पाऊलखुणा

पाऊलखुणा पाऊलखुणा ... आठवणी निसर्गाच्या!!
(2)

Heavenly AbodeSri Kedarnath DhamCustomized SchedulesAugust to October 2024Details will be declared soon!!🚩🚩🚩🚩🚩
14/03/2024

Heavenly Abode
Sri Kedarnath Dham

Customized Schedules
August to October
2024

Details will be declared soon!!
🚩🚩🚩🚩🚩

हंपीच्या सुप्रसिद्ध विजय विठ्ठल मंदिरातील हा प्रदक्षिणा मार्ग!!वास्तुकलेतील नाजुकता, भव्यता हंपीमध्ये दिसतेच... पण या अच...
10/02/2024

हंपीच्या सुप्रसिद्ध विजय विठ्ठल मंदिरातील हा प्रदक्षिणा मार्ग!!

वास्तुकलेतील नाजुकता, भव्यता हंपीमध्ये दिसतेच... पण या अचाट इमारतीतील असे छुपे सौंदर्य अधिक नजरेत भरते! आणि त्यातीलही प्रकाशयोजना, पाणीव्यवस्था वगैरे बारकावे पाहिल्यानंतर थक्क व्हायला होतं!!

ही हंपी अनुभवा... ' पाऊलखुणा ' सोबत,
आणि गोळा करा तुमच्या #आठवणी_निसर्गाच्या .. आता customised पद्धतीनेही उपलब्ध!!
😊😊😊😊😊

#हंपी #विजयविठ्ठलमंदिर #स्थापत्य #अद्वितीय

आज हंपीची पाऊलखुणातर्फे चौथी सहल पूर्ण झाली.मात्र यंदा एक नवीन जागा पाहता आली.हंपीमध्ये प्रागैतिहासिक खुणा असल्याची माहि...
08/02/2024

आज हंपीची पाऊलखुणातर्फे चौथी सहल पूर्ण झाली.
मात्र यंदा एक नवीन जागा पाहता आली.

हंपीमध्ये प्रागैतिहासिक खुणा असल्याची माहिती होती... यंदा प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला. आणि तो योग Cherry on the Cake ठरला!!
सोबतचे पर्यटक जाम खुश झाले.

#माहितीसाठी
'पाऊलखुणा' हंपीची सहल customised पद्धतीने आयोजित करते.
अवश्य संपर्क करा... आणि गोळा करा...
तुमच्या #आठवणी_निसर्गाच्या !!

#हंपी #प्रागैतिहासिक

श्रीराम - लक्ष्मण किष्किंधेमध्ये पोहोचले. वाली वधानंतर सुग्रीवाचा राज्याभिषेक झाला. पुढे सीतेच्या शोधाची गरज निर्माण झाल...
12/01/2024

श्रीराम - लक्ष्मण किष्किंधेमध्ये पोहोचले. वाली वधानंतर सुग्रीवाचा राज्याभिषेक झाला. पुढे सीतेच्या शोधाची गरज निर्माण झाली... तेव्हा व त्यानंतर सेतूबंधन होईपर्यंत वानरसेनेसोबत व्यूहनीती ठरवण्यासाठी सर्व जण एकत्र जमत असतील, ती जागा म्हणजे ही गुहा!! अशी हंपी-अनेगोंदी परिसरातील लोकांची अचल श्रद्धा आहे!! 😇

अनेगोंदीमधील तुंगभद्रेच्या काठावगत असलेला चिंतामणी टेकडी परिसर एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातो. 😇😇😇

श्रीराम वनगमन मार्ग, चिंतामणी, किष्किंधा 🙏🏼🙏🏼🙏🏼
अनेगोंदी

#आठवणी_निसर्गाच्या #हंपी #अनेगोंदी #रामायण #किष्किंधा

महावीर वानरराज वाली गुंफा 🪨वाली आणि दुंदुभी राक्षस यांच्यामध्ये द्वंद्वयुद्ध झालं. कालांतराने गुहेतून रक्ताचे पाट वाहू ल...
08/01/2024

महावीर वानरराज वाली गुंफा 🪨

वाली आणि दुंदुभी राक्षस यांच्यामध्ये द्वंद्वयुद्ध झालं. कालांतराने गुहेतून रक्ताचे पाट वाहू लागल्याने सुग्रीवाने गुहेचे दार बंद केले. नंतर वाली दुंदुभीचा अंत करून परत आला, आणि त्याने सुग्रीवाला राज्यातून बेदखल केले. पुढे श्रीरामांनी वालीचा वध केला. 😇

हे सगळं ज्या गुहेमध्ये घडलं, ती ही अनेगोंदी जवळील गुहा!! अनेगोंदी म्हणजेच रामायणातील किष्किंधानगरी, अशी सर्वमान्य श्रद्धा आहे. हंपी व परिसर पाहताना हे रामायणाचा संदर्भ देणारे स्थल विशेष आवर्जून पाहावेत, आणि #आठवणी_निसर्गाच्या पुरेपूर गोळा कराव्यात. 😊😊😊

#आठवणी_निसर्गाच्या #हंपी #अनेगोंदी #वालीकोट #रामायण #किष्किंधा

संत पुरंदरदास समाधी, हंपी🙏🏼🙏🏼🙏🏼संत पुरंदरदास हे सम्राट कृष्णदेवराय याच्या काळातील संगीततज्ज्ञ आणि कवी होते. त्यांनी केले...
06/01/2024

संत पुरंदरदास समाधी, हंपी
🙏🏼🙏🏼🙏🏼

संत पुरंदरदास हे सम्राट कृष्णदेवराय याच्या काळातील संगीततज्ज्ञ आणि कवी होते. त्यांनी केलेल्या कन्नड भाषेतील रचना आजही भक्तीने गायल्या जातात. 😊 हंपीतील सुप्रसिद्ध विजय विठ्ठल मंदिराच्या जवळच तुंगभद्रेच्या पात्रात त्यांच्या समाधीचा मंडप आहे. याठिकाणी गेल्यावर अतिशय शांत व प्रसन्न वाटते. 😊

#आठवणी_निसर्गाच्या #हंपी #पुरंदरदास #तुंगभद्रा

हंपी - अनेगोंदी परिसर दर्शन आणि कोरॅकल नौकाविहार हे अविभाज्य समीकरण आहे. 🛶 पण त्या धमाल रोमांचक अनुभवाबरोबरच असा शांत आण...
05/01/2024

हंपी - अनेगोंदी परिसर दर्शन आणि कोरॅकल नौकाविहार हे अविभाज्य समीकरण आहे. 🛶 पण त्या धमाल रोमांचक अनुभवाबरोबरच असा शांत आणि उत्कट अनुभवही त्याच कोरॅकल मध्ये मिळू शकतो. #आठवणी_निसर्गाच्या अशाच तर गोळा करायच्या असतात. 😇 अशी हंपी अनुभवण्यासाठी "पाऊलखुणा" उमटल्या पाहिजेत!! 👣

तलवारीगड्डा फेरी, अनेगोंदी
🛶🛶🛶🛶🛶🛶🛶🛶

#आठवणी_निसर्गाच्या #हंपी #कोरॅकलराईड #तुंगभद्रा

PC : Shreevallabh Sathe

On the occasion of 6th anniversary, We're offering something new!!Collect your memories  #आठवणी_निसर्गाच्या with us!!🎉🙏🏼...
19/11/2023

On the occasion of 6th anniversary,
We're offering something new!!

Collect your memories #आठवणी_निसर्गाच्या with us!!
🎉🙏🏼🎉🙏🏼🎉

Contact anytime!!

६ वा वर्धापनदिन!!आपल्या सर्वांच्या आशिर्वाद आणि पाठिंब्यानेच ही वाटचाल प्रत्यक्षात साकारली!!त्यानिमित्त मनःपूर्वक अभिवाद...
19/11/2023

६ वा वर्धापनदिन!!
आपल्या सर्वांच्या आशिर्वाद आणि पाठिंब्यानेच ही वाटचाल प्रत्यक्षात साकारली!!
त्यानिमित्त मनःपूर्वक अभिवादन!!

🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

#आठवणी_निसर्गाच्या

शुभ दीपावली🪔🪔🪔🪔🪔🪔🪔 #आठवणी_निसर्गाच्या
12/11/2023

शुभ दीपावली
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔

#आठवणी_निसर्गाच्या

जेव्हा रस्त्यावरूनच दूरदर्शन होते तेव्हा..., ते  #रोमांचक असते!! 😇😇😇शैल केदारनाथ, गुप्तकाशीमधून दूरदर्शन!! 🤩🤩🤩When you s...
27/10/2023

जेव्हा रस्त्यावरूनच दूरदर्शन होते तेव्हा..., ते #रोमांचक असते!! 😇😇😇
शैल केदारनाथ, गुप्तकाशीमधून दूरदर्शन!! 🤩🤩🤩
When you see it from far distance..., it is always !! 😇😇😇
Mt. Kedarnath, distant view from Guptkashi!! 🤩🤩🤩

#आठवणी_निसर्गाच्या #केदारनाथधाम #गुप्तकाशी #हिमालय #उत्तराखंड #माऊंटकेदारनाथ .Kedarnath

PC : Shreevallabh Sathe

जय बाबा केदारनाथ की!!🚩🚩🚩🚩🚩🚩🚩सुधारीत कार्यक्रमासह नवीन सहल!!अवश्य संपर्क करा.🤩🤩🤩🤩🤩 #आठवणी_निसर्गाच्या
01/06/2023

जय बाबा केदारनाथ की!!
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

सुधारीत कार्यक्रमासह नवीन सहल!!
अवश्य संपर्क करा.
🤩🤩🤩🤩🤩

#आठवणी_निसर्गाच्या

उन्हाच्या तीव्र लाटेत सर्वसामान्य लोक विश्रांती घेतात. भूगोल अभ्यासक मात्र अशावेळी(ही) प्रत्यक्ष क्षेत्र अभ्यास करणे पसं...
22/04/2023

उन्हाच्या तीव्र लाटेत सर्वसामान्य लोक विश्रांती घेतात. भूगोल अभ्यासक मात्र अशावेळी(ही) प्रत्यक्ष क्षेत्र अभ्यास करणे पसंत करतात. आणि मग निसर्गही त्यांना अशी सुरेख दृश्ये दाखवून सुखद अनुभूती देतो.
#पाऊलखुणा त्यांच्या अशा #आठवणी_निसर्गाच्या गोळा व्हाव्यात म्हणून सदैव तत्पर असते. 😇😇😇
गोव्याच्या ग्रुप सोबत फिरताना मिळालेला सुंदर फोटो!!

#आठवणी_निसर्गाच्या #कोकण #अभ्याससहल #भूगोल #रत्नागिरी #स्थलदर्शन #भौगोलिकपर्यटन

  गोव्यातील केपें गावच्या शासकीय महाविद्यालयातील भूगोल विभागाचे विद्यार्थी रत्नागिरीत अभ्याससहलीसाठी आले होते. त्यांच्या...
16/04/2023



गोव्यातील केपें गावच्या शासकीय महाविद्यालयातील भूगोल विभागाचे विद्यार्थी रत्नागिरीत अभ्याससहलीसाठी आले होते. त्यांच्यासाठी मार्गदर्शक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. कोकणातील भौगोलिक वैशिष्ट्ये मांडता आली, याचे समाधान राहील. त्यानिमित्ताने उजळणीही झाली. 😊
या सहलीच्या दुसर्‍या दिवसाची क्षणचित्रे 😊😊😊

#आठवणी_निसर्गाच्या #कोकण #अभ्याससहल #भूगोल #रत्नागिरी #स्थलदर्शन #भौगोलिकपर्यटन

गोव्यातील केपें गावच्या शासकीय महाविद्यालयातील भूगोल विभागाचे विद्यार्थी रत्नागिरीत अभ्याससहलीसाठी आले होते. त्यांच्यासा...
13/04/2023

गोव्यातील केपें गावच्या शासकीय महाविद्यालयातील भूगोल विभागाचे विद्यार्थी रत्नागिरीत अभ्याससहलीसाठी आले होते. त्यांच्यासाठी मार्गदर्शक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. कोकणातील भौगोलिक वैशिष्ट्ये मांडता आली, याचे समाधान राहील. त्यानिमित्ताने उजळणीही झाली. 😊
या सहलीच्या पहिल्या दिवसाची क्षणचित्रे 😊😊😊

#आठवणी_निसर्गाच्या #कोकण #अभ्याससहल #भूगोल #रत्नागिरी #स्थलदर्शन #भौगोलिकपर्यटन

रत्नागिरीजवळील गांवखडी येथे गेली जवळपास ५ वर्षे ऑलिव्ह रिडले कासवांच्या घरट्यांची देखभाल आणि नवजात पिलांना सुरक्षितपणे स...
03/04/2023

रत्नागिरीजवळील गांवखडी येथे गेली जवळपास ५ वर्षे ऑलिव्ह रिडले कासवांच्या घरट्यांची देखभाल आणि नवजात पिलांना सुरक्षितपणे समुद्रात सोडण्याचे उदात्त कार्य यशस्वीपणे सुरू आहे. आता जवळपास दरदिवशी पिलांचा एकेक गट समुद्रात जायला सुरूवात झाली आहे.
🐢🐢🐢🐢🐢🐢🐢🐢🐢🐢🐢🐢🐢🐢🐢🐢
काल असाच एक गट सोडला, तेव्हा उपस्थित होतो. तेव्हाची क्षणचित्रे #आठवणी_निसर्गाच्या निश्चित गोळा करणारी आहेत. 🤩
या कार्यासाठी अविश्रांत परिश्रम घेणारे श्री.प्रदीप डिंगणकर यांच्याविषयी सार्थ सादर कृतज्ञता मानणे श्रेयस्कर ठरेल!!
🙏🏼🙏🏼🙏🏼

#आठवणी_निसर्गाच्या #ऑलिव्हरिडलेकासव #कासवप्रजननकेंद्र #कोकण #रत्नागिरी #गांवखडी #निसर्गयात्रीरत्नागिरी

PC :

नमस्कार!!*'पाऊलखुणा'* पर्यटकांचे कोकणात सहर्ष स्वागत करीत आहे!!उन्हाळा सुरू होतोय, शाळांनाही सुट्ट्या लागतायत... अशावेळी...
23/03/2023

नमस्कार!!
*'पाऊलखुणा'* पर्यटकांचे कोकणात सहर्ष स्वागत करीत आहे!!

उन्हाळा सुरू होतोय, शाळांनाही सुट्ट्या लागतायत...
अशावेळी या!!
अनुभवा *अल्पपरिचीत कोकण!!*
आणि गोळा करा... तुमच्या * #आठवणी_निसर्गाच्या*!!
🤩🤩🤩

*विशेष आकर्षणे...*
🏝️ अस्पर्शित आणि स्वच्छ समुद्रकिनारे
🏖️ किनार्‍यावरील विस्मयकारक गोष्टी
🛕 शांत आणि प्रसन्न मंदिरे
🏛️ ऐतिहासिक स्मारके आणि किल्ले
🗿 *प्रागैतिहासिक कातळखोदचित्रे*
🥭 कोकणचा रानमेवा

आणि सोबत *अनेक क्रीडाप्रकार आणि मजामस्ती*
🛶🏄🏻‍♂️🏀🏕️🌌

आपल्या मुक्काम आणि खानपानाची विशेष सोय केली जाईल.
तसेच फिरण्यासाठी गाईडही मिळेल!!
🥭🫐🥟🫓🍗🍳🐟🦀🦐

*अवश्य या!!*
संपर्क
*श्रीवल्लभ साठे*
*9975186085*
🙏🏻🙏🏻🙏🏻

22/03/2023
आज रत्नागिरीजवळील नेवरे येथील "कैरी विश्रांती होमस्टे" यांच्याकडे आलेल्या महिला पर्यटकांसाठी विशेष उपक्रम राबविला. पर्यट...
12/03/2023

आज रत्नागिरीजवळील नेवरे येथील "कैरी विश्रांती होमस्टे" यांच्याकडे आलेल्या महिला पर्यटकांसाठी विशेष उपक्रम राबविला. पर्यटकांनीच केलेल्या मागणीनुसार 'काळबादेवी ते गणपतीपुळे' अशी प्रभातफेरीवजा सहल संपन्न झाली. 🤩
काही अंतर पुळणीवरून तर काही रस्त्यावरून याप्रकारे एकूण १५ कि.मी. (अंदाजे) चालणे झाले. त्यानिमित्ताने वेगळ्या प्रकारच्या #आठवणी_निसर्गाच्या गोळा झाल्या. 🤩

#आठवणी_निसर्गाच्या #कोकण #स्थानिकपर्यटन #समुद्रकिनारा #प्रभातफेरी #चांदणेविहार

PC :

नवीन सहल!अवश्य संपर्क करा. 🤩 #आठवणी_निसर्गाच्या
14/12/2022

नवीन सहल!
अवश्य संपर्क करा. 🤩

#आठवणी_निसर्गाच्या

नवीन सहलअवश्य संपर्क करा.New TourDo contact.  #आठवणी_निसर्गाच्या
26/07/2022

नवीन सहल
अवश्य संपर्क करा.

New Tour
Do contact.

#आठवणी_निसर्गाच्या

नवीन सहल!चला ... अवश्य संपर्क करा.New Tour!Let's go... do contact. 🤩🤩🤩🤩🤩🤩 #आठवणी_निसर्गाच्या
10/07/2022

नवीन सहल!
चला ... अवश्य संपर्क करा.

New Tour!
Let's go... do contact.

🤩🤩🤩🤩🤩🤩

#आठवणी_निसर्गाच्या

नवीन सहल!!अवश्य संपर्क करा!! #आठवणी_निसर्गाच्या
04/07/2022

नवीन सहल!!
अवश्य संपर्क करा!!

#आठवणी_निसर्गाच्या

नवी सहल!अवश्य संपर्क करा.New tour!Do contact.  #आठवणी_निसर्गाच्या
21/06/2022

नवी सहल!
अवश्य संपर्क करा.

New tour!
Do contact.

#आठवणी_निसर्गाच्या

06/06/2022
केदारनाथ धाम तीर्थयात्रा यशस्वीरित्या पार पडली.  ऐनवेळी नियोजन बदलावे लागले.पण एकंदरीत अनुभव सुखद ठरला.सविस्तर फोटो लवकर...
29/05/2022

केदारनाथ धाम तीर्थयात्रा यशस्वीरित्या पार पडली. ऐनवेळी नियोजन बदलावे लागले.
पण एकंदरीत अनुभव सुखद ठरला.

सविस्तर फोटो लवकरच!!

#आठवणी_निसर्गाच्या

Address

Thibapalace Road
Ratnagiri
415612

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

919975186085

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when पाऊलखुणा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to पाऊलखुणा:

Videos

Share

Category


Other Tour Agencies in Ratnagiri

Show All