Kamalini Kutir

Kamalini Kutir Kamalini Kutir is a splendid spot surrounded by two Historical Forts - Torna & Rajgad. Highly louded
(31)

09/08/2022

Kamalini Kutir warmly greeted and welcomed guests from Israel who visited us through a tour organized by Daffodils Holidays. It was a pleasure to welcome them to our place. A demonstration of Maharashtrian cuisine was specially arranged for the group by Kamalini Kutir. They were very curious and enthusiastic to learn and expand their palate and brush up on their culinary skills at Kamalini. Their passion for Indian cooking and gaining knowhow about the complexity of Maharashtrian cuisine amazed us. They not only learned how to cook Maharashtrian food with the assistance of our chiefs but also well-read how to serve the food in the most traditional way.

http://kamalinikutir.com/
020-24475931 / 9422057389

05/08/2022

आपल्या माणसांनी मनापासून दिलेली कौतुकाची थाप कायमच आपल्यासाठी प्रेरणादायी असते... असेच काहीसे कमलिनी कुटीरबाबत घडले. वालचंद इंजिनिअरिंग कॉलेज, सांगली यांच्या १९८२ च्या बॅचचे रियुनिअन १८-१९ जून दरम्यान कमलिनी कुटीरमध्ये त्या वर्गमित्रांनी आयोजित केले होते. इतक्या वर्षांनी जुन्या आठवणी जाग्या करत मित्रांची मैफल जमली होती... आणि या सुंदर क्षणांना अविस्मरणीय करण्यासाठी कमलिनी कुटीरने त्यांना मनापासून साथ दिली. या सगळ्याची आठवण भेट म्हणून या मित्रांनी आम्हाला ही मानचिन्ह भेट केले.
आपल्या केलेल्या कामाची अशी गोड पोचपावती मिळाली की आपल्याला नक्कीच काम करण्यासाठी उत्साह मिळतो.
या खास भेटीसाठी आणि एकुणच कार्यक्रमात आतिथ्याची संधी दिल्याबद्दल विकास नातू, अविनाश काळकुंद्री आणि शशिकांत क्षीरसागर आणि त्यांच्या मित्रवर्गाचे आम्ही मनापासून आभार मानतो.

http://kamalinikutir.com/
020-24475931 / 9422057389

नवीन पल्लवी वृषलतांची,नवीन आशा नववर्षाची,चंद्रकोरही नवीन दिसते,नवीन घडी ही आनंदाची,गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!    ...
02/04/2022

नवीन पल्लवी वृषलतांची,
नवीन आशा नववर्षाची,
चंद्रकोरही नवीन दिसते,
नवीन घडी ही आनंदाची,
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

माझ्या माहेराची वाटजाते दारी-खोऱ्यातूनवाहे कानिंदी अंगणीकमलिनीच्या दारात...पानामध्ये मऊ भातसंगे तुपाची ही धारलाड माहेराच...
30/03/2022

माझ्या माहेराची वाट
जाते दारी-खोऱ्यातून
वाहे कानिंदी अंगणी
कमलिनीच्या दारात...

पानामध्ये मऊ भात
संगे तुपाची ही धार
लाड माहेराचे देते
जणू भरवते माय...!

सह्यगिरी भाऊ पाठी
सखी कानिंदीची साथ
गोंजरते धरा माय
बापमाणूस आभाळ...!

अशा बहुरंगी रूपा
कमलिनीचा एकोपा
इथे माहेराची सर
सुगरणीचा हा खोपा...!

माहेरची आठवण करून देणाऱ्या तुमच्या लाडक्या कमलिनी कुटीरला नक्कीच भेट द्या,
अधिक माहितीसाठी संपर्क, 094220 57389

http://www.kamalinikutir.com/

24/03/2022

निसर्गाच्या सान्निध्यात असतांना वाऱ्याने सळसळणाऱ्या पानांचा ताल. झुळझुळत्या नदीचे सूर कानात साठवतांना आपल्या आतले संगीत वातावरणात समरसून जाते...
असेच काहीसे कमलिनी कुटीरच्या आवारात असताना पर्यटक 'मीनल दातार' यांच्याबाबतीत झाले. त्यांच्यातील गायिकेने निसर्गातील संगीताला दिलेली ही साथ,
त्या सांजवेळेस खऱ्याअर्थाने सावळ्याच्या वेणूनादाने संगीतमयी झालेल्या गोकुळाप्रमाणेच भासवणारी ठरली...
Video credits Datar & Sruja Datar

जिथे पक्ष्यांना वाटते संगीत द्यावे, नदीला वाटते त्यांना साथ द्यावी, इथला प्रत्येक घटक मिळून जिथे आनंदाची, सकारात्मकतेची ...
22/03/2022

जिथे पक्ष्यांना वाटते संगीत द्यावे, नदीला वाटते त्यांना साथ द्यावी, इथला प्रत्येक घटक मिळून जिथे आनंदाची, सकारात्मकतेची बरसात करतो आणि रंगांची मुक्तहस्ते उधळण होते असा केवळ निसर्गच असतो... अशाच तुमच्या लाडक्या निसर्गरम्य 'कमलिनी कुटीर'तर्फे रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा...!
image credits Rajpathak

तुमच्या आयुष्यातला खास दिवस  आठवणीत राहावेत यासाठीचे परफेक्ट डेस्टिनेशन म्हणजे तुमचे हक्काचे ठिकाण कमलिनी कुटीर...!डेस्ट...
19/03/2022

तुमच्या आयुष्यातला खास दिवस आठवणीत राहावेत यासाठीचे परफेक्ट डेस्टिनेशन म्हणजे तुमचे हक्काचे ठिकाण कमलिनी कुटीर...!
डेस्टिनेशन इव्हेंटसाठी आजच बुकिंग करा.
अधिक माहितीसाठी संपर्क;: 094220 57389

http://www.kamalinikutir.com/
#

आपल्या घरापासून दूर असताना देखील आपल्या परंपरा आणि संस्कृती जपणारेतुमचे हक्काचे ठिकाण कमलिनी कुटीर...!'कमलिनी कुटीर'तर्फ...
17/03/2022

आपल्या घरापासून दूर असताना देखील आपल्या परंपरा आणि संस्कृती जपणारे
तुमचे हक्काचे ठिकाण कमलिनी कुटीर...!
'कमलिनी कुटीर'तर्फे होळीच्या हार्दिक शुभेच्छा...!

सुट्टी म्हटली की सहल ही आलीच...आणि मुक्कामी सहल म्हटलं की आपली सुट्टी खास करणारे असे रिसॉर्ट तर हवेच,यंदाची सुट्टीसाठी क...
15/03/2022

सुट्टी म्हटली की सहल ही आलीच...आणि मुक्कामी सहल म्हटलं की आपली सुट्टी खास करणारे असे रिसॉर्ट तर हवेच,
यंदाची सुट्टीसाठी कमलिनी कुटीरसारख्या प्रशस्त आणि निसर्गरम्य रिसॉर्टवर जाऊया. आणि सहलीचा आनंद द्विगुणित करूया..

http://www.kamalinikutir.com/

जगाची पर्वा न करता नदीत उतरण्याची आणि मनमुराद आनंद घेत डुंबण्याची अनुभूती जिथे घेता येतेअसे तुमचे हक्काचे ठिकाण कमलिनी क...
11/03/2022

जगाची पर्वा न करता नदीत उतरण्याची आणि मनमुराद आनंद घेत डुंबण्याची अनुभूती जिथे घेता येते
असे तुमचे हक्काचे ठिकाण कमलिनी कुटीर...!
अधिक माहितीसाठी संपर्क : 094220 57389

http://www.kamalinikutir.com/

तुझ्या चिंता दूर सारून, तुझ्या छोट्या छोट्या आवडी निवडी आणि इच्छा जपणारे तुझे माहेरघर तुझी वाट पाहत आहे,हे सखी, तुझ्या भ...
08/03/2022

तुझ्या चिंता दूर सारून, तुझ्या छोट्या छोट्या आवडी निवडी आणि इच्छा जपणारे तुझे माहेरघर तुझी वाट पाहत आहे,
हे सखी, तुझ्या भावविश्वाला जपणारे कमलिनी कुटीर तुझी वाट पाहत आहे...!
आजच संपर्क साधा;

http://www.kamalinikutir.com/

तुझ्यातल्या तुला बाहेर येण्यासाठी हात देणारे, तुझ्या मनातले किंतु परंतु दूर सारणारे,तुझ्या माहेराची आठवण देणारे,तुझ्या ह...
07/03/2022

तुझ्यातल्या तुला बाहेर येण्यासाठी हात देणारे, तुझ्या मनातले किंतु परंतु दूर सारणारे,
तुझ्या माहेराची आठवण देणारे,तुझ्या हक्काच्या सगळ्या क्षणांना नव्याने जिवंत करणारे,
तुझे 'मीपण' जपणारे हक्काचे कमलिनी कुटीर तुझी वाट पाहतेय...
http://www.kamalinikutir.com/

1d

तुझ्यातल्या तुला बाहेर येण्यासाठी हात देणारे, तुझ्या मनातले किंतु परंतु दूर सारणारे, तुझ्या माहेराची आठवण देणारे,तुझ्या ...
06/03/2022

तुझ्यातल्या तुला बाहेर येण्यासाठी हात देणारे, तुझ्या मनातले किंतु परंतु दूर सारणारे,
तुझ्या माहेराची आठवण देणारे,तुझ्या हक्काच्या सगळ्या क्षणांना नव्याने जिवंत करणारे,
तुझे 'मीपण' जपणारे हक्काचे कमलिनी कुटीर तुझी वाट पाहतेय...

http://www.kamalinikutir.com/

'व्हॅलेंटाईन डे' म्हणजे प्रत्येक प्रेमी युगुलांसाठीचा खास दिवस. हा प्रेमासाठीचा प्रेमदिवस अधिकच खास करण्यासाठी आपल्या प्...
14/02/2022

'व्हॅलेंटाईन डे' म्हणजे प्रत्येक प्रेमी युगुलांसाठीचा खास दिवस. हा प्रेमासाठीचा प्रेमदिवस अधिकच खास करण्यासाठी
आपल्या प्रिय व्यक्तीला घेऊन जाऊया एका रोमँटिक ठिकाणी, म्हणजेच तुमच्या लाडक्या कमलिनी कुटीरला.
आजच बुकिंग करा,
कारण तुमच्या प्रिय व्यक्तीला घेऊन जायचंय प्रेमाच्या गावा...!

अधिक माहितीसाठी संपर्क : 094220 57389
http://www.kamalinikutir.com/

घराघरात जर कोणी आजारी पडले,कोणी मी डायटवर आहे असे सांगितले किंवा आज काहीतरी हेल्दी करूयात असे म्हटले की प्रत्येकाच्या मु...
08/02/2022

घराघरात जर कोणी आजारी पडले,कोणी मी डायटवर आहे असे सांगितले किंवा आज काहीतरी हेल्दी करूयात असे म्हटले की प्रत्येकाच्या मुखी जिचे नाव येते अशी ती तुमची आमची सगळ्यांची लाडकी नाचणी. मराठीत नाचणी, गुजराती आणि अहिरणीमध्ये नागली हिंदी मध्ये याला रागी म्हटले जाते. तसेच नाचणीला वरई असे देखील म्हटले जाते. खरीप हंगामातील हे पीक. महाराष्ट्र,कर्नाटक,राजस्थान,तामिळनाडू,आंध्र-प्रदेश,ओडिशा,उत्तराखंड, गोवा,बिहार या ठिकाणी नाचणीचे पीक घेतले जाते.
कार्बोहायड्रेट, प्रोटिन्स,फायबर्स, कॅल्शियम,आयर्नयुक्त असणाऱ्या नाचणीपासून वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. नाचणीचे पापड, नाचणीची खिशी,नाचणीचे लाडू आणि आजकाल ह्या नाचणीपासून वेफर्स आणि स्टिक्स देखील तयार केले जातात.लहान मुलांना नाचणीचे सत्व देखील दिले जाते. नाचणीची गरमागरम खरपूस भाकरी मात्र जेवणात खास बहार आणते.

कमलिनी कुटिरच्या ग्राहकांना अशा खास पदार्थांचा आस्वाद घेण्याचे भाग्य इथे नक्कीच मिळते. या बहु औषधी अशा खास नाचणीच्या भाकरीचा कमलिनी कुटिरच्या सानिध्यात, निसर्गाचा मनमुराद आनंद घेत आस्वाद घेणे म्हणजे स्वर्गसुखच...!
म्हणूनच कमलिनी कुटीरला जेव्हा केव्हा भेट द्याल तेव्हा किंबहुना खास नाचणीच्या भाकरीचा आस्वाद घेण्यासाठी कमलिनी कुटीरला भेट द्याच.

अथ इति स्वादजिज्ञासा।

http://www.kamalinikutir.com/

094220 57389

दिवसाची सुरुवात आणि शेवट हा एका अर्थी नव्या दिवसाची नांदी आणि सरल्या वर्षाची भैरवी असते.निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या कम...
03/02/2022

दिवसाची सुरुवात आणि शेवट हा एका अर्थी नव्या दिवसाची नांदी आणि सरल्या वर्षाची भैरवी असते.
निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या कमलिनी कुटीरच्या सान्निध्यात सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या रमणीय दृश्याचे
साक्षीदार होण्यासाठी आजच कमलिनी कुटीरशी संपर्क साधा,

अधिक माहितीसाठी संपर्क : 094220 57389

http://www.kamalinikutir.com/

लग्न,मुंज,साखरपुडा असे सोहळे म्हटले की आजकाल सगळ्यात आधी निवड केली जाते ती खास डेस्टिनेशनची. आपल्या आयुष्यातले हे खास क्...
01/02/2022

लग्न,मुंज,साखरपुडा असे सोहळे म्हटले की आजकाल सगळ्यात आधी निवड केली जाते ती खास डेस्टिनेशनची. आपल्या आयुष्यातले हे खास क्षण ज्यांच्यासाठीचा तो सोहळा त्यांच्या, त्या सोहळ्याला आलेल्या आपल्या आपुलकीच्या माणसांच्या तिथे उपस्थित प्रत्येकाच्याच आठवणीत रहावेत म्हणून आपण परफेक्ट डेस्टिनेशन निवडणे खुप महत्त्वाचे आहे.
परंतु कोविडच्या प्रादुर्भावाने सध्या याच सगळ्या आनंदावर, उत्साहावर आणि जल्लोषावर सावट आले आहे. पण शासनाने आखून दिलेल्या नियमावलीनुसार कमलिनी कुटीर सर्व खबरदारी घेत तुम्हाला तुमचा खास क्षण जगण्याची आणि आठवणीत जपण्याची संधी देत आहे.
तेव्हा आता तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. आपणही ह्या संधीचा लवकरात लवकर उपभोग घ्यावा.
आजच संपर्क साधा.

अधिक माहितीसाठी संपर्क : 094220 57389

http://www.kamalinikutir.com/

खालील २ पदांसाठी जागा भरणे आहेमहाराष्ट्रीयन कुक (अनुभव किमान 2 वर्षे)किचन सुवरवायझर(अनुभव किमान 3 वर्षे)लोकेशन: वेल्हा त...
28/01/2022

खालील २ पदांसाठी जागा भरणे आहे
महाराष्ट्रीयन कुक (अनुभव किमान 2 वर्षे)
किचन सुवरवायझर(अनुभव किमान 3 वर्षे)
लोकेशन: वेल्हा तालुका

28/01/2022

जागा भरणे आहे
महाराष्ट्रीयन कुक(अनुभव किमान 2 वर्षे)
किचन सुवरवायझर(अनुभव किमान 3 वर्षे)
लोकेशन:वेल्हा तालुका

26/01/2022

असं म्हणतात की आयुष्यातून एकदातरी सगळे टेन्शन्स, सगळे प्रश्न थोडावेळ बाजूला ठेवून तुमच्यासाठी असा वेळ काढून जर तुम्ही बा...
25/01/2022

असं म्हणतात की आयुष्यातून एकदातरी सगळे टेन्शन्स, सगळे प्रश्न थोडावेळ बाजूला ठेवून तुमच्यासाठी असा वेळ काढून जर तुम्ही बाहेर पडलात,
छोट्याश्या सहलीला गेलात की प्रश्नांचा गुंता,हरवलेल्या वाटा सगळं काही सापडायला मदत होते, कारण प्रवास तुमच्या मनाला ताजेतवाने करतो,
तणावाला दूर करत आपल्यात दडलेल्या आपल्यालाच पुन्हा एकदा भेटवतो.
अशात जर तुम्हाला निसर्गाच्या कुशीत वसलेले एखादे हक्काचे ठिकाण हवे असेल तर नक्कीच कमलिनी कुटीरला भेट द्या,
अधिक माहितीसाठी संपर्क;

सगळ्या प्रवासप्रेमींना 'पर्यटन दिना'च्या कमलिनी कुटीरतर्फे हार्दिक शुभेच्छा...!

अधिक माहितीसाठी संपर्क : 094220 57389
http://www.kamalinikutir.com/

लग्न,मुंज,साखरपुडा असे खास सोहळे आयुष्यभर खास रहावे, आठवणींच्या कुपीत त्यांचे स्थान विशेष असावे असे प्रत्येकालाच वाटत अस...
18/01/2022

लग्न,मुंज,साखरपुडा असे खास सोहळे आयुष्यभर खास रहावे, आठवणींच्या कुपीत त्यांचे स्थान विशेष असावे असे प्रत्येकालाच वाटत असते.
परंतु कोविडच्या प्रादुर्भावाने सध्या याच सगळ्या आनंदावर, उत्साहावर आणि जल्लोषावर सावट आले आहे. पण शासनाने आखून दिलेल्या नियमावलीनुसार कमलिनी कुटीर सर्व खबरदारी घेत तुम्हाला तुमचा खास क्षण जगण्याची आणि आठवणीत जपण्याची संधी देत आहे.
सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करीत डेस्टिनेशन इव्हेंट साजरे करण्याची इच्छा असल्यास आजच संपर्क साधा ;

अधिक माहितीसाठी संपर्क : 094220 57389

http://www.kamalinikutir.com/

सणवार आले की जिला सगळ्यात जास्त महत्त्व असते अशी पण तरीही तिच्या नावाने नाके मुरडली जातात अशी भाजी म्हणजे अळू. अळू हा कु...
12/01/2022

सणवार आले की जिला सगळ्यात जास्त महत्त्व असते अशी पण तरीही तिच्या नावाने नाके मुरडली जातात अशी भाजी म्हणजे अळू.
अळू हा कुठेही उगवतो,त्याला खास अशी काही प्रक्रिया करावी लागत नाही. पाणथळ जागी अळू चांगला येतो.त्याची कधी शेती केल्याचे मात्र विशेष ऐकीवात नाही. सहज आणि अगदी परसदारीच उपलब्ध होत असल्याने बहुधा पूर्वापार ह्या भाजीला वेळोवेळी जेवणात महत्त्वाचे स्थान असावे.
श्रावण महिन्यात आणि बहुतांश वेळा कुलधर्म कुळाचाराच्या जेवणात अळू वापरलाच जातो. ज्यांना अळूचे महत्त्‍व माहिती आहे, ते मात्र चवीने खातात. पावसाळ्यात सहज उपलब्ध होणारा औषधी अळूचा आहारात वापर करावा.अळूच्या वड्या आणि भाजी हे पदार्थ खास करून तयार केले जातात. काही ठराविक भागात अळूच्या पातळ भाजीला 'अळूचे फदफदे' असे देखील म्हणतात.

अळूच्या कंदात कर्बोदके २१ % , प्रथिने ३%, कॅल्शियम, लोह असते. पानात आणि देठात अ, ब, क जीवनसत्त्वे, कॅरोटीन, लोह असते. कंदातील रस रेचक असतो. अळू बीटा कॅरोटिन, फॉलेट, रिबोफ्लोवीन, थायमिनने समृद्ध आहे. अळूत झिंक, मॅग्नेशियम, कॉपर, आयर्न, पोटॅशियमही असते.
अशा ह्या अळूला बेसन,चिंच आणि तिखट मिठाची साथ मिळताच तयार होणाऱ्या अळू वड्या ह्या महाराष्ट्रीय पारंपरिक पदार्थांपैकी एक आहेत.

कमलिनी कुटिरच्या ग्राहकांना अशा खास पदार्थांचा आस्वाद घेण्याचे भाग्य इथे नक्कीच मिळते. या बहु औषधी अशा खास अळू वडीचा कमलिनी कुटिरच्या सानिध्यात, निसर्गाचा मनमुराद आनंद घेत आस्वाद घेणे म्हणजे स्वर्गसुखच...!
म्हणूनच कमलिनी कुटीरला जेव्हा केव्हा भेट द्याल तेव्हा किंबहुना खास नाचणीच्या भाकरीचा आस्वाद घेण्यासाठी कमलिनी कुटीरला भेट द्याच.
अथ इति स्वादजिज्ञासा।

http://www.kamalinikutir.com/

आजचा तरुण हा उद्याच्या उज्ज्वल भारताचा खरा शिल्पकार आहे हे ओळखून विवेकानंदानी तरुणाईला कायमच ज्ञानोपासनेसाठी प्रोत्साहित...
12/01/2022

आजचा तरुण हा उद्याच्या उज्ज्वल भारताचा खरा शिल्पकार आहे हे ओळखून विवेकानंदानी तरुणाईला कायमच ज्ञानोपासनेसाठी प्रोत्साहित केले. आज १२ जानेवारी म्हणजे स्वामी विवेकानंदांची जयंती. आजचा दिवस 'जागतिक युवा दिन' म्हणून साजरा केला जातो.
कमलिनी कुटीरतर्फे उद्याच्या शिल्पकारांना, युवकांना मनापासून शुभेच्छा…!

अधिक माहितीसाठी संपर्क : 094220 57389

http://www.kamalinikutir.com/

निसर्गप्रेमी लोकांचे सगळ्यात आवडते काम म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात जास्तीत जास्त काळ घालवणे.अशाच निसर्गप्रेमी मित्रां...
07/01/2022

निसर्गप्रेमी लोकांचे सगळ्यात आवडते काम म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात जास्तीत जास्त काळ घालवणे.
अशाच निसर्गप्रेमी मित्रांसाठी कमलिनी कुटीर अत्यंत महत्त्वाचे आणि त्यांच्या आनंदाला पूरक असे पर्यटन स्थळ आहे.
जवळच वाहणारी कानिंदी नदी, आजूबाजूला उभे असणारे सह्याद्रीचे खंदे शिलेदार अशा निसर्गरम्य वातावरणात
८० हुन अधिक भिन्नभिन्न प्रजातीचे पक्षी सापडतात.
खास बर्ड वॉचिंगसाठी यायला सध्याचा काळ आणि हे ठिकाण दोन्हीही गोष्टी एकमेकांस पूरक आहेत. तेव्हा आजच कमलिनी कुटीरच्या वेबसाईटला भेट द्या.
पक्ष्यांच्या आनंदमयी आणि सकारात्मक किलबिलाटात रममाण होण्याची संधी दवडू नका.
अधिक माहितीसाठी संपर्क : 094220 57389
http://www.kamalinikutir.com/

यंदाच्या मकर संक्रांतीला खास करण्यासाठी कमलिनी कुटीरने आयोजित केलेल्या पतंग सोहळ्याला ग्राहकांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे...
05/01/2022

यंदाच्या मकर संक्रांतीला खास करण्यासाठी कमलिनी कुटीरने आयोजित केलेल्या पतंग सोहळ्याला ग्राहकांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे.
रंगीबेरंगी पतंगांनी कमलिनी कुटीरचे आकाश बहरून आले आहे.
अजूनही हा महोत्सव चालू आहे, ज्यांना ह्या अद्वितीय सोहळ्यात सहभागी व्हायचे असेल त्यांनी लगेच खालील क्रमांकावर संपर्क करा.
आणि तुमचीही संक्रांत अविस्मरणीय होऊ द्या...!
कालावधी : १० जानेवारी ते १६ जानेवारी २०२२
वेळ : सकाळी ९ ते सायंकाळी ५
दर : केवळ ९०० ₹ प्रति
Includes – न्याहारी, चहा-कॉफी,सरबत,दुपारचे जेवण(गोड पदार्थासह), दुपारचा चहा/कॉफी,बिस्किट
*पतंग व मांजा रीळ कमलिनी कुटीरकडून पुरवले जाईल.

अधिक माहितीसाठी संपर्क :094220 57389

http://www.kamalinikutir.com/

गतवर्षीच्या सगळ्या क्षणांना आठवण स्वरूपात कायमस्वरूपी बंदिस्त करत नव्या येणाऱ्या वर्षाचे दिलखुलास स्वागत करूया. आणि नवीन...
01/01/2022

गतवर्षीच्या सगळ्या क्षणांना आठवण स्वरूपात कायमस्वरूपी बंदिस्त करत नव्या येणाऱ्या वर्षाचे दिलखुलास स्वागत करूया.
आणि नवीन सुखद आठवणी तयार करूया...
सर्व ग्राहकांना नववर्षाच्या कमलिनी कुटिरतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा...!

http://www.kamalinikutir.com/

094220 57389

May the spirit of Christmas bring you peace. The gladness of Christmas gives you hope and the warmness of the festive gr...
25/12/2021

May the spirit of Christmas bring you peace. The gladness of Christmas gives you hope and the warmness of the festive grant you love. In the prettiest of seasons, hope you find many reasons for happiness. Christmas carols and silver bells along with the precious gifts endowed upon, by loved ones, remain in your hearts throughout years to come. May your holidays and new year be bursting with well-being, affluence, and cheeriness, altogether.

http://www.kamalinikutir.com/

094220 57389

Address

At Khariv, Velha
Pune
412212

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kamalini Kutir posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Kamalini Kutir:

Videos

Share


Other Vacation Home Rental in Pune

Show All