Sahyadri Sanskruti Tourism

Sahyadri Sanskruti Tourism Namaskar! Welcome to Sahyadri Sanskruti Tourism. Our main focus to promote Maharashtra Tourism by providing customized travel packages...
(2)

Sahyadri Sanskruti Tourism specialized offering travel services in Maharashtra & India (Domestic Travel Company).

16/04/2024
14/04/2024

नागेश्वर महादेव ज्योतिर्लिंग, सोमनाथ

आगामी गिरनार दर्शन यात्रेत समाविष्ट केलेले मंदिर...  अक्षरधाम...
12/04/2024

आगामी गिरनार दर्शन यात्रेत समाविष्ट केलेले मंदिर... अक्षरधाम...

10/04/2024

पर्यटकांसोबत मनसोक्त भटकंती.. आणि मजा- मस्तीचे वातावरण..

श्रीदत्त धाम यात्राश्रीशैलम ज्योतिर्लिंग सहित पिठापुर - कुरवपुर - मंथनगोड, मंत्राल्यम, गाणगापूर, अक्कलकोट आणि नरसोबाची व...
06/04/2024

श्रीदत्त धाम यात्रा

श्रीशैलम ज्योतिर्लिंग सहित पिठापुर - कुरवपुर - मंथनगोड, मंत्राल्यम, गाणगापूर, अक्कलकोट आणि नरसोबाची वाडी - औदुंबर दत्त मंदिर दर्शन यात्रा

दिनांक 17 नोव्हेंबर 2024 पासून
रू. 23500/- प्रत्येकी

बुकिंग सुरू झालीय...

06/04/2024

प्रसिद्ध अकरा मारुती : समर्थ रामदास स्वामी स्थापित अकरा मारुतींची माहिती


समर्थ रामदास स्वामी यांनी महाराष्ट्रातील चाफळ आणि जवळच्या परिसरात सातारा, कराड, कोल्हापूर मध्ये 11 ठिकाणी मारुतीच्या मूर्त्यांना स्थापित केले. चला मग

जाणून घेऊ या कुठे आहे हे 11 मारुती.

* चाफळचा वीर मारुती / प्रताप मारुती /भीममारुती
सातारा कराड चिपळूणकडून जाणाऱ्या फाट्याजवळ उंब्रज गावाजवळ चाफळ येथे रामाच्या देऊळासामोरी हात जोडून उभा दास मारुती आणि त्याच देऊळाच्या मागे प्रताप मारुतीची कृष्ण नदीच्या काठावर चुना, वाळू, ताग पासून बनवलेलीही मूर्ती स्थापिली आहे. 6 फुटी ही उंच मूर्ती रामाच्या समोर हात जोडून उभारल्या या मूर्तीचे नैत्र श्रीरामाच्या चरणाकडे स्थिर असल्याचे जाणवते. चाफळच्या रामाच्या देऊळाच्या मागे रामदासांनी बांधलेले हे देऊळ आजतायगत आहे. या देऊळातली मारुतीची मूर्ती भीमरूपी स्तोत्रामध्ये वर्णन केल्या सारखीच आहे. कमरेला सोन्याची कासोटी, किणकिणत घंटा, नेटका, सडपातळ डोळ्यातून अग्निवर्षाव होताना जाणवणे. मूर्तीच्या पायाखाली दैत्य आहे. चाफळ येथे मारुतीच्या दोन मुर्त्यांची स्थापना रामदासांनी केली असून दोन्ही मूर्तींचे रूप वेगवेगळे आहे.

* माजगावचा मारुती
चाफळपासून 3 कि.मी. लांब एक गावात पाषाणाच्या रूपात असलेल्या दगडाला समर्थानी मारुतीचे रूप दिले. 5 फुटीची मूर्ती चाफळच्या राम मंदिराकडे तोंड करून उभारलेली आहे. आधीच्या कौलारू, माती विटाच्या देऊळाला जीर्णोद्धार करून नवे रूप देण्यात आले आहे.

* शिंगणवाडीचा मारुती / खडीचा मारुती / बालमारुती
याला चाफळचा तिसरा मारुती देखील म्हणतात. शिंगणवाडीची टेकडी चाफळ पासून 1 की.मी. च्या अंतरावर आहे. येथे रामघळ समर्थांच्या ध्यानाचे छोटेशे स्थळ आहे. येथे समर्थानी मारुतीची छोटीशी सुबक मूर्तीची स्थापना केली. 4 फुटी उंचीची उत्तरेकडे तोंड केलेली ही मूर्ती जिच्या डाव्या हातात ध्वजासारखी वस्तू दिसण्यात येते. सर्व 11 मारुतीच्या देऊळात हे सर्वात लहान देऊळ आहे. आजूबाजूच्या परिसरात घनदाट झाडे आहे. या देऊळाचा कळस तांबड्या रंगाने रंगविला आहे.

* उंब्रजचा मारुती / मठातील मारुती
चाफळचे 2 आणि माजगावातील मारुतीचे दर्शन करून परत उंब्रजला आल्यावर इथे जवळच 3 मारुती आहे. त्यातील हा एक उंब्रजचा मठातील मारुती. असंही आख्यायिका आहे की समर्थ चाफळवरून उंब्रजला दररोज स्नानेसाठी येत असत. तेव्हा एकदा ते नदीत बुडताना त्यांना स्वयं हनुमंतानेच वाचविले होते. समर्थांना उंब्रज मधील काही जमीन बक्षीस म्हणून मिळाली होती. तिथे समर्थानी मारुतीच्या देऊळची स्थापना करून चुना, वाळू आणि तागने निर्मित ही मारुतीची देखणी मूर्ती आहे. ह्या मूर्तीच्या पायाखाली दैत्य दिसतो.

* मसूरचा मारुती
उंब्रजपासून 10 की.मी. असलेले मसूर येथे मारुतीची स्थापना केली आहे. 5 फुटीची चुन्यापासून बनवलेलीही पूर्वाभिमुखी असलेली मारुतीची मूर्ती अतिशय सौम्य प्रसन्न असलेली मूर्तीच्या मस्तकी मुकुट, गळ्यात माळ, जानवं, कमरेला मेखला, पायाखाली जंबुमाळी नावाचा राक्षस दिसतो. सहा दगडी खांब्यावर देऊळाचे छत तोलून धरले आहे. मूर्तीच्या एका बाजूस शिवराम आणि दुसऱ्या बाजूस समर्थांचे चित्र काढलेले आहे. या देऊळाचा सभामंडप 13 फूट लांबी रुंदीचा आहे.

* शिराळ्याचा मारुती
सांगली जिल्ह्यात नागांसाठी प्रसिद्ध असलेले हे गाव शिराळे याचा एसटी स्टॅन्डजवळ हे मारुतीचे देऊळ समर्थानी स्थापित केले आहे. हे देऊळ देखणे असून मारुतीची मूर्ती अतिशय भव्य आहे. 7 फुटी उंच ही मूर्ती चुन्याने बनवलेली आहे. ही मूर्ती उत्तराभिमुखी आहे. कटिवस्त्र आणि त्यातील गोंडा सुंदर असून कंबरपट्ट्यामध्ये घंटा बसविण्यात आला आहे. मूर्तीच्या डोक्याचा उजवी आणि डाव्या बाजूस झरोके आहे ज्यामधून सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी मूर्तीच्या तोंडावर प्रकाश पडतो. देऊळाच्या प्राकाराला दक्षिण दिशेस दार आहे.

* शहापूरच्या मारुती
कराड मसूर रस्त्यावर 15 की.मी. च्या अंतरावर मसूरपासून 3 की.मी. अंतरापासून शहापूरच्या फाट्याहून 1 की.मी. लांब हे मारुतीचे देऊळ आहे. 11 मारुती मधल्या मारुतीमध्ये सर्वात पहिले या मारुतीची स्थापना केली आहे. या मारुतीला चुन्याचा मारुती देखील म्हटले जाते. या गावाच्या एका टोकांवर नदीच्या काठाला मारुतीचे देऊळ आहे. देऊळ आणि मारुतीची मूर्ती दोन्ही पूर्वाभिमुखी आहे. 7 फुटाची ही मूर्ती काहीशी उग्र दिसते. या मूर्तीच्या पुढील पितळी उत्सव मूर्ती आहे. मारुतीच्या मूर्तीच्या मस्तकी गोंड्यांची टोपी आहे. येथून जवळच रांजण खिंड आहे. येथून 2 दगडी रांजण दिसतात ह्याचा जवळच्या टेकडीवर समर्थांचे वास्तव्य असतं.

* बहे बोरगावचा मारुती
सांगली जिल्ह्यातील वाळवे तालुक्यात बहे गावा जवळ बोरगांवामुळे त्याला बेह बोरगाव म्हटले जाते. इथल्या मारुतीच्या स्थापनेच्या मागे एक आख्यायिका आहे. ती रामायणाशी संलग्न आहे. रावणाचा वध करून श्रीराम अयोध्येला परतांना इथे बोरगावास वास्तव्यास होते. कृष्णानदीला त्यावेळी वाळवंट होते. श्रीराम संध्यास्नान करत असताना कृष्णेला पूर येतं तेव्हा मारुतीने आपले दोन्ही बाहू अडवून नदीच्या प्रवाहाला धरून ठेवले. ते प्रवाह दोन्ही बाजूस विभक्त झाले. त्यामधून एक बेट तयार झाले. आणि या क्षेत्राला बहे असे नाव मिळाले.
या जागी मारुतीचे समर्थांना मूर्तिरूपात दर्शन झाले नाही तेव्हा त्यांनी डोहात उडी मारून मारुतीची मूर्ती त्या डोहातून काढून स्थापित केली. मारुतीचे दोन्ही हात पाणी अडविण्याचा पावित्र्यात दिसून येतात डोक्यावर मुकुट हात दोन्ही मांड्यांचा बाजूला धरलेले. अशी ही भव्य मूर्ती दिसते. इथे जाण्यासाठी कृष्णानदीच्या वरील पुलाच्या पश्चिमेकडील बंधाऱ्यावरून बेटावरून जावे लागते. नदीस पूर आल्यास इथे जाणे शक्य नसते.

* मनपाडळेचा मारुती
मनपाडळे आणि पारगाव कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळगड -ज्योतिबाच्या परिसरात आहे. कोल्हापूर ते वडगाव वाठारपासून पुढे 14 की.मी.च्या अंतरावर हे मनपाडळे आहे. 11 मारुती पैकी सर्वात दक्षिणे दिशेस असलेल्या या मारुती देऊळाची स्थापना समर्थानी केली 5 फूट उंच असलेली ही साधी सुबक मूर्ती आणि देऊळ उत्तराभिमुखी आहे. मूर्ती जवळ दीडफुटी उंच कुबडी ठेवलेली आहे. जवळपास ओढ्या काठी सुंदरसे कौलारू देऊळ आहे. औरसचौरस असलेल्या गाभाऱ्याचे ह्या देऊळात नवीन बांधकाम केलेले सभामंडप देखील आहे.

* पाडळी मारुती
वारणेच्या खोऱ्यात असलेल्या मनपाडळे गावाच्या जवळच पाडळी गावात मारुतीची मूर्ती आहे.

* पारगावाचा मारुती
यालाच बाळमारुती किंवा समर्थांच्या झोळीतला मारुती असे म्हणतात. कराड- कोल्हापूर रस्त्यावर वाठार गाव जवळ नव्या पारगावाजवळ जुने पारगाव आहे त्यात ही मारुतीची मूर्ती आहे. 11 मारुतींपैकी शेवटची आणि सर्वात लहान अशी ही मूर्ती सपाट दगडवर कोरलेली दीड फुटीची मूर्ती आहे. शेंदूर नसून केसांची शेंडी बांधलेली दिसते. मारुतीराया जणू डावीकडे धावत निघाल्याचा आविर्भावात ही कोरलेली आहे. मनपाडळे ते पारगाव अंतर 5 की.मी.चे असून वळसा घेलेला रस्ता आहे.

या 11 मारुती शिवाय समर्थांनी गोदावरी काठी, टाकळी येथे गोमयाचा मारुतीचे स्थापन केले आहे. एकदा तरी आपण 11 मारुतीच्या दर्शन करावे.🍁🙏🏻
कॉपी पेस्ट

05/04/2024

आगामी दत्तधाम यात्रेत नरसोबाची वाडी - औदुंबर दत्त मंदिर समाविष्ट...

पुढील यात्रा नोव्हेंबरमध्ये... लवकरच सविस्तर माहिती दिली जाईल.
29/03/2024

पुढील यात्रा नोव्हेंबरमध्ये... लवकरच सविस्तर माहिती दिली जाईल.

29/03/2024

हंपी - बदामी - पट्टदकल आणि ऐहोले टेम्पलची इतिहासिक सहल
दिनांक 23 सप्टेंबर ते 02 ऑक्टोंबर 2024

सहलीतील महत्वाची स्थळदर्शन:
♦️ शैव लेणी
♦️ वैष्णोव लेणी
♦️ महाविष्णू लेणी
♦️ जैन लेणी
♦️ बदामी किल्ला
♦️ संग्रहालय
♦️ मल्लिकार्जुन मंदिर
♦️ भूतनाथ अंदिर
♦️ बनशंकरी मंदिर
♦️ महाकुट
♦️ काडसिद्धेश्वर मंदिर
♦️ जम्बुलिंग मंदिर
♦️ गलगनाथ मंदिर
♦️ चंद्रशेखर मंदिर
♦️ संगमेश्वर मंदिर
♦️ काशीविशवेश्वर मंदिर
♦️ मल्लिकार्जुन मंदिर
♦️ विरूपाक्ष मंदिर
♦️ पापनाथ मंदिर
♦️ दुर्गा मंदिर
♦️ म्युझियम
♦️ विजय विठ्ठल मंदिर
♦️ नरसिंह स्टॅच्यू
♦️ कृष्ण मंदिर
♦️ हेमकुंड हिल्स
♦️ विरूपाक्ष मंदिर
♦️ एकशीला नंदी
♦️ अच्युतराया मंदिर
♦️ तुंगभद्रा नदी सफर
♦️ सुग्रीव गुफा
♦️ महनवामी डिब्बा
♦️ स्टेप्स वॉल
♦️ हजारामा मंदिर
♦️ लोटस महाल
♦️ एलिफंटा होम्स
-------------------------------------------
*टूर्स कॉस्ट:*
रू.21500/- प्रत्येकी (डबल शेअर रूम)

*समाविष्ट असलेल्या गोष्टी:*
✔ रेल्वे 3AC तिकीट सहित संपूर्ण प्रवास
✔ सर्व एन्ट्री फी समाविष्ट
✔ स्थानिक प्रवास प्रायव्हेट रिक्षा/ कार/ टॅक्सी/ बसद्वारे... (लांब अंतराचा प्रवास AC बसद्वारे असेल)
✔ ब्रेकफास्ट- लचं- डिनर
✔ AC हॉटेल डबल बेड स्टे

*समाविष्ट नसलेल्या गोष्टी:*
❌ रेल्वे प्रवासातील जेवण (ब्रेकफास्ट- लचं- डिनर) समाविष्ट नाहीय.
-------------------------------------------
*बुकिंगसाठी संपर्क:*
www.sahyadrisanskrutitourism.com
*सह्याद्री संस्कृती TOURISM*
मनसोक्त भटकंती...
Email ID:[email protected]
*Whatsapp/ Mobile No.: 8080908053/ 8452840059*
*Maharashtra. (Virar- Vasai- Palghar)*

Namaskar!
Welcome to Sahyadri Sanskruti Tourism.
Sahyadri Sanskruti Tourism specialized offering tra

21/03/2024

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

नुकतीच आमची श्रीदत्त धाम यात्रा संपन्न आली. यात्रेची सुरुवात अतिशय सुंदर अशी झाली. पिठापुरम ला पोहचल्यानंतर पालखी सेवेची तिकिटे उपलब्ध आहेत का हे पाहण्यासाठी मी तत्काळ मंदिरात गेलो. फक्त 13 तिकिटे उपलब्ध असल्याचे समजले मी तत्काळ सर्व भाविकांचे पूर्ण नाव आणि गोत्र यासंदर्भात माहिती दिली आणि 11 तिकिटे घेतली. तोपर्यंत दुपारची वेळ झाली. आमचे जेवण आले. सर्व भाविकांनी जेवणाचा आनंद घेतला. यात आमच्या यात्रेकरूसोबत एक अज्ञात व्यक्ती जेवण करून गेल्याचे कोणालाच समजले नाही. जणू दत्तगुरु आमच्या सोबत जेवत होते. नंतर मात्र कुजबुज सुरू झाली.

18/03/2024

श्री क्षेत्र गाणगापूर भीमा नदी व अमरजा नदी संगम आणि श्री अष्टतीर्थे ...
1.श्री भीमा व अमरजा संगमस्थान
भीमा व अमरजा या दिव्य पवित्र दोन नद्यांचा संगम गाणगापूर या जागृत शक्ती पीठावर झाला आहे. सदरील संगम निर्गुण मठापासून २ ते ३ किलोमीटर आहे. या संगम स्थानी "भगवान श्री नृसिंह सरस्वती" नित्य स्नान करत असत. या संगमाभोवतीच अष्टतीर्थांचा अधिवास आहे. या संगमात स्नान केल्याने भाविकाचे अनेक पापे धुतली जाऊन दिव्य अनुभव येतोच हे मात्र निश्चित. निर्गुणमठाच्या पादुकादर्शन अगोदर भाविक संगमावर स्नान करतात. पौर्णिमेचे संगम स्नान विशेष मानले जाते.
2.श्री गाणगापूर परिसरात अष्टतीर्थांचा नित्य वास आहे. ही अष्टतीर्थे पुढीलप्रमाणे होत –
१) षट्कुल तीर्थ,
२) नृसिंह तीर्थ,
३) भागीरथी तीर्थ,
४) पापविनाशी तीर्थ,
५) कोटी तीर्थ,
६) रुद्रपाद तीर्थ,
७) चक्रेश्र्वर तीर्थ व
८) मन्मथ तीर्थ.
भागीरथी तीर्थालाच ‘काशीकुंड’ असे म्हणतात. एका ब्राह्मण भक्ताने या ठिकाणी श्री शंकराची आराधना करुन त्यांना प्रसन्न करुन घेतले. त्या भक्ताच्या इच्छेने श्रीमहादेवांनी काशीची गंगा तिथे आणली. श्रीपापविनाशी तीर्थावर श्रीमत्परहंस वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींना श्रींचे साक्षात दर्शन घडले होते. याच तीर्थांवर श्री नृसिंहसरस्वतींनी आपल्या भगिनीला-रत्नाबाईला स्नान करावयास सांगितले होते. त्यामुळे तिची कुष्ठादी पापे नाहीशी झाली.
श्री क्षेत्र गाणगापूर येथील अष्टतीर्थे श्रीमन नृसिहसरस्वती स्वामी महाराजांनी भक्त जनासाठी दिवाळीचे प्रथम दिनी प्रकट केली. तो पुण्य पावन दिवस होता नरक चातुर्दशीचा! याबाबत सविस्तर माहिति "श्री गुरु चरित्र" ह्य पवित्र ग्रंथात ४९ व्या अध्यायात आली आहे.
श्री क्षेत्र गाणगापूर येथील अष्टतीर्थे स्नानाचे फळ माहिती
(१-२)"षट्कुळ व नृसिंह तिर्थ"
ह्या तीर्थात् स्नान केल्याने (भक्ती पूर्वक) काल मृत्यु व अप मृत्यु नाहीसा होवून शतायुष्य प्राप्त होते. ह्या तीर्थात् स्नान केल्याने प्रयाग येथील त्रीवेणि संगम् नद्यांचा स्नानचा फळ मिळते.
(३) "भागिरथी"
या तीर्थाचे स्नान केल्याने समस्त दारिद्र्य नाश होवून् काशी क्षेत्रातील गंगा स्नानाचा पुण्य मिळते.
(४) "पाप विनाशी"
'तीर्थात् स्नान मात्रें पाप राशी जैसे तृण अग्नि लागे', म्हणून इथे स्नान केल्याने समस्त पूर्व जन्मांचे पाप जळून राख होतो. ह्याच तीर्थात् स्नान केल्यांने स्वयं श्रीगुरू महाराजांची भगिनि "रत्नाई" चे श्वेत कुष्ठ नाहिसा झाला.
(५) "कोटि तीर्थ"
ह्या तीर्थात स्नान केल्याने आत्म शुद्धी होवून् मोक्ष प्राप्त होतो व जंबू द्वीपा मध्ये असलेले सर्व पवित्र तीर्थांचे महिमा ह्या तीर्थात् आहे. येथे स्नान केल्याने अनंत पुण्य मिळते व येथे यथा शक्ति दान केल्याने कोटि दान केलेले पुण्य मिळते.
(६)"रुद्र पाद"
हे तीर्थ "गया" समान आहे. गया क्षेत्रातिल सर्व आचरण येथे करून् रुद्र पादाला पूजल्यास् कोटि जन्मांचे दोष नाहीसा होवून् मोक्ष प्राप्ति होते.
(७)"चक्र तीर्थ"
हा तीर्थ द्वारावति तीर्थ समान आहे. येथे स्नान करून् येथील केशव मंदिरात् पूजल्यास द्वारावतिचे चौपट् पुण्य मिळते व अज्ञानिला ज्ञान प्राप्ति होते.
(८) "मन्मथ तीर्थ"
येथे स्नान करून कल्लेश्वराला पूजल्यास वंश वृद्धि होवून अष्टैश्वर्य प्राप्त होते.
आपण या कलयुगी अंधारातून प्रकाशमय जीवनात करण्यासाठी कलयुगातील एकमेव भगवंत श्रीगुरू नृसिंहसरस्वती दत्त महाराजांची मनातून भक्ती केल्यावर निश्चित आपणास आयुआरोग्य, ऐश्वर्य, कन्या - पुत्रप्राप्ती, अक्षय-लक्ष्मी प्राप्ति आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि नित्य सेवा स्वरूपात श्रीगुरूचरित्र पठण करावे आणि वर्षातून एकदा तरी आपण श्रीक्षेत्र गाणगापूर जाऊन श्रीगुरू महाराजांची सेवा, दर्शन, आणि त्रिवेणी संगम व अष्टतिर्थ स्नान करून आपले जीवन धन्य करावे

18/03/2024

आजचा दिवस पंढरपूर...

16/03/2024

#श्रीदत्तक्षेत्र_कुरवपूर (श्रीपाद श्रीवल्लभांची तपोभूमी)

श्रीक्षेत्र कुरवपूर (कुरगड्डी)

स्थान: आंध्र प्रदेशात कृष्णा स्टेशन पासून २७ कि. मी. अंतरावर बेट
सत्पुरूष: श्रीपादश्रीवल्लभ
विशेष: तपोभूमी, ध्यानधारणा, उपासनेसाठी उत्तम ठिकाण
पादुका: श्रीपाद श्रीवल्लभ पादुका

श्रीक्षेत्र कुरवपूर - श्रीपाद मंदिर महाद्वार

उपासनेच्या माध्यमातून आत्मिक बळ मिळवून मानवी जीवनातील कर्तव्ये पूर्ण करत परमेश्वराची प्राप्ती करणे हा दत्त उपासनेचा मार्ग आहे. महाराष्ट्रात दत्त संप्रदायाचा सर्वाधिक प्रसार झाला. या कारणास्तव महाराष्ट्रात अनेक प्रसिद्ध दत्तस्थाने आहेत. दत्त उपासनेला श्री नृसिंहसरस्वतींमुळे दत्त संप्रदायाचे स्वरूप प्राप्त झाले. श्रीपाद श्रीवल्लभ हे दत्तात्रेयांचे पहिले अवतार मानले जातात. ‘कुरवपूर’ हे त्यांचे अक्षय निवासस्थान होय.

दत्तभक्तांचा वेद समजला जाणाऱ्या ‘गुरूचरित्र’ या मंत्र ग्रंथांतील अध्याय ५ ते १० हे प्रथम दत्तावतार यांच्याविषयी आहेत. भगवान दत्तात्रेय यांनी सुमती व आपलराज यांना दिलेल्या वचनाप्रमाणे त्यांच्या पोटी जो प्रथमावतार संपन्न केला ते श्रीपादवल्लभ होय. वयाच्या सोळाव्या वर्षी माता-पित्यांचा निरोप घेऊन श्रीपाद श्रीवल्लभ प्रथम गोकर्ण महाबळेश्वरला गेले व तेथून श्रीशैल पर्वतावर जाऊन तेथे त्यांनी काही काळ वास्तव्य केले. नंतर फिरत फिरत ते कुरवपूर येथे आले. तेथे बावीस वर्षे तपश्चर्या करून इथूनच ते अंतर्धान पावले.

कुरवपूर क्षेत्र स्वातंत्र्यापूर्वी निजाम राज्यात होते. सध्या ते कर्नाटकात रायचूर जिल्ह्यात येते. कुरूगुड्डी या छोट्या खेडयाजवळ कृष्णा नदीचे नैसर्गिकरीत्या दोन भाग झाले आहेत व पुढे ते दोन भाग एकत्र आले आहेत. जेथे कृष्णेचे दोन भागात विभाजन झाले आहे त्या भागाला ‘कुरगुड्डी बेट’ म्हणतात. हेच ते श्रीपाद श्रीवल्लभांचे स्थान. याच बेटावर दगडांच्या गुहेत श्रीपाद श्रीवल्लभ तपश्चर्या करीत व या गुहेसमोरील मोठया औदुंबर वृक्षाखाली अनुष्ठान करीत. बेटावरील दोन-चार घरी माधुकरी मागून ते निर्वाह करीत.

श्रीपद मंदिर - कुरवपूर

सकाळी उठल्यावर नदीवर स्नान करून, ते सूर्यनमस्कार घालीत. ते ज्या शिळेवर उभे राहून सूर्यनमस्कार घालीत त्या वेळेची त्यांची शिळेवर पडणारी छाया अजूनही स्पष्ट दिसते. त्यांच्या पावलांच्या खुणाही त्या शिळेवर दिसतात. हा परिसर मोठा रम्य आहे. पादुका, मंदिर, आजूबाजूची वनश्री हे सर्व मन प्रसन्न करणारे, त्याचप्रमाणे अंतर्मुख करणारे आहे. कुरवपूर हे स्थान कित्येक वर्षे अज्ञातच होते; पण श्रीगुरूंच्या शोधात आलेल्या श्री वासुदेवानंदसरस्वती टेंबेस्वामीमहाराज यांनी या स्थानाचा शोध लावला. कुरवपूर हे आंध्र आणि कर्नाटक यांच्या सीमेवरील रायचूर जिल्ह्यातील एक खेडे आहे. चारी बाजूंनी कृष्णामाईच्या प्रवाहांनी वेढलेले हे बेट आहे. पावसाळ्यात कृष्णामाईच्या पुरामुळे आणि उन्हाळयात न सोसणा-या कडक उन्हामुळे इथे जाणे त्रासदायक होते. डिसेंबर ते फेब्रुवारी हे तीनच महिने इथे प्रवासाला सुखकारक असतात.

‘आश्विन वद्य व्दादशी’ हा श्रीपाद श्रीवल्लभांचा तिरोहित होण्याचा म्हणजेच निजानंदगमनाचा दिवस. या दिवशी कुरवपूरला मोठा उत्सव असतो.

रायचूरपासून २९ कि. मीटरवरील ‘आतकूर’ या गावी जाऊन तेथून कुरवपूर बेटावर जाण्यासाठी थोडे चालत कृष्णेच्या काठावर जावे लागते. पलीकडे जाण्यासाठी आता नावेची सोय झाली आहे. कृष्णा नदी पार करण्याचा अनुभव प्रत्येक मोसमात वेगळा असतो.

नदीच्या पात्रात सभोवार अजस्त्र शिळा आहेत. एकामागून एक असे चार प्रवाह ओलांडून आपण पैलतीरी जातो. समोर थेट कुरवपूर गावच्या बुरूजानजीकच्या वेशीवरून पायवाटेने पश्चिमेस डाव्या हाताने आत शेतीच्या बांधावरून थेट श्रीपाद श्रीवल्लभांच्या मंदिरात पूर्व दरवाजाजवळ आपण पोहोचतो. हे बेट साधारण तीन मैल लांब, तीन फर्लांग रूंद असे असून कूर्माकार आहे. बेटावर पुढील स्थळे पाहण्यासारखी आहेत.

श्रीपाद मंदिर

श्रींचे मंदिर ऐसपैस आहे. मंदिराच्या भव्य दरवाजाच्या दोन्ही बाजूस दोन दगडी कट्टे आहेत. त्याच्या शेजारी दगडी भिंती आहेत. महाव्दारावर कमान आहे. तिथे वाकून नम्रपणे हस्तस्पर्श करून आत गेल्यावर दोन्ही बाजूस पहारेकऱ्यांना बसण्याकरता दोन देवडया आहेत. भव्य अश्वत्थ (पिंपळ), कडुनिंब वृक्ष असून, त्यांना दगडी पार बांधला आहे. पाराच्या उत्तर बाजूच्या दोन्ही कोपऱ्यांवर घडीव दगडी वृंदावने आहेत. या पारावर दक्षिणाभिमुख दोन मंदिरे असून, एका मंदिरात दक्षिणाभिमुख काळ्या शाळिग्राम शिळेची मारूतीची रेखीव मूर्ती आहे व दुसऱ्या मंदिरात केशवमूर्ती आणि शिवलिंग पादुका आहेत. या पारासमोरच मुख्य पूजास्थान असून, तेथेच श्रीपाद श्रीवल्लभ जप-तप-अनुष्ठानादी कर्मे करत असत. यालाच ‘निर्गुण पीठ’ पार म्हणतात. स्वत: महाराज त्या ठिकाणी अदृश्य असल्यामुळे निराळ्या स्वरूपात पादुका नाहीत. याच ठिकाणी दिव्य अनुभव मिळतात. अर्थात त्यासाठी तेवढी साधना आवश्यक आहे.

पुरातन वटवृक्ष

श्री श्रीपादवल्लभांची अनुष्ठानाची जागा : सदर वृक्ष साधारणपणे ९०० वर्षांपूर्वीचा आहे. याचेच ढोलीमध्ये मोठा सर्प आहे. याच ठिकाणी सोलापूरच्या भक्तमंडळींनी श्रीपादवल्लभाची मूर्ती व पादुका स्थापन केल्या आहेत.

श्री टेंबेस्वामी गुहा

ही गुहा निसर्गनिर्मित असून प्राचीन आहे. या ठिकाणी श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी यांनी १९१० मध्ये चातुर्थाश्रमीय चातुर्मास संपन्न केला. आता या ठिकाणी बांधकाम होऊन शिवमंदिर बांधले आहे.

या ठिकाणी टेंबे स्वामी महाराजांनी प्रत्येक संकटावर रामबाण उपाय असलेल्या घोरकष्टोधरण स्तोत्राची रचना केली.

महाराज येथे तपश्चर्येला बसत. रांगत रांगत आत जाता येईल एवढी चिंचोळी वाट आहे. आतमध्ये केवळ एक माणूस बसु शकेल एवढी या गुहेची उंची व जागा आहे. फारशी गर्दी व मनुष्य स्पर्श न लाभलेल्या कुरवपुरच्या वातावरणात एक पवित्र्य आणि चैतन्य भरलेले आहे. ते तिथे जाणवतेच.

कुरवपूर (जि. रायचूर) कर्नाटक हे क्षेत्र कृष्णा नदीमध्ये असलेल्या एका बेटावर आहे. या क्षेत्राच्या चोहोबाजूनी पाणी आहे. या क्षेत्री श्रीपाद वल्लभांनी १४ वर्षे वास्तव्य केले. श्री दत्त अवतारी योगीराज श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबेस्वामी) यांना याच ठिकाणी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या अठरा अक्षरी मंत्राचा साक्षात्कार झाला. याच ठिकाणी वासुदेवानंद सरस्वती यांच्या वास्तव्याने पावन झालेली गुहा आहे. याच ठिकाणी श्री पाचलेगावकर महाराजांना श्रीपाद वल्लभांचा साक्षात्कार झाला.

पंचदेव पहाड या गावाजवळ दत्त उपासक विठ्ठल बाबांनी वल्ल्भपूरम नावाचा आश्रम स्थापन केला आहे. या आश्रमात निवासाची व भोजनाची व्यवस्था आहे. स्वत:च्या गाडीने कुरवपूरला जाणा-यांसाठी या आश्रमात गाडी पार्किंगची व्यवस्था आहे. वल्लभपूरम या आश्रमात श्री श्रीपाद वल्लभ स्वामींचा दरबार आहे. याच ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी सूर्यनमस्कार घालण्यासाठी येत असत. याच्या खुणा आजही पाहावयास मिळतात.

औदुंबर वृक्ष

या बेटावर असणारा औदुंबराचा वृक्ष अत्यंत डौलदार आहे. याठिकाणी पारायण करण्यासाठी कट्टा बांधला आहे. या ठिकाणी काम करणारे पुजारी व त्यांचे कुटुंबीय येथे येणाऱ्या यात्रेकरूंची राहण्याची, जेवण्याची, चहापाण्याची इ. सोय नाममात्र खर्च घेऊन करतात. सदर बेटावर दुसरे व्यावहारिक साधन नसल्याने हे संपूर्ण बेट म्हणजे एक तपोभूमीच आहे. मनापासून ज्यांना श्री गुरूदत्तांची सेवा, पारायण, जप, अनुष्ठान करावयाचे आहे. त्यांच्यासाठी ही स्वर्गभूमीच आहे. कुणाचाही त्रास नाही. स्पीकर, रेडिओ, टीव्ही यांचा व्यत्यय नाही फक्त एकांतच. केवळ सांगून, वाचून अथवा ऐकून या स्थानाचे महत्व कळणारे नाही. जशी साखर किती गोड आहे ते ती खाल्ल्याशिवाय समजत नाही.

श्रीपद श्रीवल्लभ उत्सव मूर्ती -

सदर क्षेत्र हे अनेक महात्मे येथे येऊन गेल्याने अतिशय पावन झाले आहे. श्री टेंबेस्वामी, श्री श्रीधरस्वामी, श्री नानामहाराज तराणेकर, श्री पोखरापूरकर महाराज, श्री गुळवणीमहाराज, श्री कवीश्वर, श्री मामादेशपांडे, इ. तपस्वी व्यक्तींनी या ठिकाणी मुक्काम केला आहे.

येथील कृष्णा नदीच्या विस्तीर्ण पात्रात अनेक शिळा आहेत. असे वाटते की, पूर्वीची ऋषिमंडळी ध्यानमग्न होऊन शिळेच्या रूपाने येथे बसली आहेत. आपल्याकडे एक प्रथा आहे. देवदर्शन हात, पाय धुतल्याशिवाय घेऊ नये. या ठिकाणी मंदिरात पाय धुतल्याशिवाय प्रवेशच मिळतच नाही. येथील कृष्णा नदीच्या पात्रात पाय टाकल्यावर साऱ्या जगाचा विसर पडतो, दृष्टीस पडते ते फक्त श्रीपाद मंदिर.

श्री गुरुचरित्रातील कुरवपूर माहात्म्य

श्री गुरुचरित्राच्या १० व्या अध्यायात त्यांच्या प्रिय शिष्य नवस फेडण्यासाठी कुरवपूरला जात असताना वाटेत चोरांनी अडवून त्याची हत्या केली. त्यामुळे श्रीपाद श्रीवल्लभ यांनी अवतार संपल्यानंतर हि आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी तिथे प्रकटले व आपल्या शिष्य वल्लभेषला परत जिवंत केले. अशी हि श्रीपाद श्रीवल्लभ व त्याचा निस्सम भक्त वल्लभेष या गुरु-शिष्याची कथा आहे. हि घटना घडली ते ठिकाण म्हणजे मंथनगड आहे. हे क्षेत्र कुरवपूर पासून ३० किलोमीटर अंतरावर आहे. आज त्या ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभांचे मंदिर आहे.

©️अवधूत उंडे

14/03/2024

आमचे नियमित पर्यटक rawool साहेब यांच्या आवाजातून... श्रीदत्त धाम यात्रेच्या निमित्ताने...

श्रीदत्त धाम यात्रेतील आजचा पहिला दिवस... पालखी सेवेसाठी सर्व भाविकांनी सोवळ परिधान केले. मंदिराबाहेर घेतलेला फोटो...
11/03/2024

श्रीदत्त धाम यात्रेतील आजचा पहिला दिवस... पालखी सेवेसाठी सर्व भाविकांनी सोवळ परिधान केले. मंदिराबाहेर घेतलेला फोटो...

09/03/2024

Whatsapp च्या दुनियेत असंख्य व्हिडिओ फोटो येत असतात. काल महाशिवरात्री निमित्त सोमनाथ ज्योतिर्लिंगचा व्हिडीओ आमच्या यात्रेकरूंनी पाठवला... अतिशय सुंदर असा व्हिडीओ भाविकओ तुमच्यासाठी...

सह्याद्री संस्कृती TOURISM च्या सर्व महिला यात्रेकरूंना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐💐
08/03/2024

सह्याद्री संस्कृती TOURISM च्या सर्व महिला यात्रेकरूंना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐💐

07/03/2024

काल यात्रेच्या शेवटच्या दिवशी सर्वात जुन्या कोलकत्ता मधील मेट्रोने प्रवास केला तो क्षण...

07/03/2024

सध्या चालू असलेल्या जगन्नाथ पुरी गंगासागर यात्रेत आम्ही उदयगिरी - खंडगिरी लेणी पाहण्यासाठी आलोत. या लेण्या संदर्भात माहिती देताना आमचा मार्गदर्शक...

Address

Virar
401303

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sahyadri Sanskruti Tourism posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sahyadri Sanskruti Tourism:

Videos

Share

Nearby travel agencies


Other Tourist Information Centers in Virar

Show All