वाई हे प्रचीन काळापासून अत्यंत पवित्र समजले गेलेले क्षेत्र आहे. येथे प्राचीन काळी पांडव वनवासात रहात असत. भीमाने येथे कीचकास ठार मारले अशी कथा आहे.
येत्रे पुष्कळ घाट व देवळे आहेत. गहगापुरीच्या घाटापैकी पहिला दोनशे फुटांचा भाग गंगाधरराव रास्तयांनी 1789 मधे बांधला. याला भाऊ जोशी यांनी आणखी 76 फुटाची व दुसर्या बाजीरावाने ऐंशी फुटाची जोड दिली. जवळच गंगापुरी वाडा व उमामहेश्वर पंचायतानाचे देऊळ आहे. हे देऊळही रास्त्यांनी 1784 मध्ये बांधले. या मंदिराच्या चारी कोपर्यात विष्णु, लक्ष्मी, गणपती व सुर्याची मंदिरे आहेत. गंगारामेश्वराचे मंदिरही रास्त्यानी 1780 मधे बांधले. जवळच ढाकळेश्वर महादेवाचे देऊळ आहे. त्याच्यापुढे एक मोठा नंदी आहे. गणपतराव भिकाजी रास्ते यांनी 1762 साली 1,60,000/- खर्चून गणपतीचे प्रचंड देऊळ बांधले. जवळचा घाट गणपतरावांचा भाऊ आनंदराव भिकाजी रास्ते यांनी बांधला. गणपतीच्या देवळाची उंची सत्तर फूट आहे. सर्व देवळात उत्तम असे काशी विश्वेश्वराचे मंदिर आनंदराव रास्त्यानी 1757 मधे बांधले. या व अन्य काही देवळांवर मुसलमानी शिल्पांचा प्रभाव आहे. या देवळातील नंदीच्या गळ्यातील घंटा व फुले प्रेक्षणीय आहेत.
मंडईच्या पूर्वेला महालक्ष्मी मंदिर आनंदराव रास्त्यांनी 2,75,630 रू. खचे करून 1778 मधे बांधले. याच रास्त्यांनी 1774 मधे 2,16, 250 खर्चून विष्णु मंदिर बांधले. 1740 ते 1854 ज्या दरम्यान महादेवाची आठ मंदिरे बांधण्यात आली. 1785 मधे आनंदराव रास्त्यांनी बाधलेल्या घाटावर व्यंकोबा बाबाने 1861 साली एक दत्त मंदिर बांधले. भोरकरांच्या पणजीने ताईसाहेबांनी विठोबाचे देऊळ बांधले.
1789 मधे आनंदराव रास्त्यांनी मोतीबाग हा महत्वाचा वाडा बांधला. या वाड्यात सुरेख चित्रे होती. पेशव्यांनी कृष्णेच्या दुसर्या तीरावर जाण्यास एक पूल बांधला होता.
समर्थांनी येथे रोकडोबा मारूती येथे स्थापन केला.
वाईच्या दक्षिणेस अफजलखानाने ब्रह्मणाना वेठीला धरून आपला वाडाडा बांधला. एका बाजूला कृष्णा नदी व दोन बाजूनी ओढे अशा रितीने वाड्याच्या तिन्ही बाजूनी पाणी होते. वाड्याचा दगड किकलीतले देऊळ उद्ध्वस्त करून आणला होता.
1429 मधे दौलताबादच्या मालिक उत् तुजार नावाच्या बहामश्री सरदाराने रामोशी आणि खटावचे बंंडखोरांचा पराभव करून वाई घेतली. 1453 ते 1480च्या दरम्यान वाई बहामनी राज्याचे महत्वाचे लष्करी ठाणे होते.
1648 मधे अफज