Kasba Natu

Kasba Natu Kabsa Natu (aka Natunagar) is a beautiful Village on NH 66 Mumbai to Goa Highway. It is 14 KM north

बोरघाट हा कोकण आणि देशाला जोडणारा, पुणे-मुंबईला जोडणारा एक महत्वाचा घाट आहे.. आणि हि वाट तशी अगदी प्राचीन काळापासूनच महत...
24/12/2019

बोरघाट हा कोकण आणि देशाला जोडणारा, पुणे-मुंबईला जोडणारा एक महत्वाचा घाट आहे.. आणि हि वाट तशी अगदी प्राचीन काळापासूनच महत्वाची आहे. या वाटेवर नजर ठेवायला म्हणून बांधण्यात आले दोन किल्ले, श्रीवर्धन आणि मनरंजन. हे किल्ले ज्या पठारावर आहेत त्याला आज आपण राजमाची म्हणून ओळखतो. हा किल्ला मुळातच एका महत्वाच्या जागेवर बांधलेला आहे, त्यातून संपूर्ण राजमाची परिसर सुंदर आहे. एक मोठं पठार, त्यावर दोन किल्ले, सभोवती जंगल, कातळात कोरलेल्या गुहा, एक बांधीव तलाव, प्राचीन शिवमंदिर, देवराई आणि अगदी मोजकी घरं. यावर साज म्हणून चहूबाजूला बघायला मिळणारा निसर्गरम्य नजारा..
सदर छायाचित्र श्रीवर्धन किल्ल्याच्या सर्वोच्च जागेवरून काढलाय, डाव्या हाताला कातळधार, त्याच्या वर लोणावळ्यातून राजमाचीकडे येणार रस्ता, समोर दूरवर दिसणारं लोणावळा शहर, त्याचा मुकुटमणी शोभणारा नागफणी (ड्युक्स नोज ) उजव्या हाताच्या समोरच्या डोंगरातून जाणारा रेलवे मार्ग... अगदीच सुंदर आहे हा परिसर.. आणि म्हणूनच कदाचित तितकाच पर्यटकांना आकर्षित करणारा सुद्धा आहे..

पाऊस जातो, थंडी येते. सोबत घेऊन येते धुकं, गारवा... आणि.. शेकडो मेल प्रवास करून आलेले काही पाहुणे..  विविध प्रवासी पक्षी...
23/12/2019

पाऊस जातो, थंडी येते. सोबत घेऊन येते धुकं, गारवा... आणि.. शेकडो मेल प्रवास करून आलेले काही पाहुणे.. विविध प्रवासी पक्षी.. त्यात सर्वात लोकप्रिय असलेले आणि मोठ्या प्रमाणात येणारे पक्षी फ्लेमिंगो.. म्हणजेच रोहित पक्षी.

रोहित पक्षी भारतात स्थानिक स्थलांतर करतात. बहुतांशी रोहित पक्षी हे कच्छच्या रणामधील रहिवासी आहेत. पावसाळ्यामध्ये जेव्हा कच्छच्या रणामध्ये गुढगाभर उथळ पाणी असते अश्या ठिकाणी चिखलाचे छोटे छोटे किल्ले उभारून त्यात अंडी घालतात व पिल्लांना वाढवतात.

पाणी व उन पुष्कळ असल्याने भरपूर खाद्य असते त्यामुळे पिल्लाचे पालनपोषण चांगले होते. तसेच कच्छचे रण मानवी वावरापासून दुर असल्याने त्यांची वाढ व्यवस्थित होते. ज्या भागात रोहित पक्षी अंडी घालतात त्या भागाला कच्छमध्ये रोहित पक्ष्यांचे शहर असे म्हणतात. आफ्रिकेत पण व्हिक्टोरिया सरोवर, टांगलिका सरोवरामध्ये अशीच मोठी मोठी रोहित पक्ष्याची वसतीस्थाने आहेत.

पावसाळ्यानंतर कच्छमध्ये पाणी जेव्हा आटते तेव्हा रोहित पक्षी स्थानिक स्थलांतर करतात व देशभर पसरतात. पुण्याजवळील उजनी धरणाच्या पाण्यात रोहित पक्ष्यांना पोषक अश्या उथळ जागा आहेत तेथे हिवाळ्यात व उन्हाळ्यात कधी कधी रोहित पक्षी आढळून येतात.

डोंगरात भटकंती करताना काही गोष्टी नेहमीच लक्षात ठेवायच्या असतात. त्यातली एक महत्वाची गोष्ट म्हणजे आजूबाजूला काय काय आहे ...
19/12/2019

डोंगरात भटकंती करताना काही गोष्टी नेहमीच लक्षात ठेवायच्या असतात. त्यातली एक महत्वाची गोष्ट म्हणजे आजूबाजूला काय काय आहे हे नक्की जाणून घ्यावं पाहावं आणि लक्षात ठेवावं. यानं होतं असं की, एकतर म्हणजे ही पर्वणी असेल सह्याद्रीतल्या विविध जागा, किल्ले, सुळके वेगवेगळ्या बाजूंनी न्याहाळून त्यांचं सौन्दर्य मनात भरण्यासाठी आणि अगदीच कधी बाका प्रसंग आला तर या गोष्टी खाणाखुणा म्हणून लक्षात राहतील...

असंच एक दृश्य दिसतं साम्रद गावातून संधान दरीच्या दिशेने चालताना... या पठारावरून आपल्याला समोर एक सुळका दिसतो.. हा आहे रतनगडाचा खुट्टा आणि त्याच सोबत थोडा उजवीकडे वर खुद्द रतनगड दिसतो. त्याची उंची, कोकणच्या बाजूने दिसणाऱ्या कड्याची उंची पाहिली की मग आपण पाहिलेला रतनगड खरंच किती उंच आहे याचीही जाणीव होते आणि त्या गडाची निर्मिती तिनेच का झाली असावी याचंही थोड्याफार प्रमाणात उत्तर मिळतं...

महाराष्ट्रात अनेक किल्ले आहेत. निरनिराळ्या कालखंडात निरनिराळ्या राजवटींमध्ये बांधले गेलेले.. अगदी हजार बाराशे वर्षांपूर्...
18/12/2019

महाराष्ट्रात अनेक किल्ले आहेत. निरनिराळ्या कालखंडात निरनिराळ्या राजवटींमध्ये बांधले गेलेले.. अगदी हजार बाराशे वर्षांपूर्वीपासून अठराव्या शतकापर्यंत राज्य केलेल्या विविध राजवटींचा प्रभाव या सर्व किल्ल्यांवर पडलेला दिसतो. यातले खासकरून शिवकालीन किल्ले जास्त प्रसिद्ध आहेत आणि त्यांच्यावर ये-जा सुद्धा बरीच चालू असते. परंतु, असे अनेक किल्ले आहेत ज्यांच्या भाग्यात शिवकालीन इतिहास फार कमी आलेला आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडे आपले लक्षही कमीच पडलेलं आहे.
आता हेच पहा ना... मनमाड जवळ किल्ल्यांची जणू एक माळच तयार झालेली आहे. त्यांची नावेसुद्धा बर्याच इतिहासप्रेमींनाही माहीत नाहीत. इथला अंगठावजा हडबीची शेंडी नावाचा सुळका, कात्रा किल्ला, शंभूचा डोंगर, मच्छिन्द्रनाथ डोंगर, अंकाई-टंकाई अशी रांगच आहे. यातल्या अंकाईशेजारुन तर रेल्वे सुद्धा जाते. परंतु, माहिती नसल्याने लोकांचं लक्ष फारच कमी. अंकाई किल्ला तर अगसीत ऋषींचं स्थान. परंतु, तरीही केवळ स्थानिक लोकांमध्ये माहिती असलेली ही जागा. याच्या जोडीचा टंकाई किल्ला म्हणजे एक मोठं पठार आहे. ज्यावर काही पाण्याची टाकी, तटबंदी आणि एक शिवमंदिर आहे. हे पडलेलं शिवमंदिर, समोरचं पाण्याचं विस्तीर्ण तळं सोडलं तर किल्ल्यावर सगळीकडे केवळ गुरांचा वावर दिसतो.
हे शिवमंदिर मात्र पाहण्यासारखं आहे. शिल्पयुक्त नक्षीकामाच्या दगडांनी बांधलेलं अजूनही थोडाफार तग धरुन असलेल्या मंदिरात शिवपिंड आणि समोर एक तुटक नंदी आहे.
बराच काळ हा संपूर्ण भाग मोगलाईत असल्याने तसंच, पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरांपासून लांब असल्यामुळे कदाचित इथे लोकांचा राबता कमी असावा..

या किल्ल्याच्या पायथ्याला एक सुंदर लेण्यांचा समूह आहे.. त्यावर पुन्हा कधीतरी बोलूयात.

There are many Forts in Maharashtra. These forts are built by various rulers through the historic times of Maharashtra. out of all these forts, mostly forts from the Shivaji Maharaj Reign are famous and people do visit these place more often. Other forts however, lack in attraction as they are far from the main cities and have less connection with Maratha History.
For example, A range of pinnacles and Forts near Manmad even has Railway line passing next to it, abd is still not known in the History lovers community.
Ankai Fort in this range is also the place where Agasti Hrushi stayed for a long time.
Tankai is the Neighboring fort to Ankai. This plateau type fort today, has barely any structures to showcase. a Shiva Temple is a must visit place on the fort.

रायगड... जावळीच्या जंगलातून वर आलेला, चहूबाजूंनी खड्या कातळभिंती असलेला आणि सुदूर नजर जाईल असा एक सुंदर किल्ला. इथून दिस...
17/12/2019

रायगड... जावळीच्या जंगलातून वर आलेला, चहूबाजूंनी खड्या कातळभिंती असलेला आणि सुदूर नजर जाईल असा एक सुंदर किल्ला. इथून दिसणारा राजगड, तोरणा, लिंगाणा, प्रतापगड, कोकणदिवा, डझनभर घाटवाटा.. गडाकडे पाहताच पटावं की, हा गड नक्कीच राजधानीच्या लायकीचाच नव्हे तर राजधानी बनण्यासाठीच पृथ्वीच्या पोटातून वर आलाय.. गडावर काय काय आहे हे तर आपण कित्येकदा पाहिलंय.. सोबतच्या छायाचित्रातलं दृश्य सुद्धा आपण खूपदा पाहिलंय.. पण, इथूनच किल्ला पाहण्यापेक्षा चहूबाजूंनी असाच त्याच्या पायथ्याशी जाऊन पाहता आला तर? हे शक्य आहे... रायगडाची प्रदक्षिणा केली तर हा किल्ला किती भक्कम आणि कसा रुबाबदार आहे.. याच्या पायथ्याचं जावळीचं जंगल किती दाट आहे, किती समृद्ध आहे हे सर्व पाहता येतं.. अगदी एका दिवसात आपली रायगडाकडे पाहण्याची दृष्टीच बदलते..
आम्ही जातोय... तुम्ही येणार का सोबत?

Raigad Fort is one of the beautiful forts in Sahyadris. Thick Vegetation at the base, straight rock walls from all sides, Numerous forts like, Rajgad, Torna, Lingana, Pratapgad, Kokan Diva, a dozen of ghat routes connecting Kokan and Mainland of Maharashtra in the vicinity. After looking at all these aspects one can be convinced that this fort deserved to be the Capital of Swarajya by all means.
The photo attached here is also seen many times.. but, how about exploring all the sides of this forts from base? walking around the fort to see how huge it is from all sides, to explore the richness of the Jungles around it can be fun. Once we do this trail, our perspective to look at this fort changes like anything.
we are going... are you willing to join us?

छत्रपती शिवराय या नावाबद्दल आपण सर्वांनाच अभिमान आहे, असतो आणि असावाच.. त्याला कारणंसुद्धा तशीच आहेत. ज्या वयात आजकालची ...
16/12/2019

छत्रपती शिवराय या नावाबद्दल आपण सर्वांनाच अभिमान आहे, असतो आणि असावाच.. त्याला कारणंसुद्धा तशीच आहेत. ज्या वयात आजकालची मुलं आज कपडे कोणते घालायचे हे ठरवू शकत नाहीत, त्या वयात 'शिवाजी शहाजी भोसले' नावाचा एक नवयुवक स्वराज्याची स्वप्ने पाहतच नव्हता तर आपल्या सोबत्यांना घेऊन ती स्वप्नं साकारत होता. आणि याच नवयुवकाला आज आपण मानाने, आदराने शिवछत्रपती म्हणून ओळखतो. त्यांची दूरदृष्टी किती मोठी होती, त्यांच्या प्रत्येक भूमिकेमागे किती विचार असायचा याचा प्रत्यय त्यांच्या आयुष्यात डोकावून पाहिल्यास लागलीच येतो.

आता हेच पहा ना... ब्रह्मदेवाचा आणि स्थानिक भाषेत मुरुंबदेवाचा डोंगर म्हणून ओळखला जाणारा एक छोटेखानी किल्ला हाती आल्यावर त्याचं स्वराज्याच्या पहिल्या राजधानीत रूपांतर करुन शिवरायांनी आपल्या जाणतेपणाची आपल्या दूरदृष्टीची ओळखच पटवून दिलेली आहे. डोंगराला लागून असलेल्या रांगांवर बांधकाम करुन त्यांना माचीच स्वरूप दिलं आणि १२ चौरस मैलांचा परिसर राजगडाच्या पंखांखाली आणला.. या माच्यांची नावही किती सुंदर ठेवलीयेत. पद्मावतीचं मंदिर असलेली पद्मावती, पूर्वेकडे धावणारी सुवेळा आणि दक्षिण-पश्चिमेकडे जाणारी संजीवनी..

संजीवनीची बाजू म्हणजे राजगडाची सर्वात कमकुवत बाजू होती. म्हणजे या बाजूने हल्ला होणे अतिशय सोपं जाऊ शकेल अशी डोंगर-रांग. त्या कमकुवत, नाजूक भागाला कोरुन अजस्त्र भिंती उभ्या करुन , त्यातून निघालेल्या पत्थरांमधून संजीवनी माचीचं दुहेरी बांधकाम करणं , त्याला चिलखती बुरुजांची माळ घालणं आणि एकूणच या भागाला अवघड, अभेद्य बनवणं... काय ते काम, काय ती दृष्टी... नाजूक भागाला पत्थरांचा साज लेवून किल्ल्याची सर्वात भक्कम बाजू बनवून, किल्ल्याला नाव-संजीवनीच मिळाली म्हणा ना...

तुम्ही पहिली असेलच ना ही जागा? तुमचा अनुभव नक्की सांगा.. कारण, ही जागाच इतकी खास आहे की, जगत राहावं वाटतं, इथं पुन्हा पुन्हा येण्यासाठी..

We all are Proud to have a King like Chatrapati Shivaraay, certainly so.. we should be proud of our beloved King for his visions for Swarajya and the way he planned his dreams and accomplished them.
We can easily get to understand his vision by looking at his life..

To give an Example, look at Rajgad, a small watch post on hill named Murumdev Hill, which he converted to be a Huge fort and the First Capital of Maratha Kingdom. and we should always look at the structure of this fort in Architectural perspective too.
The Extensions like, Suvela, Padmavati and Sanjivani has made it possible to bring around 12 sq. miles area under the wings of Rajgad.

The South Western ridge of the fort was the weakest link in the fort and it was very easy to conquer the fort from this side for enemies. However, Shivchatrapati had a vision for this place, he got it carved to be a huge rock wall, he got the double walled fortification built with the carved stone and made it so strong it this part became impossible to conquer.
This vary place, which was once the weakest link of the Fort, added life to the Fort and hence, the name, Sanjivani.

You also, might have been to this place, if yes, do share your experience.

सह्याद्री म्हटल्यावर डोळ्यासमोर काय उभं राहतं? ज्वालामुखीच्या उद्रेकातून निर्माण झालेल्या काळ्या कभिन्न कातळ भिंती, कोकण...
15/12/2019

सह्याद्री म्हटल्यावर डोळ्यासमोर काय उभं राहतं? ज्वालामुखीच्या उद्रेकातून निर्माण झालेल्या काळ्या कभिन्न कातळ भिंती, कोकणच्या दिशेने पाहिल्यावर दिसणाऱ्या अजस्त्र कड्यांची रांग.. देशावर आपल्या अनेक शाखा पसरवत जाणारे डोंगर.. असंख्य, आकार प्रकारची गिरिशिखरे आणि त्यावर बांधलेले किल्ले.
होय ना.. ?
या विशिष्ठ आकाराच्या गिरिशिखरांमुळेच आपल्याला एकदा पाहिलेला किल्ला कसाही कुठूनही पाहिल्यावर लक्षात येतो. राजगडाचा बालेकिल्ला, जावळीच्या जंगलातून वर उठून आलेला संपूर्ण रायगड, तोरण्याची बुधला.. देश-पठाराच्या क्षितिज रेषेतून डोकावणारा लिंगाणा... नाणेघाट.. मोरोशीचा भैरवगड..
अश्याच अनेक रचना अगदी दाटीवाटीने उभ्या आहेत त्या खासकरून नाशिकमध्ये. त्यातलाच एक किल्ला म्हणजे धोडप.. इथला इखाऱ्याचा सुळका म्हणजे प्रस्तरारोहकांसाठी एक आव्हानच.. आणि इतरांसाठी एक आकर्षण आहे.. आदिलशाही, मोगलाई, पेशवाईच्या इतिहासाचा साक्षीदार असलेला हा किल्ला आपल्या अंगावर काही सुंदर कातळशिल्प लेवून उभा ठाकलेला आहे. चहुबाजूंच्या गावांमधून वेगवेगळा भासणार हा किल्ला एकदा तरी नक्कीच पाहायला हवा.. याचं सूर्य क्षितिजावर असतानाचं दृश्य तर केवळ अप्रतिमच..

Sahyadri, the word itself helps us to visualize it's volcanic rock walls, when we see them from Konkan side, the height of these walls would amuse us, on the eastern side, it has spread in multiple branches consisting some unique features at various places. the peaks and features of the hills have helped the rulers to build forts according to the needs throughout the Historic times.
All these features of the hills help us identify the forts just by looking at them from distance. Just try to visualize multiple forts like the Citadel of Rajgad, Raigad fort raised out of the Thick forest of Javali, Torna with it's Budhla Machi, Nanacha angtha, Lingana pinnacle raising their heads out of the Horizon, Bhairvgad... many of them can be visualised by their shapes.
A lot of such feature full peaks and forts can be seen in Nashik. One of them is, Dhodap Fort. It's Pinnacle is not only a mission for climbers, but it also amuses hikers and other visitors too.
The Fort has witnessed a lot of History from Adlishaha, Mughuals & Peshwa times too. It has many unique attractive structures which are worth visiting once.

किल्ला म्हणजे काय? चार भिंती, दहा देवड्या, दोन दरवाजे, ५-७ बुरुज...? नव्हे... किल्ला बांधायचा म्हणजे त्याचंही शास्त्र आह...
14/12/2019

किल्ला म्हणजे काय? चार भिंती, दहा देवड्या, दोन दरवाजे, ५-७ बुरुज...? नव्हे... किल्ला बांधायचा म्हणजे त्याचंही शास्त्र आहेच की... म्हणजे, तो कुठे बांधायचा, कोणतं साहित्य वापरायचं.. कुठे दरवाजा हवा, कुठे बुरुज हवा.. आसपासचा परिसर काय, जागा जमिनीवर, पाण्यात, डोंगरात, जंगलात, वाळवंट यापैकी नक्की कुठे आहे... कितीतरी गोष्टी असतात किल्ला बांधायचा म्हटल्यावर.. आणि इतिहास काळात आपल्या सह्याद्रीत कित्येक किल्ले बांधून ठेवलेत विविध राज्यकर्त्यांनी. अगदी सातवाहन काळापासून ते इंग्रजांच्या काळापर्यंत.. त्यातून शिवशाहीत बांधलेले किल्ले ही तर अभ्यासण्यासाठीची पर्वणीची ठिकाणे.
या किल्ल्यांबद्दल टप्प्य्टप्प्यात बोलूच आपण. आज बोलूयात दरवाजाबद्दल. किल्ल्यात शिरायचं म्हटल्यावर त्याला दरवाजा आलाच की.. मग तो राजमार्गावरचा असो किंवा सगळ्यांची नजर चुकवत वापरला जाणारा चोर दरवाजा असो... दरवाजांच्या बांधणीचे अनेक प्रकार आहेत. त्यातलाच एक म्हणजे गोमुखी दरवाजा.. या पद्धतीचा उपयोग शिवकाळात बऱ्याच प्रमाणात झाला.. अर्थात, त्याच्या आधी आणि नंतर सुद्धा अशी कामं झालीच म्हणा... हे दरवाजे म्हणजे, बाहेरुन अजिबात ना दिसणारे, तटबंदीत अगदीच बेमालूम जागी बांधलेले असतात. गडाकडे जाणाऱ्या वाटेवर गेलं की कुठल्यातरी बुरजाआडून तटबंदीत शिरल्यासारखी वाट आपल्याला घेऊन जाते एका वळणदार वाटेवर.. दोन्ही बाजूनी तटबंदी, मागे उतार समोर वळत जाणारी फरसबंदी वाट आपल्याला मग अचानकच समोर एका दारापाशी नेऊन ठेवते. अश्या प्रकारचे दरवाजे, राजगड, रायगड, तोरणा, जीवधन अश्या कैक किल्ल्यांवर दिसतात. इथे आलं की न सांगताच लक्षात येतं, आपल्यावर चहूबाजूंनी नजर ठेवली जातीय. त्यातून निमुळती वाट, वळणदार वाट.. म्हणजे मोठ्या संख्येने हल्ला केवळ अशक्यच...
अश्या काही दरवाजांबद्दल तुम्हाला माहिती असेलच ना.. सांगा की मग.. कुठे पाहिलाय असा दरवाजा?
(छायाचित्रातील दरवाजा जीवधन वर आहे. यात उजव्या बाजूला दरवाजा आणि समोरच्या चिंचोळ्या वाटेने खाली पायथ्याला जाणारी वाट आहे.)

What's a fort? Four walls, some Gun holes, couple of gates and a few bastians? Not really... There is obviously some science, architecture behind it. Some reason for everything they do, everything they bulid. Like, where to build the gates, walls, bastian, what material to use, how to utilize space, resources available. They also consider the geography, hills, land, water, jungle and a lot of factors do matter.
Mumerous such forts have been built throughout the History of Sahyadrian Region and we can actually categorize the work on the basis of their rulers as the architecture and engineering used for the places kept on evolving with time. Hence, we have a lot to explore and study about.
Today, we talk about gates. There are many types of gates built on a fort in history... let they be the main and huge gates or small doors to escape in emergency situations. One of them is hidden gates named 'gaumukhi'.
These gates are built in such a way that no one can actually see them from outside. A narrow path leading to the fort takes us to the gate through a narrow gully of fortified walls and that to curves through these walls to show us the main gate. The u turn, small space, makes it impossible to attack with a big group. And the attacker would.also come in the range of the fortified walls from both sides. Such an amazing thought, isn't it?
Rajgad, Raigad, Torna, Jivdhan has such hidden gates and they are a subject to study for their strategic designs.

International Mountain Dayआज आंतरराष्ट्रीय पर्वत/डोंगर दिवस आहे. दरवर्षी हा दिवस 11 डिसेंबर रोजी साजरा केला जातो.यंदाची ...
11/12/2019

International Mountain Day

आज आंतरराष्ट्रीय पर्वत/डोंगर दिवस आहे. दरवर्षी हा दिवस 11 डिसेंबर रोजी साजरा केला जातो.

यंदाची या दिवसाची 'mountains matter for youth' अशी आहे

डोंगर/पर्वत यांचा आपल्यावर, निसर्गावर मोठा प्रभाव असतो. यांच्या असण्या-नसण्यामुळे निसर्गातली विविध चक्रे तयार होतात. त्यामुळे डोंगरांकडे, लक्ष देणं गरजेचं आहे. आणि या सगळ्यात महत्वाची भूमिका पार पाडू शकते ती तरुणाई. कारण, कोणत्याही परिवर्तनात सर्वात पुढे तरुणाईच असते आणि अशी अनेक परिवर्तने तरुणाईने इतिहासात घडवून आणलेली आहेत. म्हणूनच आपण भटक्यांनी या गोष्टीत आपल्याला जमेल तेवढा पुढाकार घेणं फार गरजेचं आहे.

डोंगरांचं महत्व आपल्याला त्यांच्या गोड्या पाण्याचे, स्वछ ऊर्जा, अन्न इत्यादी महत्त्वपूर्ण गोष्टींच्या निर्मितीमधील त्यांचं योगदान पाहून लक्षात येतं. याविषयी लोकांना जागरूक करणं ही काळाची गरज आहे.

डोंगर, त्यांच्या दऱ्या -खोऱ्यात राहणारी म्हणझे, त्यांची जीवनशैली, त्यांची संस्कृती, तिथली जैवविविधता असं सगळंच फार महत्वाचं आहे आणि ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवणं हे आपलं काम आहे. या भागांमध्ये स्थानिक पातळीवर जर रोजगार, बऱ्यापैकी गुंतवणूक, संशोधन वगैरे करता आलं तर इथून ' चांगल्या जीवनशैली 'च्या शोधात, डोंगरांतून, गावांमधून बाहेर पडून शहराकडे येणार ओघ थांबवता येईल.
कारण, पर्वतांपासून स्थलांतर केल्याने शेती, जमिनीची विटंबना आणि सांस्कृतिक मूल्ये आणि पुरातन परंपरा नष्ट होतात. शिक्षण आणि प्रशिक्षण, बाजारपेठ प्रवेश, रोजगाराच्या विविध संधी आणि चांगल्या सार्वजनिक सेवा यामुळे पर्वतावरील तरुणांचे उज्ज्वल भविष्य सुनिश्चित होऊ शकते.

यात आपण काय काय करू शकतो याचा विचार करुन त्यावर अंमलबजावणी करणं गरजेचं आहे.

तर भटक्या मित्र-मैत्रिणींनो, तुम्हाला असं काही सुचत असेल तर नक्की कळवा.

‘Mountains matter for Youth’ is the theme of this year’s International Mountain Day, which is celebrated on 11 December.

Young people are active agents of change and the future leaders of tomorrow. They are custodians of mountains and of their natural resources, which are being threatened by climate change.

The 2019 International Mountain Day’s theme is a great opportunity for young generations to take the lead and request that mountains and mountain peoples become central in the national and international development agendas, receive more attention, investments and tailored research.

The day will also be an occasion to educate children about the role that mountains play in supporting billions up and downstream – by providing freshwater, clean energy, food and recreation.

International Mountain Day is a chance to highlight that for rural youth, living in the mountains can be hard. Many young people leave in search of a better life and employment. Migration from mountains leads to abandoned agriculture, land degradation and a loss of cultural values and ancient traditions. Education and training, market access, diverse employment opportunities and good public services can ensure a brighter future for young people in the mountains.

Address

NH 66
Khed
415709

Telephone

9850887432

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kasba Natu posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Nearby travel agencies

Other Tourist Information Centers in Khed

Show All