AmazingAlibag

AmazingAlibag Providing All information about tourist places around Alibag.
(1)

Exploring another ancient temple at
03/05/2024

Exploring another ancient temple at

Exploring Padmadurga, a historic fort, our first tourism visit with group from Pune,
01/05/2024

Exploring Padmadurga, a historic fort, our first tourism visit with group from Pune,

18/04/2024

आज जागतिक वारसा दिन. वर्ल्ड हेरिटेज डे.
प्रत्येक देशातील गावांना आणि शहरांना ऐतिहासिक, साहित्यिक, सांस्कृतिक, तसेच विविध कलेचा वारसा लाभलेला असतो, आणि हाच वारसा या परिसराची ओळख बनलेला असतो.
अलिबागला सुद्धा अतिशय समृद्ध असा दोन हजार वर्षांपासूनचा वारसा लाभलेला आहे, आणि याची प्रमाणे बऱ्याच ठिकाणी दिसून येतात, जसे अलिबागजवळील ऐतिहासिक चौल-रेवदंडा गाव, जसे मुरुड येथील कुडा मांदाड हि साधारणतः पहिल्या व दुसऱ्या शतकातील बौद्धकालीन लेणी, अलिबाग परिसरातील पुरातन देवालये. अलिबाग परिसरात सापडणारे पुरातन शिलालेख. आक्षी येथे सापडलेले मराठी आद्य शिलालेख, मुरुड येथील ताम्रपट हे' या सांस्कृतिक वारशाची साक्ष देतात.
चला तर, हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा प्रत्यक्ष अनुभवायला अलिबागला

आज नववर्ष !!! चैत्र शुद्ध प्रतिपदा श्री शालिवाहन शके १९४६ अर्थात नवीन वर्षाची सुरुवात. सरत्या वर्षाचा निरोप घेऊन नव्या उ...
09/04/2024

आज नववर्ष !!! चैत्र शुद्ध प्रतिपदा श्री शालिवाहन शके १९४६ अर्थात नवीन वर्षाची सुरुवात. सरत्या वर्षाचा निरोप घेऊन नव्या उमेदीने नव्या उन्मेषाने नववर्षाचे स्वागत करण्याचा दिवस...
साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त!

निसर्ग सतत आपले रूप बदलत असतो. पानगळ होते त्यानंतर बहर ही येतो. म्हणजेच अंत आहे तिथे आरंभही आहे. हे सगळ आहे म्हणूनच नाविन्य आहे, चैतन्य आहे. झाडांना येणारी कोवळी व रंगीबेरंगी पाने म्हणजे ऋतुबदल दर्शविणाऱ्या गुढ्याच.
चैत्र आलाय, आणि आता सर्व वातावरण बदलून गेलंय. पानगळ संपुन फुटलेल्या नव्या पालवीमुळे नवचैतन्य पसरलंय.
चैत्राचा हात हातात घेऊनच वसंत ऋतूचे आगमन झालेय.
आपल्या अलिबाग चा परिसर सुद्धा विविध रानफुलांनी सजून गेलाय . वेगवेगळ्या रंगांची फुले, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मध्ये मध्ये डोकाऊ लागलीत. पळस, सावरी, नीलमोहर, बहावा, गुलमोहर अशी किती तरी फुले फुलू लागलीत.
शिशीराच्या पानगळीने उदास झालेले हळवं मन या वसंतोत्सवात आनंदाने न्हाऊन निघते. सगळीकडे वातावरण प्रफुल्लीत होउन निसर्गाला नवचैतन्य येते.
पुन्हा पुन्हा मन गाऊ लागते
"शिशिर संपला वसंत आला
नभी पारवा घुमू लागला..."

जिथे पानगळ तिथे बहर हीच शिकवण निसर्ग आपल्याला देतो आणि सकारात्मक विचार करण्याची प्रेरणा देखील या निसर्गाकडून आपल्याला मिळते.
जुन्याची जागा नवे घेते म्हणूनच या सृष्टीत चैतन्य टिकून आहे. ओढ आणि आपुलकी टिकून आहे. चैत्र पालवी हेच तर सांगत असते.

Amazing Alibag च्या सर्व टीम तर्फे सर्व अलिबागकारांना आणि अलिबागच्या चाहत्यांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. येणारे नव वर्ष आपल्या जीवनात आनंद, समृद्धी, आरोग्य, भरभराट घेऊन येवो हीच सदिच्छा !!!

बहावावसंत ऋतूमध्ये निसर्ग विविध रंगांची उधळण करतो, त्यातीलच एक मन प्रसन्न करणारा रंग म्हणजे पिवळा. अलिबाग आणि परिसरात सु...
26/03/2024

बहावा

वसंत ऋतूमध्ये निसर्ग विविध रंगांची उधळण करतो, त्यातीलच एक मन प्रसन्न करणारा रंग म्हणजे पिवळा. अलिबाग आणि परिसरात सुद्धा विविधरंगी फुलांनी झाडे बाहेरून जातात, त्यातीलच एक पिवळ्याशार रंगांच्या फुलांनी बाहेरून गेलेले झाड म्हणजे बहावा. पूर्णपणे बहरलेले झाड म्हणजे एखाद्या सुंदरपणे केलेल्या फुलांच्या सजावटीलाही लाजवेल अशी नैसर्गिक रचना.

बहावा फुलला की अंदाजे ६० दिवसांनी पाऊस पडतो असे म्हणतात . याला पावसाचा नेचर इंडीकेटर असेही म्हणतात. या झाडाला 'शाॅवर ऑफ द फाॅरेस्ट' असेही म्हणतात.

अलिबागच्या जवळ बेलकडे आणि पुढच्या रस्त्याच्या दुतर्फा हि झाडे आणि पिवळीशार फुले दिसून येतात. हे बहरलेले झाड पहिले त्याचे वर्णन करायला शब्द अपुरे पडतात आणि आठवते ती इंदिरा संत यांची कविता -

नकळत येती ओठावरती
तुला पाहता शब्द वाहवा,
सोनवर्खिले झुंबर लेउन
दिमाखात हा उभा बहावा ।

लोलक इवले धम्मक पिवळे
दवबिंदूतुन बघ लुकलुकती,
हिरवी पर्णे जणू कोंदणे
साज पाचुचा तया चढवती ॥

कधी दिसे नववधू बावरी
हळद माखली तनु सावरते
झुळुकीसंगे दल थरथरता
डूल कानिचे जणू हालते ।

युवतीच्या कमनीय कटीवर
झोके घेई रम्य मेखला,
की धरणीवर नक्षत्रांचा
गंधर्वांनी झुला बांधला ॥

पीतांबर नेसुनी युगंधर
जणू झळकला या भूलोकी,
पुन्हा एकदा पार्थासाठी
गीताई तो सांगे श्लोकी ।

ज्या ज्या वेळी अवघड होई
ग्रीष्माचा तुज दाह सहाया,
त्या त्या वेळी अवतरेन मी
बहावा रुपे तुज सुखवाया ॥
- इंदिरा संत.

मग कधी येताय हि नैसर्गची अद्भुत देणगी पाहायला, अलिबागला !!!

होळीकोकणातला गौरी गणपती नंतर सर्वात लोकप्रिय सण म्हणजे होळी म्हणजेच शिमगा.या सणाच्या निमित्ताने वसंत ऋतूचे उत्साहाने स्व...
24/03/2024

होळी

कोकणातला गौरी गणपती नंतर सर्वात लोकप्रिय सण म्हणजे होळी म्हणजेच शिमगा.
या सणाच्या निमित्ताने वसंत ऋतूचे उत्साहाने स्वागत करायला चाकरमानी पुन्हा गावाकडे येतात. कोकणात विशेषतः फाल्गुन पौर्णिमेच्या दिवसापासून पुढे सात दिवस होलिकोत्सव साजरा केला जातो.या पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा असेही म्हणतात. ' हुताशन ' म्हणजे हुत पदार्थांचे ( दिलेल्या आहुतींचे ) अशन अर्थात भक्षण करतो तो अग्नी. विशेषरुपात अग्नीचे पूजन करण्याची पर्वणी म्हणून ही हुताशनी पौर्णिमा. या पर्वावर साजरा होणारा उत्सव होलिका,होळी,शिमगा या नावांनीही ओळखला जातो. होलिकोत्सव,धुलिकोत्सव,रंगोत्सव असे तीन वेगवेगळे दिवस साजरे केले जातात. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी घरी गोडधोड , त्यात प्रामुख्याने पुरण पोळीचे जेवण केले जाते. सायंकाळी गावातील सर्व लहान थोर मंडळी एकत्र येऊन होळी पेटवतात. होळीला नारळ अर्पण केला जातो. बरेच ठिकाणी लोकनृत्य सादर केले जाते.

अलिबाग परिसरामध्ये केळीचे झाड होळीसाठी वापरले जाते तर मुरुड कडे सुपारीचे झाड वापरले जाते. मुरुडला एक दिवस आधी हे सुपारीचे झाड आडवे धरून पूर्ण पाखाडीमध्ये नाचत गाजत फिरवले जाते, व घरोघरी त्याची पूजा करतात नंतर हे झाड होळी म्हणून उभे केले जाते. अलिबागमध्ये सुद्धा होळीभोवती अतिशय आकर्षक सजावट केली जाते. अलिबाग कोळीवाड्यामध्ये तर हा उत्सव पाहण्यासारखा असतो. वेगवेगळे देखावे सुद्धा सादर केले जातात.

होळीचा दुसरा दिवस म्हणजे धुळवड, ह्या दिवशी अलिबागमध्ये असते. समुद्राला उधाणाची भरती असते, मग बरेच अलिबागकार समुद्रामध्ये डुंबण्याचा आनंद घेतात.

होळी हा रंगांचा उत्सव म्हणून सुद्धा पूर्ण भारतभर साजरा केला जातो. होळीच्या दरम्यान येणाऱ्या वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी कोकणात सुद्धा निरनिराळ्या झाडांना येणाऱ्या' रंगीबेरंगी फुलांनी सृष्टी अगदी बहरून जाते, यामध्ये विशेष करून गर्द पिवळा बहावा, केशरी काटेसावर, गुलमोहोर, अशा झाडांना विशेष बहर आलेला असतो

महाशिवरात्रीनिमित्त सर्वांना शुभेच्छा.आज माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी म्हणजेच महाशिवरात्र. अलिबाग परिसरामध्ये बरीच ...
08/03/2024

महाशिवरात्रीनिमित्त सर्वांना शुभेच्छा.
आज माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी म्हणजेच महाशिवरात्र. अलिबाग परिसरामध्ये बरीच पुरातन शिवमंदिरे आहेत. या सर्व मंदिरांमध्ये महाशिवरात्रीला मोठा उत्सव साजरा केला जातो. भगवान शंकरांना बेलाची पाने वाहून अभिषेक केला जातो. बेलाचे झाड हे सुद्धा अलिबागमध्ये सापडणाऱ्या झाडांमधील एक विशेष. अलिबागमध्ये शिवकालीन व आंग्रेकालीन अशी बरीच मंदिरे आहेत. आज काही प्रसिद्ध शिवमंदिराची माहिती आपण आज घेऊ.

वरसोली येथील बेलेश्वर -
साधारणतः सन ११११ च्या दरम्यानचे हे मंदिर आहे. मंदिर परिसराची जागा कान्होजी आंग्रे यांच्या मालकीची होती. नंतर हि जागा ब्रिटिश सरकार कडे गेली, सन १८६४ साली ब्रिटिश सरकारने हि जागा येथील राऊळ घराण्याकडे दिली. मंदिराच्या उजव्या बाजूला एक शिलालेख ठेवलेला दिसून येतो.

नागाव येथील भीमेश्वर - अलिबाग नागाव रस्त्यालगत हे पुरातन मंदिर आहे. सदाशिवराव भाऊ पेशवे यांची पत्नी पार्वतीबाई यांच्या सहकार्याने या मंदिराचा जिर्णोद्धार १७५८ साली करण्यात आला. याच मंदिराजवळ साधारणतः श के १२८८ सालचा एक शिलालेख सापडतो.

कनकेश्वर - मापगांव येथील श्री क्षेत्र कनकेश्वर हे सुद्धा फार प्राचीन आणि प्रसिद्ध देवस्थान आहे. कनकेश्वर येथील डोंगर परदेशी पक्ष्यांसाठी फार अनुकूल असल्याने हे पक्षी पाहण्यासाठी पक्षीप्रेमी येतात. पावसाळ्यात या जागेचे सौन्दर्य फारच अप्रतिम असते.

चौलचे श्री रामेश्वर - अलिबागपासून पुढे चौल येथे श्री क्षेत्र रामेश्वर देवस्थान सुद्धा फार पुरातन आणि प्रसिद्ध आहे. मंदिरासमोर प्रशस्त अशी पुष्करिणी आहे, येथे त्रिपुरारी पौर्णिमेला फार मोठा दीपोत्सव साजरा केला जातो. येथे अग्निकुंड, पर्जन्यकुंड व वायुकुंड अशी तीन कुंडे आहेत.

अशा या ऐतिहासिक अलिबाग ला भेट द्यायला नक्की या.
www.amazingalibag.com । Discover Real Alibag

लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी।जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ।आज २७ फेब्रुवारी , मराठी भाषा गौरव दिन. ज्ञानपीठ पुरस्कार वि...
27/02/2024

लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी।
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ।

आज २७ फेब्रुवारी , मराठी भाषा गौरव दिन. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी कवी कुसुमाग्रज यांचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान महत्त्वपूर्ण असल्याने त्यांना अभिवादन म्हणून २१ जानेवारी २०१३ रोजी महाराष्ट्र शासनाने त्यांचा जन्मदिवस "२७ फेब्रुवारी" हा "मराठी भाषा गौरव दिन" म्हणून घोषित केला.

साहित्य आणि अलिबागचे नाते फार फार वर्षांपूर्वीचे. मराठी लेखनकलेला अलिबागजवळील काही शिलालेखांमुळे फार प्राचीन वारसा लाभला आहे. अलिबाग तालुक्यातील आक्षी येथील नऊ ओळींचा शिलालेख शके ९३४ म्हणजेच इ. स. १०१२ मधील मराठीतील सर्वात पहिला शिलालेख मानला जातो. शिलालेखांप्रमाणेच पहिल्या ताम्रपटाचा मान हा रायगड जिल्ह्यालाच मिळतो. नंतरच्या काळात समर्थ रामदासांनी लिहिलेला श्री दासबोध ग्रंथ सुद्धा रायगड जिल्ह्यातील शिवथरघळीतला. आंग्रेकालीन अष्टागारातील प्रमुख ठिकाणे अलिबाग आणि परिसरात असल्यामुळे येथे शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा अनेक प्रकारचे ग्रंथ लिहिले गेले. याच काळात मराठी भाषेचा कोश, मराठी व्याकरण व इतर पाठ्यपुस्तकांची निर्मिती झाली. मराठा आणि पेशव्यांच्या काळात नागाव व पेण हि विद्येची केंद्रे होती. नंतरच्या स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक शालेय पाठ्यपुस्तके, बोधप्रद पुस्तके, प्रबंध, वर्तमानपत्रे, अशा अनेक प्रकारच्या साहित्याने येथील साहित्य व ग्रंथसंपदा बहरलेली आहे.

आपल्या साहित्यिक वारसा लाभलेल्या अलिबागची हि परंपरा अशीच पुढे चालू ठेऊ.

चला तर, हा ऐतिहासिक वारसा आणि आद्य शिलालेख प्रत्यक्ष पहायला, अलिबागच्या भेटीला
www.amazingalibag.com

रायगड जिल्ह्यातील कोकण किनारपट्टीवर अलिबागपासून साधारणतः २५ किमी अंतरावर हिरव्यागार झाडीच्या कुशीत वसलेले घनदाट जंगल म्ह...
25/02/2024

रायगड जिल्ह्यातील कोकण किनारपट्टीवर अलिबागपासून साधारणतः २५ किमी अंतरावर हिरव्यागार झाडीच्या कुशीत वसलेले घनदाट जंगल म्हणजे "फणसाड अभयारण्य " . ५२ चौ किमी क्षेत्रावर विस्तारलेल्या या अभयारण्याला निसर्गाचा वरद हस्तच लाभलेला जणू. येथील उपलब्ध असलेल्या अफाट जैव विविधतेचे संरक्षण व जतन व्हावे या हेतूने महाराष्ट्र शासनाने दि २५ फेब्रुवारी १९८६ मध्ये फणसाड वन्यजीव अभयारण्य घोषित केले.

फणसाड अभयारण्य जैव विविधतेने नटलेले आहे येथे विविध प्रमाणात झाडे आढळतात. येथील वृक्षसंपदेला शोभेल अशी येथे फुलपाखरे आणि पक्षी सुद्धा बरेच आहेत. फणसाड अभयारण्यामध्ये साधारणतः १५ पेक्षा जास्त प्रकारचे प्राणी आढळतात. येथे भटकंतीसाठी विविध वाट तयार केल्या आहेत, येथे २७ पाणस्थळे आहेत, फणसाड गाण आणि सावरट तलाव येथील बिबट्याची गुहा पाहणे हा थरारक अनुभव आहे. येथून एका मनोऱ्यावरून अथांग समुद्राचे सुद्धा दर्शन घडते. तलावातील माश्यांची अचूक शिकार करणारे पक्षी पाहणे म्हणजे फारच मनमोहक असते.

निसर्गाच्या अन्नसाखळीत मेलेली जनावरे खाऊन स्वच्छता राखणारी गिधाडे आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. येथील खास बनवलेले "व्हल्चर रेस्टोरंट" येथे अभयारण्य परिसरातील मृत जनावरे येथे टाकली जातात आणि यावर गिधाडे येतात.

येथे एक जुने धरण सुद्धा आहे, पावसाळ्यामध्ये अतिशय विहंगम दृश्य असते.

चला तर मग येताय ना फणसाड अभयारण्याच्या सफरीचा अनुभव घ्यायला

Hello Travellers !!!Happy National Tourism Day !AlibagOnline is super excited to announce it’s new start “Amazing Alibag...
10/02/2024

Hello Travellers !!!
Happy National Tourism Day !
AlibagOnline is super excited to announce it’s new start “Amazing Alibag '' which will help you Discover Real Alibag. In association with “Maitree Holidays and Adventures” a well known brand in adventures & Holiday organisers, we are ready to help you “Discover Real Alibag”
Now don’t just limit your Alibag visit to a few Beaches & forts, Get ready to explore unseen Alibag !!!.
Visit our new website www.amazingalibag.com where you will get variety of Tour Packages of your interest.
Keep tuning here for more details soon.
Keep Travelling -
Team Amazing Alibag.

Dear Travelers !!!We are ✨excited to share our new start “Amazing Alibag”, a complete travel solution for your next Alib...
10/02/2024

Dear Travelers !!!

We are ✨excited to share our new start “Amazing Alibag”, a complete travel solution for your next Alibag Tour. Now explore 🏰ancient forts, 🏖️scenic beaches, historic places, 🌿 nature & biodiversity, Culture & tradition with Amazing Alibag. We specializes in Luxury Accommodation, Expert Guides, Custom Itinerary, Adventurous activities. Visit our website www.amazingalibag.com

We are the very first to introduce the Complete travel package for Amazing Alibag on the shores of western Coastal lines of Kokan. We specialise into Luxury Accommodation, Authentic Food, Expert Guides, Naturalists, Adventurists, Culture & Tradition, Historical information.

Keep Travelling -
Team Amazing Alibag.

Address

Alibag
402201

Alerts

Be the first to know and let us send you an email when AmazingAlibag posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to AmazingAlibag:

Videos

Share


Other Tourist Information Centers in Alibag

Show All