08/10/2014
पनवेल-सायन मार्गावर पेट्रोल पंपासमोरील पुलावरून खाली उतरताना सुरक्षेसाठी लावलेले लोखंडी पत्रे भेदून मुरली कुटुंबीयांची मोटार पाण्यात बुडाली. पुणे येथून मुरली कुटुंबीय घरी परतत असताना हा अपघात घडला. पत्र्याच्या आवाजामुळे या मार्गावरून जाणाऱ्या रिक्षाचालकाने धाडसाने या मोटारीमधून मायलेकींना सुरक्षित पाण्याबाहेर काढले. या मुलाचे नाव विकी भोईर असे आहे. विकी हा ओवेपेठ गावात राहणारा असून तो खारघरमध्ये तीनआसनी रिक्षा चालवतो. ५० फूट खोल खाडीत या मायलेकी मोटारीबाहेर पडल्या. मात्र खाडीला भरतीचे उधाण आल्याने त्या पाण्यासोबत वाहत जात होत्या. विकीने पाण्यात उडी मारून शेजारची होडी घेऊन या मायलेकींपर्यंत पोहोचला. http://loksa.in/aSd116723