Konkan Darshan - कोकण दर्शन

Konkan Darshan - कोकण दर्शन Konkan Darshan is a tourist company specialist in Konkan and Coastal tours in Maharashtra.
(10)

कोकणातील Eco friendly आकाशकंदील 🎆🎇कारागीर - विजय परब तुळस गाव वेंगुर्ला. #सिंधूदूर्ग
30/10/2024

कोकणातील Eco friendly आकाशकंदील 🎆🎇
कारागीर - विजय परब
तुळस गाव वेंगुर्ला.
#सिंधूदूर्ग

साधेपणा पण खूप मोठी श्रीमंती कोकणी माणसाचे घर नटलय दीपावली साठी ❤कोकणातील दिवाळी 🎇🎆🎊Simple is also equally rich.   © Roh...
28/10/2024

साधेपणा पण खूप मोठी श्रीमंती कोकणी माणसाचे घर नटलय दीपावली साठी ❤
कोकणातील दिवाळी 🎇🎆🎊
Simple is also equally rich.


© Rohit Bhide

Just a kind reminder. शक्य तेवढं पुढे फाॅरवर्ड करा.दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपलीय. एक विनंती मित्रांनो. जमेल तेवढी दिव...
23/10/2024

Just a kind reminder. शक्य तेवढं पुढे फाॅरवर्ड करा.

दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपलीय. एक विनंती मित्रांनो. जमेल तेवढी दिवाळीची खरेदी अशा गरजुंकडून करा. आपल्यासाठी किरकोळ खरेदी असू शकेल परंतु त्यांची दिवाळी साजरी होऊ शकेल.

स्वर्गाहून सुंदर आपले कोकण.फोटो/व्हिडीयो क्रेडिट :  Please dm for creditकोकण हा फक्त बघण्याचा विषय नाही, तर अनुभवण्याचा ...
22/10/2024

स्वर्गाहून सुंदर आपले कोकण.

फोटो/व्हिडीयो क्रेडिट : Please dm for credit

कोकण हा फक्त बघण्याचा विषय नाही, तर अनुभवण्याचा विषय आहे! ❤️ एकच ध्यास, कोकणाचा विकास!

येवा कोकण आपलोच असा!
🥭🥥🏠🌅🍍🫐🥭🐊🐅🐘☘️🌴🌴🌸🌺🥀⛈️🌧️🌊☔🐟🐬🦐🦀🍉🥭

#कोकण #मालवण

कळकळीची विनंती ,ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा . सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीत छोट्या गावातील आराध्या ताई आपल्या कुटुं...
17/10/2024

कळकळीची विनंती ,ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा . सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीत छोट्या गावातील आराध्या ताई आपल्या कुटुंबाला आधार मिळवा यासाठी जुन्या साड्यापासून उबदार गोधडी बनवून देतात सोबत जात्यावर दळण देखील भरडून देतात,अश्या मेहनती कोकणी माणसांना प्रोत्साहन देण्यासाठी कृपया मदत करा.
संपर्क-: आराध्या ढवळ- 9923576382

Via - malvani life youtube channel
Via - suvarn Kokan vlog

🌴 #राजापूर #कोकण

11/10/2024
Ai ने तयार केलेलं कोकणी घराचं चित्र
08/10/2024

Ai ने तयार केलेलं कोकणी घराचं चित्र

 #निघाल्या_गाड्या_परतीलागणपतीच्या सणाला सगळं भरलेलं घर...मुंबईकर सगळे पोराबाळाना घेऊन आलेले... 6-7 महिने आधी तिकिटे बुक ...
15/09/2024

#निघाल्या_गाड्या_परतीला
गणपतीच्या सणाला सगळं भरलेलं घर...
मुंबईकर सगळे पोराबाळाना घेऊन आलेले... 6-7 महिने आधी तिकिटे बुक करून आलेले काय अन.. "तो नेणारा आम्हाला, जशी त्याची मर्जी"... म्हणत, गणपतीला साकडं घालत ऐनवेळी लालपरीत अंग अवघडून बसणारे ही... निघाले परत...
मुंबई अन इतर सगळ्या ठिकाणी पोटापाण्यासाठी गेलेली पोरं सुना, लेकी नातवंडे... घरात आली...
गणपतीचा मखर सजवण्यापासून, घरभर रंगीत कागदाच्या पताका लावण्यात रमलेले घर...
स्वयंपाक घरातून येणारे वेगवेगळे सुवास... मोदक, घावणे, काळ्या वाटण्याची उसळ, खोबऱ्याची चटणी... वरण भात पापड लोणचं फेण्या... पुरणपोळी अन श्रीखंड...
दुर्वा फुलं गोळा करता करता, परसातून मिळालेली तवशी, चिबुड च्या मिळून खाल्लेल्या फोडी...
मुंबईकर लेकराला जास्तीचा वाटा देऊन, गावच्या लेकराला.."तू हयसर आसस ना रे... त्येका खावंदे.." म्हणून गप बसवणारी काकी....
अरे बाबल्या... गो बाय... तिकडे बावी कडे जाताना जपून जा रे... म्हणून काळजी करणारे आजोबा....

गणपती विसर्जन झालं की, डोळ्याला पदर लावणारी घरधनीन... दुसऱ्यादिवशी रिक्षा येणार...
आदल्या रात्री पिशवीत... फेण्या, कुळीथ, नाचणी, तांदूळ, चिबुड, तवशी, रानभाज्या.. आणि एका डब्यात, पिठात गावठी कोंबडीची अंडी भरून ठेवते...

जाणाऱ्यांचीही पावलं जड होतात पण गाडी चुकायला नको म्हणून घाई करावी लागते... डोळे पुसत पुसत, पिशव्या रिक्षात ठेवल्या जातात...
जपून जावा रे... फोन करा रे म्हणून सांगताना... हात सोडवत नसतात...
मग रिक्षावालाच रिक्षा स्टार्ट करतो...
अन, हताशपणे हात हलवून निरोप दिला जातो.....

अन ते भरलं घर, मोकळं मोकळं होतं....
म्हातारी डोळे पुसत, सुनेला म्हणते... गो रडा नको, जा मागच्या दारी तसाच पसारा पडलाय....
अन म्हातारा... मनात गणपतीला हात जोडत, त्या लांबवर गेलेल्या रिक्षाच्या आवाजाचा अंदाज घेत म्हणतो... पुढल्या वर्षी लवकर या.....

निरोपाची वेळच हळवी....
©प्रतिभा देशमुख, रत्नागिरी

गणेश चतुर्थीनिमित्त सांवोर्डेम येथील सांवोर्डेकर वाड्यात भारतातील सर्वात मोठे संयुक्त कुटुंब.1734 मध्ये बांधलेले 288 वर्...
13/09/2024

गणेश चतुर्थीनिमित्त सांवोर्डेम येथील सांवोर्डेकर वाड्यात भारतातील सर्वात मोठे संयुक्त कुटुंब.
1734 मध्ये बांधलेले 288 वर्षे जुने संवोर्डेकर वाडा हे घर आता दक्षिण गोव्यातील ऐतिहासिक स्थळ बनले आहे. मालमत्तेची नियमित देखभाल केली जाते. हे देशातील सर्वात जुन्या संयुक्त कुटुंबांपैकी एक आहे, जे आता वेगळे राहतात परंतु एकत्र सण साजरे करण्यासाठी एकत्र जमणे हा एक मुद्दा आहे. त्याचप्रमाणे, प्राचीन कुळातील 250 सदस्य आता गणेश चतुर्थी साजरा करण्यासाठी त्यांच्या वडिलोपार्जित घरी परतले आहेत.
ऐतिहासिक स्थळ 4,000 चौरस मीटरमध्ये पसरलेले आहे आणि त्यात चार अंगण, चार विहिरी आणि सुमारे 80-विचित्र खोल्या आहेत.

Post of Sandeep Tendulkar

साभार : लय भारी पेज
11/09/2024

साभार : लय भारी पेज

मध्य भारतातील महाराष्ट्र राज्यास लाभलेला कोकण हा प्रदेश निसर्ग, समुद्र, उंच उंच दऱ्या, डोंगराळ प्रदेश, सह्याद्रीच्या पर्...
08/09/2024

मध्य भारतातील महाराष्ट्र राज्यास लाभलेला कोकण हा प्रदेश निसर्ग, समुद्र, उंच उंच दऱ्या, डोंगराळ प्रदेश, सह्याद्रीच्या पर्वत रांगा या परवतांना धडकणार निळसर पाणी त्याचबरोबर पश्चिम समुद्रकिनारा सर्वांना आनंदित मोहित करना कोकण कडा, येकदा पाऊल पडल की तुम्हाला अस जाणवेल नैनीताल, पिथोरागड सारखे रोड वळण दार रस्ते, उंच उंच घाट रस्ते, कोकण म्हटल की क्षितिजाला समुद्र मिळाला असे जाणवते. किनारपट्टी जवळपास ७२० कि मी. लांबीची लाभली असल्यामुळे पर्यटकांचे आकर्षणाचं केंद्र ठरते.

कोकणातील समुद्र किनारा पर्यटकांना उन्हाळयात सर्वाधिक लक्ष वेधून घेत असतो कोकण भूमी ही अनेक नैसर्गिक साधन संपतीने नटलेली आहे. येथील हापूस अंबा, गावरान केली,सुपारी, फणस, काजूच्या बागा, नारळ, कोकम, जांभळं, करवंद अश्या अनेक प्रकारच्या फळांची चव पर्यटकांची उत्कंठा वाढवत राहतात. नविण्याने भुरळ पाडणारा,ऐतिहासिक वारसा असलेला हा प्रदेश आज आपली अस्मिता परकियांच्या हातात देऊन टाकला जात आहे.
महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहेत.(How many administrative divisions are there in Maharashtra)
महाराष्ट्रात सहा प्रशासकीय विभाग असून याच प्रशासकीय विभागांमधील कोकण हा एक विभाग आहे. ज्यात ज्यात ७ जिल्ह्याचा समावेश होतो. कोकण विभागाला दोन महानगर लाभले आहे. तर बहुतांश लोकसंख्या ही शहरी भागामध्ये वास्तव्यास राहते.

कोकण लाल माती (Konkan red soil)
भौगोलिक परिस्थितीनुसार निसर्गाने नटलेला कोकण महाराष्ट्राचा (स्विझर्लंड) म्हणून ओळखला जातो. बहुतांश जमीनीचा स्तर इतर विभागाच्या तुलनेत कडक व लाल गेरू रंगाचा आहे. कोकनातील माती लाल गेरु रंगाची दिसण्याचे कारण म्हणजे माती मद्ये लोहाचे असलेले प्रमाण व मोठ्या प्रमाणात पडणारा पाऊस, उन्हाचा चटका बसून लाल जांभळ्या खडकाची होणारी झीज लाल मातीला जन्म देते हीच प्रक्रिया वर्षानुवर्ष चालत राहिली आहे.
कोकण शेती (Konkan agriculture Farm)
लाल मातीचा उपयोग कृषी उत्पादनासाठी योग्य समजली जाते. ज्यात काजूच्या बागा, सुपारी, आंबा, अश्या अनेक फळबाग व खाच राच्या जमिनी मद्ये भात शेती मोठ्या प्रमाणात केली जाऊ लागली आहे.तर डोंगराळ उथळसर जमिनीमध्ये नाचणी शकते. अश्या जमिनीत लोहाचे व कुजलेल्या पानापासून अनेक मूलद्रव्य आढळतात तर डोंगराळ पट्ट्यातील माती नाचणीच्या बुडाला चिकटून राहत असल्याने मातीचे पावसा सोबत वाहून जाण्याचे प्रमाण कमी होते.

कोकणातील प्रमुख मुख्य नद्या.(main rivers of Konkan)
महाराष्ट्राला सर्वाधिक नद्यांचे उगमस्थान कोकण विभागाला लाभले आहे. पौराणिक कथांमध्ये संत कालिदास यांच्या मेघदूत या काव्यात यक्ष देवतास दक्षिणेकडून उत्तरे कडे जात असताना पृथ्वीचे सौंदर्य कसे आहे हे विचारना करण्यात आली आहे. त्यावेळी दक्षिने कडील जमिनीवरचे सौंदर्य अचूक डोंगर दर्याचे वर्णन ही मेघदूत ग्रंथात या कथा मार्फत ही मिळते.

कोकणातील निसर्ग सौंदर्यात सह्याद्री पर्वतामधून उगम पावणाऱ्या नद्यांनी पर्यटन वाढवण्यासाठी अनमोल योगदान दिले आहे. सह्याद्रीच्या डोंगरा मधून उगम पावणाऱ्या नद्या जश्या लहान बाळाच्या जन्म देतात तशा पद्धतीने दिसतात. या नद्यांना आकाशातून समुद्राला मिळताना पहिले त्यावेळी एखादी पोर सासरला जाऊन माहेरी आल्यावर आईला मिठी मारते अगदी त्याच प्रमाणे समुद्राला मिळतात.

रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख नद्या.(Main rivers of Ratnagiri district)
सह्याद्रीच्या कुशीतून बहुतांश नद्यांचा उगम होऊन पश्चिमेकडे वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळतात. प्रमुख नदी जगबुडी नदी, बाव, रत्नागिरी, जैतापूर, मचकुंदी नदी, विशिष्ट नदी, जैतापूर नदी, सावित्री नदी उप नदी शास्त्री नदी, भरजा ,केव, काजळी नदी, नदी,शिव नदी,रत्नागिरी जिल्ह्यातून या प्रमुख नद्या वाहतात.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख नद्या. (Main rivers of Sindhudurg district.)
सिंधुदुर्ग जिल्हा कोकणातील सर्वात जास्त नद्याचा उगम असलेला प्रसिद्ध जिल्हा आहे. प्रमुख नदी देवगड, गड नदी, तेरे खोल, वाघोटन, कर्ली, तिलारी उपनद्या आचरा नदी, नदी,जाणवली, खांडरा,बंडा,बेल, पियाळी, शकू,भामसाळ, सुखशांती, सरंबळ या प्रमुख व उप नद्या उगम पावतात.

रायगड जिल्ह्यातील प्रमुख नद्या.(Main rivers of raigad district)
रायगड जिल्ह्यास ऐतिहासिक व भौगोलिदृष्ट्या महत्वाचे स्थान प्राप्त झाले असून राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारभाराची राजधानी म्हणून ओळखले जाते. रायगड जिल्ह्यातील प्रमुख नद्या उल्हास नदी, घोड नदी, गांधार, सावित्री, काळ, पाताळगंगा, अंबा, कुंडलिका

पालघर जिल्ह्यातील प्रमुख नद्या (Major rivers of Palghar district
पालघर हा जिल्हा कोकणच्या उत्तर दिशेच्या टोकावर पहावयास मिळतो. सह्याद्रीच्या पर्वत रांगा, वैतरणा खोरे तसेच उल्हास खोरे या जिल्ह्यास नद्यांच्या खोऱ्यामुळे अधिक महत्व प्राप्त होत. पालघर जिल्ह्यातून वाहत जाणाऱ्या प्रमुख नद्या.वैतरणा नदी,उल्हास नदी उप नदी बारवी, भातसा, पिंजाल, सूर्य, दहेरजा, तानसा.

कोकणातील नद्यांचे निसर्गसौंदर्य वाढवण्यास मोठे योगदान लाभले आहे.

माहिती साभार - krushi adda

बियाणे विकून वर्षाला 50 लाखांची कमाई.उद्योजिका  #चंदना गाडे यांची कथा खूप प्रेरणादायी आहे. चंदना MCA पदवीधर असून सॉफ्टवे...
08/09/2024

बियाणे विकून वर्षाला 50 लाखांची कमाई.

उद्योजिका #चंदना गाडे यांची कथा खूप प्रेरणादायी आहे. चंदना MCA पदवीधर असून सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. 2014 मध्ये त्यांच्या मुलीच्या जन्मानंतर, चंदना यांना तिला ऑरगॅनिक अन्न देण्याची इच्छा झाली. चंदना गाडे तिला तांदूळ आणि सेंद्रिय हिरव्या पालेभाज्या खाऊन वाढवू इच्छित होती. पण शहरात राहून बाजारात उपलब्ध भाज्यांवर तिला शंका आली.

“त्याच वेळी, आम्ही शेतकऱ्यांनी पालेभाज्या पिकवण्यासाठी दूषित ड्रेनेज पाण्याचा वापर केल्याच्या आणि रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर केल्याच्या बातम्या ऐकल्या. सध्याच्या काळात, लहान वयातच मुलांना त्यांच्या खाण्याच्या सवयींमुळे अनेक आजार होत आहेत. आम्हाला आमच्या मुलीला विषारी अन्न द्यायचे नव्हते,” 36 वर्षीय हैदराबाद रहिवासी ‘द बेटर इंडिया’ला सांगतात. मात्र, शहरात राहून हे स्वप्न पूर्ण करणे सोपे नव्हते, कारण बाजारातील भाजीपाला आणि बियाणे त्यांच्या अपेक्षांवर खरे उतरत नव्हते. याच गरजेतून त्यांनी एक व्यावसायिक संधी ओळखली.

2016 मध्ये, जवळपास 1 लाख रुपयांची गुंतवणूक करून त्यांनी **'SeedBasket pvt ltd'** नावाचा व्यवसाय सुरू केला. प्रारंभी त्यांनी काही मोजक्याच भाज्यांच्या बियाण्यांसह सुरुवात केली होती, पण लवकरच त्यांनी फळे, फुले, आणि औषधी वनस्पतींच्या बियाण्यांचे विविधता वाढवली. 'SeedBasket' ने ग्राहकांना देशी बियाण्यांचे महत्त्व समजावून देत, त्यांची उपलब्धता सोपी केली.

त्यांच्या बियाण्यांची किंमत 30 ते 500 रुपयांच्या दरम्यान आहे, जी त्यांच्या गुणवत्तेनुसार ठरवली जाते. आज त्यांची कंपनी देशभरातून बियाणे गोळा करून, त्यांना प्रक्रिया करून पॅकेजिंग करते.

चंदना आणि नवीन यांनी सुरुवातीच्या काळात अनेक आर्थिक अडचणींचा सामना केला. कधी कधी ते स्वतःच बियाण्यांचे वितरण करीत आणि शेतकऱ्यांशी थेट संपर्क साधत होते. त्यांच्या धैर्याने आणि न थकणाऱ्या मेहनतीने, आज त्यांचा व्यवसाय शहरी बागायतदारांमध्ये अत्यंत लोकप्रिय झाला आहे.

आज चंदना एक वर्षात 50 लाख रूपये कमावतात आणि अजूनही अनेक शेतकरी व बागायतदारांना देशी बियाण्यांचे महत्त्व पटवून देत आहेत. चंदना आणि नवीन यांची कथा आपल्याला दाखवते की, जैवविविधतेचे जतन आणि आरोग्यदायी जीवनशैलीसाठी देशी बियाण्यांचे पुनरुज्जीवन किती महत्त्वपूर्ण आहे.




पोस्ट क्रेडिट - द बेटर इंडिया

अश्या लोकांकडून पण खरेदी करा 👍❤️ जे पोटासाठी जगतात 🥺
01/09/2024

अश्या लोकांकडून पण खरेदी करा 👍❤️ जे पोटासाठी जगतात 🥺

गणपती बाप्पा मोरया🙏 मंगलमूर्ती मोरया🙏
31/08/2024

गणपती बाप्पा मोरया
🙏 मंगलमूर्ती मोरया🙏

   संगमेश्वर ते लांजा रोड खराब आहे .ज्यांना राजापूर कडे जायचे असेल तर संगमेश्वर - देवरुख - साखरपा - दाभोळे. मार्गे जावे ...
26/08/2024



संगमेश्वर ते लांजा रोड खराब आहे .ज्यांना राजापूर कडे जायचे असेल तर संगमेश्वर - देवरुख - साखरपा - दाभोळे. मार्गे जावे .

   जे चाकरमानी मुंबई वरून कोकणात येण्यासाठी नॅशनल हायवे 66 तरुण येणार आहेत त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की संगमेश्वर प...
26/08/2024



जे चाकरमानी मुंबई वरून कोकणात येण्यासाठी नॅशनल हायवे 66 तरुण येणार आहेत त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की संगमेश्वर पर्यंत रोड चांगला आहे बहुदा महाड पासून असेल पण संगमेश्वर पासून लांजा पर्यंत रोडची अवस्था फार वाईट आहे जर तुम्ही संगमेश्वर डावीकडे वळला तर देवरुख लागतो देवरुख कडून साखरपा साखरपा वर राइट घेऊन तुम्ही दाभोळे मार्गे लांजाला निघू शकता बाहेर हा चांगला रोड आहे सुखरूप या गाड्या व्यवस्थित चालवा आणि उत्सव साजरा करा.
Nh66 ,गणेश उत्सव, संगमेश्वर,देवरूख,सख्रपा लांजा









स्वर्गाहून सुंदर आपले कोकण.फोटो/व्हिडीयो क्रेडिट :  Please dm for creditकोकण हा फक्त बघण्याचा विषय नाही, तर अनुभवण्याचा ...
21/08/2024

स्वर्गाहून सुंदर आपले कोकण.

फोटो/व्हिडीयो क्रेडिट : Please dm for credit

कोकण हा फक्त बघण्याचा विषय नाही, तर अनुभवण्याचा विषय आहे! ❤️ एकच ध्यास, कोकणाचा विकास!

येवा कोकण आपलोच असा!
🥭🥥🏠🌅🍍🫐🥭🐊🐅🐘☘️🌴🌴🌸🌺🥀⛈️🌧️🌊☔🐟🐬🦐🦀🍉🥭

#कोकण #मालवण

Address

Guhagar
Ratnagiri
415703

Telephone

+91 88885 35284

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Konkan Darshan - कोकण दर्शन posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share


Other Tourist Information Centers in Ratnagiri

Show All