02/04/2022
“माहेर” Home stay
पत्ता: काळकावाडी (कालीकावाडी), आडिवरे.
पावस पासून 20 किलोमीटर दक्षिणेला, रत्नागिरीपासून ३६ किलोमीटर दक्षिणेला, राजापुरपासून २५ किलोमीटर पश्चिमेला.
एकट्या दुकट्या स्त्रियांनाही रहायला अत्यंत सुरक्षित
एकूण उपलब्ध जागा: १४४ वर्ग फुट आकाराच्या दोन खोल्या, दोन्हीत डबल बेड. खोल्या मोठ्या असल्याने तिसरा माणूसही सामावून घेणे सहज शक्य. सध्यातरी वातानुकूलन नाही. आधुनिक सोयींनी युक्त.
प्रत्येक खोलीला स्वतंत्र पाश्चिमात्य पद्धतीचे स्वच्छतागृह.
फावल्या वेळात वाचनासाठी छोटेखानी पुस्तकालय.
रात्री प्रकाश प्रदूषण रहित ताऱ्यांनी भरलेले आकाश
कोणास अधिक दिवस राहून स्वत:चा स्वयंपाक स्वत: करून रहावयाचे असेल तर स्वतंत्र स्वयंपाकघर उपलब्ध. स्वयंपाकघरात सर्वसाधारण भांडीकुंडी, gas, मिक्सर, मायक्रोवेव्ह ओव्हन, रेफ्रीजरेटर.स्वैपाक करायचा नसल्यास घरगुती शुद्ध शाकाहारी जेवणाची व्यवस्था.
कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन उपलब्ध
शॉवरसहित २४ तास गरम पाणी उपलब्ध (सोलर)
बाहेर पडवी, पडवीत झोपाळा. आसमंतात भरपूर पक्ष्यांचा वावर.
आसपासची प्रेक्षणीय स्थळे:
वेत्ये समुद्र किनारा ३.५ किलोमीटर, महाकाली मंदिर आडिवरे, कशेळीचे १००० वर्षे पुरातन कनकादित्य मंदिर, देवघळी किनारा, गावखडी किनारा आणि तेथील कासव संवर्धन केंद्र, पूर्णगड किल्ला, विजयदुर्ग, आंबोळगड्चा खास करून पावसाळ्यात पहायचा अनोखा समुद्र किनारा, पावस स्वरूपानंद आश्रम. धूतपापेश्वर मंदिर राजापूर आणि असंख्य पुरातन मंदिरे, कित्येकांच्या कुलदैवतांची मंदिरे. आसपासच्या खाड्यांमधून होडीतून सफर
आणि बरीच कातळ शिल्पे... कशेळीचे महा कातळशिल्प, बारसू, देवाचे गोठणे, रुंधे, कोट, देवी हसोळ, .... आणि जरा दूरवर उक्षी, जांभरूण, चावे, .......
कोणाला निवांत विश्रांतीसाठी रहायचे असेल तरी सुंदर ठिकाण..
अर्थात जवळचे मित्र मैत्रिणी नातेवाईक सोडून सर्वांना ती सशुल्क असेल.
आसमंतात तुमचे वाहन नसेल तर मी माझ्या वाहनातून तुम्हाला सशुल्क हिंडवू शकतो.
(नियम लागू)
संपर्क:
[email protected]
9850076715, 7498924556