28/09/2020
⛰केंजळगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
केंजळगड हा कृष्णा आणि नीरा या दोन नद्यांच्या खोऱ्यातील एका डोंगरावर आहे. एका बाजूला धोम येथे कृष्णा नदीवर धरण आहे, तर दुसरीकडे नीरा नदीवर देवघर येथे धरण व जवळच रायरेश्वराचे पठार आहे. .त्या पठारावर जाण्यासाठी असलेल्या वाटांची नावे : गणेशदरा, गायदरा, या सोप्या वाटा; आणि कागदरा, लोह्दरा, वाघदरा, सांबरदरा, सुणदरा ह्या अवघड वाटा. केंजळ किल्ल्याकडून रायरेश्वराकडे जाताना वाटेत सुणदरा आहे. सध्या तेथे शिडी लावली आहे. ती वाट चढून रायरेश्वरावर गेल्यावर ती वाट किती अनोखी आहे ते कळून येते. 'रायरेश्वर' महादेवाचे देऊळ तेथे आहे.
⛰त्या उंचीवरून कमळगड, केंजळगड, कोल्हेश्वर, तोरणा, पाचगणी, पांडवगड, पुरंदर, महाबळेश्वर, राजगड, रायगड, रोहिडा, लिंगाणा, वज्रगड, वैराटगड, सिंहगड हे दुर्ग दिसतात, तर नाकिंदा ह्या रायरेश्वराच्या पश्चिम टोकावरून चंद्रगड, प्रतापगड, मंगळगडही दिसतात. केंजळगडाचे दुसरे नाव केलंजा आणि तिसरे मनमोहनगड. हे तिसरे नाव खास शिवाजी महाराजांनी दिले आहे. केंजळगडची किल्लेदारी पिलाजी गोळे यांच्याकडे असल्याची शिवकालीन ते शाहू कालखंड पर्यंत नोंद मिळते, हंबीरराव मोहिते यांची शेवटची लढाई याच परिसरात झाली,एकनिष्ठ गोळे घराणे ने भरपूर योगदान या गड साठी दिले आहे,पुढे १६८९ मध्ये पायदळ प्रमुख त्यांना करण्यात आले त्यावेळेस च्या पत्र नुसार पिलाजी गोळे कडे केंजळगड, पांडवगड, कमळगड, वैराटगड ,चंदन वंदन, मंगळगड अशी यादी मिळते (शाहू दप्तर) भोरहून कोरले, वडतुंबीला जाऊन तेथून पायी केंजळमाचीपर्यंत चालत जाता येते. इथे देवळात मुक्कामाला जागा आहे, .गडावर रहाण्यास जागा नाही. माचीहून उजव्या हाताने वर चढून गेल्यावर एक सपाटी लागते. इथूनच दगडात चोपन्न प्रशस्त पायरया खोदून काढल्या आहेत.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩...
Visit and follow the page :
📸 PC : (unknown)...
🌴 ..
Must follow : ..
🚩जय महाराष्ट्र जय शिवराय🚩