Raigad

Raigad Raigad

सुरमई साडेसातशेला मिळते. पापलेट  तेराशे रुपयांना. मटण साडेआठशे रुपयांना मिळते. आज काय घ्यावे  याचा विचार करत लिंबाखाली ब...
06/08/2024

सुरमई साडेसातशेला मिळते. पापलेट तेराशे रुपयांना. मटण साडेआठशे रुपयांना मिळते. आज काय घ्यावे याचा विचार करत लिंबाखाली बसलेलो. तोच एका लेबरचा फोन आला. म्हणाला, ‘साहेब जरा पैशांची नड होती.’ मी म्हणलं ‘हा, संध्याकाळी बघू.’ ‘होय साहेब’ म्हणत त्यानं फोन ठेवला. दुपारी अठ्ठावण्ण रुपये लीटरची चितळे दुधाची पिशवी, दीडशे रुपयांचा श्रीखंडाचा डबा आणि पासष्ट रुपयांची लोणच्याची पुडी घेऊन घरी गेलो. घरात गेल्या गेल्या बायकोनं ऑनलाईन मागवलेल्या तीन साड्या दाखवल्या. प्रत्येक साडी साडेसातशे रुपयांची. साड्या बघतानाच पुन्हा त्या लेबरचा फोन आला. म्हणाला, ‘सायेब आत्ता जमलं का भेटायला ?’ वैतागत म्हणालो, ‘अरे बाबा आत्ता लय उन हे. मी येतो की संध्याकाळी. ’केविलवान्या आवाजात तो म्हणाला, ‘साहेब मी आलोय चालत चौकापर्यंत.’

मला धक्काच बसला. म्हणालो, ‘अरे तु एवढ्या उन्हात दोन किलोमीटर चालत आलाय? खुपच गरज आहे का पैशांची?’ हतबल होत म्हणाला, ‘होय साहेब.’ भुवयांचा आकडा करत म्हणालो, ‘किती पैशे पाहिजेत?’ तसा दबक्या आवाजात म्हणाला, ‘शंभर रुपये पायजे होते साहेब.’ ‘थांब थांब आलो मी.’ असं म्हणत गाडी चालू करुन चौकात गेलो. मला पाहताच त्यानं काळपट तोंडावरचा घाम पुसला. आदबीनं हसला. म्हणालो, “काय रे कशाला एवढे अर्जंट पैसे पायजे होते ? सासऱ्याना दारू पाहिजे का मेहुणा हारला जुगारात?
तसा तो उसणं हसू तोंडावर आणत म्हणाला, ‘साहेब तीन दिवस झालं हाजरीच नाय मिळाली. काल दळण टाकलय हितल्या गिरणीत. ते आणाय पैशेच नाय. रात्रीचे पाव खाल्ले पोरींनी. पण आता भुक लागली म्हणून रडाय लागल्यात. म्हणून मग तुम्हाला फोन केला.

याची एक पोरगी दोन वर्षांची, दुसरी तीन महिन्याची.
दीर्घ उसासा घेत मी त्याच्या हातात शंभरच्या दोन नोटा टेकवल्या. तसा हसत म्हणाला, ‘एवढे नको साहेब. शंभर बास होत्यान. पगार झाल्याव तुम्हाला वापस करीन.’ त्याच्या उत्तरांनी तोंडातली थुंकीच सुकली. दोन्ही हात जोडून नमस्कार करत तो गिरणीच्या दिशेनं चालत निघाला.

माझ्या घरातले मासे, श्रीखंड, दुध, लोणचं सगळं बेचव करीत तो बाजरीच पीठ आणायला निघाला होता.माझी बायको दोन अडीच हजारच्या साडया पाहुन जेवढी खुश झाली, त्याहुन जास्त खुश याची बायको होणार होती….

निशब्द…

मित्रांनो, सगळ्या गोष्टींचं सोंग करता येतं, पण पैशाचं व पोटाच सोंग नाही करता येत. आपल्यापैकी बरेच लोकं चांगल्या नोकरीला आहेत. कुटुंबाच्या सर्व गरजा सर्वोपरी पूर्ण जरूर करा. पण काबाड कष्टकऱ्यांना ५०-१०० देताना हात आखडू नका. आज मजुरांचे दिवस वाईट आहेत. बऱ्याच लोकांवर खरोखर कठीण प्रसंग आहे.....🙏
c/p
Laxman Yedage
❤️🎉🙏🏻

Jai Gurudev
04/07/2024

Jai Gurudev

28/05/2024
Raigad
28/05/2024

Raigad

28/05/2024
कुणबी युवा मेळावा (७वा वर्धापनदिन सोहळा)रविवार, दि.७ मे २०२३, सायंकाळी ५वाजतास्थळ - गो.म.वेदक विद्यालय मैदान, मु.पो.ता.त...
05/05/2023

कुणबी युवा मेळावा (७वा वर्धापनदिन सोहळा)
रविवार, दि.७ मे २०२३, सायंकाळी ५वाजता
स्थळ - गो.म.वेदक विद्यालय मैदान, मु.पो.ता.तळा

#कुणबीयुवामेळावा_ग्रामिण
#कुणबीयुवामेळावा
#७वावर्धापनदिन
#कुणबीयुवातळा

Address

Tala
402111

Telephone

+918369418932

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Raigad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Raigad:

Videos

Share

Category


Other Tour Agencies in Tala

Show All

You may also like