Taware Tour's

Taware Tour's Tours and tourism
(2)

30/03/2024
*झेपावे* *दक्षिणेकडे*...   उत्तरेला उत्तुंग हिमशिखरांसह नंदनवन काश्मीर आहे, तर दक्षिणेला विशाल महासागरांसह यक्षभूमी केरळ...
01/01/2024

*झेपावे* *दक्षिणेकडे*...

उत्तरेला उत्तुंग हिमशिखरांसह नंदनवन काश्मीर आहे, तर दक्षिणेला विशाल महासागरांसह यक्षभूमी केरळ आहे.
केरळ म्हणजे नारळ किंवा नारळ म्हणजे केरळ! कसेही म्हणा पण नारळाशिवाय केरळचा विचार करणेही शक्य नाही; इतके नारळाचे सान्निध्य केरळला लाभलेले आहे.
या भूमीचे दुसरे नाव "भार्गव भूमी" किंवा "परशुराम भूमी" असेही आहे. केरळला "नागभूमी" म्हणूनही ओळखले जाते. कारण नाग लोकांची वस्ती या भूमीत होती. हे नागलोक द्रविड होते.
केरळ या नावाच्या स्त्रोताबद्दल संदिग्धता आहे. जुन्या मल्याळी भाषेतील फोडीप्रमाणे केरा (नारळाचे झाड) व आलम् (परिसर) असा केरळम चा अर्थ होतो. पारंपरिक तमिळ भाषेप्रमाणे केरळची "चेराआलम" अशी फोड होते. त्यावरून या शब्दाचा अर्थ डोंगरापलिकडील उतरणीचा प्रदेश असा होतो. केरळभूमीचा उल्लेख "मलैनाडू" किंवा "चेरनाडू" अशा नावांनी देखील केला जात असे. "चेरतल" असेही म्हटले जाई. काही काळ केरळवर 'चेर' नावाच्या राजांची राजवट होती, त्या 'चेर' राजांचे वसतीस्थान तेच "चेरतल" होय. यातील 'त' पुढे लुप्त झाला. आणि "चेरल" असा शब्द उरला. कालांतराने या "चेरल" चे "केरळ" बनले!
भौगोलिकदृष्टय़ा केरळचे तीन विभाग पडतात. 1) समुद्रालगतचा सखल मैदानी प्रदेश 2) याच्या पूर्वेकडील उंचसखल असा मध्यभाग आणि 3)अगदी पूर्वेकडील जंगलांनी व्यापलेला पहाडी प्रदेश. केरळच्या बहुतेक भागात पाऊसपाणी चांगले होते. पावसाचे प्रमाण कमीजास्त होत असावे पण दुष्काळ पडलाय असे कधी ऐकिवात नाही. तिथे महापुराचा धोकाच अधिक असावा. पश्चिम घाटातील डोंगररांगांच्या व्यतिरिक्तही काही डोंगर अन्य भागात पसरलेले असून ते केरळच्या सौंदर्यात भर घालत आहेत. केरळला जवळपास 600 किलोमीटरचा समुद्र किनाराही लाभलेला आहे. केरळला लाभलेले हे एक वरदानच होय. समुद्रालगत किनारपट्टीवर नारळी पोफळीची असंख्य झाडे आहेत. येथे भाताचे पीकही उत्तम होते. पर्वतीय भागावर चहाचे मळे, मसाल्यांचे बगीचे तर कमी उंचीच्या भागात रबर, हळदीचे पीक विपुल प्रमाणात होते.
साक्षरतेच्या बाबतीत केरळ भारतात अग्रेसर आहे. स्त्रिया आणि पुरुष दोघांमधेही शिक्षणाचा प्रसार भरपूर आहे. आद्य शंकराचार्यांसारखा महापुरुष, श्रीनारायण गुरू, महाकवी कुमारन केरळच्या भूमीत होऊन गेले. राजा रवी वर्मांसारखा जगद्विख्यात चित्रकार याच केरळच्या भूमीने भारताला दिला आहे. साहित्य, संगीत, शिल्प इ. ललित कलांच्या क्षेत्रातही केरळीय कलावंत प्राचीन काळापासून आघाडीवर आहेत. भारतीय नृत्यामधे केरळच्या कथकली नृत्याने मोलाची भर घातली आहे. मोहिनी अट्टम नृत्यही वैशिष्टय़पूर्ण आहे.
केरळी माणसाची वेषभूषा साधीसुधी तसे त्यांचे खाणेपिणेही साधेसुधेच. वेषभूषेत पांढऱ्या रंगाचा वापर जास्त. प्रामुख्याने भातच पिकत असल्यामुळे तांदळाचे पदार्थ खाण्यात जास्त. भरपूर लांबच लांब समुद्रकिनारा त्यामुळे आहारात मासेही जास्त प्रमाणात असतात.
"ओणम्" हा केरळचा मुख्य आणि प्रसिद्ध सण आहे. केरळची भाषा केरळी तिला "मल्याळम्" असे म्हणतात. "मल्याळी" म्हणूनही ती ओळखली जाते. मल्याळम् हा शब्द 'मलय' म्हणजे पर्वत आणि 'आलम्' म्हणजे समुद्र अशा दोन शब्दापासून बनलेला. एकंदरीत या 'आलम्' म्हणजे शब्दाचे दोन अर्थ आहेत तर! केरलम् मधला 'आलम्' म्हणजे परिसर आणि मल्याळम् मधला 'आलम्' म्हणजे समुद्र. असो..
दिशांवरून आपल्याकडे फार शुभाशुभ आहे. पूर्व, पश्चिम, उत्तर या शुभ दिशा. दक्षिण दिशा अशुभ वैगेरे वैगेरे. मला खात्री आहे ज्याने केरळ बघितले आहे तो दक्षिणेला कधीही नावे ठेवणार नाही. तो दक्षिणेच्या प्रेमातच पडेल.
माझ्या व्यवसायाच्या निमित्ताने मला या दिशांच्या शुभाशुभत्वाचे बरेच चमत्कारिक आणि मजेशीर अनुभव आले आहेत. यातील एक प्रमुख श्रद्धा म्हणजे आपल्याकडे वास्तूचे मुख्य व्दार दक्षिणेकडे नको असते. कारण दक्षिण ही अशुभ दिशा, राक्षसांची दिशा, दुष्ट शक्तिंची दिशा. उत्तर दिशा कुबेराची दिशा वैगेरे वैगेरे. मला तर खरे कुबेर दक्षिणेलाच पाहायला मिळाले. बालाजी आणि पद्मनाभ. कुबेराला लाजवेल अशी संपत्ती आहे या देवस्थानांची. आपल्याकडे येणारा पाऊस हा दक्षिणेकडूनच भारतात प्रवेश करतो. दरवर्षी जून महिन्यात कानावर पडणारं वाक्यं.. आणि मान्सून केरळमधे दाखल! ती दक्षिण आपली जीवनदायिनी आहे.
असेच एक renovation चे काम करताना वास्तुशास्त्रासंबंधित दिशांचा मजेशीर अभ्यास झाला. यजमानांनी त्यांच्या रुमच्या planning साठी एक वास्तुशास्त्री आणला होता. तो होता south वाला. त्याने त्याच्या शास्त्रानुसार रुम्सची आणि देवघराची रचना केली. यामधे विशेष हे कि देवघर त्यांनी दक्षिणमुखी करावयास सांगितले होते. दक्षिणेतली मंदिरे दक्षिणमुखी असतात. आपल्याकडे जनरली असं नसतं म्हणून मी यजमानांना शंका विचारली देवघर दक्षिणमुखी कसं?? यावर यजमान म्हणाले दक्षिणेला ज्या दुष्ट शक्ती असतात त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी, त्यांना धाक,भीती रहावी म्हणून सुष्ट शक्ती हव्यात म्हणून देवघराची रचना दक्षिणमुखी. याने देवाचे लक्ष कायम या दुष्ट शक्तींवर राहते व या दुष्ट शक्ती आपल्या घरात प्रवेश करत नाहीत. मुद्दा अगदीच चूक नव्हता. त्याप्रमाणे बांधकाम पूर्ण करत आणले आणि यजमानीण बाईंच्या मैत्रिणीची entry झाली. त्याही वास्तुशास्त्र अभ्यासक होत्या. त्या महाराष्ट्रीयन होत्या. त्यांनी हे सर्व बघितलं आणि ताबडतोब बांधकाम थांबवायला सांगितलं, म्हणाल्या असं कुठं असतं का दक्षिणमुखी देवघर! देवांना कोणी अशुभ दिशेकडे तोंड करून बसवतं का?? वैगेरे वैगेरे. यात सरशी यजमानीण बाईंचीच झाली. त्यांच्या मैत्रिणीच्या वास्तुशास्त्राप्रमाणे बांधकाम replan केलं. यात कमावलं आमच्या ब्रेकरवाल्याने. त्याला म्हटलं, हे बघ! दक्षिण दिशा तुझ्यासाठी शुभ आहे हे कायम लक्षात ठेव. माझं म्हणणं एवढंच कि आपल्याला जे सहज, सोप्पं, सुटसुटीत असेल इतकंच वास्तुशास्त्र पाळावं. उगीच त्याच्या आहारी जाऊ नये.
तर असे हे दिशांचे मजेशीर किस्से. आम्ही तर दक्षिणेलाच प्रवासाला निघालो होतो; म्हटलं बघू या काय काय अनुभव येतायत! प्रवासाअंती दक्षिण नितांत सुंदर आहे, शुभ आहे हाच अनुभव आला.
आमच्या प्रवासाची सुरुवात चिपळूणपासून झाली. चिपळूणातल्या पश्चिम महाराष्ट्रात “जगप्रसिद्ध” असलेल्या हाॅटेल अभिषेकमधे दुपारचं जेवण करून रेल्वे स्टेशनवर गेलो. नेत्रावती एक्स्प्रेसने दुसर्‍या दिवशी दुपारी त्रिशूरला उतरलो. त्रिशूर येथे गजशाळा पाहिली. पन्नासेक हत्तींचे संगोपन तिथे केलं जातं. बहुतेक हत्ती हस्तीदंतासहित बघायला मिळाले हे विशेष. तद्नंतर गुरूवायूर श्रीकृष्ण मंदिर पाहिले. अतिशय सुंदर मंदिर. श्रीकृष्णाची मूर्ती सुबक होती. अंत:पुर आणि गाभारा पणत्यांनी उजळून निघाला होता. मंदिरात प्रवेशासाठी पुरुषांना लुंगी आणि स्त्रियांना साडी बंधनकारक होती. मंदिरात दुसर्‍या दिवशी सकाळी आरतीसाठी गेलेल्या आमच्यापैकी काही जणांना सजवलेले हत्ती पाहण्यास मिळाले.
रेल्वेमधून जाताना दिसलेलं केरळचं प्रथम दर्शन म्हणजे जागोजागी असलेल्या नारळी पोफळीच्या बागा. कुठेही दृष्टी टाका निळ्याभोर आकाश क्षितिजरेषेपर्यंत दृष्टीस पडणारी हिरवीगार नारळीच नारळी! नारळी पोफळीच्या झाडांमधून केरळातली गावे एकास लागून एक अशी उभी आहेत कि एक गाव कुठे संपले आणि दुसरे कुठे चालू सुरू झाले हे कळतच नाही. आम्ही गेलो तेव्हा तरी निरभ्र आकाश आणि स्वच्छ सूर्यप्रकाश असल्यामुळे केरळचं सौंदर्य खुलून दिसत होतं. केरळला निघण्यापूर्वी चार पाच दिवस अगोदर तिथे मुसळधार पाऊस झाल्यामुळे मन खट्टू झालं होतं. आपल्या टूरचा बेरंग होणार बहुतेक असं वाटून गेलं. पण नशीब आमच्या बाजूने होतं. निसर्गाने आमच्यावर कृपादृष्टी केली होती.
दुसर्‍या दिवशी कोचीन बंदर आणि मुन्नार स्थलदर्शन. कोचीन बंदर ठिकठाक. बुक केलेल्या याॅटमधून समुद्रात फेरफटका. याॅटच्या डान्स फ्लोअरवर सर्वांनी केलेला डान्स हेच काय ते विरंगुळ्याचे क्षण.
मुन्नारचे हिरवेगार डोंगर केरळच्या सौंदर्याची साक्ष देत होते. चहाचे मळे ही मुन्नारची ओळख. दोन अडीच फूट उंचीच्या चहाच्या झाडांनी भरलेले हिरवेगार डोंगर. सभोवार कुठेही नजर टाका डोंगर उतारावर असलेल्या या चहाच्या झाडांच्या जाडसर पट्ट्या विलक्षण रेखीव दिसत होत्या. मला खात्री आहे बालकवींनी जर केरळ टूर केली असती तर “हिरवे हिरवे जाड गालिचे…”असंच आलं असतं. ग्रुपमधील समस्त स्त्री वर्गाचे “चहाच्या मळ्यामधे कोणं गं उभी…” स्टाईलने फोटो सेशन पार पडले. मुन्नारमधेच एर्वीकुलम् नॅशनल पार्क आहे. येथे निलगिरी थार जातीच्या शेळ्या दृष्टीस पडतात. काही औषधी झाडेही पहायला मिळतात. केरळमध्ये बोचऱ्या थंडीचा अनुभव मिळतो तो इथेच. पार्क बघताना छोटीशी डोंगर चढण चढावी लागते. येथे पार्कची स्वतंत्र बस व्यवस्था आहे. प्रायव्हेट गाडय़ा खालीच पार्क कराव्या लागतात. पुढे मेट्टूपट्टी या छोट्याशा डॅमकडे रवाना झालो. तेथील इको पाॅईंट हे टिपीकल पिकनिक स्थळ आहे. इको पाॅईंट म्हणजे खोल खोल दऱ्या दिसतील असं वाटलं. आपल्याकडे नाही का महाबळेश्वरला खोल दऱ्यांमधून इको साऊंड येतो. पण इथे इको पॉईंट आला तरी दऱ्यांचा पत्ताचं नाही. डॅमचे बॅकवॉटर आणि त्यापलीकडे असणारी शोला निलगिरी जातीच्या झाडांची दाट जंगले त्यातून निर्माण होणारा इको साऊंड. आतापर्यंत हिंदी पिक्चरमधे आणि महाबळेश्वरलाच फक्त दऱ्याखोऱ्यांमधून येणारा इको साऊंड ऐकला होता. हे जरा नविनच होतं. मुन्नारमधेच थोडी खरेदी झाली. कोको चॉकलेट्स, बनाना चिप्स वैगेरे वैगेरे. नारळासोबत केळीच्या बागाही प्रचंड प्रमाणात आहेत केरळमधे. केळ्याचे वेफर्स नारळाच्या तेलापासून बनवलेले त्यामुळे त्यांची किंमत जास्त, जवळपास 400/-रुपये किलो. मुन्नारमधेच चहाची फॅक्टरी पाहिली. तिथे चहाचे असंख्य प्रकार बघायला मिळाले. लागलीच ice tee घेऊन टाकला. थोडासा वेगळा वाटला म्हणून घेतला.
यानंतरचा मुक्काम थेकडीला होता. थेकडी मसाल्याच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे. किचनमधे एकत्र ठेवलेले मसाले प्रत्यक्षातही एकत्र नांदताना बघून गंमत वाटली. वेलची, लवंग, दालचिनी, काळी मिरी, तमालपत्र, जायफळ इ. आणि इतर आयुर्वेदिक औषधी वनस्पती जसे की शतावरी, अश्वगंधा, ब्राम्ही, सफेद मुसळी एवढी वैविध्य असलेली झाडे एकाच ठिकाणी उगवलेली पाहून आश्चर्य वाटले. याच मसाल्यांच्या गार्डनमधे आपल्याकडची लाजाळूही खूप खूप वर्षांनी भेटली. लहानपणी कधी काळी बघितलेली लाजाळू, तिला स्पर्श करून लाजवायचा मोह आवरला नाही. इथेच निसर्गाने केरळला किती भरभरून दिलंय हे जाणवलं. एवढी जैवविविधता असलेला केरळ हा फार दुर्मिळ प्रांत असेल. नारळीच्या बागा, केळी, चहाचे मळे, मसाले, रबर, आयुर्वेदिक औषधी वनस्पती, भात, मासे, समुद्रकिनारे, गोड्या पाण्याची सरोवरे या जैवविविधतेला तोड नाही. याच मसाल्यांच्या गार्डनमधे तेथील गाईड जोनीशने आम्हांला मसाल्यांची आणि आयुर्वेदिक औषधी वनस्पतींची उपयुक्त आणि महत्वपूर्ण माहिती सांगितली. जोनीश केरळी ख्रिश्चन होता. सफाईदार हिंदी बोलत होता. केरळ कन्याकुमारीमधे बऱ्यापैकी हिंदी बोलणारे, समजू शकणारे लोक भेटले. मातृभाषेचा टोकाचा अभिमान बाळगणारे हे मल्याळी तमिळी हिंदीबाबत आता थोडेसे Liberal झाले आहे हे खरे. रेल्वेमधेही बरेचसे हिंदी, इंग्लिश बोलणारे मल्याळी तमिळी भेटले. आम्हांला भेटलेले बरेचसे गाईड मिनाक्षी मंदिरातील मुरूगन, सुचिंद्रम् मंदिरातील स्वामी ठराविक मराठी वाक्ये अस्खलितपणे बोलत होते. जसे की चला चला लवकर चला, थांबा, पुढे चला पुढे चला, शांत रहा आणि ऐका वैगेरे वैगेरे. गाईड बहुभाषिक असावा हेच खरे. रेल्वेत मल्याळी तमिळींशी बोलून मी ही माझा गरजेपुरता मल्याळी तमिळी शब्दसंग्रह वाढवला. नको असेल तर वेंडा, हवं असल्यास वेनम् वैगेरे वैगेरे. केरळी लोक लुंगीला “मुंटू”म्हणतात आणि कुर्त्याला “तोर्तू” म्हणतात.
थेकडीमधे मसाल्यांची दुकाने जागोजागी होती. एका दुकानाच्या नावाखालीच “इलायची की मंडी” असा उल्लेख होता. यावरूनच इथल्या मसाला मार्केटचा आवाका लक्षात येतो. यानंतर थेकडीमधेच टूरचा Hilight Point होता तो म्हणजे पेरियार लेक बोटींग. पेरियारचं घनदाट जंगल लेक बोटींग करत पाहणं हा एक अद्भुत अनुभव होता. सकाळची प्रसन्न वेळ, पेरियार लेकचं मनाला शांतता देणारं तितकंच शांत पाणी, त्या पाण्यात दिसणारं जंगलातील झाडांचं प्रतिबिंब, पक्ष्यांचे, वन्य प्राण्यांचे ऐकू येणारे आवाज, सरोवरात विहार करणारे पक्षी तुम्हांला वेगळ्याचं विश्वात घेऊन जातात. नशिबाने आम्हांला गवे, हरणे, लंगूर जातीची माकडे लेकच्या कडेला पाहायला मिळाली. पेरियार लेक बोटींग एक अविस्मरणीय अनुभव होता.
थेकडी नंतर आम्ही मदुराईला गेलो. मिनाक्षी मंदिर आणि मदुराई सिल्क साडी ही येथील आकर्षणे होती. मिनाक्षी मंदिराचे आवार भव्य होते. चारही दिशांना नऊ दहा मजली गोपुरे होती. गोपुरे ही दाक्षिणात्य मंदिरांची खासियत. शिल्पकला उत्तम. मंदिराच्या आत सिलींगवर काढलेली ऑईल पेंटची भित्तीचित्रे मंदिराच्या पुरातन शैलीला बाधा आणत होती. रामेश्वरलाही तोच प्रकार. सुचिंद्रम् आणि पद्मनाभ मंदिरे आपआपली ओरिजिनल पुरातन शैली जपून होती. सर्व मंदिरातील शिल्पकला अप्रतिम होती. मदुराईत साडी खरेदी ही समस्त स्त्री वर्गाला पर्वणीचं असते. त्यातून सुटका नाही. मदुराईला जाऊन मदुराई सिल्क घेतली नाहीत तर मग काय केलंत तिथे जाऊन असा प्रश्न विचारणारेही असतात आपल्याकडे. “पोथिस मॉल”ची चेनच आहे साऊथमधे. इथे तुम्हांला 300 रूपयांपासून 50000 रूपयांपर्यंत साड्या मिळू शकतात.
मदुराईनंतर रामेश्वरला भेट दिली. रामाने लंकेला जाताना शिवलिंग तयार करून त्याची पूजा केली अशी आख्यायिका आहे. येथेच धनुषकोडी, पाम्बम् बीच, डॉ. कलाम हाऊस हे स्थलदर्शन झालं. श्रीलंका येथून 50 किलोमीटरवर आहे असं कळालं. रामेश्वर मंदिरात 22 का 24 स्नानकुंड आहेत. त्याला तीर्थ संबोधतात. या तीर्थात स्नान केल्याने सर्व पापे धुतली असा समज आहे. माहीत नाही तो समज आहे की गैरसमज आहे. त्यापेक्षा रामेश्वर पापे न करण्याचीच सद्बुद्धी सर्वांना का देत नाही कुणास ठाउक!
मदुराई मंदिराच्या बाहेर विविध फुलांचे गजरे विकायला होते. दाक्षिणात्य स्त्रिया आणि त्यांनी केसात माळलेले भरघोस गजरे ही एक दाक्षिणात्य स्त्रीची ओळख सर्वश्रुत आहेच. ऑफकोर्स बायकोलाही गजरे घेतलेच आणि तद्नंतरही पुढच्या प्रवासात सकाळी मॉर्निग वॉकला हाॅटेलमधून बाहेर पडून येताना तिच्यासाठी गजरे घेऊन येणे हा नियम टूरची सांगता होईपर्यंत पाळला. तमिळी, केरळी घरापुढे काढलेल्या रेखीव रांगोळ्या लक्ष वेधून घेत होत्या. तामिळनाडू बऱ्यापैकी महाराष्ट्राशी साधर्म्य असलेला परिसर. केरळमधे उतरत्या छपराची मंगलोरी कौलांची घरे जास्त प्रमाणात पाहायला मिळाली. केरळमधे ख्रिस्ती धर्माचा प्रसार जास्त प्रमाणात झालेला आहे त्यामुळे उत्तम स्थापत्यकला असलेली चर्चेस जागोजागी पाहायला मिळाली. मुस्लिमही बहुसंख्येने आहेत. त्यांना मोपला म्हणतात. कोचीनमधे बरेचसे मोपलाज दिसले.
यानंतरचा मुक्काम कन्याकुमारीला होता. विवेकानंद स्मारक हे येथील प्रमुख आकर्षण. त्रिवेणी सागर संगमावर वसलेलं अप्रतिम स्मारक. त्याच्या शेजारीच आता तमिळ कवी थिरूवल्लुवर यांचा जवळपास 100 फूटी पुतळा उभारला आहे. येथील सूर्योदय आणि सूर्यास्त दोन्ही मनोहारी.
यानंतर त्रिवेंद्रम (तिरूअनंतपूरम्) कडे प्रयाण केले. दुपारचं जेवण येथील प्रसिद्ध रेस्टॉरंट Mothers Veg Plaza इथे करणार होतो. पारंपरिक केरळी भोजनाचा आनंद येथे मिळाला. केळीच्या पानावर पारंपरिक केरळी पदार्थ, विविध प्रकारची लोणची, केरळी पद्धतीने बनविलेल्या भाज्या, हलके फुलके पापड, पायसम् पुरणपोळीसहीत चार प्रकारचे स्वीटस्, ब्राऊन राईस, पांढरा भात आणि रस्सम, प्यायला कोमट पाणी असा अस्सल केरळी भोजनाचा थाट होता. केरळात मंदिरात आणि हाॅटेलमधे पिण्यासाठी कोमट पाणी serve करतात. यावरून केरळी लोक किती health conscious आहेत हे दिसून येतं. त्रिवेंद्रममधेच प्रसिद्ध झू आणि राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी पाहिली. राजा रवी वर्मांची पेंन्टींग्ज सुरेख होती. संध्याकाळी पद्मनाभ मंदिर दर्शनासाठी गेलो. पद्मनाभ मंदिर विशाल आणि भव्य असून श्रीविष्णूची योगनिद्रेचा आनंद घेत असलेली मूर्ती सुबक आहे. मूर्तीचे संपूर्ण दर्शन तीन व्दारातून घडते. एकामधून श्रीविष्णूचे मुख दृष्टीस पडते मधल्यातून नाभी व तिसऱ्यामधून चरणकमल दिसतात. गाभारा आणि अंतःपुर गुरुवायूर मंदिराप्रमाणेच पणत्यांनी उजळून निघालं होतं. इथेही पुरूषांना लुंगी आणि स्त्रियांना साडी बंधनकारक होती.
शेवटचा मुक्काम अलेप्पीला होता. केरला बॅक वाॅटर. टूरचा दुसरा Highlight Point. हाऊसबोटमधे मुक्काम. अलेप्पीला जाताना सुचिंद्रम् मंदिर पाहिले. छान आहे मंदिर. मंदिराच्या दगडी खांबातून सारेगम हे सप्तसूर ऐकू येतात. कशी स्थापत्यकला असेल त्याकाळी याची प्रचिती येते. वाटेत कोवलम् च्या नितांत सुंदर बीचवर रेंगाळलो. अतिशय सुंदर, स्वच्छ निळ्याशार पाण्याचा, रुपेरी वाळूचा समुद्रकिनारा. भारतातील नितांत सुंदर बीचपैकी हा एक आहे. पुढे जटायू पार्कला गेलो पण आमच्या दुर्दैवाने रोप वे च्या दुरूस्तीचे काम चालू असल्यामुळे जटायू शिल्प आम्हांला बघता आले नाही.
दुपारी अलेप्पीला हाऊसबोटवर पोहोचलो. अलेप्पी केरळमधील सर्वात जुने बॅक वाॅटर शहर आहे. हे ठिकाण कालवे, नद्या, सरोवरांनी वेढलेले आहे. अलेप्पीला भारताचे व्हेनिस असेही म्हणतात. हाऊसबोटीने चार पाच तासांचा फेरफटका मारून आलो. इथेच आयुर्वेदिक मसाज सेंटर, मच्छी मार्केट, वेलनेस सेंटर आणि केरळचे ग्रामीण जीवन पाहायला मिळाले. फेरफटका मारत असतानाच रात्रीच्या जेवणासाठी लाॅबस्टर (मोठे झिंगे) खरेदी केले. आमच्या हाऊसबोटचा मॅनेजर शीनो याने हाऊसबोट मॅनेजमेंट मार्फत रात्रीचा चिकनचा बेत केला होता. पण तुम्हांला हवे असल्यास मासे, प्राॅन्स् विकत घेऊन ते तुम्ही हाऊसबोट किचन स्टाफला बनवायला देऊ शकता. हा विषय ऐच्छिक असतो. फक्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार खरेदी करून किचन स्टाफकडे सुपूर्त करायची. बनवायचे वेगळे चार्जेस घेत नाहीत. हाऊसबोटीने जाऊन मच्छीमार्केटमधे खरेदी पहिल्यांदाच केली. एक वेगळा अनुभव. एकमजली, दुमजली अशा छानशा हाऊसबोट होत्या. काही हाऊस बोटींचे इंटेरियर अतिशय सुरेख होतं. पाण्यावरचं तरंगते हाॅटेलचं म्हणा ना.
शेवटच्या हाऊसबोट मुक्कामाने प्रवासाचा शीण गेला. तद्नंतर परतीचा प्रवास सुरु झाला.
या प्रवासात आमच्यासोबत असलेले सर्व टूरकरी mostly सिनीयर सिटीझन्स होते. आम्ही तीन चार कपल्स चाळीशी पन्नाशीतले होतो. त्यामुळे आता आपली टूर कशी होणार अशी कुशंका आली. पण माझ्या या कुशंकेला या सिनीयर्सनी दोन दिवसातचं तिलांजली दिली. कोचीनला समुद्रात फेरफटका मारण्यासाठी बुक केलेल्या याॅटवर या सिनीयर्सना डान्स करताना बघून उत्साह वाढला. तरूणांना लाजवतील अशा शिताफीने सर्वजण नाचत होते. इथेच बनलेलं बाॅन्डींग शेवटपर्यंत टिकून राहीलं. छान मैत्री झाली सगळ्यांशी. सर्वजण वक्तशीर होते. टूर मॅनेजरने सांगितलेल्या वेळेत सर्वजण हजर राहत होते. कुणामुळे खोळंबा झालाय, कुणामुळे site seeing मिस् झालंय, कुणाला काही त्रास झालाय असं एकदाही झालं नाही. सर्वजण fit and fine होते. बहुतेकांना मी बोलूनही दाखवलं तुमच्याकडे बघून आता आमचं टेंशन वाढलंय तुमच्या वयात आता आम्हांलाही किती fit and fine राहायचंय हे तुम्ही दाखवून दिलंत. मस्त एन्जॉय करत होते सर्वजण.
एकंदरीत दक्षिण सुंदर आहे, छान आहे, शुभ आहे हाच अनुभव घेऊन परतलो.
सरतेशेवटी आमच्या टूर कंपनीबद्दल. अमोल तावरे यांच्या तावरे टूर्स मार्फत आमची केरळ कन्याकुमारी टूर यशस्वी झाली. अमोल माझा पेठकरीच. अतिशय कष्टाळू, passionate, committed. त्रिशूरला उतरल्यानंतर त्याने arrange केलेली देखणी AC VOLVO बघूनचं इथून पुढचा आपला सर्व प्रवास भारीच होणार आहे याची कल्पना आली. अर्धी लढाई त्याने इथेच जिंकली होती. राहीलेली अर्धी लढाई त्याने उत्कृष्ट food management, luggage management, विनम्र आणि तत्पर staff देऊन भरून काढली. उत्कृष्ट महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण serve केलं. त्यामुळे केरळमधे आम्ही शेवयाची खीर, पुरणपोळी, गाजर हलवा, दुधी हलवा, बदाम शिरा, उपमा, फ्रुट सॅलड, भरली भेंडी, भरली वांगी आणि इतर पनीरच्या पंजाबी डिशेस खाऊ शकलो, अन्यथा 8/10 दिवस केरळी जेवणं ही एक शिक्षाच झाली असती कदाचित. पण तावरेंनी सर्वांच्या पोटाची व्यवस्थित काळजी घेतली. कोणीही खाण्यामुळे आजारी पडलंय असं झालं नाही. टूर यशस्वी काय लागतं हो! फिरायला एक VOLVO चा रथ, सुग्रास भोजन आणि सर्वांमधलं fine bonding यात अमोल यशस्वी झाला होता. यातच सगळं आलं.
So this is It..!!

पुढच्या वर्षी लवकर या !अनंत चतुर्दशी निमित्त हार्दिक शुभेच्छा!Taware ToursAddress:१२८, मनोरमा अपार्टमेंट, चितामणी हॉस्पि...
28/09/2023

पुढच्या वर्षी लवकर या !
अनंत चतुर्दशी निमित्त हार्दिक शुभेच्छा!

Taware Tours

Address:
१२८, मनोरमा अपार्टमेंट, चितामणी हॉस्पिटल समोर, देवी चौक, सातारा, ४१५००२.

Contact No :
9850008684
9595291181


WORLD TOURISM DAYAGE IS DEFINITELY NOT A BARRIER BUT THE DESIRE TO EXPLORE MAKES YOU TRAVEL.Taware Tours१२८, मनोरमा अपार...
27/09/2023

WORLD TOURISM DAY
AGE IS DEFINITELY NOT A BARRIER BUT THE DESIRE TO EXPLORE MAKES YOU TRAVEL.

Taware Tours

१२८, मनोरमा अपार्टमेंट, चितामणी हॉस्पिटल समोर, देवी चौक, सातारा, ४१५००२.

Contact No : 9850008684 / 9595291181


गणेश चतुर्थी निमित्त हार्दिक शुभेच्छा !Taware ToursAddress:१२८, मनोरमा अपार्टमेंट, चितामणी हॉस्पिटल समोर, देवी चौक, साता...
19/09/2023

गणेश चतुर्थी निमित्त हार्दिक शुभेच्छा !

Taware Tours
Address:
१२८, मनोरमा अपार्टमेंट, चितामणी हॉस्पिटल समोर, देवी चौक, सातारा, ४१५००२.

Contact No :
9850008684
9595291181


श्रीकृष्ण जन्माष्टमी निम्मित सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!Taware ToursAddress:१२८, मनोरमा अपार्टमेंट, चितामणी हॉस्पिटल स...
06/09/2023

श्रीकृष्ण जन्माष्टमी निम्मित सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!

Taware Tours
Address:
१२८, मनोरमा अपार्टमेंट, चितामणी हॉस्पिटल समोर, देवी चौक, सातारा, ४१५००२.

Contact No :
9850008684
9595291181


05/09/2023

तावरे टूर्स नियोजित अष्टविनायक दर्शन टूर

आमच्या टुरिस्ट चे अतिशय समाधानकारक अभिप्राय
आणि या अष्टविनायक दर्शनातले काही अविस्मरणीय क्षण

चला तुम्ही सुद्धा अनुभवा धार्मिक आणि अविस्मरणीय क्षण तावरे टूर्स सोबत

Taware Tours

१२८, मनोरमा अपार्टमेंट, चितामणी हॉस्पिटल समोर, देवी चौक, सातारा, ४१५००२.
Contact No : 9850008684 / 9595291181

संपूर्ण राजस्थानमेवाड, मारवाडखास आकर्षण तंबूतील मुक्काम 1 Dec 2023, 11 dec 2023, 16 jan 2024एक वेळ रेल्वे स्लीपर class प...
05/09/2023

संपूर्ण राजस्थान
मेवाड, मारवाड

खास आकर्षण तंबूतील मुक्काम

1 Dec 2023, 11 dec 2023, 16 jan 2024

एक वेळ रेल्वे स्लीपर class प्रवास
एक वेळ विमान प्रवास
प्रत्येकी 45,500/-

Taware Tours

१२८, मनोरमा अपार्टमेंट, चितामणी हॉस्पिटल समोर, देवी चौक, सातारा, ४१५००२.
Contact No : 9850008684 / 9595291181

Explore केरळगुरुवायूर। कोचीन । मुन्नार । थेकडी आलेप्पी । बॅक वॉटर । तिरुअनंतपूरम कालडी । रामेश्वरम | मदुराई । कन्या कुमा...
04/09/2023

Explore केरळ

गुरुवायूर। कोचीन । मुन्नार । थेकडी आलेप्पी । बॅक वॉटर । तिरुअनंतपूरम कालडी । रामेश्वरम | मदुराई । कन्या कुमारी

रेल्वे स्लीपर class प्रवासासहित
प्रत्येकी 38,500/-
30 Nov 2023

Taware Tours

१२८, मनोरमा अपार्टमेंट, चितामणी हॉस्पिटल समोर, देवी चौक, सातारा, ४१५००२.
Contact No : 9850008684 / 9595291181

HAPPY RAKSHA BANDHAN... Bond Of Love And Carefor more info call us on 9850008684 / 9595291181                           ...
30/08/2023

HAPPY RAKSHA BANDHAN...
Bond Of Love And Care

for more info call us on
9850008684 / 9595291181



Happy Nagpanchami..Taware Tours१२८, मनोरमा अपार्टमेंट, चितामणी हॉस्पिटल समोर, देवी चौक, सातारा, ४१५००२.Contact No:985000...
21/08/2023

Happy Nagpanchami..

Taware Tours
१२८, मनोरमा अपार्टमेंट, चितामणी हॉस्पिटल समोर, देवी चौक, सातारा, ४१५००२.
Contact No:
9850008684
9595291181

HAPPY INDEPENDENCE DAYfor more info call us on 9850008684 / 9595291181
15/08/2023

HAPPY INDEPENDENCE DAY

for more info call us on
9850008684 / 9595291181

जग पाहण्याचं स्वप्नं तुमचं, ते पूर्ण करण्याचं ध्येय आमचं...!for more info call us on 9850008684 / 9595291181            ...
02/08/2023

जग पाहण्याचं स्वप्नं तुमचं, ते पूर्ण करण्याचं ध्येय आमचं...!

for more info call us on
9850008684 / 9595291181

अष्टविनायक दर्शन मोरगावसिद्धटेकपालीमहडरांजणगावओझरथेऊरलेण्याद्री23, 24, 25 ऑगस्ट2 Night 3 Day'sfor more info call us on 9...
26/07/2023

अष्टविनायक दर्शन
मोरगाव
सिद्धटेक
पाली
महड
रांजणगाव
ओझर
थेऊर
लेण्याद्री
23, 24, 25 ऑगस्ट
2 Night 3 Day's

for more info call us on
9850008684 / 9595291181

महाराष्ट्रातील प्रसिद्धसाडेतीन शक्तिपीठे बघण्याचा योग तेही तावरे टूर्स सोबतfor more info call us on 9850008684 / 9595291...
22/07/2023

महाराष्ट्रातील प्रसिद्ध
साडेतीन शक्तिपीठे बघण्याचा योग तेही तावरे टूर्स सोबत
for more info call us on
9850008684 / 9595291181

संपूर्ण जगाची सवारी चला करुया फिरायची तयारीfor more info call us on 9850008684 / 9595291181                             ...
15/07/2023

संपूर्ण जगाची सवारी चला करुया फिरायची तयारी
for more info call us on 9850008684 / 9595291181

अधिक मास स्पेशलप्रस्थान - 1 ऑगस्ट - 10 दिवसीयसाडेतीन शक्तीपीठे, पाच ज्योतिलिंग शेगाव सहतुळजापुर- कोल्हापुर - माहुरगड - व...
14/07/2023

अधिक मास स्पेशल
प्रस्थान - 1 ऑगस्ट - 10 दिवसीय
साडेतीन शक्तीपीठे, पाच ज्योतिलिंग शेगाव सह
तुळजापुर- कोल्हापुर - माहुरगड - वणी त्र्यंबकेश्वर - औंढा नागनाथ- परळी वैजनाथ - घृणेश्वर - भिमाशंकर आणि शेगांव- आंबेजोगाई - नाशिक- अजिंठा
for more info call us on 9850008684 / 9595291181

II असो कोणतेही स्थान होई विठ्ठलाचेच भान II आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा !
29/06/2023

II असो कोणतेही स्थान होई विठ्ठलाचेच भान II
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा !

चला स्वत:चे लाड करूयात भारताचे दर्शन करायला जाऊयातfor more info call us on 9850008684 / 9595291181                      ...
26/06/2023

चला स्वत:चे लाड करूयात भारताचे दर्शन करायला जाऊयात
for more info call us on 9850008684 / 9595291181

देशविदेशात फिरा आणि धम्माल मस्ती कराfor more info call us on 9850008684 / 9595291181
23/06/2023

देशविदेशात फिरा
आणि धम्माल मस्ती करा
for more info call us on 9850008684 / 9595291181

कुटुंबासह चला प्रवासाला for more info call us on 9850008684 / 9595291181
22/06/2023

कुटुंबासह चला प्रवासाला
for more info call us on 9850008684 / 9595291181

सण सौभाग्याचा, बंध हा अतूट नात्याचाया मंगलदिनी पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छावटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
03/06/2023

सण सौभाग्याचा, बंध हा अतूट नात्याचा
या मंगलदिनी पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

Experience the Vibrant Charms of Thailand's Pattaya with Taware Tours. Unforgettable Adventures Await!Tour date - 27 Oct...
03/06/2023

Experience the Vibrant Charms of Thailand's Pattaya with Taware Tours.
Unforgettable Adventures Await!
Tour date - 27 October
4 Nights 5 Days All Inclusive

Address

Satara
415002

Opening Hours

Monday 9am - 8pm
Tuesday 9am - 8pm
Wednesday 9am - 8pm
Thursday 9am - 8pm
Friday 9am - 8pm
Saturday 9am - 8pm

Telephone

9850008684

Alerts

Be the first to know and let us send you an email when Taware Tour's posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share

Category