EAGLE WINGS Trek and Tours, sangamner

EAGLE WINGS Trek and Tours, sangamner Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from EAGLE WINGS Trek and Tours, sangamner, Eco tour agency, Sangamner.
(2)

08/10/2023
भारतीय सेनादलाच्या सदर्न कमांडतर्फे यंदाच्या स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट २०२३ रोजी,  सदर्न कमांडच्या आखत्यारीत येणाऱ्या राज...
17/08/2023

भारतीय सेनादलाच्या सदर्न कमांडतर्फे यंदाच्या स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट २०२३ रोजी, सदर्न कमांडच्या आखत्यारीत येणाऱ्या राज्यांपैकी सुमारे ६ राज्यांमधील ७५ गडकोटांवर एकाच वेळी तिरंगा फडकावला गेला. त्यापैकी तब्बल ४९ गडकिल्ले हे महाराष्ट्रातील होते... साहस आणि देशप्रेमाने भारलेल्या अशा एका अतिशय अनोख्या उपक्रमात, भारतीय सेनादलातील अधिकारी व जवानांबरोबर छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गडांवर जाऊन तिरंगा फडकवण्याचा व स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचा अनुभव महाराष्ट्रातील ३०० हून अधिक साहसप्रेमींनी घेतला. या उपक्रमाचा समन्वय करण्यासाठी महाराष्ट्रातील आघाडीच्या 'गिरिप्रेमी' या गिर्यारोहण संस्थेने सदर्न कमांडला सहकार्य केले आणि उपक्रमाला प्रतिसाद म्हणून महाराष्ट्रातील सर्व भागातून गिर्यारोहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यात अहमदनगर जिल्ह्यातील सहा गडांचा समावेश होता.
यात हरिश्चंद्रगड, रतनगड, पट्टा उर्फ विश्रामगड, बितनगड,कलालगड,अहमदनगर भुईकोट इ.किल्ल्यांचा समावेश होता.
या प्रत्येक किल्यासाठी श्रीकांत कासट, सौरभ म्हाळस,प्रा.सुधाकर उगले,प्रा.जयसिंग सहाणे,श्रीनिवास अमृतवाड, रवींद्र चोबे यांनी समन्वयक म्हणून त्यांच्या सहकाऱ्यां सोबत प्रत्यक्ष किल्ल्यावर उपस्थित राहून भारतीय लष्कराबरोबर तिरंगा झेंड्यास मानवंदना दिली.

जवाई लेपर्ड हिल...              वाईल्ड कॅट प्रेमींसाठी एक आवडतं ठिकाण म्हणजे राजस्थान मधलं जवाई...            'जवाई बांध...
04/08/2023

जवाई लेपर्ड हिल...

वाईल्ड कॅट प्रेमींसाठी एक आवडतं ठिकाण म्हणजे राजस्थान मधलं जवाई...

'जवाई बांध' या मोठ्या सरोवराच्या भोवती पसरलेल्या या सर्व टेकड्यांमुळे हा परिसर रमणीय झाला आहे. इथल्या मध्यम उंचीच्या खडकाळ टेकड्या हे खूप साऱ्या बिबट्यांचं आवडतं ठिकाण आहे. खूप मोठ्या संख्येने बिबटे या टेकड्यांवर मुक्त संचार करत असतात.

जवाई येथील या टेकड्या पुरातन मंदिर शुंखलेसाठी प्रसिद्ध आहेत येथील टेकड्यांवर असलेल्या विविध मंदिरांच्या पायऱ्यांवर आरामात बसलेले आणि बोचऱ्या थंडीत ऊन खात निवांत पहुडलेले बिबटे बघणं म्हणजे एक मोठी पर्वणी असते.
येथील मंदिरांमध्ये भरपूर भाविक येजा करत असतात परंतु हे बिबटे मात्र तेथील नागरिकांना,पर्यटकांना कोणतीही इजा पोहोचवत नाहीत हे इथले वैशिष्ट्य सुप्रसिद्ध आहे.

निशाचर असलेला हा लाजाळू प्राणी मात्र दिवसातल्या वेगवेगळ्या प्रहरांमध्ये सुद्धा आपल्याला अगदी जवळून दर्शन देतो. त्यामुळे जवाई हे वाइल्ड सफारी प्रेमींचं सध्या आवडतं डेस्टिनेशन ठरत आहे.

सप्टेंबर पासून तर एप्रिल पर्यंतचा काळ हा या लेपर्ड सफारीसाठी अतिशय अनुकूल असून मोठ्या प्रमाणात पर्यटकांचे पाय जवाई कडे वळतात. सध्या राजस्थान राज्याचे पर्यटन मंत्रालय सुद्धा जवाई च्या बिबट्यांचा नैसर्गिक अधिवास जपत तिथला मोठ्या प्रमाणात करत आहे. अशा या बिबटप्रिय स्थळाला भेट देणे हा नितांत सुंदर अनुभव असतो यात शंकाच नाही.

बिबट दर्शनासोबतच जवाई मधला आपला स्टे हा अतिशय कम्फर्टेबल आणि इलाईट अशा रिसॉर्टमध्ये असला की आपली ही सफारी 'क्या बात' होऊन जाते.

अशा शेकडो हजारो वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रेक्षणीय पर्यटनस्थळांनी आपला भारत देश नटला आहे सजला आहे.. म्हणूनच प्रसिद्ध कवी डॉ चंद्रभानू त्रिपाठी आपल्या संस्कृत काव्यामध्ये म्हणतात,
प्रकृत्या सुरम्यं विशालं प्रकामं
सरित्तारहारैः ललामं निकामम् ।
हिमाद्रिर्ललाटे पदे चैव सिंधुः
प्रियं भारतं सर्वदा दर्शनीयम् ।।

🖋️- सौरभ सुरेश म्हाळस, संगमनेर.

Contact for more Details -
8830313849

सुप्रभात,आपण सर्व सह्यवेड्या, निसर्ग भ्रमंती करणाऱ्यांचे गुरू, ज्यांनी गड भटकंती आमच्या रोमारोमात भिनलेली त्या गोपाळ नील...
08/07/2023

सुप्रभात,
आपण सर्व सह्यवेड्या, निसर्ग भ्रमंती करणाऱ्यांचे गुरू, ज्यांनी गड भटकंती आमच्या रोमारोमात भिनलेली त्या गोपाळ नीलकंठ दांडेकर (गोनीदा व आमचे सर्वांचे अप्पा) यांना शतशः दंडवत.

आज ८ जुलै, गोनीदा म्हणजे गोपाळ नीलकंठ दांडेकर यांचा जन्मदिवस !

डोंगरवेड्यांचे आद्य गुरू असणाऱ्या आप्पांना आजच्या १०७ व्या जन्मदिवसाचे औचित्य साधत 'गोपाळ नीलकंठ दांडेकर - किल्ले पाहिलेला माणूस' या महितीपटाची लिंक खाली देत आहे. महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने निर्मिलेला माहितीपट आपण बघावा आणि अनेकांपर्यंत पोहचवावा ही नम्र विनंती. धन्यवाद ! 😊🙏🏻

https://youtu.be/qhr4WkhytSA

#अखिलमहाराष्ट्रगिर्यारोहणमहासंघ #गोनिदा #गोपालनीलकंठदांडेकर

सर्व भटक्यांना नमस्कार. सध्या सगळीकडे मस्त पाऊस सुरू झाला आहे. पावसासोबतच सह्याद्रीमधील विविध ठिकाणे ही पर्यटकांनी आणि ग...
05/07/2023

सर्व भटक्यांना नमस्कार.
सध्या सगळीकडे मस्त पाऊस सुरू झाला आहे. पावसासोबतच सह्याद्रीमधील विविध ठिकाणे ही पर्यटकांनी आणि गिर्यारोहणाला आलेल्या गिर्यारोहकांनी भरून गेलेली दिसता आहेत.

पावसाळ्यातील गिर्यारोहणामध्ये आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागते. अन्यथा अपातकालीन स्थितीला सामोरे जावं लागण्याची शक्यता असते. या काळातील सुरक्षित गिर्यारोहणासाठी 'अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने' काही मार्गदर्शक तत्वे सांगितली आहेत.
पावसाळ्यात गिर्यारोहण करताना सदर नियम पाळल्यास गिर्यारोहण आनंददायी होईल यात शंकाच नाही..

■ पावसाळ्यातील ट्रेक करताना घ्यावयची काळजी ■

1. ओळखीच्या व अनुभवी ग्रुप सोबत ट्रेकला जावे

2. ट्रेक मधील भटक्यांची संख्या मर्यादित व नियोजन करता येईल एवढीच असावी

3. ग्रुप कडे First Aid चे साहित्य असावे,

4. ट्रेक कुठे, किती दिवसांचा आहे व लीडर/ ग्रुप यांची माहिती घटी/जवळच्या व्यक्तीस द्यावी.

5. ट्रेक मध्ये First man - last man यांच्या मध्येच चालावे.

6. एक दिवसाचा ट्रेक असला तरी सोबत चांगली टॉर्च ठेवावी.

7 आवश्यक वाटल्यास स्थानिक वाटाड्या (गाईड) सोबत घ्यावा.

8. पावसाचा अंदाज पाहून ट्रेकचे नियोजन करावे.

9. पावसाळ्यात धुक्यामुळे वाट चुकण्याची शक्यता असते. धुक्यात वावरताना सावधानता बाळगावी.

10. किल्ल्यावरील तट, दरवाजे, इतर पडीक अवशेष यांवर चढू नये, एखादा सुटलेला दगड निसटून अपघात होऊ शकतो.

1. walking stick सोबत ठेवावी, त्यामुळे चढणे, उतरणे व चालणे सोपे होते.

12. शेवाळलेल्या जागा व पायऱ्यांवर जपून चालावे.

13. आपतकालीन स्थितीत उपयोग व्हावा, म्हणून मोबाईल जपून वापरावा.

14. अवघड ठिकाणी फोटो किंवा सेल्फी घेणे टाळावे.

15. जंगलात शहरी गोंगाट ठिकाणी करू नये

16. किल्ल्यावर, जंगलात, धबधब्याजवळ कचरा करू नका. आपला निसर्ग आपणच स्वच्छ ठेवा.

17. पाणलोट क्षेत्रात जास्त पाऊस झाल्यास समजून येत नाही. अचानक पाण्याचा प्रवाह वाढण्याची भीती असते. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहात, ओढ्यात, नदीत उतरू नये.

18. धबधब्याच्या प्रपात सोबत वरून दगड पडण्याची शक्यता असते.

19. डोहात, घरणात पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नसल्याने अपघात होऊ शकतो. त्यात उतरणे टाळावे.

20. गर्दीची ठिकाणे टाळावी.

21. आयत्यावेळी ट्रेकमध्ये बदल केला तर त्याबद्दल संबंधितांना कळवावे.

22. ट्रेक संपल्यावर सगळे घरी पोहचले आहेत याची खात्री करा.

23. सोबत जास्तीचे कोरडे पदार्थ ठेवावे. आपत्कालीन स्तिथीत त्याचा उपयोग होतो.

24. सोबत असणारे सर्व साहित्य प्लास्टिक बॅगमध्ये टाकून चांगले पॅक करून सॅक मधे टाकावे. ते ओले होणार नाही याची दक्षता घ्यावी.

25. दुर्देवाने काही दुर्घटना घडल्यास 7620230231 या 24x7 हेल्पलाईन नंबरवर आपत्कालीन मदतीसाठी संपर्क साधावा

जनहितार्थ प्रसारणाकरिता
द्वारा - अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ.

A people without the knowledge of their past history, origin and culture is like a tree without roots.' — Marcus Garvey
08/06/2023

A people without the knowledge of their past history, origin and culture is like a tree without roots.'

— Marcus Garvey

Until you step into the unknown, you don’t know what you’re made of....  Valley, Bhandardara.
08/06/2023

Until you step into the unknown, you don’t know what you’re made of....

Valley, Bhandardara.

There’s nothing better than feeling small in nature. It's the best way to instill a fresh sense of awe.                 ...
08/06/2023

There’s nothing better than feeling small in nature. It's the best way to instill a fresh sense of awe.

Fireflies festival with Sandan valley trek happily completed...😍👍🏻27-28 may 2023
30/05/2023

Fireflies festival with Sandan valley trek happily completed...😍👍🏻
27-28 may 2023

पेमगिरी किल्यावरील महाध्वजारोहण.
18/08/2022

पेमगिरी किल्यावरील महाध्वजारोहण.

रेस्तराँ (रेस्टॉरंट) ऑन व्हील... भारतीय रेल्वे...  आपल्या प्रचंड मोठ्या विस्तारासह इतर अनेक बाबींमध्ये जगात सर्वप्रथम अस...
07/08/2022

रेस्तराँ (रेस्टॉरंट) ऑन व्हील...

भारतीय रेल्वे...
आपल्या प्रचंड मोठ्या विस्तारासह इतर अनेक बाबींमध्ये जगात सर्वप्रथम असणाऱ्या भारतीय रेल्वे द्वारे पर्यटकांना आकर्षित करणारे आणि सेवा-सुविधांची गुणवत्ता वाढवणारे अनेकानेक उपक्रम सध्या देशभर सुरू आहेत. त्यापैकीच 'रेस्तराँ ऑन व्हील' हा एक अनोखा उपक्रम.

पॅलेस ऑन व्हील, व्हिलेज ऑन व्हील, लक्झरी ऑन व्हील्स या उपक्रमाची लोकप्रियता आपण सगळे जाणतोच.. देशभर धावणाऱ्या या सर्व रेल्वेज भारतीय पर्यटकांसोबतच विदेशी पर्यटकांमध्ये आकर्षण ठरत आहेत. असाच भा.म.रे. म्हणजेच भारतीय मध्य रेल्वेद्वारे रेल्वे कोचेसना अतिशय आलिशान पद्धतीने सजवून त्यात 'कोच रेस्टॉरंट' तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी ना केवळ रेल्वे प्रवासी तर स्थानिक गावकऱ्यांना सुद्धा हॉटेलिंग करता येणार आहे. या रेस्टॉरंटमध्ये अतिशय दर्जेदार आणि उत्तमोत्तम पदार्थ उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

निसर्ग,संस्कृती आणि धार्मिक पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या 'मध्यप्रदेश' मधील इटारसी स्टेशनला प्रारंभिक स्वरूपात हा प्रयोग केलेला आहे..
तर, तेव्हा जेव्हा जेव्हा मध्य प्रदेशात फिरायला जाल तेव्हा या अनोख्या कोच रेस्टॉरंट मध्ये जेवण करायला विसरू नका हं..
कारण,
एमपी अजब है। सबसे गजब है। 😀👍🏻

🖋️लेखन- सौरभ सुरेश म्हाळस ,
8830313849


01/06/2022

Welcome Monsoon... After 1st lot of 4000 seeds, 2nd lot of 2000 seeds with 300 packets are Ready for Germinate in Jungle.🌱🌳😊👍

Namaste! Incredible India is delighted to welcome you back. Adhering to all the Covid safety protocols and with the worl...
12/02/2022

Namaste!
Incredible India is delighted to welcome you back.

Adhering to all the Covid safety protocols and with the world's largest vaccination drive in place, measures have been undertaken to create a safe haven for our international travellers to experience this Incredible destination.

As part of this, the travel restrictions have been relaxed by India for selected countries. To know all about the revised guidelines and detailed requirements, please visit :
https://www.mohfw.gov.in/

Kishan Reddy Gangapuram Shripad Naik Ajay Bhatt Ministry of Health and Family Welfare, Government of India Ministry of Culture, Government of India Press Information Bureau - PIB, Government of India Incredible India

Devotion and absolute self-surrender are the happiest and best means to reach God. -ramanuja.       #एकभारतश्रेष्ठभारत  ...
12/02/2022

Devotion and absolute self-surrender are the happiest and best means to reach God.
-ramanuja.

#एकभारतश्रेष्ठभारत

Feel alive ....
28/07/2021

Feel alive ....

Let's go...😊
19/07/2021

Let's go...😊

15/07/2021

भो: सह्य देवता..,
अस्मिन कार्य संरक्षणार्थम् स्थिरो भव, अचलो भव, सुखदो भव, वरदो भव..

कोरोना आणि लॉकडाऊनचे दुष्टचक्र आता संपतंय, लसीकरणाने आता जनजीवन सुरळीत होण्याच्या मार्गावर आहे, आपल्या ईगल विंग्स ट्रेकर्स समूहा मार्फत आयोजित केले जाणारे गिर्यारोहणाचे आणि सहलींचे उपक्रम दीड वर्षाच्या विश्रांतीनंतर आता पुन्हा सुरू करत आहोत. या वर्षीच्या गिर्यारोहण मोहिमांची सुरुवात ही विश्रामगडावर समूहाच्या प्रतिनिधींच्या सराव प्रात्यक्षिकांनी करण्यात आली.

श्री क्षेत्र गणेशपुरी येथील शांतिमंदिराचे आचार्य श्री भास्करजी निलखे आणि सौ श्रद्धा भास्कर निलखे या नवदांपत्याच्या हस्ते सह्याद्री पर्वत आणि गिर्यारोहणाच्या साहित्याचे पूजन करण्यात आले..
कल्याण येथील सुप्रसिद्ध पुरोहित श्री धनंजयजी निलखे गुरुजी यांनी औपचारिक पूजन करून कविराज भूषणलिखित भूषणबावनी मधील भवानी मातेच्या स्तुतीचे गायन केले.

माता भवानी, गिरीराज सह्याद्री आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने प्रस्तरावरोहणास सुरुवात करण्यात आली...

लवकरच आपणा सर्वांना सहभागी होता येईल अशा गिर्यारोहण मोहिमांची, सहलींची माहिती आणि वेळापत्रक प्रदर्शित केले जाईल.. 😊🙏🏻

- सौरभ सुरेश म्हाळस
8830313849



https://www.facebook.com/EAGLE-WINGS-Trekkers-sangamner-1851057624950284

Address

Sangamner

Telephone

8830313849

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when EAGLE WINGS Trek and Tours, sangamner posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to EAGLE WINGS Trek and Tours, sangamner:

Videos

Share


Other Eco Tours in Sangamner

Show All