20/10/2022
*दाजीपूरच्या जंगल सफारी करण्याचा प्लॅन करताय; आधी हे वाचाच!*
सर्वात प्रथम राधानगरी अभ्यारण्यामध्ये दाजीपूर जंगल सफारी हि एकमेव 45 km ची कच्चा रस्त्यावरून करायची सफारी आहे.राधानगरी वरून 4 ते 5 तास व दाजीपूर मधून 3 ते 4 तास लागतात दोन्ही ठिकाणावरून एकच जंगल सफर करता येते पण राधानगरी व दाजीपूर येथील गाडे भाडे मध्ये फरक आहे. सफारीचा संपूर्ण रस्ता मातीचा असलेमुळे धूळ, खडे याचा वयोवृद्ध व लहान मुलांना थोडा त्रास होतो. सदाहरित जंगल प्रकारात येथील जंगल येते त्यामुळे दाट व खुरट्या झाडांचे जंगल आहे.
कारवी वनस्पतीच्या वाढीमुळे तसेच गवताळ कुरणांची क्षेत्र कमी असलेमुळे राधानगरी दाजीपूर जंगलात प्राणी दिसण्याचे प्रमाण नगण्य आहे. त्यामुळे तुम्ही फक्त प्राणी(वाघ,गवा, हरीण)पाहायला म्हणून जाणार असाल तर तुमची घोर निराशा होऊ शकते.
असे असताना जंगलात पाहण्यासारखे काय आहे?
राधानगरी चे जंगल हे जैवविधतेचे भांडार आहे, येथे पक्षी,फुलपाखरू,सरपटणारे प्राणी पासून वनस्पती ची खूप विविधता आहे. युनेस्को ने या क्षेत्राला जागतिक नैसर्गिक समृद्ध प्रदेश म्हणून मान्यता दिली आहे. येथील जंगलात तुम्हाला गाडीतून फिरून जंगल नाही समजून घेता येत ट्रेकिंग करत,पायी फिरून हे जंगल समजून घेतले पाहिजे यासाठी आपल्या सोबत हवा एक स्थानिक चा माहिती असलेला प्रशिक्षित गाईड..
हा गाईड तुम्हाला वनस्पती पासून साप, बेडूक ते फुलपाखरू मधमाश्या पर्यंत वेगवेगळे प्रकार दाखवतो. फक्त राधानगरी परिसरातच आढळणाऱ्या काही औषधी वनस्पती, पक्षी बद्दल विस्तृत माहिती देतो.एवढेच नाही तर राधानगरी दाजीपूर भागातील वेगवेगळे ठिकाण,पक्षी निरीक्षण,फुलपाखरू उद्यान, सूर्योदय, सूर्यास्त, धरण, धबधबे,ट्रेकिंग,देवराया च्या वाटा दाखवतो. आपली राहण्याची, खाण्याची आणि फिरण्याची सगळी व्यवस्था करतो.
यावर्षी आमची राधानगरीच्या सफारी मध्ये एक हि प्राणी आम्हाला दिसला नाही पण आमच्या सेवेत असणारे आमचे गाईड सम्राट यांनी आम्हाला जंगल व जंगलातील जैवविविधता दाखवून आमची सफारी संस्मरणीय केली.
आपल्या सेवेसाठी राधानगरी मध्ये गेले 10 वर्षाहुन जास्त वेळ वन्यजीव पर्यटन क्षेत्रात काम करणारे सम्राट केरकर आपली राधानगरी अभयारण्य सफारी सुलभ करून देतात.सम्राट केरकर यांनी राधानगरी येथे बायसन नेचर क्लब या वन्यजीव संवर्धन पर्यटन संस्थेची स्थापना केली आहे. महाराष्ट्रातील पहिला फुलपाखरू महोत्सव असो वा राधानगरी पर्यटनात लोकप्रिय असलेला काजवा महोत्सव हा त्यांच्याच कल्पनेतून सुरु झाला आहे. ते स्वतः सर्व पर्यटकांची राहण्याची भोजन व जंगल सफारी, ट्रेकिंग ची सोय करून देतात. त्यामुळे आपण राधानगरी ला भेट देणार असाल तर नक्की सम्राट केरकर यांच्याशी संपर्क करा.त्याचा संपर्क नंबर हि देत आहे. राधानगरी ची आपली सहल अविस्मरणीय व आनंददायी करण्यासाठी त्यांची आपणास मदतच होईल.
सम्राट केरकर - 9604113743 , 9421174337