Parashar Agri & Culture Tourism

Parashar Agri & Culture Tourism Parashar Agritourism, Junnar is ideal center for Agri Tourism, Village Tourism & Eco tourism. We have started our accommodation facilities since 4th Sept 2011.
(2)

Introduction
Parashar Agritourism is registered center with MTDC [Maharashtra Tourism Development Corporation] under Mahabhraman Scheme. Parashar Agritourism has started its work with celebrating Maharashtra’s 1st Grape Festival in April 2011. With working we have followed some discipline to serve our guests. As our culture is known for “Atithi Devo Bhav “and “Vasudhaiva Kutumbakam” it is our resp

onsibility to be on it. Through Parashar Agritourism we are trying to do so. Agriculture is not only farming but its culture of human being. Unfortunately with modernization we are on toe of advance facilities and all, we become addicted for Pizzas, burger and other fast food which is not good for health and this entire very well known by you too. Fortunately we are living in such country where we can eat fresh food on each day. We have to focus on it. This is our small effort to promote agriculture as a culture and to create awareness about farming and to help to give that prestige to farming. Parashar Agritourism is ideal model of community tourism where we have developed accommodation facilities on 1 acre barren land. To see different farm experiments we are taking farm tour on near about 60 acres of land which is cultivated by different farmers. When guests used to visit their farms, they can purchase fresh agriculture produce from them. During farm tour by seeing well maintained farm, your two words of appreciation will give encouragement to that farmer to work more. At Parshar Agritourism, we are celebrating so many festivals throughout the year. Grape festival [!5th Jan-10th April], Jatra Festival and Tamasha [Maharashtra folk art] festival during Holi period, Village Festival in August, Rainy festival , Diwali festival, Kojagiri Festval and many more.
“During taking our meal, we should not to waste it in plates” guests are moving from our place with this feeling after knowing that how tough work is to produce food.

कला ही आजूबाजूला घडणाऱ्या अगणित घटनांची एकत्रित नोंद आणि त्याची अभिव्यक्ती असते. त्याला कल्पनेच्या आवाक्याची जोड मिळाली ...
12/04/2024

कला ही आजूबाजूला घडणाऱ्या अगणित घटनांची एकत्रित नोंद आणि त्याची अभिव्यक्ती असते. त्याला कल्पनेच्या आवाक्याची जोड मिळाली की अफलातून निर्मिती होते. मग त्यासाठी माध्यम कुठलेही असो, निर्माण होणाऱ्या प्रत्येक कलाकृती सोबत, कला अजून उन्नत आणि उत्क्रांत होत जाते. कलाकृती साकारताना कला जरी बहरत असली तरी कलाकृतीकार मात्र नेहमीच रिता होत जातो, आणि त्यानं/तिनं तसं व्हायलाही हवं नाहीतर; नव्या घटनेची नवी नोंद आणि तशीच नव्याने अभिव्यक्ती निर्माण कशी होईल?

11/04/2024
गुढीपाडव्याच्या आभाळभर शुभेच्छा झाडाला फुटणाऱ्या नव्या नवतीच्या उमेदीने आणि नव्या पालवीच्या उत्साहाने आपल्या आयुष्यात आन...
09/04/2024

गुढीपाडव्याच्या आभाळभर शुभेच्छा झाडाला फुटणाऱ्या नव्या नवतीच्या उमेदीने आणि नव्या पालवीच्या उत्साहाने आपल्या आयुष्यात आनंद येत राहो
#गुढीपाडवा #मराठी #संस्कृती

Tractor training workshop for John Deere India Team.
19/01/2024

Tractor training workshop for John Deere India Team.

Ahilya, Ready with Parashar's organic veggies for school's weekly market.
13/01/2024

Ahilya, Ready with Parashar's organic veggies for school's weekly market.

04/10/2023

Expecting

*रानभाजी महोत्सव नाणेघाट २०२३* -जुन्नरची आदिवासी जीवन पद्धती अनुभवण्याची सुवर्णसंधी..!*ठिकाण* - नाणेघाट ब्रिटिशकालीन फडक...
22/09/2023

*रानभाजी महोत्सव नाणेघाट २०२३*
-जुन्नरची आदिवासी जीवन पद्धती अनुभवण्याची सुवर्णसंधी..!
*ठिकाण* - नाणेघाट ब्रिटिशकालीन फडके बंधारा घाटघर.
https://maps.google.com/?q=Naneghat%2C+Ghatghar%2C+Maharashtra+421401&ftid=0x3bdd68cd2369eccf:0x8667a13893e246be&entry=gps
*दिनांक*- ३० सप्टेंबर व १ आक्टोबर (शनिवार व रविवार)
*आयोजक*- ऋषिकेश परिवार व घाटघर ग्रामपंचायत
*संयोजक*- पराशर कृषी व संस्कृती पर्यटन
*डिजिटल सहकार्य*- सोमनाथ नागवडे सोशल मीडिया
*रानभाजी महोत्सवाची वैशिष्ट्ये*
☘️ रानभाज्यांची ओळख करून देणारे आणि महत्त्वपूर्ण माहिती देणारे स्टॉल्स.
☘️ रानभाज्यांचे पोषणमूल्य व आरोग्यासाठी औषधी मूल्य, रानभाज्यांच्या चवदार रेसिपीज कशा बनवायच्या याविषयी माहिती देणाऱ्या अनुभवी आदिवासी आजी
☘️ रानभाजी पाककला स्पर्धा
☘️ रानभाजी व आदिवासी खाद्यसंस्कृतीचे स्टॉल्स जिथे रानभाजी थाळी, खेकडा व गावठी चिकन थाळी, नाचणीचं सूप अशी खमंग जेवणाची मेजवानी
☘️ आदिवासी जीवन पद्धतीचं संग्रहालय जिथे विविध प्रात्यक्षिके आपल्याला बघायला मिळू शकतात
☘️आदिवासी जीवन पद्धतीतील मनोरंजनाचे खेळ आणि लोककलांचे सादरीकरण या निमित्ताने असणार आहे.
☘️ रानभाजी टूर व रानभाजी वॉक या निमित्ताने होईल जिथे आपल्याला रानभाज्यांची प्रत्यक्ष ओळख करून घेता येईल.
☘️ आणि परिसरातील पर्यटन जसे की नाणेघाट, जीवधन किल्ला, रिव्हर्स वॉटर फॉल आपल्यासाठी असणारच आहे.
... *एकंदरच अनुभव सिद्ध पर्यटनाची जबरदस्त मेजवानी आपल्याला या रानभाजी महोत्सवाच्या निमित्ताने मिळणार आहे*


*रानभाजी महोत्सवातील निशुल्क गोष्टी*
१. रानभाजी माहितीचे स्टॉल्स २. रानभाजी पाककला स्पर्धा ३.रानभाजी पोषणमूल्य माहिती ४. आदिवासी जीवनपद्धती मनोरंजनाचे खेळ व सहभाग
५. आदिवासी जीवनपद्धती लोककला सादरीकरण
६.परिसरातील पर्यटन (नाणेघाट, जीवधन)

*रानभाजी महोत्सवातील शुल्क देऊन करायच्या गोष्टी*
१. आदिवासी खाद्य संस्कृती अनुभव
२. आदिवासी जीवन पद्धती संग्रहालय
३. आदिवासी जीवनपद्धती प्रात्यक्षिके
४. रानभाजी वॉक/ रानभाजी टूर

*शुल्क*
१. आदिवासी जीवनपद्धती संग्रहालय भेट व प्रात्यक्षिके अनुभव- ₹१००/प्रत्येकी
२. रानभाजी टूर/ वॉक- ₹१००/प्रत्येकी
३. बैलगाडी राईड- ₹२०/प्रत्येकी

*खाद्यसंस्कृती शुल्क*
१. रानभाजी थाळी - ₹१५०
२. खेकडा थाळी - ₹२००
३. फिश थाळी/ गावठी चिकन थाळी- ₹२००
४. मटन थाळी- ₹३००
५. भाजी भाकरी- ₹५०
६. सेंद्रिय नाष्टा- ₹३०
७. नाचणी सूप- ₹30
८. सेंद्रिय चहा- ₹२०

*१ दिवसीय सहल-रानभाजी महोत्सव*
ऍक्टिव्हिटीज
१. सकाळचा चहा नाष्टा
२. रानभाजी महोत्सवातील विविध स्टाल्स भेटी.
३. मनोरंजनाच्या खेळांमध्ये सहभाग
४. लोककला सादरीकरण आस्वाद
५. आदिवासी बांधवांच्या घरी, आदिवासी खाद्य संस्कृती चा आस्वाद (व्हेज, नॉन व्हेज)
६.आदिवासी जीवनपद्धती संग्रहायलय भेट व जीवनपद्धती प्रात्यक्षिके सहभाग
७. गाईडसोबत, नाणे घाट परिसर पर्यटन अनुभव
८. संध्याकाळचा नाष्टा व चहा

*शुल्क*
१. शाकाहारी जेवणासोबत -₹५०० रुपये/व्यक्ती
२. मांसाहारी जेवणासोबत - ₹६०० रुपये/व्यक्ती
5 वर्षाच्या मुलांपर्यंत काही शुल्क नाही, १० वर्षांपर्यंतच्या मुलांना अर्धे शुल्क असेल.

*अधिक माहितीसाठी*
श्री. तुकाराम रावते - 9860257160
श्री. सुरेश जोशी- 9307547628

*विशेष विनंती* - रानभाज्या या दुर्मिळ असतात आपल्याला जर रानभाजी महोत्सवाचा व्यवस्थित अनुभव घ्यायचा असेल तर कृपया आपले नाव नोंदणी आवश्यक आहे जेणेकरून किती पर्यटन येणार आहे त्यानुसार रानभाज्यांची तजवीज करून ठेवता येईल.

*नाव नोंदणीसाठी-*
पराशर कृषी व संस्कृती पर्यटन
7038890500
7020092221
#नाणेघाट #रानभाजी

https://youtube.com/watch?v=bETP0DsR7XY&si=lz5W7tFUM5lnviI2इथं येण्याची खूप सारी कारणं आहेत आणि नाहीत सुद्धा. आजूबाजूच्य...
16/09/2023

https://youtube.com/watch?v=bETP0DsR7XY&si=lz5W7tFUM5lnviI2
इथं येण्याची खूप सारी कारणं आहेत आणि नाहीत सुद्धा. आजूबाजूच्या कोलाहलात जर तुम्ही हरवून गेलेले असाल. स्वतःलाच, स्वतः सापडणं किंवा स्वतःचा शोध घेणं गरजेचं वाटत असेल... तर हे ठिकाण आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे.
Somnath Nagawade , तुझ्यामुळे पराशरचं अस्सलपण लोकांपर्यंत पोहोचू शकलं. पराशर सारख्या अनेक ठिकाणांना तुझा परिसस्पर्श लाभलाय, तुझ्यामुळे संवेदनशील आणि जबाबदारीने पर्यटन करणाऱ्या पर्यटकांना, पराशर सारख्या अनुभवसिद्ध पर्यटन करणाऱ्या जागा माहीत झाल्यात. तुला फक्त धन्यवाद म्हणणं पुरेसं नाही, तुझ्या ऋणात राहणं आवडेल मला.

Parashar Agri & Culture Tourism Junnar l Farmstay Near pune | Experitional Tourism Center JunnarContact Details Nagar-Kalyan Highway, Rajuri, Final Mile Rd, ...

Happy Teachers Day
05/09/2023

Happy Teachers Day

इथं मुद्दामून, आवर्जून आणि ठरवून....वेगळं काहीच करावं लागत नाही.एकदा इथं आलं की आपण...निसर्गाची लय पकडून स्वतःला , निसर्...
04/09/2023

इथं मुद्दामून, आवर्जून आणि ठरवून....
वेगळं काहीच करावं लागत नाही.
एकदा इथं आलं की आपण...
निसर्गाची लय पकडून स्वतःला , निसर्गाशी समर्पित करायचं...
त्याच्या आणि आपल्या फिरक्वेन्सी मॅच करायच्या...
एकदा आपली लय एकरूप झाली की,
बाकी फक्त जे जे काय होतंय, घडतंय ते अनुभवायचं कारण इट्स नॅचरली ऑरगॅनिक.
पराशर कृषी व संस्कृती पर्यटन.

Let's move ahead.
29/08/2023

Let's move ahead.

28/08/2023

नम्रताने ट्राय केलेला कॅलिग्राफीचा प्रयोग. #पुणे
26/08/2023

नम्रताने ट्राय केलेला कॅलिग्राफीचा प्रयोग.
#पुणे

श्रावण मास श्री हनुमान सप्ताह अखंड वीणा पहारा-श्री लक्ष्मणबाबा हाडवळे भावकी दि.25 ऑगस्ट 2023.पहाटे आवरून, शुचिर्भूत होऊन...
25/08/2023

श्रावण मास श्री हनुमान सप्ताह अखंड वीणा पहारा-श्री लक्ष्मणबाबा हाडवळे भावकी दि.25 ऑगस्ट 2023.
पहाटे आवरून, शुचिर्भूत होऊन, विणेची तार अलगद छेडत एका दैवी वातावरणातील प्रसन्न सकाळ मनाला आनंद देणारी आहे.

Traveling is a natural instinct of mankind.
24/08/2023

Traveling is a natural instinct of mankind.

सारे जहाँ से अच्छा, हिंदोस्ता हमारा|चांद्रयान-3 मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व भारतीयांचे मनःपूर्वक अभिनंदन.हे तुम्ही आहात...
23/08/2023

सारे जहाँ से अच्छा, हिंदोस्ता हमारा|
चांद्रयान-3 मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व भारतीयांचे मनःपूर्वक अभिनंदन.
हे तुम्ही आहात की ज्यांच्यामुळे आपण सर्व अभिमानाने सांगू शकतो की, चंद्राच्या दक्षिण गोलार्धात पोहोचणारा, भारत हा पहिला देश आहे.

आराधना... तिच्या नावातच पूजा आहे, समर्पित भाव आहे. तिच्याविषयी लिहिण्यासारखं बरंच काही आहे. आणि ते सुद्धा फक्त यासाठी ना...
15/08/2023

आराधना... तिच्या नावातच पूजा आहे, समर्पित भाव आहे. तिच्याविषयी लिहिण्यासारखं बरंच काही आहे. आणि ते सुद्धा फक्त यासाठी नाही की ती आतापर्यंत 3 वेळा पराशर वर येऊन गेलीय, किवा तिने माझं बंद असलेलं Instagram सुरू करून दिलंय किवा तिला छान डान्स येतो किवा तिचं व्यक्तिमत्व आकर्षक आहे... तिच्या विषयी लिहावं वाटलं कारण ती एक प्रेरणादायी ऊर्जा आहे.
https://hachikotourism.blogspot.com/2023/08/blog-post_14.html
https://youtu.be/yqJAYRXn__Y?si=B34ynEsR_mTPZrgW

माणूस आयुष्यभराचा अंतर्बाह्य प्रवासी.आपण वरकरणी पर्यटनाच्या नावाने काही विशिष्ट ठिकाणांना भेटी देतो. कामानिमित्त प्रवास ...
13/08/2023

माणूस आयुष्यभराचा अंतर्बाह्य प्रवासी.
आपण वरकरणी पर्यटनाच्या नावाने काही विशिष्ट ठिकाणांना भेटी देतो. कामानिमित्त प्रवास होतो, प्रवासात वेळ निघून जातो, अनेक लोकं भेटतात, आकलन वाढतं. नजर उघडी होत असताना, बाह्यांगाचा प्रवास अंतर्मनात जे काही बदल करतो, ते सर्व; आयुष्याचं अंतर्बाह्य आकलन, म्हणजेच आपलं जगणं होऊन बसतं.
याच अंतर्बाह्य प्रवासाचा एक विलक्षण अनुभव

माणुस- कायम अंतर्बाह्य प्रवासी फिरणं हा माणसाचा स्थायीभाव आहे. मानवाची उत्क्रांती होत असताना, आपल्यासारख्याच इत....

11/08/2023

https://hachikotourism.blogspot.com/2023/08/blog-post.htmlजुन्नर, महाराष्ट्रातील पहिला पर्यटन तालुका. जुन्नर तालुक्यातून...
04/08/2023

https://hachikotourism.blogspot.com/2023/08/blog-post.html
जुन्नर, महाराष्ट्रातील पहिला पर्यटन तालुका. जुन्नर तालुक्यातून दोन राष्ट्रीय महामार्ग जातात. जुन्नर तालुक्याचा पूर्व पश्चिम विस्तार मोठा आहे, जवळपास 70 किलोमीटरच्या या विस्तारात 2000मिमी ते 500 मिमी पर्यंतच्या पावसाची रेंज बघायला मिळते. याच पाऊसमानाच्या भौगोलिकतेवर आधारित, सांस्कृतिक रचना जुन्नर तालुक्यामध्ये झालेली आहे.

ढोबळमानाने पुणे नाशिक महामार्गाच्या पश्चिमेकडे जुन्नर तालुक्यातील बरचंसं पर्यटन वैभव आहे, त्याचसोबत बजुन्नर तालुक्याच्या पूर्वबपट्ट्यातील जे काही मोजकं पर्यटन वैभव आहे, त्याचा आवाका, कालखंड आणि व्याप्ती ही पश्चिम जुन्नरशी समतोल अशी आहे.

"जुन्नरची पूर्वाई" या लेखातून आपण जुन्नरच्या पूर्व भागातील पर्यटन स्थळांचा मागवा घेतला आहे. पराशर कृषी व संस्कृती पर्यटन केंद्राच्या 20 किलोमीटर परिसरात आणि 30 मिनिटांच्या प्रवासाच्या आत येणाऱ्या पर्यटन स्थळांचा समावेश या लेखात केलेला आहे.

https://www.esakal.com/pune/pune-teacher-france-student-zp-schools-education-systeam-vbm00मॅडम, माझी आई मला भेटायला फ्रा...
31/07/2023

https://www.esakal.com/pune/pune-teacher-france-student-zp-schools-education-systeam-vbm00
मॅडम, माझी आई मला भेटायला फ्रान्सवरून आली आहे. तिला 4 दिवस ग्रामीण भारत दाखवायचा आहे, तसंच गप्पा मारायला निवांतपणा ही हवा आहे, आम्हाला कुठे जाता येईल हे आपण सांगू शकाल का? सिम्बॉयसिसच्या मृणाल मॅडमला कॅपूसीन या फ्रेंच मुलीचा मेसेज आला.

कॅपूसीन, तिच्या महाविद्यालयीन शिक्षणाच्या एका कोर्ससाठी, 6 महिन्यांपासून पुण्यात राहत होती. लोला, तिची आई तिला भेटायला पुण्यात आलेली.

परदेशी लोकं, त्यात दोन्ही महिला अशा परिस्थितीत त्यांना ग्रामीण भारत अनुभवायला सुरक्षित आणि ऑथेंटिक जागा म्हणून मृणाल मॅडम ने आपल्या पराशर कृषी व संस्कृती पर्यटन केंद्राचं नाव सुचवलं.

त्यांनी माझा नंबर कॅपुसीन ला दिला. पुढील सोपस्कारासाठी मला कॅपूसीनचा मेसेज आला. मी अमरनाथ यात्रेला गेलो असल्याने कॅपूसीन आणि लोला या मायलेकीला त्यांच्या चार दिवसांच्या पराशर कृषी व संस्कृती पर्यटन केंद्रावरील वास्तव्याला नम्रता बघणार होती.

आपल्या पराशर वरील मंडळींच्या साथीने, 4 दिवसात कॅपूसीन आणि लोला यांनी आजूबाजूचा शेतशिवार, त्यातील पीक पद्धती, महिला शेतकरी, एक संध्याकाळ शेतकऱ्याच्या घरी, शेतकऱ्याच्या घरचे जेवण, आठवडी बाजार, गावातील ग्रामपंचायतीचे 23 हजार पुस्तकांचे वाचनालय, 49 वर्ष जुनी दुग्ध सहकारी संस्था इत्यादी गोष्टी मोठ्या उत्साहाने पाहिल्या आणि अनुभवल्या.

माझी 7 वर्षांची मुलगी आहिल्या, ही गावातीलच जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता दुसरीला जाते. ती जेव्हा शाळेतून आली तेव्हा तिचा गणवेश बघून, लोलाची उत्सुकता चाळवली. त्याला कारणही तसंच होतं,

फ्रान्समध्ये लोला नर्सरी टीचर होती. तसेच तिचा लहान मुलांची सायकॉलॉजी, त्यांची शिकण्याची मानसिकता, वयोगट आणि परिस्थिती हे विषय तिच्या आवडीचे आणि अभ्यासाचे होते. त्यामुळे साहजिकच ग्रामीण भारतातील शिक्षण पद्धती बघायची ही संधी अहिल्याच्या शाळेच्या भेटीच्या निमित्ताने तिला मिळणार होती.

लोलाने नम्रता जवळ ही गोष्ट बोलून दाखवली आणि मग दुसऱ्या दिवशी कॅपूसीन व लोला या मायलेकिं सोबत नम्रता अहिल्याच्या म्हणजेच गावातल्या जिल्हा परिषदेत शाळेत गेल्या.

शाळा अतिशय रम्य परिसरात आणि कौलारू इमारतीची अजूनही एक टिकून आहे. शाळेतील बोलक्या भिंती, स्वच्छ परिसर हा मनमोहुन टाकणारा दिसतो. शाळा आणि शालेय परिसराच्या प्रेमातच लोला वेडी झाली, तिने मुलांची पुस्तकं बघितली. मराठी भाषा जरी कळली नाही, तरी त्यावरील चित्रांच्या माध्यमातून तिला जिल्हा परिषद शाळेतील शिक्षण पद्धती आणि काठिण्य पातळी लक्षात आली.

मग शिक्षकांशी गप्पा मारत असताना एक एक गोष्ट उलगडत गेली, मग त्यामध्ये शालेय पोषण आहार, शासनाकडून मिळणारा मोफत गणवेश, पुस्तके याविषयी लोलाने मोठ्या आत्मीयतेने माहिती घेतली.

तिला खरं आश्चर्य वाटलं ते तेव्हा, जेव्हा तिला कळलं शाळा आणि परिसराची स्वच्छता, शाळेतील मुलं स्वतः करतात ते. जगातील कुठल्याही शाळेतील पहिला संस्कार तो स्वयंशिस्त आणि स्वयंस्वच्छता हा असतो, जो खऱ्या अर्थाने आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या माध्यमातून दिला जात आहे, हे बघून लोला आश्चर्यचकित झाली.

ग्रामीण संस्कृतीचा अनुभव घेत असताना तिला भारतातील गाव, सहकाराची चळवळ, शिक्षण पद्धती या गोष्टींचा प्रत्यक्ष दर्शी अनुभव तर मिळालाच पण त्यासोबत तिने आपल्या मुलीला जोपर्यंत तू पुण्यात आहेस तेव्हा, जेव्हा कधी तुला घराची आठवण येईल तेव्हा इथे आवर्जून येत जा असं निक्षून सांगितलं.

आपल्या पराशर कृषी व संस्कृती पर्यटन केंद्राच्या माध्यमातून मागील 11वर्षांत देश-विदेशातील अनेक पै पाहुणे आले, आपल्याकडून जे शक्य आहे ते सर्व प्रकारचे आदरातिथ्य देण्याचा प्रयत्न आपण केला, करत आलो. बदल्यात व्यवहाराच्या पलीकडचं एक आपुलकीचं आणि प्रेमाचं नातं बनत गेलं. आज पराशर जे काही उभं आहे, ते अशा जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या पै पाहुण्यांमुळे आणि त्यांनी पराशरला आणि पराशरच्या सेवेला तथास्तु म्हटल्यामुळेच.
मनोज हाडवळे
7038890500

शिक्षण पद्धती समजून घेतली. त्यांच्या शाळेतील इतर शिक्षकांना दाखवायला शाळेचे फोटो काढून घेतले. Pune teacher france student ZP Schools education...

I'm on Instagram as . Install the app to follow my photos and videos. https://www.instagram.com/invites/contact/?i=1qrwr...
27/07/2023

I'm on Instagram as . Install the app to follow my photos and videos. https://www.instagram.com/invites/contact/?i=1qrwrp4p9jovw&utm_content=3yxpm29
*Hello guest,*
Hope you are doing well.
We have your +ve vibes at Parashar Agri & Culture Tourism. It's you due to whom, since 1 decade, we are in service to provide the platform for experiential tourism.
*We request you to follow us on Instagram* , to get to know about your second home, Parashar Agri & Culture Tourism.
With warm regards☘️☘️😊☘️☘️💐



Black buck sighting just 20kms from Parashar Agri & Culture Tourism - an ideal location for monsoon masti & relaxation.w...
23/07/2023

Black buck sighting just 20kms from Parashar Agri & Culture Tourism - an ideal location for monsoon masti & relaxation.
www.parasharagritourism.Com
For more details and bookings. 7038890500 7020092221

   #
18/07/2023

#

Address

A/P/Rajuri
Rajuri
412411

Alerts

Be the first to know and let us send you an email when Parashar Agri & Culture Tourism posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Parashar Agri & Culture Tourism:

Videos

Share