!! आठवणींनी समृद्ध व्हा !!
तप्त मातीला आणि मनाला,
गारवा देणारा पहिला पाऊस!
ओसाड भकास सृष्टीला,
हिरवा करणारा पहिला पाऊस!
अल्लड मुलांना अन् साऱ्यांनाच,
चिंब करणारा पहिला पाऊस!!
मतलबी व स्वार्थी स्पर्धेच्या जगापासुन वेगळे होऊन फक्त निसर्गाच्या
वाटेवर चालण्यासाठी ऐक पाऊल म्हणजे " आजोळ अ़ग्रो टुरिझम" होय.
#आजोळ#फील statisfied#
#सेंद्रीयशेती #Organic_farming #गोशाळा #Tour #OneDayPicnic
#Birthday_Celebration #Marriage_ceremony
#Aajolagrotourism #tourism #agrotourism #vikramgad #peace #happylife #onedaypicnic #ladiespsecial #familyspecial #family #picnicnearmumbai# #viilagelife #feelhappy #nature #naturalenvironment #natureloversplace
रोज रोज तेच रुटिन,
थोड वेगळ
जगुन तर बघा...,,,
मनाची मरगळघालवण्यासाठी
ऐकदा आजोळ अँग्रोला
येउन तर बघा.............
#आजोळ#फील statisfied#
#सेंद्रीयशेती #Organic_farming #गोशाळा #Tour #OneDayPicnic
#Birthday_Celebration #Marriage_ceremony
#Aajolagrotourism #tourism #agrotourism #vikramgad #peace #happylife #onedaypicnic #ladiespsecial #familyspecial #family #picnicnearmumbai# #viilagelife #feelhappy #nature #naturalenvironment #natureloversplace
हटके मुसाफिरीचा परिपुर्ण आनंद!!!!
आजोळ
ऐक निसर्गानुभव
# पाऊसधारा #
घुमते शीळ वार्याची
हिरव्या रानारानात
ॠणझूनती पैजने
झाडांच्या पानापानात
डोंगराला मिठी घालूनी
नदी वाहते वेगात
हात धरूनी वाऱ्याचा
धरा नाचते तालात
गंध भारलेली धून
रे दाही दिशादिशात
किलबिल पाखरांची
सृष्टीचा कानोकानात
उत्सव रंगारंगांचा
धरतिच्या अंगणात
कोसळती पाऊसधारा
न्हातो मी रे अमृतात
शिवराजे जामोदे कविराज
हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणांच्या मखमलीचे त्या सुंदर मखमली वरती फुलराणी ही खेळत होती.
आजोळ मध्ये आलेले पावसाळी पाव्हणे
album
कीड, किटक व इवलेशे जीव ,,....
मित्रांच्या गेटटुगेदर साठी आपला " फेवरेट" स्पाँट आजोळ
आत भरला कोठुनी हा पावसाळा
झिरपला, खोलात रुजला पावसाळा
टाळले मीही कधी होते सरींना
शोधुनी भिजवून गेला पावसाळा
जन्मभर भिजवायचे होते मनाला
तोकडा वाटयास आला पावसाळा
मी कसा भिजणार हो त्यांच्या तऱ्हेने
वेगळा त्यांचा नि माझा पावसाळा
फक्त हा तेव्हाच होतो रंग हिरवा
नाचतो फांदयांत जेव्हा पावसाळा
जन्म अक्खा कोरडे होता न आले
चिंब सर्वांगात भिनला पावसाळा
केस पिंजारूनही आला कधी तो
वाहते घरदार झाला पावसाळा
हात फैलावू किती तो पांगलेला
बघ पुन्हा हलके निसटला पावसाळा
आनंद पेंढारकर
फांद्यांमध्ये साकळलेले गारठओले पक्षी
वठलेल्या बुंध्यांवर उठली नाजुक हिरवी नक्षी
मधेच येई सर एखादी अकस्मात चालून
छेडुन जाई गात्रांमधुनी मल्हाराची धून
पायाखाली पाचोळ्यातुन उठलेली सरसर
घरात घुसुनी पाणी झाले हाय कुणी बेघर
दूरामध्ये असेल रडला आर्त कुणाचा तान्हा
प्रत्येक कातळाला फुटला शुभ्र दुधाचा पान्हा
झरझर येई दरी चढूनी अवचित मेघ धुक्याचा
कवेत घेता रुजुन शहारा ये साजणस्पर्शाचा
उजाड माळावरी पसरले गर्द कुणी गालिचे ?
गोल ठेंगण्या झुडुपांचे वर झुपके मखमालीचे
एकेक छटा लेऊन उभे डोंगर क्षितिजापाशी
रांगेत उभे प्रार्थनेतुनी बोलत आकाशाशी
देहाशी घेतली फारकत घडू नये ते घडले
मी परतीच्या वाटेवर, मन आंबोलीतच उरले
आनंद पेंढारकर
भिरभिरले हे मन,
फुलपाखरु होउन!
कुणाच्या शोधात,
नकळे आतले आत!
फुलपाखरु शोधतय फुल,
गंध चाखायला!
मन झाले हे बावरे,
गुंतुन पडायला!
टिप टिप पाऊस
झो झो वारा
गीत गाऊ पाहतो.
आसमंत सारा
कडाडणारी वीज
गडगडणारे ढग
धावण्यार्या छत्रीतली
आपली लगबग
डराव् डराव् बेडकं
छम छम तळे
लेझीम हाती घेऊनी जणू
थेंब लाटेवर पळे
खळ खळ झरा
तड तड पत्रा
पावसाने भरवली बघा
ताला सुरांची जत्रा
©p