Shirala Taluka Paryatan Vikas Mandal

Shirala Taluka Paryatan Vikas Mandal Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shirala Taluka Paryatan Vikas Mandal, Tourist Information Center, Sangli.

04/08/2023
11/07/2023

विस्मृतीत गेलेला एक लेख आणि समर्थांचे एक वेगळे चित्र!

आज दासनवमी! या निमित्त पूर्वी भारत इतिहास संशोधक मंडळात मांडल्या गेलेल्या एका संशोधनाला उजाळा देण्याचा हा लहानसा प्रयत्न.

श्री समर्थ रामदास स्वामींचे डोमगाव मठात सापडलेल्या दासबोध प्रतीतील एक चित्र कायम ‘रामदास आणि आदिलशाह’ अशा नावाने फिरवले जाते आणि त्यात रामदास आदिलशाहाचे हेर असल्याचे भासवले जाते. पण मुळात हे चित्र नेमके आहे काय, त्यात असलेल्या व्यक्ती कोण आहेत याचा उहापोह भारत इतिहास संशोधक मंडळाच्या जुलै इ.स. १९८२ च्या त्रैमासिक क्र. ६१ मध्ये डेक्कन कॉलेजच्या उषा रानडे यांनी ‘समर्थ रामदास: एक आगळे दर्शन’ या पाठात केला आहे. लेखिकेने जे संशोधन मांडले आहे, ते जसेच्या तसे न देता अतिशय थोडक्यात इथे देत आहे. पूर्ण लेख हा मंडळाच्या त्रैमासिकात असल्याने जिज्ञासूंनी त्रैमासिक मिळवून अवश्य वाचावा.

डोमगावच्या मठात दासबोधाची एक सचित्र प्रत असल्याचे लेखिकेला समजल्यानंतर त्यांनी मठाला भेट देऊन ती प्रत तपासली. हि प्रत कल्याणस्वामींचे शिष्य केशवस्वामी रामदासी यांच्या हातची असून पोथीचा लेखनकाल इ.स. १६९९ असल्याचे दिसते. समर्थांनी ‘लेखनक्रिया’ समासात लिखाणाचे जे नियम घालून दिले आहेत त्यानुसार दासबोधाची ही प्रत लिहिली गेली असून सोन्या-रुप्याच्या शाईने लिखाण आणि चित्रे काढली आहेत. या पोथीत एकूण सव्वीस चित्रे असून त्यातील एक चित्र म्हणजे पुढे (या पोस्ट मध्ये दिलेले) चित्र आहे.

आता या चित्राबद्दल पसरवले जाणारे गैरसमज म्हणजे मध्यभागी आदिलशाह बसला असून मागे त्याचा सेवक आहे आणि आदिलशहाच्या समोर रामदासस्वामी बसले आहेत. पण वास्तवात हे असे नाही हे चित्र पाहिल्यास नीट दिसून येईल. या आदिलशाही पोशाखात बसलेली व्यक्ती म्हणजे समर्थ रामदासस्वामी असून समोर बसलेली व्यक्ती हे त्यांचे शिष्य कल्याण गोसावी आहेत.

आता ते मधले रामदासस्वामी आदिलशाही वेशात कसे? या गोष्टीचा विचार केल्यास मध्ययुगीन चित्रपद्धतीत चित्रकाराच्या मानसिकतेचा आणि त्याच्या प्रांताचा त्याच्या चित्रांवर परिणाम होतो हे आपल्याला अनेक उदाहरणांवरून दिसून येईल. म्हणजे अगदी शिवाजी महाराजांची चित्रं सुद्धा मोंगली किमॉंश घालून आणि ताशा पद्धतीचे पायघोळ वगैरे घालून दाखवलेली आहेत. अनेक देवदेवतांची चित्रेसुद्धा त्या त्या प्रांताच्या पोशाखावर बनवलेली आहेत. हे चित्र काढणारा चित्रकार आदिलशाही प्रांतातला असावा आणि म्हणूनच त्याने चित्र काढताना समर्थांना तो वेष परिधान केला असावा हे उघड आहे.

माझं त्यातलं आणखी एक निरीक्षण म्हणजे नीट पाहिल्यास कल्याण गोसाव्याच्या हातात कागद आणि लेखणी दिसत आहे. ते कागदावर काहीतरी लिहीत आहेत. दासबोध समर्थांनी सांगितलं आणि कल्याणस्वामींनी उतरवून घेतला हि गोष्ट सर्वश्रुत आहेच. याशिवाय रामदासस्वामींच्या मागे उभा असलेला सेवक हा आदिलशाही सेवक नाही, तो एक जटाधारी साधू आहे, यावरून समोर बसलेली व्यक्ती आदिलशाह अथवा कोणी सुलतान नसून ते समर्थ आहेत हे उघड होते.

यापुढे कोणाला हे चित्र “आदिलशहाचा हेर रामदास” अशा मथळ्याखाली दिसल्यास बिचकून जाऊ नका, हे चित्र समर्थांचे आणि कल्याणस्वामींचे आहे.

#इतिहासाच्या_पाऊलखुणा

Address

Sangli
415405

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shirala Taluka Paryatan Vikas Mandal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shirala Taluka Paryatan Vikas Mandal:

Videos

Share


Other Tourist Information Centers in Sangli

Show All