15/11/2021
धुक्याने पांघरलेली दुलई, आकाशातून अगदी जमिनीवर उतरलेले ढग, गुलाबी थंडी, पक्षांची किलबिल अन हातात वाफाळता चहा!!!!
हे नयनरम्य दृश्य आहे पानशेतच्या एका रिसॉर्टच्या खिडकीमधून दिसणारे. 🌫
श्री.राहुल सर म्हणजे कल्पक, मेहनती, धीरगंभीर व्यक्तिमत्व याची खात्री हे रिसॉर्ट बघूनच पटते की त्यांनी अतिशय कल्पकतेने आणि अभिरुची संपन्नतेने या रिसॉर्ट रचना केली आहे.
ग्राहकांच्या अगदी छोट्या आवश्यकता, सोयी व सुविधा यांचा खूप विचार करून हे रिसॉर्ट उभारलेले आहे आणि याची प्रचिती तिथे हे पाऊल ठेवल्याबरोबर येतेच.
साधारण नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सरांनी त्यांच्या रिसॉर्ट मध्ये लग्नाच्या डेकोरेशन करण्या संबंधित विचारले व स्वानुभव जर्नीज ने हे काम हातात घेतले. प्रथम नेहमीप्रमाणे मेजरमेंट कुठे काय चपखल बसेल याची पहाणी झाली.अत्यंत वाजवी दरात पण तरीही सुबक रेखीव, सुंदर, मनमोहक असे डेकोरेशन करायचे होते. त्यादृष्टीने तयारी सुरू झाली.
आजूबाजूला पानशेत धरणाचे पाणी आणि हिरव्या डोंगरांच्या शालूने नटलेला परिसर, डिसेंबरची हवीहवीशी गुलाबी थंडी अशा ठिकाणचे डेकोरेशन करायचे होते.
उत्साहाने सळसळणारे, हसतमुख व सदा सकारात्मक असणाऱ्या
अभी व कविता👰🤵 या लग्न होणाऱ्या जोडीने त्यांना कशाप्रकारचे डेकोरेशन अपेक्षित आहे ते सांगितले व स्वानुभवाचे काम चालू झाले.
पांढरा रंग व पीच (फिकट केशरी रंग) ही रंग संगती त्यांना सुचवली.
पांढरा रंग शांतता व सौख्य दर्शवतो तर फिकट नारंगी रंग उत्कर्ष व उत्साह दर्शवतो.
सर्वांग सुंदर दिमाखदार आणि सर्वांच मन मोहवणारच नाही तर मनापासून पसंतीची दाद मिळणारा मिळवणारा सेट अप 23 डिसेंबरला साकारला गेला.
1.अगत्याने आणि प्रेमाने स्वागत करणारी कमान प्रवेशद्वारापाशी सुसज्ज!
2.नव्या आयुष्याला सुरुवात करणाऱ्या वधू-वरांची ची नावे त्यांच्या सारखीच विराजमान झाली.
3.नव्या आयुष्याला सुरुवात करणाऱ्या वधू-वरांची ची नावे त्यांच्या सारखीच विराजमान झाली.
4. वधूवरांना आशीर्वाद आणि शुभेच्छा देणाऱ्या आप्त स्वकीय मित्र मैत्रिणी यांची आसन व्यवस्था करणारा मोठा मांडव.
5.आपल्या संस्कृतीला जपणारे मांगल्य आणि पावित्र्य जपणारे विधी जिथे होणार तो विधी मंडप🌸🌸🌸
आजच्या कठीण परिस्थितीत सुद्धा अतिशय वाजवी दरात, तुम्हाला हवी तशी किंवा आमच्या कल्पनेने नटलेली आकर्षक सजावट असो की रुचकर ,स्वादिष्ट स्वच्छ केटरिंग व्यवस्था असो ,स्वानुभव जर्नीज नेहमीच तत्पर आहे जबाबदारी स्वीकारायला.
एवढेच नाही तर तुमच्या सर्व सोहळ्यांचे सर्व सुंदर क्षण टिपण्यासाठी अनुभवी असे फोटोग्राफर सुद्धा आमच्या टीम मध्ये आहेत सोबतचा फोटो पाहून नक्कीच खात्री पटेल.
कोणताही सोहळा साज शृंगार शिवाय पार पडत नाही तुम्हा सर्वांना छान सजवण्याची जबाबदारी सुद्धा स्वानुभव जर्नीज ची टीम उत्तम रित्या पार पाडते.
विवाह समारंभ, असो की किटी पार्टी ,डोहाळ जेवण ,वाढदिवस कोणत्याही छोट्या- मोठ्या समारंभांचे अथपासून इती पर्यंत आयोजन करायचे असेल तर एक समर्पक पर्याय म्हणून स्वानुभव जर्नीज चा विचार नक्की करा!!!
संपर्क क्रमांक - 9850078455/9922033819/9503233819
🌸🌸🌸