MyKokan

MyKokan This page contains information about kokan, Maharashtra
(1)

गावची दहीहंडी
27/08/2024

गावची दहीहंडी

Village view
24/08/2024

Village view

Evening view @ जगबुडी नदी
24/08/2024

Evening view @ जगबुडी नदी

19/08/2024

Borewell start

18/08/2024

#बोअरवेल #कोकण

01/06/2023

मावशीची एन्ट्री - शाहीर रत्नाकर महाकाळ #नमन

खूप छान असा लेख
01/06/2023

खूप छान असा लेख

गावांतून येऊन मुंबईत सेटल झालेल्या माझ्या सर्व मित्र मैत्रिणींना समर्पित .....
आमच्या कोकणात साधारणतः 7 जून पर्यंत मान्सूनचं आगमन होतं. चार चार दिवस आकाश उघडत नाही. हा खूप वेगळा अनुभव आहे.

आता आता हे मिडीयावाले पावसाचा पाठलाग करत रिपोर्ट्स ब्राॅडकास्ट करीत असतात. केरळमध्ये मान्सून दाखल अशा फूटनोट्स किंवा मग ती सॅटेलाईट पिक्चर्स पावसाची चाहूल सांगत असतात. अगोदर कुठे होते टीव्ही नि हे इंटरनेट. याआमच्या कोकणात खूप आधीपासून बर्‍याच पद्धती आहेत पाऊस साधारण कधी येईल हे ओळखण्याच्या.

सकाळी परसात देवपूजेची फूलं काढायला बाहेर पडलं की हवा गार असते, पायात अगदी छोट्या आकाराचे लाल किडे दिसायला लागतात. हे एका रात्रीत कुठून उत्पन्न होत असतील याचं मला आजही कुतूहल वाटतं. त्यानंतर भिंगरी नावाचे उडणारे जीव खूप खाली खाली येऊ लागतात. हल्लीची मुलं हॅलिकाॅप्टर म्हणतात त्याला. माझा काका सांगायचा, हे बाकीच्या काळात खूप उंचीवर असतात. पाऊस जसजसा जवळ येऊ लागतो तसतसे हे खाली खाली येतात. काळे लाल डोंगळे प्रचंड प्रमाणात वारूळ सोडून कशात तरी व्यस्त असलेले दिसतात. यावेळी मान्सून साधारण पंधरा दिवस अंतरावर असतो.
मग आमच्या घरी गड्यांना बोलवून अंगणातला माडांच्या चुडतांचा मांडव काढून टाकायचे.

अगदी दोन चार दिवस अंतरावर पाऊस आला की प्रचंड भरून येत राहतं. आर्द्रता इतकी की अंगातन नुसत्या घामाच्या धारा. एकाजागी बसवत नाही. दिवस दिवस घराघरातले झोपाळे डोलत असत पुरूष मंडळी ओटी, मोठ्ठाले माचे किंवा खाटली सोडून अंगणासमोरच्या पडवीत झोपायला लागत.

मजा असायची ही सगळी. सारवलेल्या अंगणातात धो धो ओतायचा पाऊस तेव्हा चार महिने या अंगण्यात बॅट बाॅल घेऊन दिवस दिवस खेळलेली आम्ही भावंडं केविलवाणी होऊन ते बघत राहायचो. पार खडे व्हायचे दोन दिवसात त्या सारवलेल्या अंगणाचे. रात्री अपरात्री लाईट नसणे ही फार काॅमन गोष्ट होती. कारण पाऊस रिपरिप किंवा रिमझिम असा कधी नसतोच. धो धो हे एकच योग्य वर्णन. मग कुठेतरी एखादी झाऊळ, साग, वाकड्या फणसाची फांदी तारेवर पडली की दोन दोन दिवस अंधार. पण त्याचा कधी त्रास वाटला नाही.

राॅकेलवरचा बाटलीचा दिवा कोनाड्यात ठेवून किंवा बत्ती वाशाला टांगून सगळे जेवायला बसायचे. अचानक आलेला प्रचंड गारवा, असेल ती भाजी, गरम गरम भाकऱ्या, नुकतंच मुरायला लागलेलं लोणचं, आज्जीच्या हातची ताकाची कढी, चुलीवरून उतरवून मोकळा करून वाढलेला गरम भात आणि नात्यांची ऊब हे सगळं आठवलं की आता शनिवारी जातो त्या हेल्थ क्लब किंवा हॉटेलचा झगमगाट फिका वाटतो. समोर लॅपटॉपवर नेटफ्लिक्स, टीव्हीवर हॉट स्टार किंवा मूव्हीज असल्याशिवाय आता घशाखाली घास जात नाही. पण ते दिवस खरंच सोन्याचे होते.

कौलं गळायची. काका, बाबा, आजोबा सगळे संध्याकाळपासनं त्याचा बंदोबस्त करण्यात गुंग. नेमका पावसाआधीच गोठ्यात नवीन पाडा यायचा. त्याच्या काळजीनं खालीवर होणारा जीव आई कसाबसा समजावून झोपवायची. रेज्यातनं बाहेर बघावं तर वीज चमकताक्षणी दारातला प्राजक्त, काकाची टूव्हीलर, पाडावकी केलेले बेडे नारळ लख्ख दिसायचे. भितीनं पाचावर धारण बसायची पण डोळे बंद केले की काही होणार नाही हा खुळा विश्वास असायचा.

हे सगळं अजून तसंच आहे फक्त आम्ही पोरंबाळं मोठी झालो, नोकरीच्या शोधात स्वप्नांच्या मागे शहरात आलो.आताआईबाबा नाहीत आणि आज्जीआजोबाही गेले त्याला बरीच वर्षं झाली. बाहेर पाऊस पडत असला की नेमकं रात्री जेवताना हे सगळं आठवतं आणि घास तोंडात घोळत राहतो. डोळ्यात कधी मळभ भरतं नि कधी कोसळायला लागतं हे काही अजून आधी ओळखता येत नाही. कधी कधी वाटतं उगीच मोठे झालो. त्या ओटीवरच्या कोपर्‍यात ठेवलेला कंदील पुरेसा होता अंधारात आधाराला. पण आज... आता इतके पुढे निघून आलो की परत जाणं शक्य नाही आणि कुठे कंदील पण दिसत नाही......

30/05/2023
08/05/2023

गवळण एन्ट्री - शाहीर रत्नाकर महाकाळ नमन #नमन

08/05/2023

प्रथम वर्धापन सोहळा ग्रामदैवत श्री झोलाई मानाई मंदिर, मेटे

06/05/2023

प्रथम वर्धापन सोहळा ग्रामदैवत श्री झोलाई मानाई मंदिर, मेटे

01/05/2023

Point

26/04/2023

श्री गणेशाय नमः!!  #श्रीगणेश  #गणपती
25/04/2023

श्री गणेशाय नमः!! #श्रीगणेश #गणपती

22/04/2023

*आज अक्षय तृतीया,*
*साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक सुंदर मुहूर्त..!!*
*आपल्या आयुष्यात “अक्षय” सुख, धनसंपदा ,मैत्री आणि आरोग्य लाभो,*
*हिच ईश्वर चरणी प्रार्थना..!!*
*अक्षय तृतीयेच्या खुप खुप शुभेच्छा..!"*

आयनी गावाचे सुपुत्र कोकणातील स्वातंत्र्य लढ्यातील सशस्त्र क्रांतिकारक अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी पुण्यतिथी निमित्त विनम...
19/04/2023

आयनी गावाचे सुपुत्र कोकणातील स्वातंत्र्य लढ्यातील सशस्त्र क्रांतिकारक अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन #खेड

हळदीचे झाड
18/04/2023

हळदीचे झाड

श्री झोलाई मानाई देवी मेटे गावाची ग्रामदेवता
16/04/2023

श्री झोलाई मानाई देवी मेटे गावाची ग्रामदेवता

14/04/2023

लोणावळ्यातील पाऊस आणि धुके

Gateway of India
14/04/2023

Gateway of India

13/04/2023

रत्नागिरी हापूस
13/04/2023

रत्नागिरी हापूस

27/10/2021
13/10/2021

Address

Satara

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when MyKokan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share


Other Eco Tours in Satara

Show All

You may also like