Vighnaharta Tours And Travels

Vighnaharta Tours And Travels Tour Packages, Air Booking, Railway and ST Reservation, Private Vehicle Booking, Hotel Booking, Food

26/01/2023
यंदाच्या आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविकांसाठी मुंबई, नवी मुंबई, ठाणे येथून प्रवासासाठी लागणारी बस, कार, टेम्...
22/06/2022

यंदाच्या आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविकांसाठी मुंबई, नवी मुंबई, ठाणे येथून प्रवासासाठी लागणारी बस, कार, टेम्पो ट्रॅव्हलर तसेच इतर वाहने माफक दारात मिळतील. बुकिंग साठी आजच संपर्क साधा...
९९८७३३९९६६ / ९३२३३३९९६६

यंदाच्या पावसाळ्यात निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्याच्या विचारात असाल, तर तुमच्या रोड ट्रिप साठी विघ्नहर्ता ट्रॅव्हल्स ची ...
22/06/2022

यंदाच्या पावसाळ्यात निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्याच्या विचारात असाल, तर तुमच्या रोड ट्रिप साठी विघ्नहर्ता ट्रॅव्हल्स ची साथ हवीच...! मान्सून पर्यटनासाठी लागण्याऱ्या बस, कार, टेम्पो ट्रॅव्हलर अशा सर्व प्रकारची वाहने बुकिंग तसेच हॉटेल बुकिंग अगदी माफक दारात भेटतील. आजच संपर्क साधा आणि आपली मान्सून ट्रिप बुक करा... संपर्क : ९९८७३३९९६६ / ९३२३३३९९६६

If you are thinking of enjoying nature in this rainy season. you need the support of Vighnaharta Travels for your road trip...! All types of vehicles required for monsoon tourism such as bus, car, Tempo Traveler booking as well as hotel booking will meet at reasonable prices. Contact us today and book your monsoon trip.

Contact: 9987 33 99 66 / 9323 33 99 66

30/08/2021
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा ॥
01/05/2021

दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा ॥

सत्राणें उड्डाणें हुंकार वदनीं ।करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनीं ।आमच्या सर्व पर्यटकांना 'श्री हनुमान जयंती' च्या मनःपूर्वक...
27/04/2021

सत्राणें उड्डाणें हुंकार वदनीं ।
करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनीं ।
आमच्या सर्व पर्यटकांना 'श्री हनुमान जयंती' च्या मनःपूर्वक शुभेच्छा..!
कोरोनाचा उपद्रव अजून कमी झाला नसून सर्वांनी घरीच थांबून हा सण आपल्या कुटुंबियांसोबत आनंदानं साजरा करा. कोरोनाचा लवकरात लवकर नायनाट होऊ देत, अशी प्रार्थना आम्ही अंजनीसूत मारुतीराया चरणी करतो.

चैत्र शुद्ध प्रतिपदा, अर्थात गुढीपाडवा. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला या वेळेस कोरोना सारख्या भयाण राक्षस...
13/04/2021

चैत्र शुद्ध प्रतिपदा, अर्थात गुढीपाडवा. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला या वेळेस कोरोना सारख्या भयाण राक्षसाचं सावट आपल्यावर आहे त्यामुळे, परंपरा जपुया, पण काळजीपूर्वक. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

हिंदवी स्वराज्य संस्थापक, शौर्य व पराक्रमाचे प्रतिक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना जयंतीदिनी विघ्नहर्ता टूर्स अँड ट्रॅ...
31/03/2021

हिंदवी स्वराज्य संस्थापक, शौर्य व पराक्रमाचे प्रतिक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना जयंतीदिनी विघ्नहर्ता टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा मानाचा मुजरा.

आपल्या अभंग व कीर्तनाच्या माध्यमातून समाजातील अंधश्रद्धा दूर करून समाजाला नवी दिशा देणारे जगद्गुरू श्री तुकाराम महाराज य...
30/03/2021

आपल्या अभंग व कीर्तनाच्या माध्यमातून समाजातील अंधश्रद्धा दूर करून समाजाला नवी दिशा देणारे जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांच्या पवित्र स्मृतीस त्रिवार वंदन !

या होळीत अज्ञान,अंधःकार,द्वेष आदि दुर्गुणांचे दहन व्हावे, ही अपेक्षा. सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा.
28/03/2021

या होळीत अज्ञान,अंधःकार,द्वेष आदि दुर्गुणांचे दहन व्हावे, ही अपेक्षा. सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीदिनी विघ्नहर्ता टूर्स कडून विनम्र अभिवादन!शिवजयंतीच्या सर्व...
19/02/2021

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीदिनी विघ्नहर्ता टूर्स कडून विनम्र अभिवादन!
शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

श्री. ईश्वर चव्हाण यांना विघ्नहर्ता ट्रैवल परिवाराकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...
10/02/2021

श्री. ईश्वर चव्हाण यांना विघ्नहर्ता ट्रैवल परिवाराकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

दत्त संप्रदायाच्या पवित्र यात्रेचा शुभारंभ म्हणजे "ब्रम्हा, विष्णु आणि महेश" यांचं दर्शन... आणि त्याची सूरवात करूया आई क...
15/11/2019

दत्त संप्रदायाच्या पवित्र यात्रेचा शुभारंभ म्हणजे "ब्रम्हा, विष्णु आणि महेश" यांचं दर्शन... आणि त्याची सूरवात करूया आई करवीर निवासिनी "अंबाबाईच्या" आशीर्वादाने.
कोल्हापूर, नृसिंह वाडी, आकल्कोट आणि गाणगापूर यात्रा खास विघ्नहर्ता टुर्स अँड ट्रॅव्हल्स बरोबर २१, २२, २३ आणि २४ नोव्हेंबर २०१९

15/11/2019
विघ्नहर्ता टुर्स अँड ट्रॅव्हल्स परिवारातर्फे आपणा सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा... चला... देश विदेशातील पर्यटन...
08/10/2019

विघ्नहर्ता टुर्स अँड ट्रॅव्हल्स परिवारातर्फे आपणा सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा...
चला... देश विदेशातील पर्यटनाच सिंहावलोकन करूया.!

पाचवे पुष्प...!!!भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते भाद्रपद शुद्ध एकादशी या ८ दिवसाच्या कालावधीत आम्ही तुम्हाला माहीत करून देणार आ...
06/09/2019

पाचवे पुष्प...!!!

भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते भाद्रपद शुद्ध एकादशी या ८ दिवसाच्या कालावधीत आम्ही तुम्हाला माहीत करून देणार आहोत महाराष्ट्रातल्या अष्टविनायकांची माहिती.

स्वस्ति श्री गणनायकंम गज - मुखंम मोरेश्वरम, सिद्धितंम, बल्लाळ स्तु विनायकंम. स्मरणे चिंतामणी स्थेवरम, लेण्याद्री गिरिजात्मजम, सुवर्धंम विघ्नेश्वरम ओझरम, गिर्ये रंजन संस्थित महागणपती नमो नमः

अष्टविनायकातील पाचवा गणपती म्हणजे थेऊर गावचा चिंतामणी
चिंतामणी (थेऊर) हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे

चिंतामणी गणपतीचे मंदिर

गणपतीचे मंदिर हे धरानिधर महाराज देव यांनी बांधले. १०० वर्षांनंतर पेशव्यांनी तेथे भव्य व आकर्षक मंदिर व सभागृह बांधले. हे मंदिर पूर्णपणे लाकडापासून बनवले आहे. त्याकाळी हे मंदिर बांधायला ४० हजार रूपये लागले होते. युरोपीयांकडून पेशव्यांना पितळाच्या दोन मोठ्या घंटा मिळाल्या होत्या. त्यातील एक महाडला असून दुसरी येथे आहे. वयाच्या २७व्या वर्षी माधवराव पेशव्यांना क्षयरोग झाला. तेव्हा त्यांना येथे आणण्या‍त आले. या गणपतीसमोरच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांची पत्‍नी रमाबाई त्यानंतर सती गेल्या. त्यांच्या स्मरणार्थ येथे बाग तयार करण्यात आली आहे. मोरया गोसावी यांना येथेच सिद्धी प्राप्त झाल्याचेही सांगितले जाते. श्री चिंतामणीचे मंदिर भव्य असून मंदिराच्या आवारात एक मोठी घंटा आहे. मंदिरातील मूर्ती स्वयंभू असून डाव्या सोंडेची, आसन घातलेली व पूर्वाभिमुख आहे. त्याच्या दोन्ही डोळ्यात लाल मणी व हिरे आहेत. हे मंदिर आजही मजबूत स्थितीत आहे.

चिंतामणी गणपतीची आख्यायिका

ब्रम्हदेवाने आपले चित्त स्थिर करण्यासाठी गणपतीची या जागी आराधना केली. त्यामुळे या गावाला थेऊर असे नाव पडले, अशी अख्यायिका आहे. यासंदर्भात आणखी एक कथा आहे. राजा अभिजीत व राणी गुणवतीचा मुलगा गुणाने कपिलमुनींकडे असलेला चिंतामणी हे रत्‍न चोरले. कपिलमुनींना हे कळले तेव्हा त्यांनी गणपतीला ते रत्‍न गुणाकडून परत आणण्याची विनंती केली. गणपतीने गुणाचा वध करून ते रत्‍न कपिलमुनींना दिले. मात्र, कपिलमुनींनी हे रत्‍न गणपतीला अर्पण केले. गणपतीच्या गळ्यात त्यांनी ते घातले व त्यांची चिंताही दूर झाली. त्यामुळे गणपतीला येथे चिंतामणी या नावाने ओळखले जाऊ लागले.

चौथे पुष्प...!!!भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते भाद्रपद शुद्ध एकादशी या ८ दिवसाच्या कालावधीत आम्ही तुम्हाला माहीत करून देणार आह...
06/09/2019

चौथे पुष्प...!!!

भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते भाद्रपद शुद्ध एकादशी या ८ दिवसाच्या कालावधीत आम्ही तुम्हाला माहीत करून देणार आहोत महाराष्ट्रातल्या अष्टविनायकांची माहिती.

स्वस्ति श्री गणनायकंम गज - मुखंम मोरेश्वरम, सिद्धितंम, बल्लाळ स्तु विनायकंम. स्मरणे चिंतामणी स्थेवरम, लेण्याद्री गिरिजात्मजम, सुवर्धंम विघ्नेश्वरम ओझरम, गिर्ये रंजन संस्थित महागणपती नमो नमः

अष्टविनायकातील चौथा गणपती म्हणजे महड गावचा वरदविनायक
महड गावचा वरदविनायक हिंदू देवता गणेशाच्या अष्टविनायक मंदिरांपैकी एक आहे. हे महाराष्ट्र, भारत, रायगड जिल्ह्यातील कर्जत आणि खोपोली जवळील खालापूर तालुक्यात महड गावात आहे. हे मंदिर पेशवे जनरल रामजी महादेव बिवालकर यांनी बांधले (पुनर्संचयित केले)

वरदविनायक गणपतीचे मंदिर

वरदा विनायक या मंदिराची मूर्ती स्वयंभू (स्वत: मूळ) असून ती लगतच्या तलावात सन १६९० मध्ये बुडलेल्या अवस्थेत सापडली. हे मंदिर सुभेदार रामजी महादेव बिवालकर यांनी स्थापना करून मंदिर बांधले असे म्हणतात. मंदिराचा परिसर एका सुंदर तलावाच्या एका बाजूला आहे. या मंदिराची मूर्ती पूर्वेकडे आहे आणि त्याची खोड डावीकडे वळाली आहे. या मंदिरात तेलाचा दिवा आहे जो १८९२ पासून सतत जळत असल्याचे सांगितले जाते. या मंदिरात मुशिका, नवग्रह देवता आणि शिवलिंगाचीही मूर्ती आहे. मंदिराच्या चारही बाजूला पहारेकरी असलेल्या हत्तींच्या चार मूर्ती आहेत. या अष्टविनायक मंदिरात भक्त गाभाऱ्यात दाखल होऊ शकतात आणि त्यांना पुष्पांजली वाहू शकतात आणि वैयक्तिकरित्या त्या मूर्तीला आदर करतात. वर्षभर भाविक वरादविनायक दर्शनास भेट देतात. माघा चतुर्थी सारख्या सणांच्या वेळी या मंदिरात प्रचंड गर्दी दिसून येते.

वरदविनायक गणपतीची आख्यायिका

पौराणिक कथा अशी आहे की निःसंतान राजा, कौडिन्यापूरचा भीमा आणि त्यांची पत्नी विश्वामित्र ऋषीं यांना भेटले होते जेव्हा ते तपश्चर्येसाठी जंगलात आले होते. विश्वामित्रने राजाला जप करण्यासाठी एक मंत्र गजर मंत्र दिला आणि अशा प्रकारे त्याचा मुलगा आणि वारस, राजकुमार रुकमागंदाचा जन्म झाला. रुक्मगंडा एक सुंदर तरुण राजपुत्र झाला.

एके दिवशी शिकारीच्या प्रवासावर रुक्मागंडा ऋषीं वाचकवीच्या आश्रमात थांबला. ऋषींची पत्नी, मुकुंदा, देखणा राजपुत्र पाहून त्याच्या प्रेमात पडली आणि तिला आपल्या इच्छेनुसार करण्यास सांगितले. सद्गुण राजकुमार सरळ नकार देत आश्रम सोडला. मुकुंदा खूप प्रेमळ झाला. तिची दुर्दशा जाणून राजा इंद्रने रुक्मगंडाचे रूप धारण केले आणि तिच्यावर प्रेम केले. मुकुंदा गर्भवती झाली व तिला ग्रीत्समदा हा मुलगा झाला.

कालांतराने, जेव्हा ग्रीत्समदाला त्याच्या जन्माच्या परिस्थितीची जाणीव झाली, तेव्हा त्याने आपल्या आईला शाप दिला की तो कुजलेला, काटेरी पाने असलेली (भोर) वनस्पती बनशील. मुकुंदाने त्यानंतर ग्रीत्समदाला शाप दिला की त्याच्यातून एक क्रूर राक्षस (राक्षस) जन्म घेईल. तेवढ्यात दोघांना एक स्वर्गीय वाणी ऐकू आली, "ग्रितसमदा इंद्राचा पुत्र आहे", यामुळे त्या दोघांनाही धक्का बसला, परंतु संबंधित शाप बदलण्यास उशीर झाला. मुकुंदाचे भोर रोपात रूपांतर झाले. ग्रितसमदा लज्जास्पद आणि पश्चात्ताप करणारे, पुष्पक जंगलात परतले, जिथे त्याने गणपतीची परतफेड करण्यासाठी प्रार्थना केली (गणपती).

गृत्समदाच्या तपश्चर्येने भगवान गणेश प्रसन्न झाले आणि त्यांनी शंकराच्या (शिव) सोडून इतर कोणाकडूनही पराभूत होणार नाही असा मुलगा होईल अशी वरदान दिली. ग्रिटसमदा गणेशांना जंगलाला आशीर्वाद देण्यास सांगतात, जेणेकरून येथे प्रार्थना करणारे कोणतेही भक्त यशस्वी होतील, तसेच गणेशाला तेथे कायमचे रहाण्याचे आवाहन केले आणि ब्रह्मदेवाचे ज्ञान मागितले. ग्रितसमदाने तेथे एक मंदिर बांधले आणि तेथे बसलेल्या गणेशमूर्तीला वरदविनायक म्हणतात. आज जंगल भद्रका म्हणून ओळखले जाते.

महाराष्ट्राची अध्यात्मिक गाथा I I अष्टविनायक यात्रा I I.
04/09/2019

महाराष्ट्राची अध्यात्मिक गाथा I I अष्टविनायक यात्रा I I.

मुसळधार पावसात छत्र छायेप्रमाणे तो आमच्या सोबत होता... भीमाशंकर च्या दाट धुक्यातून आम्हाला मार्ग दाखवण्यासाठी तो आमच्या ...
04/09/2019

मुसळधार पावसात छत्र छायेप्रमाणे तो आमच्या सोबत होता... भीमाशंकर च्या दाट धुक्यातून आम्हाला मार्ग दाखवण्यासाठी तो आमच्या सोबत होता... आम्हाला रांजणगावात पोहोचायला उशीर होत असताना त्याने दर्शनासाठी गाभारा उघडा ठेवला आणि त्याने आम्हाला दर्शन दिले, तिथेही तोच होता... त्याने जेजुरी गडावरती भंडारा उधळला... त्याने आम्हाला लेण्याद्री च्या पायऱ्या चढविल्या आणि मुख्य म्हणजे आमची यात्रा निर्विघनपणे पूर्ण केली...तो म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका विघ्नहर्ता श्री. गणपती होता.!!!

आम्ही पुन्हा येतोय तुझी अष्ठवधी रूप पाहायला.!
पुन्हा एकदा त्याच उत्साहात आणि त्याच भक्ती - भावात घेऊन येतोय. महाराष्ट्राची अध्यात्मिक गाथा सांगणारी .I I अष्टविनायक यात्रा I I.

आजच आमच्या कार्यालयात भेट द्या आणि आपली सीट बुक करा...
गणपती बाप्पा मोरया... मंगल मूर्ती मोरया...!

तिसरे पुष्प...!!!भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते भाद्रपद शुद्ध एकादशी या ८ दिवसाच्या कालावधीत आम्ही तुम्हाला माहीत करून देणार आ...
04/09/2019

तिसरे पुष्प...!!!

भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते भाद्रपद शुद्ध एकादशी या ८ दिवसाच्या कालावधीत आम्ही तुम्हाला माहीत करून देणार आहोत महाराष्ट्रातल्या अष्टविनायकांची माहिती.

स्वस्ति श्री गणनायकंम गज - मुखंम मोरेश्वरम, सिद्धितंम, बल्लाळ स्तु विनायकंम. स्मरणे चिंतामणी स्थेवरम, लेण्याद्री गिरिजात्मजम, सुवर्धंम विघ्नेश्वरम ओझरम, गिर्ये रंजन संस्थित महागणपती नमो नमः

अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणजे बल्लाळेश्वर (पाली)
बल्लाळेश्वर (पाली) हे रायगड जिल्ह्यातील पाली गावातले गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे.गणेश पुराणात अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणून पालीचा बल्लाळेश्र्वर ओळखला जातो. अष्टविनायकातला हा एकच असा गणपती आहे की जो भक्ताच्या नावाने (बल्लाळ) प्रसिद्ध आहे. बल्लाळ हा गणपतीचा असीम भक्त होता.

बल्लाळेश्वर गणपतीचे मंदिर

या मंदिराची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे, जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा त्याची किरणे मूर्तीच्या अंगावर पडतात. या मंदिराच्या दोन्ही बाजूस दोन तलाव आहेत. त्यातील एकाचे पाणी रोजच्या पूजेसाठी वापरले जाते. स्वयंभू असलेल्या या मूर्तीचे डोळे हिर्‍यांपासून बनवले आहेत, गणपतीच्या अंगावर उपरणे व अंगरखा अशी वस्त्रे आहेत. नाना फडणवीस यांनी या लाकडी मंदिराचे दगडी मंदिरात रूपांतर केले.

बल्लाळेश्वर गणपतीची आख्यायिका

विश्वामित्र ऋषींनी भीमराजास, भृगु ऋषींनी सोमकांत राजास श्री बल्लाळेश्वराची कथा सांगितली असा उल्लेख आहे. तर मुद्गल पुराणात जाजलीने विभांडक ऋषींना श्री बल्लाळविनायकाची कथा सांगितल्याचा उल्लेख आहे. कृत युगात येथे पल्लीपूर नांवाचे नगर होते. तेव्हा तेथे कल्याण नांवाचा वैशवाणी राहत असे. या कुटूंबात बल्लाळ नांवाचा सुपुत्र झाला. बल्लाळ लहानपणा पासून ध्यानधारणा व गणेशचिंतनात मग्न असे. अध्ययन व व्यापार न करता बल्लाळ भक्ती मार्गाला लागला व इतर सवंगड्यांनाही तेच करायला लावीत असे, म्हणून कल्याण शेठजींनी बल्लाळचा गणपती दूर फेकून दिला आणि बल्लाळला एका झाडाला बांधून ठेवले. नंतर बल्लाळने घरी जाणार नाही येथेच तुला देह अर्पण करीन अशा दृढनिश्चयाने ईश्वरचिंतन केले. त्याचा भक्तिभाव पाहून श्री गजाननाने विप्र रूपात प्रकट होऊन त्यांनी बल्लाळला बंधनातून मुक्त केले व त्याला वर दिला. बल्लाळाने विनायकाला विनंती केली की, आपण येथे कायमचे वास्तव्य करून भक्तांच्या मनोकामना पूर्ण कराव्यात. तो वर बल्लाळाला देवून श्री गजाननाची स्वयंभू मूर्ती प्रकट झाली. बल्लाळविनायक या नावाने श्रीगणेश येथील शिळे मध्ये अंतर्धान पावले. तीच ही बल्लाळेश्वराची मूर्ती आहे.

दुसरे पुष्प...!!!भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते भाद्रपद शुद्ध एकादशी या ८ दिवसाच्या कालावधीत आम्ही तुम्हाला माहीत करून देणार आ...
03/09/2019

दुसरे पुष्प...!!!

भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते भाद्रपद शुद्ध एकादशी या ८ दिवसाच्या कालावधीत आम्ही तुम्हाला माहीत करून देणार आहोत महाराष्ट्रातल्या अष्टविनायकांची माहिती.

स्वस्ति श्री गणनायकंम गज - मुखंम मोरेश्वरम, सिद्धितंम, बल्लाळ स्तु विनायकंम. स्मरणे चिंतामणी स्थेवरम, लेण्याद्री गिरिजात्मजम, सुवर्धंम विघ्नेश्वरम ओझरम, गिर्ये रंजन संस्थित महागणपती नमो नमः

अष्टविनायकातील दुसरा गणपती म्हणजे सिद्धटेकचा सिद्धिविनायक
सिद्धटेक (सिद्धिविनायक) हे अहमदनगर जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. श्री विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारा, कार्य सिद्धीस नेणारा हा सिद्धिविनायक अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेचा एकमेव गणपती आहे.अष्टविनायकांमधील हा दुसरा गणपती ओळखला जातो.

सिद्धटेकच्या सिद्धिविनायकाचे मंदिर

मंदिरातील सिद्धिविनायकाची मूर्ती स्वयंभू असून ती तीन फूट उंच व अडीच फूट रुंद आहे. आहे. मूर्तीचे तोंड उत्तरेकडे असून ती गजमुखी आहे. सोंड उजवीकडे असल्याने सोवळे कडक आहे. त्यामुळे हा गणपती भक्तांसाठी कडक मानला जातो. गणपतीने एक मांडी घातली असून त्यावर ऋद्धि-सिद्धी बसलेल्या आहेत. प्रभावळीवर चंद्र, सूर्य,गरुड यांच्या आकृत्या असून मध्यभागी नागराज आहे. या देवळाला एक प्रदक्षिणा घालायची म्हणजे १ किलोमीटर चालावे लागते. पेशवेकालीन महत्त्व लाभलेल्या ह्या सिद्धिविनायकाच्या मंदिराचा गाभारा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधला. देवाचे मखर पितळेचे असून सिंहासन पाषाणाचे आहे.छोट्याश्या टेकडीवर असलेल्या या देवळाचा रस्ता पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके यांनी तयार केला. मात्र, १५ फूट उंचीचे व १० फूट लांबीचे हे देऊळ अहिल्याबाई होळकर यांनी बांधले.

सिद्धटेकच्या सिद्धिविनायक गणपतीची आख्यायिका

मधु व कैटभ या असुरांशी भगवान विश्णू अनेक वर्षे लढत होते. मात्र, त्यात त्यांना यश प्राप्त होत नव्हते. तेव्हा शंकराने विष्णूला गणपतीची आराधना करायला सांगितली. याच ठिकाणी गणपतीची आराधना करून विष्णूने असुरांचा वध केला.

हरिपंत फडके यांचे सरदारपद पेशव्यांनी काढून घेतले, तेव्हा फडक्यांनी या मंदिरास २१ प्रदक्षिणा घातल्या. त्यानंतर २१ दिवसांनी त्यांची सरदारकी त्यांना परत मिळाल्याची आख्यायिका सांगितली जाते. या मंदिराच्या जवळून भीमा नदी वाहते.

भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते भाद्रपद शुद्ध एकादशी या ८ दिवसाच्या कालावधीत आम्ही तुम्हाला माहीत करून देणार आहोत महाराष्ट्रातल...
02/09/2019

भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते भाद्रपद शुद्ध एकादशी या ८ दिवसाच्या कालावधीत आम्ही तुम्हाला माहीत करून देणार आहोत महाराष्ट्रातल्या अष्टविनायकांची माहिती.

स्वस्ति श्री गणनायकंम गज - मुखंम मोरेश्वरम, सिद्धितंम, बल्लाळ स्तु विनायकंम. स्मरणे चिंतामणी स्थेवरम, लेण्याद्री गिरिजात्मजम, सुवर्धंम विघ्नेश्वरम ओझरम, गिर्ये रंजन संस्थित महागणपती नमो नमः

अष्टविनायकातील पहिला गणपती म्हणजे मोरगावचा मयुरेश्वर
मोरेश्वर (मोरगाव) हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे मंदीर आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. अष्टविनायकातील सर्वांत पहिला गणपती म्हणून मोरगावचा मयूरेश्वर ओळखला जातो.

मोरगावच्या मोरेश्वराचे मंदिर

मोरेश्वराचे मंदिर म्हणजे एक प्रशस्त गढीच आहे. मंदिर काळ्या दगडापासून तयार करण्यात आले असन ते बहामनी काळात बांधले गेले. गावाच्या मध्यभागी असलेल्या या देवळाला चारही बाजूंनी मनोरे आहेत. मोगल काळात देवळावर आक्रमण होऊ नये म्हणून या देवळाला मशिदीसारखा आकार दिला आहे. देवळाच्या बाजूने ५० फूट उंचीची ‍संरक्षण भिंत आहे. गाभार्‍यातील मयूरेश्वराची मूर्ती बैठी, डाव्या सोंडेची, पूर्वाभिमुख आणि अत्यंत आकर्षक आहे. मूर्तीच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवले आहेत. मस्तकावर नागराजाचा फणा आहे. मूर्तीच्या डाव्या- उजव्या बाजूस ऋद्धिसिद्धीच्या पितळी मूर्ती असून पुढे मूषक व मयूर आहेत.

मयूरेश्वर गणपतीची आख्यायिका

असे मानले जाते की, पूर्वी सिंधू नावाच्या असुराने पृथ्वीतलावर उत्पात माजवला होता, त्याचा नाश करण्यासाठी देवांनी अखेर गणपतीची आराधना केली, तेव्हा गणपतीने मयूरावर आरूढ होऊन येथे सिंधू असुराचा वध केला.त्यामुळे गणपतीला येथे मयूरेश्वर असे नाव पडले

श्री. गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा...!!!गणपती बाप्पा मोरया... मंगल मूर्ती मोरया... 🌺१४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती ...
02/09/2019

श्री. गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा...!!!

गणपती बाप्पा मोरया... मंगल मूर्ती मोरया... 🌺

१४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती म्हणजे श्री. गणेश, विद्या आणि दयेचा सागर म्हणजे श्री. गणेश, आणि आपले सर्व विघ्न दूर करणारा विघ्नहर्ता म्हणजे श्री. गणेश.
आज गणेश चतुर्थी च्या मंगल दिवशी तुम्हाला सुख, शांती, समाधान आणि ऐश्वर्य लाभो हीच श्री. गणेशा चरणी प्रार्थना...

पुन्हा एकदा विघ्नहर्ता टुर्स अँड ट्रॅव्हल्स परिवारातर्फे गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा...!!!

पंढरपूर हे संतांचे माहेर घर, तर शेगांव हे भक्तांचे !आयुष्याचे तिर्थक्षेत्र करणारी शेगाव यात्रायात्रेच्या संपूर्ण माहितीस...
31/08/2019

पंढरपूर हे संतांचे माहेर घर, तर शेगांव हे भक्तांचे !
आयुष्याचे तिर्थक्षेत्र करणारी शेगाव यात्रा

यात्रेच्या संपूर्ण माहितीसाठी आणि सीट बुक करण्यासाठी संपर्क
• कार्यालय : गाळ क्रमांक ३, ए विंग, तुकाराम पार्क, आकाशगंगा सोसायटी समोर, राबोडी क्रमांक - २, ठाणे पश्चिम, ४००६०१.
• संपर्क : शरद शिंदे : 9987339966 I प्रणित मोरे : 9076339966 I भारती शिंदे : ९३२३३३९९६६
• इ - मेल : [email protected]
• संकेत स्थळ : www.vighnahartatravels.com

दिवाळी २०१९तीर्थक्षेत्रांच्या मंगलमय यात्रा...!!!आजच भेट द्या आमच्या ठाणे येथील कार्यालयात आणि दिवाळी सुट्यांमधील आपली स...
29/08/2019

दिवाळी २०१९
तीर्थक्षेत्रांच्या मंगलमय यात्रा...!!!
आजच भेट द्या आमच्या ठाणे येथील कार्यालयात आणि दिवाळी सुट्यांमधील आपली सीट आजच बुक करा.

प्रथम अष्टविनायक यात्रा २०१९ - सांगता समारंभ सर्व मान्यवरांचे आणि आमच्या पर्यटक अथितीचें हार्दिक आभार...!तुमचं प्रेम आणि...
19/08/2019

प्रथम अष्टविनायक यात्रा २०१९ - सांगता समारंभ
सर्व मान्यवरांचे आणि आमच्या पर्यटक अथितीचें हार्दिक आभार...!
तुमचं प्रेम आणि आशीर्वाद कायम असुद्या...

Address

Shop No/3, A Wing, Tukaram Park, Opp Aakashganga CHS, 2nd Rabodi
Thane
400601

Opening Hours

Monday 9am - 10pm
Tuesday 9am - 10pm
Wednesday 9am - 10pm
Thursday 9am - 10pm
Friday 9am - 10pm
Saturday 9am - 10pm
Sunday 9am - 10pm

Telephone

+919987339966

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vighnaharta Tours And Travels posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Vighnaharta Tours And Travels:

Share

Category


Other Tour Agencies in Thane

Show All