼 🌹

Address

Pune
411001

Opening Hours

Monday 7am - 9pm
Tuesday 7am - 9pm
Wednesday 7am - 9pm
Thursday 7am - 9pm
Friday 7am - 9pm
Saturday 7am - 9pm
Sunday 7am - 9pm

Telephone

+918180020066

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pune Darshan - पुणे दर्शन posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share


Other Tourist Information Centers in Pune

Show All