Katwate Tours & Travels

Katwate Tours & Travels Enjoy your trip with katwate tours & travels

अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत, श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराजछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या सर्वशिवभक्तांना ...
19/02/2021

अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत, श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या सर्वशिवभक्तांना भगव्या शिवमय शुभेच्छा

मोदकांचा प्रसाद केला, लाल फुलांचा हार सजवलामखर नटून तयार झाले, वाजत गाजत बाप्पा आलेगुलाल फुले अक्षता उधळे, बाप्पाच्या स्...
15/02/2021

मोदकांचा प्रसाद केला,
लाल फुलांचा हार सजवला
मखर नटून तयार झाले,
वाजत गाजत बाप्पा आले
गुलाल फुले अक्षता उधळे,
बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे,
माघी गणेश जयंती निमित्त मन:पूर्वक शुभेच्छा!
Katwate tours and travels, Satara

महागणपती (रांजणगाव) हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. रांजणगावचे श्री महागणपतीचे मं...
12/02/2021

महागणपती (रांजणगाव) हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. रांजणगावचे श्री महागणपतीचे मंदिर पूर्वाभिमुख असून, मुख्य रस्त्यावर उजवीकडे आहे. दक्षिणायन आणि उत्तरायण यांचा मध्य काळात सूर्याचे किरण मूर्तीवर पडतील, अशी मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण बांधणी केली आहे. मूळ मूर्तीला "महोत्कट' असे नाव असून, तिला दहा सोंडा व वीस हात आहेत, असे म्हणतात, परंतु ती तळघरात ठेवलेली आहेत. येथील पूजेकरिता ठेवलेल्या मूर्तीच्या बाजूला ऋद्धी-सिद्धी आहेत. हा गणपती नवसाला अगदी हमखास पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. पूर्वाभिमुखी असलेले हे मंदिर तसे अगदी साधे-सुधेच होते. परंतु, बदलासह आता मंदिरात आद्ययावत सोयींसुविधा करण्यात आल्या आहेत. मंदिराच्या आसपासच्या सर्व परिसराचे नव्याने सुशोभीकरण करण्यात आले आहे. या मंदिराचा सभामंडप सरदार किबे यांनी, तर गाभारा माधवराव पेशव्यांनी बांधला आहे. बांधकाम करताना उत्तम दिशासाधन साधले असल्यामुळे उत्तरायण आणि दक्षिणायन यांच्या मध्यकाळात सूर्याची प्रकाशकिरणे देखील झळाळत्या सोनेरी तेजाचे आवरण लेऊन महागणपतीच्या पूजेसाठी येतात. अशा वेळी शेंदूर लावलेली महागणपतीची मूर्ती अधिकच आकर्षक भासते. सभामंडपातून आत गेल्यावर गाभाऱ्यात गणेशाची डाव्या सोंडेची आसन घातलेली रेखीव मूर्ती आहे. मूर्तीचे कपाळ रुंद असून दोन्ही बाजूंना ऋद्धी-सिद्धी आहेत. या मूर्तीच्या खालच्या बाजूला तळघर आहे. तळघरात महागणपतीची अजून एक लहान मूर्ती आहे. ही गणपतीची मूळ मूर्ती असून, तिला दहा सोंडा व वीस हात आहेत, असे सांगतात.

विघ्नहर (ओझर) हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे.अष्टविनायकातला सातवा गणपती म्हणजे ओझ...
11/02/2021

विघ्नहर (ओझर) हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे.
अष्टविनायकातला सातवा गणपती म्हणजे ओझरचा विघ्नहर. या गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणूनही ओळखले जाते. विघ्न म्हणजे कार्यात बाधा येणारी बाधा आणि हर म्हणजे दूर करणारा.ओझर मधील श्री विघ्नहर हा अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती आहे.

अष्टविनायकांपैकी एकमेव गणपती असा आहे की, जो गिरी म्हणजे पर्वताच्या सानिध्यात वास्तव्याला आहे. ते स्थान म्हणजे लेण्याद्री...
09/02/2021

अष्टविनायकांपैकी एकमेव गणपती असा आहे की, जो गिरी म्हणजे पर्वताच्या सानिध्यात वास्तव्याला आहे. ते स्थान म्हणजे लेण्याद्री. जुन्नरपासून सात किलोमीटर अंतरावर लेण्याद्रीचा डोंगर आहे. मंदिराच्या पूर्व व पश्चिम बाजूस २८ लेणी आहेत. एकाच मोठ्या आकाराच्या शिळेत मंदिराची लेणी कोरली आहे. लेण्याद्री मंदिर सात क्रमांकाच्या गुहेत असून, तेथे पाषाणात कोरलेली गणपतीची मूर्ती आहे. समोरील सभामंडप ५१ फूट रुंद आणि ५७ फूट लांब आहे. त्याला कोठेही खांबाचा आधार नाही. ही गुहा अशा प्रकारे बनवली आहे की जोपर्यंत आकाशात सूर्य आहे, तोपर्यंतच प्रकाश आत येत राहणार. गुहेत विजेचा एकही बल्ब नाही. जवळपास ३०० पायऱ्या चढून गणपतीच्या दर्शनाला जावे लागते.

चिंतामणी (थेऊर) हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे.गणपतीचे मंदिर हे धरानिधर महाराज दे...
08/02/2021

चिंतामणी (थेऊर) हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे.
गणपतीचे मंदिर हे धरानिधर महाराज देव यांनी बांधले. १०० वर्षांनंतर पेशव्यांनी तेथे भव्य व आकर्षक मंदिर व सभागृह बांधले. हे मंदिर पूर्णपणे लाकडापासून बनवले आहे. त्याकाळी हे मंदिर बांधायला ४० हजार रूपये लागले होते. युरोपीयांकडून पेशव्यांना पितळाच्या दोन मोठ्या घंटा मिळाल्या होत्या. त्यातील एक महाडला असून दुसरी येथे आहे. वयाच्या २७व्या वर्षी माधवराव पेशव्यांना क्षयरोग झाला. तेव्हा त्यांना येथे आणण्या‍त आले. या गणपतीसमोरच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांची पत्‍नी रमाबाई त्यानंतर सती गेल्या. त्यांच्या स्मरणार्थ येथे बाग तयार करण्यात आली आहे. मोरया गोसावी यांना येथेच सिद्धी प्राप्त झाल्याचेही सांगितले जाते.

बल्लाळेश्वर (पाली) हे रायगड जिल्ह्यातील पाली गावातले गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. गणेश पुराणात अष्...
05/02/2021

बल्लाळेश्वर (पाली) हे रायगड जिल्ह्यातील पाली गावातले गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. गणेश पुराणात अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणून पालीचा बल्लाळेश्वरओळखला जातो. अष्टविनायकातला हा एकच असा गणपती आहे की जो भक्ताच्या नावाने (बल्लाळ) प्रसिद्ध आहे. बल्लाळ हा गणपतीचा असीम भक्त होता.
विश्वामित्र ऋषींनी भीमराजास, भृगु ऋषींनी सोमकांत राजास श्री बल्लाळेश्वराची कथा सांगितली असा उल्लेख आहे. तर मुद्गल पुराणात जाजलीने विभांडक ऋषींना श्री बल्लाळविनायकाची कथा सांगितल्याचा उल्लेख आहे. फार प्राचीन काळी, म्हणजे कृतयुगात सिंधू देशातील कोकण पल्लीर नावाच्या गावात (पाली गावात) कल्याण नावाचा एक व्यापारी राहात होता. त्याच्या पत्नीचे नाव इंदुमती. काही दिवसांनी त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव बल्लाळ. बल्लाळ जसजसा मोठा होऊ लागला, तसतसा त्याचा गणेशमूर्तिपूजनाकडे अधिक ओढा दिसू लागला. हळूहळू तो गणेशचिंतनात रमू लागला. त्याच्या मित्रांनाही गणेशभक्तीचे वेड लागले. बल्लाळ आपल्या मित्रांसह रानात जाऊन गणेशमूर्तीचे भजन-पूजन करू लागला. बल्लाळाच्या संगतीने मुले बिघडली अशी ओरड गावात सुरु झाली. लोक कल्याण शेठ्जीकडे जाऊन 'बल्लाळने आमच्या मुलांना बिघडविले' अशी तक्रार करू लागले.
आपला मुलगा इतक्या लहान वयात भक्तिमार्गाला लागला आणि त्याने आपल्याबरोबर इतर मुलांनाही वाईट नादाला लावले या विचाराने कल्याण शेठजींना राग आला. त्या रागाच्या भरातच तो एक भलामोठा सोटा घेऊन बल्लाळ ज्या रानात होता तेथे गेला. तेथे बल्लाळ आपल्या सवंगड्यांसह गणेशमूर्तीची पूजा करीत होता. सारेजण गणेशाचे भजन करीत होते. बल्लाळ गणेशाच्या ध्यानात अगदी रंगून गेला होता. ते पाहून कल्याण शेठजींच्या पायाची आग मस्तकाला गेली. तो ओरडत, शिव्या देतच तेथे धावला. त्याने ती पूजा मोडून टाकली. गणेशाची मूर्ती फेकून दिली. इतर मुले भीतीने पळून गेली; पण बल्लाळ मात्र गणेश ध्यानात मग्न होता. कल्याण शेठजीने बल्लाळास सोट्याने झोडपून काढले. बल्लाळ रक्तबंबाळ झाला, बेशुद्ध पडला; पण कल्याणला त्याची दया आली नाही. त्याने बल्लाळाला तशा अवस्थेच एका झाडाला वेलींनी बांधून ठेवले. कल्याण शेठ रागाने म्हणाला, 'येऊ दे तुझा गणेश आता तुला सोडवायला. घरी आलास तर ठार मारीन, तुझा नि माझा संबंध कायमचा तुटला.' असे म्हणून कल्याण शेठ निघून गेला.
थोड्या वेळाने बल्लाळ भानावर आला. त्याचे शरीर ठणकत होते. तशाच स्थितीत त्याने गणेशाचा धावा केला. ''हे देवा, तू विघ्ननाशक आहेस. तू आपल्या भक्ताची कधीही उपेक्षा करीत नाहीस… ज्याने गणेशमूर्ती फेकली व मला मारले तो आंधळा, बहिरा, मुका व कुष्ठरोगी होईल. आता तुझे चिंतन करीतच मी देहत्याग करीन.'
बल्लाळाचा धावा ऐकून विनायक-गणेश ब्राह्मण रुपात प्रगट झाला. बल्लाळाचे बंध तुटले. त्याचे शरीर होते तसे सुंदर झाले. गणेश बल्लाळाला म्हणाला, ''तुला ज्याने त्रास दिला त्याला याच जन्मी नव्हे तर पुढच्या जन्मीसुद्धा अपार दुःख भोगावे लागेल. तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. तू माझ्या भक्तीचा प्रवर्तक, श्रेष्ठ आचार्य व दीर्घायुषी होशील. आता तुला हवा तो वर माग.''तेव्हा बल्लाळ म्हणाला – ''तू याच ठिकाणी कायमचे वास्तव्य करावेस व आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण कराव्यात. ही भूमी गणेश क्षेत्र म्हणून प्रसिद्ध व्हावी.''तेव्हा गणेश म्हणाला – ''तुझ्या इच्छेनुसार मी इथे 'बल्लाळ विनायक' या नावाने कायमचे वास्तव्य करीन. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला जे भक्त येथे येतील त्यांच्या सर्व मनःकामना पूर्ण होतील.'' असा वर देऊन गणेश जवळ असलेल्या एका शिळेत अंतर्धान पावला. तीच शिळा आज बल्लाळेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे.
नाना फडणवीस यांनी या लाकडी मंदिराचे दगडी मंदिरात रूपांतर केले.या मंदिराची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे, जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा त्याची किरणे मूर्तीच्या अंगावर पडतात. या मंदिराच्या दोन्ही बाजूस दोन तलाव आहेत. त्यातील एकाचे पाणी रोजच्या पूजेसाठी वापरले जाते. स्वयंभू असलेल्या या मूर्तीचे डोळे हिर्‍यांपासून बनवले आहेत, गणपतीच्या अंगावर उपरणे व अंगरखा अशी वस्त्रे आहेत..
बल्लाळेश्वर (पाली) हे रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात पाली गावातले गणपतीचे देऊळ आहे. पुण्यापासून बल्लाळेश्वर ११० किलोमीटरवर आहे. पुणे- लोणावळा -खोपोली मार्गे बल्लाळेश्वरला जाता येते.
आणि या सर्व अष्टविनायक दर्शनासाठी आपण एखाद्या टूर्स अँड ट्रॅव्हल्स एजन्सी द्वारे गेलो तर बराच त्रास कमी होतो व अतिशय व्यवस्थित व शास्त्रोक्त दर्शन देखील होते अशाच शास्त्रोक्त दर्शनासाठी आपण आम्हाला देखील संपर्क करू शकता
आमची आगामी टूर 08/02/21 ते 10/02/21 आहे
संपर्क - संजीवनी 7559398630 / शुभांगी +91 84840 80588
काटवटे टूर्स अँड ट्रॅव्हल्स, सातारा

वरदविनायक (महड) हे रायगड जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे.अष्टविनायकात चौथा गणपती म्हणून महाडचा वरदविनायक ओळखला जातो. या गणप...
05/02/2021

वरदविनायक (महड) हे रायगड जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे.अष्टविनायकात चौथा गणपती म्हणून महाडचा वरदविनायक ओळखला जातो. या गणपतीची एकदम जवळ जाऊन पूजा करता येते.
हे देऊळ अष्टविनायकांपैकीएक आहे.या मंदिराचा जिर्णोद्धार झाला असला तरी मंदिराचा गाभारा पेशवेकालिन असून तो हेमांडपंथी आहे. हा गणपती पुरातन कालीन असल्याचे सांगितले जाते.गणेश येथे वरदविनायक (समृद्धी व यश देणारा ) या रूपात रहात असे. येथील मूर्ती स्वयंभू असून धोंडू पौढकर यांना ती येथील तलावात १६९० साली सापडली.

बल्लाळेश्वर (पाली) हे रायगड जिल्ह्यातील पाली गावातले गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. गणेश पुराणात अष्...
04/02/2021

बल्लाळेश्वर (पाली) हे रायगड जिल्ह्यातील पाली गावातले गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. गणेश पुराणात अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणून पालीचा बल्लाळेश्वरओळखला जातो. अष्टविनायकातला हा एकच असा गणपती आहे की जो भक्ताच्या नावाने (बल्लाळ) प्रसिद्ध आहे. बल्लाळ हा गणपतीचा असीम भक्त होता.

सिद्धटेक (सिद्धिविनायक) हे अहमदनगर जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. श्री विष्णूला सिद्धी प...
03/02/2021

सिद्धटेक (सिद्धिविनायक) हे अहमदनगर जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. श्री विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारा, कार्य सिद्धीस नेणारा हा सिद्धिविनायक अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेचा एकमेव गणपती आहे. अष्ट विनायकांमधील हा दुसरा गणपती आहे.पेशवेकालीन महत्त्व लाभलेल्या ह्या सिद्धिविनायकाच्या मंदिराचा गाभारा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधला. देवाचे मखर पितळेचे असून सिंहासन पाषाणाचे आहे. मधु व कैटभ या असुरांशी भगवान विष्णू अनेक वर्षे लढत होते. मात्र, या युद्धात त्यांना यश प्राप्त होत नव्हते. तेव्हा शंकराने विष्णूला गणपतीची आराधना करायला सांगितली. याच ठिकाणी गणपतीची आराधना करून विष्णूने असुरांचा वध केला.
छोट्याश्या टेकडीवर असलेल्या या देवळाचा रस्ता पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके यांनी तयार केला. मात्र, १५ फूट उंचीचे व १० फूट लांबीचे हे देऊळ अहिल्याबाई होळकर यांनी बांधले.हरिपंत फडके यांचे सरदारपद पेशव्यांनी काढून घेतले, तेव्हा फडक्यांनी या मंदिरास २१ प्रदक्षिणा घातल्या. त्यानंतर २१ दिवसांनी त्यांची सरदारकी त्यांना परत मिळाल्याची आख्यायिका सांगितली जाते. या मंदिराच्या जवळून भीमा नदी वाहते.
मंदिरातील सिद्धिविनायकाची मूर्ती स्वयंभू असून ती तीन फूट उंच व अडीच फूट रुंद आहे. आहे. मूर्तीचे तोंड उत्तरेकडे असून ती गजमुखी आहे. सोंड उजवीकडे असल्याने सोवळे कडक आहे. त्यामुळे हा गणपती भक्तांसाठी कडक मानला जातो. गणपतीने एक मांडी घातली असून त्यावर ऋद्धि-सिद्धी बसलेल्या आहेत. प्रभावळीवर चंद्र, सूर्य, गरुड यांच्या आकृत्या असून मध्यभागी नागराज आहे. या देवळाला एक प्रदक्षिणा घालायची म्हणजे १ किलोमीटर चालावे लागते.
श्री क्षेत्र सिद्धटेक अहमदनगर जिल्ह्यात कर्जत तालुक्यात भीमा नदीच्या काठावर वसलेले एक खेडेगाव आहे.
सिद्धटेकला जाण्यासाठी यात्रेकरूंना सोयीचे रेल्वे स्टेशन म्हणजे दौंड. दौंड ते सिद्धटेक हे अंतर १८ कि.मी. आहे. दौंडवरून शिरापूर येथे बसने जाऊन पुढे नदी ओलांडून जावे लागते. नदीवर होड्या चालू असतात. आता मात्र नदीवर पूल झाला असल्याने होडीने जावे लागत नाही. गाड्या थेट मंदिरापर्यंत जातात.
दौंड-काष्टी-पेडगावमार्गे सिद्धटेक या ४८ कि.मी. लांबीच्या मार्गाने सुद्धा जाता येते.
पुण्याहून हडपसर-लोणी-यवत-चौफुला-
पाटस-दौंडमार्गे सिद्धटेक ९८ कि.मी. वर आहे. (नदी पार करावी लागते/पूल आहे.)
आणि या सर्व अष्टविनायक दर्शनासाठी आपण एखाद्या टूर्स अँड ट्रॅव्हल्स एजन्सी द्वारे गेलो तर बराच त्रास कमी होतो व अतिशय व्यवस्थित व शास्त्रोक्त दर्शन देखील होते अशाच शास्त्रोक्त दर्शनासाठी आपण आम्हाला देखील संपर्क करू शकता.आमची आगामी टूर 08/02/21 ते 10/02/21 आहे
संपर्क - संजीवनी 7559398630
काटवटे टूर्स अँड ट्रॅव्हल्स, सातारा

श्री मोरेश्वर                महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय, प्रतिष्ठीत आणि मानाची 8 गणपती स्थाने म्हणून अष्टविनायकाकडे ...
01/02/2021

श्री मोरेश्वर
महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय, प्रतिष्ठीत आणि मानाची 8 गणपती स्थाने म्हणून अष्टविनायकाकडे (Ashtavinayak) पाहिले जाते. अष्टविनायकांपैकी पहिला गणपती हा मोरगावचा मोरेश्र्वर. या गणपतीस श्री मयुरेश्वर असेही म्हणतात. श्री मोरेश्वर गणेशाचे, हे स्वयंभू व आद्यस्थान आहे.
असे मानले जाते की, पूर्वी सिंधू नावाच्या असुराने पृथ्वीतलावर उत्पात माजवला होता, त्याचा नाश करण्यासाठी देवांनी अखेर गणपतीची आराधना केली, तेव्हा गणपतीने मयूरावर आरूढ होऊन येथे सिंधू असुराचा वध केला.त्यामुळे गणपतीला येथे मयूरेश्वर असे नाव पडले. या गावात मोरांची संख्या जास्त असल्यामुळे त्याला मोरगाव असे म्हणतात. या मंदिरात मयूरेश्वराबरोबर ऋद्धी व सिद्धी यांच्याही मूर्ती आहेत. असे म्हणतात की ब्रम्हदेवाने दोन वेळा या मयूरेश्वराची मूर्ती बनवली आहे. पहिली मूर्ती बनवल्यावर ‍ती सिंधुसुराने तोडली. म्हणून ब्रम्हदेवाने पुन्हा एक मूर्ती घडवली.सध्याची मयूरेश्वराची मूर्ती खरी नसून त्यामागे खरी मूर्ती असल्याचे मानले जाते. ती मूर्ती लहान वाळू व लोखंडाचे अंश व हिर्‍यांपासून बनलेली आहे. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या समोर एक नंदीची मूर्ती आहे. असे सांगितले जाते की शंकराच्या मंदिरासाठी नंदीची मूर्ती एका रथातून नेली जात होती, मात्र येथे आल्यावर त्या रथाचे चाक तुटले. त्यामुळे या नंदीला येथेच ठेवण्यात आले.
मोरेश्वराचे मंदिर म्हणजे एक प्रशस्त गढीच आहे. मंदिर काळ्या दगडापासून तयार करण्यात आले असन ते बहामनी काळात बांधले गेले. गावाच्या मध्यभागी असलेल्या या देवळाला चारही बाजूंनी मनोरे आहेत. मोगल काळात देवळावर आक्रमण होऊ नये म्हणून या देवळाला मशिदीसारखा आकार दिला आहे. देवळाच्या बाजूने ५० फूट उंचीची ‍संरक्षण भिंत आहे. गाभार्‍यातील मयूरेश्वराची मूर्ती बैठी, डाव्या सोंडेची, पूर्वाभिमुख आणि अत्यंत आकर्षक आहे. मूर्तीच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवले आहेत. मस्तकावर नागराजाचा फणा आहे. मूर्तीच्या डाव्या- उजव्या बाजूस ऋद्धिसिद्धीच्या पितळी मूर्ती असून पुढे मूषक व मयूर आहेत.
*content source-wikipedia
*image source - google

26/01/2021
स्वप्न सगळेच बघतातस्वत:साठी इतरांसाठीआपण आज एक स्वप्न बघूयादेशासाठी आपल्या सर्वांसाठीसुरक्षित भारत, सुविकसित भारतप्रजासत...
26/01/2021

स्वप्न सगळेच बघतात
स्वत:साठी इतरांसाठी
आपण आज एक स्वप्न बघूया
देशासाठी आपल्या सर्वांसाठी
सुरक्षित भारत, सुविकसित भारत
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

दरवर्षी प्रमाणे यंदाच्याही वर्षी ॲड. शुभांगी विजयकुमार काटवटे यांच्या मार्फत अयोध्या फाउंडेशन, काटवटे टूर्स अँड ट्रॅव्हल...
23/01/2021

दरवर्षी प्रमाणे यंदाच्याही वर्षी ॲड. शुभांगी विजयकुमार काटवटे यांच्या मार्फत अयोध्या फाउंडेशन, काटवटे टूर्स अँड ट्रॅव्हल्स तसेच चंदू काका सराफ यांच्या सहयोगाने करण्यात आले आहे तरी सर्वांनी उपस्थित राहावे...
वेळ दुपारी ४ ते ८
ठिकाण - ३४४, रामाचा गोट, श्री काळाराम मंदिर जवळ, सातारा.
सदैव आपल्या सेवेस तत्पर -
ॲड. शुभांगी विजयकुमार काटवटे.

।। नव्या वर्षाची पवित्र सुरुवात ।।काटवटे टूर्स अँड ट्रॅव्हल्स आयोजित ' शास्त्रोक्त अष्टविनायक दर्शन ' (विशेष आकर्षण : १२...
10/01/2021

।। नव्या वर्षाची पवित्र सुरुवात ।।
काटवटे टूर्स अँड ट्रॅव्हल्स आयोजित
' शास्त्रोक्त अष्टविनायक दर्शन '
(विशेष आकर्षण : १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारे भीमाशंकर दर्शन)

नमस्कार, नमस्कार, नमस्कार...
काय मंडळी कसे आहात? नव्या वर्षाची सुरुवात करूया गणपतीबाप्पाच्या आशीर्वादाने, काटवटे टूर्स अँड ट्रॅव्हल्स आयोजित शास्त्रोक्त अष्टविनायक दर्शनाद्वारे
होय शास्त्रोक्त म्हणजेच 'मोरगाव येथे अष्टविनायक दर्शन पूर्ण करण्याचा संकल्प करून पुन्हा मोरगाव येथे परत येऊन संकल्पपूर्ती करण्याचा' सोबत या सहलीचे विशेष आकर्षण आहे 'भीमाशंकर दर्शन' १२ ज्योतिलिंगांपैकी एक असणारे सुंदर भीमाशंकर मंदिर येथे दर्शनाचा लाभ !
काटवटे टूर्स अँड ट्रॅव्हल्स आयोजित अष्टविनायक यात्रेची ठळक वैशिष्ट्ये
* शास्त्रोक्त यात्रा (मोरगाव येथे संकल्प आणि पुन्हा शेवटी मोरगाव येथे संकल्प सिद्धी).
* संपूर्ण प्रवास सातारा ते सातारा डिलक्स बसमध्ये.
* उत्तम आणि दर्जेदार डिलक्स हॉटेलमध्ये राहण्याची उत्तम सोय.
* दोन्ही वेळच्या जेवणासोबत चहा नाश्ताची उत्तम सोय.
* मुख्य आकर्षण : १२ ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले भीमाशंकर येथे दर्शन घ्यायची सुवर्णसंधी
* अर्ली बर्ड डिस्काउंट मिळवा ५% केवळ २५ जानेवारीच्या आत बुकिंग करणाऱ्यांसाठी
अष्टविनायक संकल्पसिद्धी
रुपये ४२२१/- फक्त
(३दिवस / २ रात्री)

Address

344, Ramacha Got, Near Kalaram Mandir, Gujar Ali
Satara
415002

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm

Telephone

+917559398630

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Katwate Tours & Travels posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category