जिल्हा माहिती कार्यालय, सातारा ,District Information Office ,Satara

  • Home
  • India
  • Satara
  • जिल्हा माहिती कार्यालय, सातारा ,District Information Office ,Satara

जिल्हा माहिती कार्यालय, सातारा ,District Information Office ,Satara MAHARASHTRA GOVERNMENT PUBLICITY THROUGH SATARA OFFICE
Visit Our Twitter A/c- twitter.com/Info_Satara
(50)

26/06/2024

*सवलतीच्या दरात रोपांची विक्री*
*विविध विभागांनी वन महोत्सवात वृक्षांची लागवड करावी*

सातारा दि. 26: वन महोत्सव 30 सप्टेंबर पर्यंत राबविण्यात येत आहे. वृक्षलागवडीसाठी लोकांना उदयुक्त करण्याच्या दृष्टीने शासनामार्फत सवलतीच्या दराने रोपांचा पुरवठा करण्यात येणार आहे, अशी माहिती विभागीय वन अधिकारी एच.एस. वाघमोडे यांनी दिली आहे.
ज्या शासकीय यंत्रणांना, स्थानिक स्वराज्य संस्थांना वृक्ष लागवड करावयाची आहे व त्यांच्याकडे जागा उपलब्ध आहे मात्र त्यांच्याकडे रोपे निर्मितीसाठी कोणत्याही प्रकारची आर्थिक तरतूद उपलब्ध नाही, अशा यंत्रणांना या वन महोत्सव कालावधीत उपलब्ध जागेच्या प्रमाणात वृक्षलावगड करण्यासाठी आवश्यक रोपांचा मोफत पुरवठा नजिकच्या रोपवाटिकेतून रोपांचा उपलब्धतेनुसार केला जाईल. त्याचबरोबर शाळा, विद्यालय, महाविद्यालय यांनी रोपांची मागणी केल्यास त्यांना वन महोत्सव कालावधीत मागणीनुसार मोफत रोपांचा पुरवठा केला जाईल. तसेच पोलीस, संरक्षण बल यांना मोफत रोपांचा पुरवठा केला जाईल.
विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग, सातारा यांच्या अधिनस्त 10 परिक्षेत्रामध्ये रोपे उपलब्ध असून वन महोत्सव कालावधीत जास्तीत जास्त वृक्षारोपण करण्याच्या अनुषंगाने विविध विभागांनी सवलतीच्या दरात रोपे घेऊन वृक्ष लागवड करावी, असेही आवाहन श्री. वाघमोडे यांनी केले आहे.
00000

26/06/2024

*नदीवरील उपसा सिंचन पंप सुरक्षित स्थळी हलवण्यचे सिंचन विभागाचे आवाहन*
सातारा दि. 26: कार्यकारी अभियंता, कोयना सिंचन विभाग, कोयना नगर यांच्या कार्यक्षेत्रातील कोयना, तारळी, उत्तरमांड, वांग, उत्तरवांग नद्या तसेच या नद्यावरील को.प. बंधारे व महिर, चाफळ व चाळकेवाडी ल.पा तलाव इत्यादी ठिकाणी अतिवृष्टीमुळे उद्भावणाऱ्या पुरामुळे शेतकऱ्यांचे पंपांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. उपसा सिंचन योजना पंप शेतकऱ्यांनी त्यांच्या स्वखर्चाने सुरक्षित स्थळी तात्पुरत्या स्वरुपात हलवावे. पुरामुळे नुकसान झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी शेतकऱ्यांची राहील, असे कोयना सिंचन विभागाच्या उपकार्यकारी अभियंत्यांनी कळविले आहे.
0000

26/06/2024

*श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त वाहतूकीत बदल*
सातारा दि. 26: श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोळहा 6 जुलै ते 11 जुलै अखेर सातारा जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार आहे. या अनुषंगाने पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी वाहतुकीत बदल केला आहे.
दि.०५/०७/२०२४ रोजीचे ०६.०० ते दि.०९/०७/२०२४ रोजीचे 12 वा. पर्यत फलटण येथून पुणे, निरा, लोणंद कडे जाणारी वाहतूक बारामती किवा वाठार स्टेशन येथून पूणेकडे शिरगांव घाटातून वळविणेत येत आहे. दि.०५/०७/२०२४ रोजीचे सकाळी ६.०० वा. पासून ते दि.०८/०७/२०२४ रोजी रात्री 12 वा.पर्यत आदर्की फाटा येथून लोणंदकडे येणारी वाहतूक पालखी सोहळयातील येणारे वाहनाखेरीज इतर वाहनांना बंद करणेत येत आहे. दि.०५/०७/२०२४ रोजीचे सकाळी ९.०० पासून ते दि.१०/०७/२०२४ रोजीचे दुपारी 1 वा. पर्यंत लोणंद येथून फलटणकडे जाणारी वाहतूक आदर्की मार्गे फलटणकडे वळविण्यात येत आहे. दिनांक ०५/०७/२०२४ रोजीचे मध्यरात्रीपासून ते दिनांक ०९/०७/२०२४ रोजीचे मध्यरात्रीपर्यंत फलटण ते लोणंद या मार्गावरील वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात येत आहे. दि.०९/०७/२०२४ रोजीचे रात्रीच्या 12 वाजल्यापासून ते दि.११/०७/२०२४ रोजीचे दुपारी 4 वा. पर्यंत फलटण ते नातेपुते जाणारी वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात येत आहे. दि.०९/०७/२०२४ रोजीचे रात्रीच्या 12 पासून ते दि. ११/०७/२०२४ रोजीचे रात्री 12 वा. पर्यंत नातेपुतेकडून पुणे बाजुकडे जाणारी वाहतुक माळशिरस, अकलूज येथून बारामती मार्गे पुण्याकडे वळविण्यात येत आहे.
दि.०९/०७/२०२४ रोजीचे रात्री 12 वाजल्यापासून ते दि.११/०७/२०२४ रोजीचे दुपारी 4 वा. नातेपुतेकडून फलटण मार्गे साताराकडे जाणारी वाहतूक शिंगणापूर तिकाटणे मार्गे दहिवडी-सातारा अशी वळविण्यात येत आहे. नातेपुतेकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक नातेपुते-दहीगाव-जांब-बारामती मार्गे पुण्याकडे वळविण्यात येत आहे. दि.०९/7/२०२४ रोजीचे रात्री 12 पासून ते दि.११/०७/२०२४ रोजीचे दुपारी 4 वा.पर्यंत नातेपुते-वाई- वाठारकडे जाणारी वाहतूक शिंगणापूर तिकाटणे-शिंगणापूर-जावली-कोळकी-झिरपवाडी-विचुर्णी-ढवळपाटी- वाठार फाटा मार्गे वळविण्यात येत आहे.
१०/०७/२०२४ रोजी पालखी सोहळा हा फलटण येथून पुढील बरड मुक्कामी सकाळी ६.०० वा. मार्गस्थ होणार आहे. सदर वेळी वाहतुकीची कोंडी निर्माण होवूनये म्हणून पालखीतील वाहने फलटण ते पंढरपुर रोडने बरड कडे जाण्याऐवजी फलटण-दहिवडी चौक-कोळकी शिगणापूर तिकाटणे-वडले-पिंप्रद-बरड अशी वळविण्यात येत आहे.
पालखी सोहळा दरम्यान पालखी मार्गावरील पालखी सोहळयातील वाहनाखेरीज इतर सर्व वाहने पर्यायी ये-जा करतील याची इतर वाहनधारकांनी नोंद घ्यावी.
00000

26/06/2024

*मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची नेत्र विभागाला भेट*

सातारा दि. 26 : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी नेत्रतपासणी शिबीरानिमित्त स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील नेत्र विभागाला भेट देवून कामकाजा बद्दल समाधान व्यक्त केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सूचनेनुसार दिनांक २९ मे २०२४ रोजी केडंबे तालुका जावली या डोंगराळ भागामध्ये मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दुर्गम व डोंगराळ भागातील लोक परिवहन तसेच इतर अडचणी मुळे वैद्यकीय सुविधांपासून वंचित राहतात याची नोंद घेऊनच या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या तपासणी शिबिरामध्ये सुमारे 225 रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यामध्ये मोतीबिंदूचे 52 रुग्ण आढळून आले. त्यापैकी 25 रुग्णांना शासकीय वाहनाने नेत्र विभागात आणून रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली तसेच त्यांना त्यांच्या गावी शस्त्रक्रियेनंतर परत सोडण्याची व्यवस्था ही शासकीय वाहनांनी करण्यात आली.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यात आले. या शिबिरा मध्ये जिल्हा नेत्रशल्य चिकित्सक डॉ. चंद्रकांत काटकर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राहुल खाडे, तसेच रुग्णालयीन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
0000

26/06/2024

*फोर्टिफाईड तांदळाबाबत शंका आणि अडचणी असल्यास जिल्हा पुरवठा कार्यालयाशी संपर्क साधावा*
सातारा दि. 26: फोर्टिफाईड तांदळाचे अनुषंगाने पसरवणेत येणाऱ्या अफवांवर नागरीकांनी विश्वासू ठेऊ नये. सदर फोर्टिफाईड तांदळाबाबत लाभार्थ्यांना काही शंका, अडचणी असल्यास आपल्या तालुक्यातील तहसिल कार्यालयातील पुरवठा शाखेशी अथवा जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी केले आहे.
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यात लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत लाभार्थ्यांना फोर्टिफाईड तांदूळ (पोषणतत्व गुणसंवर्धीत तांदूळ) वितरीत करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. राज्यात फोर्टिफाईड तांदूळ वितरण योजना ही पंतप्रधान महोदयांची महत्त्वाकांक्षी योजना असून त्यानुसार सातारा जिल्हयात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत पात्र प्राधान्य कुटुंब लाभार्थी व अंत्योदय लाभार्थींना फोर्टिफाईड तांदूळ वितरीत करणेत येत आहे.
फोर्टिफाइड तांदूळामध्ये जीवनसत्व B-12, फॉलिक ॲसिड व लोह या सूक्ष्म पोषक तत्वांचा समावेश असतो. पोषकतत्वे मिळवण्याच्या दृष्टीने फोर्टीफाइड तांदूळ अत्यंत उपयुक्त आहे. फोर्टिफाइड तांदूळ व नियमित तांदूळ याचे प्रमाण 1:100 असे आहे. म्हणजेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पुरवठा करण्यात येत असलेल्या तांदूळामध्ये फोर्टिफाइड तांदळाचे प्रमाण 1 किलोमध्ये 10 ग्रॅम या प्रमाणात आहे. प्रक्रिया करण्यात आलेल्या फोर्टिफाइड तांदळाचे वजन हे नियमित तांदळापेक्षा कमी असते.त्यामुळे हा तांदूळ पाण्यामध्ये वर तरंगताना दिसतो. फोर्टिफाइड तांदूळ नियमित पद्धतीने शिजवणेत यावा.यासाठी कोणत्याही प्रकारची वेगळी कार्यपद्धती अवलंबवण्याची आवश्यकता नाही.
सदर फोर्टिफाईड तांदूळामधील लोह हे अशक्तपणा व तांबडया पेशींची कमतरता दूर करते. फॉलिक ॲसिड गर्भाचा विकास व नवीन रक्त पेशी बनविणेस उपयुक्त आहे. विटामिन B-12 मज्जासंस्थेचे कार्य सुरळीत सुरु ठेवते. अशाप्रकारे फोर्टिफाईड तांदूळ हा पोषणतत्वांनी युक्त तांदूळ असलेने लाभार्थ्यांचे आरोग्याचे दृष्टीने अत्यंत लाभदायक आहे. फोर्टिफाईड तांदूळ हा सामान्य तांदळाच्या तुलनेत अधिक पौष्टिक असतो.सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींना पोषक घटक असलेले धान्य मिळावे यासाठी विविध पोषक घटकांचा अंतर्भाव असलेला फोर्टिफाईड तांदूळ वितरीत करणेत येत आहे.
0000

25/06/2024

*छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीरास पालकमंत्री शंभूराज देसाई यांची भेट*
*युवकांना केले मार्गदर्शन*
सातारा दि. 25: कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात आयोजित छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीराला पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी भेट दिली.
यावेळी जिल्हा व्यवस्थापक पी.बी. देशमाने, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य संजय मांगलेकर, जिल्हा कौशल्य रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सुनिल पवार, योगेंद्र सातपुते आदी उपस्थित होते.
युवकांनी करिअरसाठी जे क्षेत्र निवडले आहे त्या क्षेत्रात प्राविण्य मिळावावे. युवकांनी आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचाही लाभ घ्यावा, असेही आवाहन पालकमंत्री श्री. देसाई यांनी केले.
0000

*पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी हिरवा झेंडा दाखून प्रशिक्षणासाठी शेतकरी केले मार्गस्त* सातारा दि. 25 : शेतक-यांना बांबू ...
25/06/2024

*पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी हिरवा झेंडा दाखून प्रशिक्षणासाठी शेतकरी केले मार्गस्त*
सातारा दि. 25 : शेतक-यांना बांबू लागवडीचे तांत्रिक मार्गदर्शन करणेसाठी डॉ. बाबासाहेब सावंत कृषी विदयापीठ, दापोली येथे बांबू लागवडीबाबतचे प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी हिरवा झेंडा दाखून या प्रशिणासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांचे वाहन मार्गस्थ केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी विजय माईनकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
बांबू लागवडीच्या प्रशिक्षणासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने पहिल्या टप्पयात 55 शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी प्रशिक्षणासाठी दापोली येथे गेले आहेत.
0000

*राज्य उत्पादन शुल्क विभागाला सोयी सुविधा देण्यावर शासनाचा भर**- पालकमंत्री शंभूराज देसाई*सातारा दि. 25:  राज्य उत्पादन ...
25/06/2024

*राज्य उत्पादन शुल्क विभागाला सोयी सुविधा देण्यावर शासनाचा भर*
*- पालकमंत्री शंभूराज देसाई*
सातारा दि. 25: राज्य उत्पादन शुल्क विभाग हा राज्याला मोठ्या प्रमाणात महसूल देत आहे. या विभागाला तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांना सेायी सुविधा देण्यावर शासनाचा भर आहे, असे प्रतिपादन राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
गोडोली, सातारा येथे उभारण्यात येणाऱ्या अधीक्षक कार्यालय राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमीपूजन पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सूर्यवंशी, पोलीस अधीक्षक समीर शेख, उपायुक्त विजय चिंचाळकर, अधीक्षक अभियंता संतोष राखडे, कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक वैभव वैद्य आदी उपस्थित होते.
पोलीस विभागाच्या धर्तीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाला नवीन वाहने उपलब्ध करुन देण्यात आली आहेत, असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, 17 ठिकाणी स्वतंत्र उत्पादन शुल्क विभागाच्या इमारतींचे काम सुरु आहे. या विभागाच्या विविध प्रस्तांवाना मुख्यमंत्री महोदयांनी मान्यता दिलेली आहे.
पोलीस विभगाच्या जागेत उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालयत होत आहे. पोलीस विभागाने त्यांच्यासाठी नवीन जागेचा प्रस्ताव द्यावा. प्रशासनाला सुविधा दिल्या तर प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी जोमाने काम करतात. समाजामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सतर्क राहिले पाहिजे. उत्पादन शुल्क विभागाच्या नवीन इमारतीचे काम तातडीने सुरु करा. काम दर्जेदार झाले पाहिजे सातारच्या वैभवात भर घालणारी वास्तु निर्माण करा, असेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले.
राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उत्पादन शुल्क विभाग चांगल्या पद्धतीने काम करीत आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या महसूलात 25 टक्के वाढ झालेली आहे, असे प्रास्ताविकात आयुक्त श्री. सूर्यवंशी यांनी सांगितले
नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये तळ घर, तळ मजला, पहिला मजला असे एकूण 2 हजार 207.69 चौ.मी क्षेत्रफळ असणार आहे. त्याचबरोबर विश्रामगृह इमारतीचेही बांधकाम होणार आहे त्याचे क्षेत्रफळ 504.11 चौ.मी. असणार आहे.
00000

*पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला पाटण तालुक्यातील विविध विकास कामांचा आढावा*सातारा दि. 24: पालकमंत्री शंभूराज देसाई...
24/06/2024

*पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला पाटण तालुक्यातील विविध विकास कामांचा आढावा*
सातारा दि. 24: पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पाटण तालुक्यात सुरु असलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेऊन कामांना गती देण्याच्या सूचना केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्ष समीर शेख, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, प्रांताधिकारी सुनिल गाढे, कार्यकारी अभियंता राहूल अहिरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पाटण तालुक्यातील रस्त्यांचे डांबरीकरण पावसाळ्यानंतर करावे, अशा सूचना करुन पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, बांधकामाची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत. मातोश्री पाणंद रस्त्याची चारशेहून अधिक कामे मंजूर आहेत. ही कामे लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी प्रत्येक ग्रामसेवकाला तीन ते चार कामे वाटून द्यावीत. कामे वेळेत होण्यासाठी रोहयो व ग्रामपंचायत विभागाने वेळोवेळी आढावा घ्यावा.
प्रधानमंत्री ग्रामसडक, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, जिल्हा परिषदेकडील रस्त्यांचा कामांचा व कोयना भूकंप पुनर्वसन निधी,डोंगरी विकास निधीमधील कामांचाही आढावा घेतला.
या बैठकीनंतर पालकमंत्री श्री. देसाई यांनी जिल्हा परिषद आवारातील लोकल बोर्डाच्या इमारतीच्या व लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पोवई नाका येथील उभारण्यात येत असलेल्या पुतळ्याच्या कामाची पहाणी केली. ही कामे दर्जेदार व लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
000

24/06/2024

*आपत्ती निवारणासाठी जिल्हा प्रशासन सज्ज*
*- पालकमंत्री शंभूराज देसाई*

सातारा दि. 24: मान्सून कालावधीत आपत्ती निवारणासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. ज्या ठिकाणी आपत्ती उद्भवल्यास तेथील नागरिकांपर्यंत प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी लवकरात लवकर पोहचून मदत करतील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात अतीवृष्टी व दरड प्रवण क्षेत्रात करावयाच्या उपायोजनांचा पालकमंत्री श्री. देसाई यांनी आढावा घेतला. या वेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्ष समीर शेख, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, गावांमध्ये पूर किंवा दरडी कोसळल्या तर तेथील नागरिकांची विविध शाळांमध्ये राहण्याची सोय करण्यात आली आहे. या शाळांमध्ये औषधे, पिण्याचे पाणी, अन्नधान्य, लाईट या सह सर्व सुविधा सज्ज ठेवण्यात आलेल्या आहेत. संभाव्य आपत्ती परिस्थिती हाताळण्यासाठी 1 जुलै पासून एनडीआरएफचे पथक सातारा जिल्ह्यात दाखल होणार आहे. त्याचबरोबर जिल्हा प्रशासन व एनडीआरएफ मार्फत पूर प्रवण व दरड प्रवण तालुक्यामध्ये शोध व बचाव प्रशिक्षण कार्यक्रम तसेच साहित्याची चाचणी घेण्यात आलेली आहेत.
दरड कोसळून रस्ते वाहतूक विस्कळीत होणारी नाही यासाठी मेढा- महाबळेश्वर घाट, पसरणी घाट, चिपळून-कराड मार्ग, सज्जनगड-ठोसेघर मार्ग, महाबळेश्वर-पोलादपूर मार्ग व शेंद्रे ते बामणोली मार्गावर जेसीबी, पोकलेन, क्रेन व डंपर इत्यादी वाहने ठेवण्यात आलेली आहेत. डोंगरी तसेच पूर प्रवण क्षेत्रातील नागरिकांनी मान्सून कालावधीत सतर्क रहावे, असे आवाहनही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
0000

*पालखी सोहळा शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने सतर्क रहावे*- *पालकमंत्री शंभूराज देसाई*- *संतश्रेष्ठ श्री ज्ञा...
24/06/2024

*पालखी सोहळा शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने सतर्क रहावे*
- *पालकमंत्री शंभूराज देसाई*
-
*संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज*

*सातारा दि. 24 (जिमाका)* : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा उत्साहात, शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने सतर्क रहावे अशा सूचना पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आज पालखी सोहळ्याच्या नियोजनाचा आढावा पालकमंत्री श्री. देसई यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधिक्षक समीर खेख, उपवन संरक्षक अदिती भारद्वाज, अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, फलटण व खंडाळ्याचे प्रांताधिकारी, तहसिलदार यांच्यासह सबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना पुरवण्यात येणाऱ्या सर्व सुविधा दर्जेदार असाव्यात असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, पालखी मार्गावर तसेच विसावा आणि मुक्कामाच्या ठिकाणी पाणी, वीज, आरोग्य सुविधा पुरवण्याचे योग्य नियोजन करण्यात आले आहे. त्याची चांगली अंमलबजावणी करण्यात यावी. महिला वारकऱ्यांसाठी बंदीस्त स्नानगृहाची व्यवस्था असावी. ठरावीत अंतरावर आरोग्य पथक तैनाक असावे. त्याशिवाय फरते आरोग्य पथकही तैनात करण्यात यावे. पालखी सोहळ्यातील सहभागी वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच पालखी मार्गावर कायमस्वरुपी शौचालये व स्नानगृहे उभारण्यासाठीचा प्रस्ताव तयार करावा. त्यासाठी जागा निश्चित कराव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी पालखी सोहळ्याच्या नियोजनाबाबत संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी नियोजनाची माहिती दिली. पालखी सोहळ्यासाठी यंदा 1 हजार 800 फरते शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच 74 ठिकाणी तात्पुरती मुतारी, 24 ठिकाणी महिलांसाठी बंदीस्त स्नानगृहांची सोय करण्यात आली आहे. सुलभ इंटरनॅशनल संस्थेमार्फत पाडेगाव येथे 17 शौचालये आणि 5 स्नानगृहे, व लोणंद येथील तळावर 39 शौचालये आणि 2 स्नानगृहे कायमस्वरुपी उभारण्यात आली आहेत. त्याशिवाय हॉटेल, ढाबे, सार्वजनिक शौचालय युनिट, मंगल कार्यालय अशा एकूण 135 ठिकाणी 468 शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच 15 निवारा शेड उभारण्यात आली आहेत.

पालखी सोहळ्यात सहभागी वारकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने पालखी मार्गाची स्वच्छता करण्यात आली आहे. तसेच तळावरील व विसाव्याच्या ठिकाणासह मार्गावरील सर्व पाण्याच्या स्त्रोतांची नियमित तपासणी करण्यात येत आहे. पालखी मार्गावर एकूण 64 वैद्यकीय अधिकारी, 536 आरोग्य कर्मचारी, 39 रुग्णवाहिका, 17 आरोग्य दूत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय 21 वैद्यकीय पथकेही तैनात असणार आहेत. 1 हजार 40 आंतररुग्ण खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. तर 72 कक्ष उपलब्ध करण्यात आले आहेत. पाणी शुद्धीकरणासाठी 34 पथके तैनात असून टॅंकर भरण्याच्या ठिकाणी 48 पथके तैनात असतील. पालखी मार्गावरील मांसाहारी हॉटेल, कत्तलखाने, मासळी बाजार, दारु दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परिवहन विभागाकडून पालखी सोहळ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांची सुरक्षा विषयक तपासणी करणे, खाद्यगृह, खाद्यपदार्थ, शितपेय यांची अन्न व औषध प्रशासनामार्फत तपासणी करणे, पालखी मार्गावर पालखी मार्गक्रमण कालावधीत ठराविक मार्गावरील वाहतूक बंद ठेवणे असे आदेश देण्यात आले आहेत. तर लोणद मुक्कामी 5 गॅस एजन्सीमार्फत 7 हजार गॅस रिफील करण्याची व्यवस्था आणि तरडगाव, फलटण व बरड मुक्कामी 10 गॅस एजन्सीमार्फत 12 हजार गॅस सिलेंडर रिफिल करण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी श्री डुडी यांनी सांगितले.
00000

24/06/2024

*अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पीकस्पर्धा खरीप हंगाम सन २०२४- २५चे आयोजन*
सातारा दि. 24 (जिमाका): कृषि विभागामार्फत खरीप हंगाम सन २०२४-२५ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात, ख. ज्वारी, बाजरी, मका नाचणी (रागी) तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल या ११ पिकासाठी पीक स्पर्धचे आयोजन करण्यात आले आहे. पीक स्पर्धेतील पिके - खरीप पिके भात, ख. ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी) तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल (एकूण ११ पिके). स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणा-या शेतक-याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. पिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीच्या स्वतःच्या शेतावर भात पिकाच्या बाबतीत किमान २० आर (०.२०हे) व इतर पिकांच्या बाबतीत किमान ४० आर (०.४० हे) आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागद पत्रे पुढीलप्रमाणे असतील, विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ), ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, ७/१२, ८-अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास), पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित ७/१२ वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा, बँक खाते चेक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत इ. खरीप हंगामामध्ये पीक स्पर्धेची अर्ज दाखल करण्याची तारीख खालील प्रमाणे राहील. मूग व उडीद अंतिम तारीख ३१ जुलै २०२४, भात. ख ज्वारी, बाजरी मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल ३१ ऑगस्ट २०२४ तसेच अर्ज दाखल करण्याच्या तारखेच्या दिवशी शासकीय सुट्टी असल्यास त्यापुढील शासकीय सुट्टी नसलेली तारीख गृहीत धरण्यात यावी. तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर व राज्य स्तरावरील पीक स्पर्धा निकाल प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाचे पीक स्पर्धा विजेते निवडण्यात येतील. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्कपीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी रक्कम रु ३०० राहील व आदिवासी गटासाठी रक्कम रु १५० राहील.
सर्वसाधारण व आदिवासी गट बक्षिस रुपये तालुका पातळी पहिले बक्षिस 5 हजार रुपये, दुसरे बक्षिस 3 हजार रुपये, तिसरे बक्षीस 2 हजार रुपये, जिल्हा पातळी पहिले बक्षिस 10 हजार रुपये, दुसरे बक्षिस 7 हजार रुपये, तिसरे बक्षीस 5 हजार रुपये, राज्य पातळी पहिले बक्षिस 50 हजार रुपये, दुसरे बक्षिस 40 हजार रुपये, तिसरे बक्षीस 30 हजार रुपये.
दुय्यम तसेच पौष्टिक तृण धान्य पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ व्हावी याकरिता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात येत आहे पीक स्पर्धे बाबत अधिक माहितीसाठी शेतकरी बंधुभगिनींनी संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा महाराष्ट्र शासन कृषि विभागाचे संकेतस्थळ-www.krishi.maharashtra.gov.in ला भेट दयावी तसेच खालील QR कोड स्कॅन करावा, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी कळविले आहे.
000000

24/06/2024

*Right To Give Up पर्याय निवडा : शिष्यवृत्तीचे रद्द अर्ज पुनर्स्थापित करा*

सातारा दि. 24 (जिमाका): सद्यस्थितीत शैक्षणिक वर्ष २०२३-२४ या वर्षाकरीता महाडिबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करणे सुरू आहे. तथापी, अर्ज स्वीकृती मॉडयूलमध्ये महाडिबीटी प्रणालीवर विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगीन मधील शिष्यवृत्ती अर्ज भरत असताना राईट टू गिव्ह अप' चा टँब नव्याने प्रथमच उपलब्ध करून देण्यात आलेला आहे, शिष्यवृत्तीचा लाभ कायमस्वरूपी थांबविण्याची किंवा सोडून देण्याची तुमची इच्छा असेल तरच राईट टू गिव्ह अप' हे बटन दाबावे असा त्यावर उल्लेख आहे. सदर सुविधा प्रणालीवर नव्याने प्रथमच उपलब्ध करून दिलेली असल्याने टॅब अनेक विद्यार्थ्यांकडून अनभिज्ञतेतून अथवा नजरचुकीने क्लीक झाला आहे. पर्यायीने असे विद्यार्थी शिष्यवृत्ती/ शिक्षण शुल्क परीक्षापासून वंचीत राहत आहेत.
विद्यार्थी, संघटना व शासनाचे विविध विभाग यांची मागणी विचारात घेता माहिती व तंत्रज्ञान विभागाने राज्य शासनाच्या महाडिबीटी पोर्टलवर ज्या विद्यार्थ्यांनी अनावधानाने अथवा नजरचुकीने Right To Give Up पर्यायी निवडून त्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज रद्दबातल झाले असतील केवळ अशा विद्यार्थ्यांना त्याचा अर्ज Revert Back करण्याची सुविधा Right To Give Up सदराखाली उपलब्ध करून दिनांक 30 जून 2024 पर्यंत अंतिम संधी देण्यात आलेली आहे. याबाबत विद्यार्थ्याने आपल्या संबधित महाविद्यालयाच्या प्राचार्याशी संपर्क साधून महाविद्यालयांच्या प्राचार्य Login मधून आपला अर्ज Revert Back करून घेणे आवश्यक आहे. Revert Back झालेला अर्ज विहित वेळेत विद्यार्थ्यांच्या Login मधुन ऑनलाइन फेरसादर करणे आवश्यक राहील
त्याचबरोबर अशा सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येत आहे की, त्यांनी उपरोक्त प्रक्रियेचा अवलंब करून त्यांचा अर्ज विहित मुदतीत Revert Back करून घेण्याची संपूर्ण जबाबदारी महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांची आहे, असे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव ता. आंबेगाव, पुणे यांनी कळविले आहे.
000000

*"आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र"* *योजनेत सहभागी होण्याची सुवर्णसंधी*  सातारा दि. 24 (जिमाका):  राज्यातील युवक युवती...
24/06/2024

*"आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र"*
*योजनेत सहभागी होण्याची सुवर्णसंधी*

सातारा दि. 24 (जिमाका): राज्यातील युवक युवतींचे कौशल्य विकासाद्वारे सक्षमीकरण करुन त्यांना अधिक मागणी असलेल्या उद्योग, सेवा व तत्सम क्षेत्रांत रोजगार/स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान राबविण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. शासनाच्या नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण, २०२० मध्ये व्यावसायिक शिक्षणाला महत्त्व देण्यात आलेले आहे. त्या धोरणाच्या अंमलबजावणीला सकारात्मक वातावरण निर्मिती हेण्यासाठी तसेच कौशल्य विकास संकल्पनेचा अधिकाधिक फायदा राज्यातील युवक युवतींना व्हावा, विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाची संधी स्वतःच्या महाविद्यालयांत उपलब्ध व्हावी या दृष्टिकोनातून शासनाने "आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र" ही नाविन्यपूर्ण योजना सुरु केली आहे.
या योजनेअंतर्गत जिल्हयातील इच्छूक महाविद्यालयांत कौशल्य प्रशिक्षण केंद्र स्थापन करुन १५ ते ४५ वयोगटातील युवक-युवतींना भविष्यातील कौशल्य अभ्यासक्रमांच्या प्रशिक्षणाला प्राधान्य देऊन त्यांना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. या करीता केंद्र शासनामार्फत निश्चित केलेल्या कॉमन कॉस्ट नॉर्म नुसार कौशल्य विकास केंद्रांना विविध टप्प्यांमध्ये प्रति प्रशिक्षणार्थी सरासरी रु. ९०००/ ते १५०००/- पर्यंत प्रशिक्षण शुल्क अदा करण्यात येते. इच्छुक महाविद्यालयांमध्ये "आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र" स्थापन करण्याचा राज्य शासनाचा मनोदय आहे. या करीता https://forms.gle/m1UAJSW42prB8XGy9 ही लिंक तयार करण्यात आली असून त्याद्वारे महाविद्यालयांत "आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र" स्थापन करण्यासाठी अर्ज करावयाचा आहे.
तरी या योजनेचा जास्तीत जास्त महाविद्यालयांनी लाभ घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बस स्थानकाच्या बाजूला, नवीन प्रशासकीय इमारत, तळमजला, सातारा या ठिकाणी किंवा ०२१६२ २३९९३८ या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार विभाग सातारा चे सहायक आयुक्त श्री. सुनिल शं. पवार यांनी केले आहे.
00000

Access Google Forms with a personal Google account or Google Workspace account (for business use).

24/06/2024

*प्रलंबित शिष्यवृत्ती अर्ज भरणेकरीता ३० जून २०२४ पर्यंत मुदतवाढ*

सातारा दि. 24 (जिमाका): शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी शिष्यवृत्ती/शिक्षण फी परिक्षा फी, राजर्षी छ. शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती व व्यावसायिक पाठ्यक्रमास शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृह निर्वाह भत्ता या योजनेचे अनु. जाती प्रवर्गातील महाडीबीटी पोर्टलवर अर्ज नुतनीकरण (Renewal) व नवीन अर्ज नोंदणी (Fresh) दि. 11 ऑक्टोंबर 2023 पासून सुरूवात करण्यात आलेली आहे. याबाबत जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयास संकेतस्थळाद्वारे तसेच समाज कल्याण विभागामार्फत मागासवर्गीय पात्र विद्यार्थ्यांचे सदर संकेतस्थळावरुन अर्ज भरुन मंजुरीस्तव सादर करण्याबाबत वेळोवेळी कळविण्यात आलेले आहे. याबाबत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने शासनाकडून मुदतवाढ देण्यात आलेली आहे व सद्यस्थितीत अंतिम मुदत दिनांक 30 जून, 2024 पर्यंत देण्यात आलेली आहे.
मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी ऑनलाईन भरलेले अर्ज महाविद्यालय स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रलंबित असल्याचे निदर्शनास येत आहे. सन 2023-2024 हे शैक्षणिक वर्ष संपलेले असतानादेखील महाविद्यालय / महाविद्यालय प्रशासनाकडुन मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत हि बाब गंभीर स्वरुपाची आहे. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांना दिनांक 28 जून 2024 पुर्वी महाविद्यालयामध्ये प्रवेशित असणा-या पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन माध्यमातुन पडताळणी करुन सदर विद्यार्थ्यांचे अर्ज सहायक आयुक्त, समाज कल्याण सातारा यांच्याकडे मंजुरीसाठी वर्ग करणे तसेच सदर बाब मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांशी संबंधीत असल्याने यास प्रथम प्राधान्य देऊन अर्ज निकाली काढावेत.
अनुसूचित जाती प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांकडून पोर्टलवर चुकून RIGHT TO GIVE UP OPTION निवडला गेला आहे. अशा विद्यार्थ्यांचे अर्ज Principal Login ला परत करण्यात यावेत. तदनंतर सदर अर्जाची महाविद्यालय स्तरावर तपासणी होवून त्यांना पुनश्च महाडिबीटी प्रणालीवर Online अर्ज सादर करण्याची सवलत उपलब्ध करून देणेत आली आहे. ही संधी एकदाच व अंतीम स्वरूपात देण्यात येत आहे. दिनांक 30 जून 2024 या अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकानंतर ही सुविधा बंद करणेत येत असून संबंधित विद्यार्थी व महाविदयालयांनी आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबतचे आवाहन नितीन उबाळे, सहायक आयुक्त, समाज कल्याण, सातारा यांनी केले आहे.
000000

24/06/2024

*इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडील*
*शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज ऑफलाईन*

सातारा दि. 24 (जिमाका): सातारा जिल्ह्यामध्ये इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत विजाभज, विमाप्र आणि इमाव प्रवर्गातील इ. 1 ली ते 10 वी मधील विद्यार्थ्यांसाठी विविध मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना राबविल्या जातात. इ. 5 वी ते 7 वी आणि इ. 8 वी ते 10 वी मधील विजाभज / विमाप्र आणि इमाव प्रवर्गातील विद्यार्थिनीना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती. माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या विजाभज, विमाप्र आणि इमाव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क विजाभज, विमाप्र आणि इमाव प्रवर्ग. इ. 1 वी व 10 वी मध्ये शिकणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती. इ. 1 ली ते 10 वी तील डीएनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी डॉ. आंबेडकर मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती.
या योजनांच्या संदर्भात सातारा जिल्हयातील सर्व मान्यताप्राप्त अनुदानीत, विना अनुदानीत कायमस्वरुपी विना अनुदानीत शाळेतील मुख्याध्यापक यांना आवाहन करण्यात येते की, सन 2024 - 25 या शैक्षणिक वर्षातील विजाभज, विमाप्र आणि इमाव प्रवर्गातील सर्व पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने संबंधित पंचायत समितीकडे सादर करावेत. संबंधीत पंचायत समिती यांनी आपल्या तालुक्यातील सर्व शाळांचे विजाभज, विमाप्र आणि इमाव प्रवर्गातील शिष्यवृत्ती योजनांचे ऑफलाईन पध्दतीचे अर्ज एकत्रिकरण करून समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, सातारा यांचेकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा यांनी केले आहे.
0000000

*जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व आयुष विभाग, सातारा**यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय  योग दिन स...
21/06/2024

*जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व आयुष विभाग, सातारा*
*यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा*

सातारा दि. २१ (जिमाका) श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे दिनांक २१ जून २०२४ रोजी आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे , जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर सिव्हिल सर्जन डॉ.युवराज करपे, समाज कल्याण अधिकारी नितीन उबाळे,जिल्हा आयुष अधिकारी डॉ मिथुन पवार, सहाय्यक जिल्हा आयुष अधिकारी, डॉ संजीवनी शिंदे सातारा तालुका गट विकास अधिकारी सतीश बुद्धे महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे राज्यसचिव प्रल्हाद पारटे इंटरनॅशनल नेचरोपॅथी ऑर्गनायझेशन च्या डॉ. पल्लवी दळवी, मैत्रेय योग च्या संस्थापिका अपर्णा शिंगटे, नितेश भोसले आदी उपस्थित होते.

जिल्हा क्रीडाधिकारी नितीन तारळकर यांनी प्रास्ताविकात सर्वांचे स्वागत करून योगाचे महत्त्व सांगितले आंतरराष्ट्रीय योग दिन, २०२४ ची थीम स्वतः साठी वं समाजासाठी योग असून शारिरीक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी तसेच भारताचे संस्कृती व परंपरा यांचा सारासार विचार योग शास्‍त्रात केला आहे. शारिरीक, मानसिक, बौधिक, अध्यात्मिक, सामाजिक विकासासाठी योग सहाय्यभूत असून, आयुष मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या शिष्टाचारानुसार दरवर्षी दिनांक २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

योग प्रोटोकॉल चे संपूर्ण मार्गदर्शन मैत्रिय योग च्या संस्थापक,योगशिक्षीका अपर्णा शिंगटे यांनी केले.अनुराधा इंगळे यांनी प्राणायाम केले तर हेमांगी पिसाळ, धारा गोहेल,मालती राऊत,शुभांगी पाटील, सुवर्ण वाघमारे यांनी प्रात्यक्षिक करून दाखविली यामध्ये योगासन पूर्व हालचाली त्यानंतर उभी आसने यामध्ये ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, त्रिकोनासान. बैठी आसने यामध्ये वज्रासन,उष्ट्रसान, शशंकासन, मंडूकासन,
पोटावरील आसने यामध्ये मकरासन, भुजंगासन, शलभासन ,पाठीवरील आसने यामध्ये नौकासन, पवनमुक्तासन, उत्तनपदासन, अर्धहलासन, शवासन आदी आसने तर कपळभाति शुद्धीक्रिया आणि अनुलोम विलोम काकी, भ्रामरी प्राणायाम ध्यान घेणेत आले,यांनंतर व्यसन मुक्तीची शपथ सर्वांनी घेतली. योगशिक्षक,योग निसर्गोपचार तज्ञ पूरब आनंदे, अपर्णा शिंगटे , धारा गोयल, प्रल्हाद पारटे यांनी प्रात्यक्षिके घेतली. विता कारजकर यांनी सूत्रसंचालन आणि योगाचे मार्गदर्शन केले. नेहरु युवा केंद्र सातारा समन्व्यक श्री देशमुख, सुमित पाटील, सुनील कोळी इंटरनॅशनल नेचरोपॅथी ऑर्गनायझेशन,गाथा योग साधना केंद्र, आर्ट ऑफ लिव्हींग , गुरुकृपा राजयोग चॅरिटेबल ट्रस्ट, विवेकानंद केंद्र कन्याकुमारी नगर स्थान सातारा, पतंजली योग समिती, हॅप्पी लाईफ फौंडेशन सातारा, महाराष्ट्र योग शिक्षक संघ, सातारा जिल्हा मुदिता योग, , योगग्राम सांबरवाडी, योग विद्याधाम, सातारा विविध योग संस्था माध्यमातून घेणेत आला. सातारा शहरातील शाळेतील विद्यार्थी, राष्ट्रीय आंतर राष्ट्रीय खेळाडू, स्काऊट वं गाईड योग साधक यांनी सहभाग घेतला.

00000

21/06/2024

*इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाकडील योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन*
सातारा, दि. 21 : इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाकडून बीज भांडव, थेट कर्ज, वैयक्तीक कर्ज, गट कर्ज व्याज परतावा, महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा व शैक्षणिक कर्ज व्याज परतवा अशा विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.

तरी इच्छूांनी सदर योजनांचा लाभ घेण्यासाठी अधिक माहितीकरिता इतर मागास प्रवर्गात मोडत असल्याबाबतचा मूळ जातीचा दाखला व आधार कार्डसह स्वतः "जिल्हा कार्यालय, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बी बिंग, दुसरा माळा, खोली नं. ३. सर्व्हे नं २२/अ, जुनी एम आय डी सी रोड, बॉम्बे रेस्टॉरन्ट उड्डाण पुलाजवळ, सातारा दूरध्वनी क्रमाक ०२१६२-२९५१८4 या पत्यावर संपर्क साधावा.
0000

Address

HAJERI MAL SADAR BAZAR
Satara
415001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when जिल्हा माहिती कार्यालय, सातारा ,District Information Office ,Satara posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share


Other Satara travel agencies

Show All

You may also like